खोली क्रमांक ३०७... भाग - ४ (अंतिम भाग)
रियाने गार्डला पाहिलं त्या क्षणी रियाच्या हातातील टॉर्च खाली पडला. गार्ड दारात शांतपणे उभा होता—डोळ्यांत एक विचित्र स्थिर नजर. ना राग, ना घाई… फक्त थंड, भेदक शांतता.
“रिया… पळायचं का?” मितालीने कापऱ्या आवाजात विचारलं पण रिया मात्र त्या दाराकडे पाहतच राहिली.
गार्ड हलकेच पुढे आला आणि म्हणाला—
गार्ड हलकेच पुढे आला आणि म्हणाला—
“राग मानू नका… मी कोणालाही त्रास देत नाही. मी फक्त… 307 ची देखरेख करतो.”
रियाने थरथरत विचारलं.“नेहा कुठे आहे?! तिला काय केलं तू?” हे विचारताच गार्डच्या ओठांवर एक मंद, भीतीदायक हसू उमटलं.
“नेहा? ती इथेच आहे.” तो बोटांनी भिंतीकडे इशारा करत म्हणाला. आणि परत पुढे बोलू लागला.
“भिंतीमध्ये… तुमच्या सारख्याच घाबरलेल्या अवस्थेत आहे ती.” हे ऐकताच रियाचा व मितालीचा रक्त गोठलं.
मितालीने लगेच घाबरून रियाचा हात धरला.
मितालीने लगेच घाबरून रियाचा हात धरला.
“ये रिया, आपण बाहेर जाऊ या!” मिताली ओरडली आणि दोघी मागे सरकू लागल्या, तेवढ्यात भिंत हलायला लागली. आणि आतून पुन्हा तोच आवाज—
ठक… ठक… ठक…
तो आवाज ऐकून रियाच्या डोळ्यांत पाणी आलं मितालीही घाबरून ओरडली.
“नेहा… नेहा आहे का आत?! आम्ही तुला बाहेर काढू!” मितालीच्या ओरडण्यावर गार्ड हसला.
“गरज नाही. तिची जागा तिथेच आहे... आणि लवकरच तुम्हा दोघींचीही.” तो म्हणाला. इतक्यात 307 च्या पलीकडून अचानक जोराचा वारा सुटल्यासारखा आवाज आला. गडद अंधारातून एक सावली त्यांच्या दिशेने धावून आली.
रिया आणि मिताली दाराबाहेर पळाल्या. गार्ड मागे ओरडत होता आणि हसत होता.... “थांबा! 307 सोडून जाऊ नका!”
पण तरीही त्या दोघी पायऱ्या उतरून जमेल तितक्या वेगाने मुख्य गेटकडे पळाल्या.
गार्ड वरून येण्याचा प्रयत्न करत होता, पण पायऱ्यांवरचा जुना गंजलेला लोखंडी रेलिंग तुटून तो खाली कोसळला.
त्याच्या ओरडण्याचा आवाज काही क्षण दुमदुमला… आणि शांतता.
त्याच्या ओरडण्याचा आवाज काही क्षण दुमदुमला… आणि शांतता.
रीया आणि मिताली हॉस्टेलबाहेर येऊन थांबल्या.
श्वास जोरात चालू होता. डोळ्यांत भीतीने धूसरपणा आला होता.
श्वास जोरात चालू होता. डोळ्यांत भीतीने धूसरपणा आला होता.
त्यानी मागे वळून पाहिलं 307 च्या खिडकीत कोणीतरी उभं होतं.त्यांच्याकडे पाहत. हलतही नव्हतं. गार्ड नव्हता. कोणीच नव्हतं. फक्त एक अंधारी छाया.
मिताली हळूच म्हणाली—
“रिया… तो गार्ड नव्हता. तो फक्त 307 चा पहारेकरी होता. ते आत… जे कोण आहे… त्याच्यापासून आपल्या जिवाला धोका आहे." हे ऐकून रिया थबकली. दोघीही एकमेकींकडे पाहू लागल्या.
“रिया… तो गार्ड नव्हता. तो फक्त 307 चा पहारेकरी होता. ते आत… जे कोण आहे… त्याच्यापासून आपल्या जिवाला धोका आहे." हे ऐकून रिया थबकली. दोघीही एकमेकींकडे पाहू लागल्या.
त्यांना आता सत्य कळलं होतं... 307 चं गूढ गार्ड नव्हता… काहीतरी वेगळंच होतं. काहीतरी… जे अजूनही जिवंत आहे. ते खुप जवळ आहे पण दिसत नाही.
दोघींनी त्या रूमकडे पाहिलं त्याचवेळी 307 च्या खिडकीतली ती सावली हळूहळू गायब झाली.
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा