अपहरण ( भाग नववा )

This is a created story by writer. All the characters, locations and situations are just imagination of writer. If anyone feel like , this story was happened in past. So it will be a coincidence. All the rights reserved to writer.

टीना पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली आणि घराकडे चालत निघाली. पोलिसांनी केलेल्या चौकशीमुळे ती घाबरून गेली होती. तिने तिचा मोबाईल ऑन केला. मोबाईलवर १२ मिसकॉलच नोटिफिकेशन दिसत होतं. ते नोटिफिकेशन बघून सुद्धा तिने मोबाईलचं लॉक खोललं नाही. ती तशीच चालत घरी गेली. तिच्या मोबाईलवर अजून सुद्धा काही कॉल येतच होते. हो..! तिच्या कॉलेजमधील मित्रांचे..! टीना खूप टेन्शनमध्ये होती. घरी जाऊन ती शांत बसून राहिली.

टीनाचे ते तीन मित्र कॉलेजमध्ये गेले होते. पोलिसांनी त्यांचे नंबर मिळवून साक्षी मॅडमना पाठवून दिले. त्यांचे कॉल रेकॉर्ड मागवले गेले. साक्षी मॅडम टीनाची चौकशी केल्यानंतरचे अपडेट्स द्यायला शिर्के सरांकडे गेल्या.

" जय हिंद सर..!"

" जय हिंद..!"

" आज टीनाला चौकशीसाठी बोलावलं होतं."

"ओके. काही माहिती मिळाली का..?"

" आम्ही विचारलेल्या प्रश्नांची तीने जरा अडखळत उत्तरे दिली. पण मला वाटतं, ती पोलीस स्टेशनमध्ये आल्यामुळे थोडी घाबरली असेल. तिच्या एका उत्तरातून अस समजलं की केतकीच्या वडिलांचा स्वभाव कडक आहे."

" म्हणजे ..?"

" सर..! केतकीच अपहरण झाल्यापासून टिनाने केतकीच्या नंबरवर कॉल केला नाही. म्हणून मी तिला बोलले की तू तिच्या घरी चौकशीला जाऊ शकली असतीस. तर टीना म्हणाली, की त्यांच्या घरी कोण जाणार. तिचे वडील कडक स्वभावाचे आहेत." 

" पण केतकीच्या वडिलांच्या वागण्याबोलण्यावरून तरी तस वाटतं नाही."

" हो सर..! मला वाटलं की टीना काहीही उत्तरे देत आहे. म्हणून मी तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे. "

"ओके."

" दुसरं अस की टीनाच्या मित्रांवर पण लक्ष ठेवलंय. पण त्यांची चौकशी करायला मिळाली तर बरं होईल."

" हं...! " शिर्के सर जरा विचारात पडले," साक्षी. काम कर..!"

"येस सर..?"

" तू टीनाच्या घरी जा..! तिथे तिला कम्फर्टेबल फील झालं आणि तिन्हे काही सांगितलं तर बघा..! पण तिच्या घरच्यांच्या परवानगीने हां...!!"

" हो नक्की..!"

एवढ बोलून साक्षी मॅडम शिर्के सरांच्या केबिनमधून बाहेर आल्या. त्यांनी त्यांचा युनिफॉर्म बदलून साधे कपडे घातले आणि त्यांच्या गाडीतून टीनाच्या घरी गेल्या. टीनाच्या घरच्यांना कसं हाताळायचं ह्याचा विचार साक्षी मॅडम करत होत्या. टीनाच्या घरी पोहोचल्यावर त्यांनी दारावरची बेल वाजवली. आतून एका महिलेने दार उघडलं.

" जी..?"

" नमस्कार! मी साक्षी...!"

" हां.. बोला.."

" मी पोलीस स्टेशनमधून आली आहे. मला टीनाला भेटायचं आहे."

" टीनाला ..? की टोनीला..?"

" टीना. टीनाला.."

त्या बाईने टीनाला आवाज दिला आणि साक्षी मॅडमना आत बोलावलं. आत येताच हॉलमध्ये एक २७-२८ वर्षाचा तरुण ट्रॅक पॅन्ट आणि स्लीवलेस टीशर्ट घालून सोफ्यावर बसलेला दिसला. साक्षी मॅडम उभ्याच होत्या. तेवढ्यात टीना बाहेर आली. साक्षी मॅडमना पाहताच तिने त्या तरुणांकडे बघितलं आणि ती आत निघून गेली. साक्षी मॅडमना समजलं नाही की टीनाला काय झालं. साक्षी मॅडम तिच्या मागून आतल्या रूम मध्ये गेल्या.

" टीना.! मला तुझ्याबरोबर काही बोलायचंय..! "

" मी सांगितलं तुम्हाला. मी काही नाही केलंय..!" टीनाची चलबिचल होत होती.

" माझ्याकडे बघ..! तुला काही होणार नाही. मला माहित आहे की तुला काहीतरी सांगायचंय...!"

" नाही मॅडम..! "

" बघ..! तू पोलीस स्टेशनमध्ये आली होतीस तेंव्हा मी तुला काही केलं का..? नाही ना..? तिथे तुला भीती वाटली असेल म्हणून मी इथे आले..!"

टीना रडायला लागली. तिला सावरून घेत असताना त्यांच्या घरची महिला आत आली आणि टीनाला म्हणाली,

" बेटा..! क्या हुआ..?"

टीना रडतच होती. साक्षी मॅडम तिचे हात हातात घेऊन बोलल्या,

" ट्रस्ट मी. तुला काही नाही होणार. तुला जे माहीत आहे ते सांग..!"

" तुला माहीत आहे का केतकीला कोणी किडण्याप केली होती...?"

टीना आता खूपच रडायला लागली आणि थोड्यावेळाने रडत रडतच बोलली,

" टोनी..."

" काय बोललीस ..! परत बोल..!"

"टोनी..!"

" कोण हा टोनी...?"

टोनी नाव ऐकताच ती महिला ओरडली. " टोनी..! मुझे लगा ही था इसने कूच तो किया हैं। इतना उछल जो रहा है दो दिन से..!"

" कोण आहे हा टोनी...?"

" माझा चुलत भाऊ..! ह्यांचा मुलगा..!"

" कुठे आहे तो..? त्याने केतकीला पळवल होत का..?"

" हो..! तो बाहेर बसलाय..!"

" काय...?" एवढ बोलून साक्षी मॅडम हॉलमध्ये आल्या आणि पाहतात तर टोनी म्हणजे तो हॉल मध्ये बसलेला मुलगा गायब होता. साक्षी मॅडम जिन्याकडे बघू लागल्या . पण तो दिसेनासा झाला होता. साक्षी मॅडम टीनाकडे आल्या आणि बोलल्या, 

"त्याचा नंबर दे लवकर...!"

टीनाने नंबर दिला. तो नंबर त्यांनी हवालदार शिंदेंना पाठवला. एवढ्यात बिल्डिंग मधुन गाडी बाहेर जाण्याचा आवाज झाला. ती बघायला म्हणून साक्षी मॅडम विंडोकडे धावल्या. एक राखाडी रंगाची अल्टो कार जाताना दिसली. साक्षी मॅडमनी हवालदार शिंदेंना कॉल केला. शिंदेंनी कॉल उचलताच,


" हॅलो.! शिंदे...!"

" बोला मॅडम..!"

" मी तुम्हाला एक मोबाईल नंबर पाठवला आहे. तो आत्ता लगेच सरव्हेइलन्स्ला टाका. केतकीच्या अपहरण प्रकरणातील आरोपीचा हा नंबर आहे. तो एका राखाडी रंगाच्या अल्टो कार मधून गुरूनगर २ येतून पळाला आहे. सरांना सांगून नाका बंदी करा...! मी लगेच त्याचा फोटो आणि त्या गाडीचा नंबर तुम्हाला पाठवते."एवढं बोलून साक्षी मॅडमनी कॉल कट केला. 

" टीना..! टोनीच्या गाडीचा नंबर माहीत आहे ना..!"

" नाही मॅडम.."

" ओहह..नो..!"

" पण मॅडम.. माझ्याकडे टोनीचे फोटोस आहेत. त्यात त्याच्या गाडीचा नंबर भेटेल."

"लवकर शोध..!"

टीनाने तिच्या मोबाईल मधून टोनीच्या गाडीचा फोटो शोधून काढला. त्या गाडीचा नंबर दिसणारा फोटो आणि टोनीचा फोटो तिने साक्षी मॅडमना पाठवला. साक्षी मॅडमनी तो लगेच हवालदार शिंदे आणि शिर्के सरांना फॉरवर्ड केला. त्यांनी शिर्के सरांना कॉल केला.

" हॅलो सर.."

" हॅलो साक्षी. मला शिंदे बोलले सगळं. मी नाकाबंदी करायला सांगितली आहे. तो जास्त लांब जाऊ शकणार नाही. "

" हो सर..! मी त्याचा फोटो आणि गाडीचा फोटो ही पाठवला आहे..!"

" ओके..!"

" सर..! तो त्याचे कोणी साथीदार असतील तर त्यांच्याकडे ही जाऊ शकतो..!"

" हो..! पण आपण त्याचा शोध घेऊया..!मग ते ही सापडतील. एक आरोपी तरी आपल्याला समजला आहे."

" ओके सर..! सर मी इथे टीनाच्या घरी थांबते..! टोनी इथे परत येण्याची शक्यता आहे..!"

" ठीक आहे..!"

"ओके सर..!"

साक्षी मॅडमनी कॉल ठेवला. टीना हॉल मध्ये येऊन बसली होती. साक्षी मॅडम तिच्या बाजूला बसल्या आणि तिला बोलल्या,

" टीना..! तुला कधी माहिती पडलं की हे टोनीने केलंय."

" मी गेल्या दोन तीन दिवसात त्याच्या बोलण्यावरून ओळखल होत. मला तस वाटतं होतं की हा काहीतरी प्लॅन करतोय. मग केतकी किडण्याप झाली आहे हे समजलं आणि त्याच दिवशी रात्री ती घरी आल्याचं ही समजलं. बरोबर त्याच रात्री टोनी खूप लेट घरी आला. त्या नंतर तो खूप खुश होता..! "

" अजून काही डिटेल मध्ये ऐकलं होतंस का.? "

" नाही मॅडम..! मला काही नाही ना होणार..? "

" तुला कशाला काय होईल..!"

" मी आधी पोलिसांना कॉल केला नाही म्हणून..?"

" नाही ग..! तू घाबरली होतीस.. पण आता तू आमची मदत केलीस की नाही..!"

" हो..!"

" मग तुला काही होणार नाही.."

साक्षी मॅडम तिथेच बसल्या होत्या.  तासाभरात साक्षी मॅडमना समजलं की टोनीची कार हायवेला टोल नाक्यावर पोलिसांनी पकडली. पोलिसांनी टोनीला ताब्यात घेतलं होत. साक्षी मॅडमनी ही खबर टीनाला सांगितली आणि त्या पोलीस स्टेशनला गेल्या. टोनीला पकडून गुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल.

🎭 Series Post

View all