अपहरण ( भाग दुसरा )

A created story by writer. All the characters, situations, locations and city names are just imagined. If anyone feel like this story was happened and based on that situation, so it will be just coincidence. All the rights reserved to writer .

साक्षी मॅडम केतकीच्या केसमध्ये गुंतल्या जात होत्या. रात्रभर त्यांनी बऱ्याच वेळा केतकीचा नंबर चालू झाला होता का याच्या अपडेट घेतल्या होत्या. केतकीचा नंबर ऑफच होता. सकाळचे ७.३० झाले होते. सकाळच्या ड्युटीवरचे पोलीस कर्मचारी हळूहळू हजर होऊ लागले होते. ८ वाजण्याच्या काही वेळ आधी पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि आत सुद्धा बुलेट गाडीचा आवाज येऊ लागला. गुरूनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक उमेश शिर्के त्यांच्या बुलेट गाडीवरून हजर झाले होते. गाडीवरून उतरून स्टेशन मध्ये येताच सगळे पोलीस कर्मचारी त्यांना सॅल्यूट ठोकू लागले. जय हिंद सर, जय हिंद सर असा आवाज बराच वेळ ऐकू येत होता. 

उमेश शिर्के. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ४ वर्षापूर्वी  घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेत त्यांच्या जिल्यात प्रथम आलेले विद्यार्थी. त्यानंतर त्यांच्या कामाचा आलेख कायम उंचावत ठेऊन ते आता पोलीस निरीक्षक झाले होते. पिळदार शरीरयष्टी आणि भारदार आवाज त्यांना शोभत होता. शिर्के त्यांच्या केबिन मध्ये येताच मागून 'जय हिंद सर' चा आवाज घुमला.

 आवाज ओळखूनच शिर्के म्हणाले , 

" या विचारे मॅडम...!" आणि शिर्के त्यांच्या खुर्चीवर बसले. 

साक्षी मॅडम हातात काही कागद घेऊन त्यांच्या सामोर उभ्या होत्या. 

" गुड मॉर्निंग सर. "

" व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम. पण तुमची नाईट काही चांगली गेली नाही असं वाटतंय..!"

" तस काही नाही सर..! "

" काही नाही कसं..! तुमचा हावभाव आणि तुमच्या मागे तुमच्या हातातले पेपर्स सगळं सांगतायत..." 

" हां सर....! एक केस आली आहे मिसिंगची. २१ वर्षाची मुलगी रात्री १०.३० पासून मिसिंग आहे. तिच्याकडे तिचा मोबाईल होता. पण तो ऑफ येतोय. पुढे काही अपडेट नाही.  तिच्या घरच्यांना इथे बोलावलं आहे."

" ठीक आहे. मी बघतो. तुम्ही निघू शकता. "

" नाही सर..! मी तीच रिक्वेस्ट करायला आली आहे की ही केस मला द्यावी."

" ठीक आहे. तुम्हाला ह्या केसचे सगळे अपडेट्स मिळत राहतील. पण सद्या तुमची ड्युटी संपली आहे. आता घरी जाऊन आराम करा. संध्याकाळी यालच तुम्ही. "

" नाही सर. केतकीचे आईवडील इथे येतायत. त्यांची चौकशी होईपर्यंत मी थांबते...!"

" साक्षी.! " आता शिर्के साहेब आपलं पद बाजूला ठेऊन साक्षीबरोबर बोलू लागले. 

" ही केस एका मुलीची आहे. त्यामुळे ह्या केसबद्दल तुझं असं वागणं मी समजू शकतो.पण इथे मी किंवा कोणीही अशा केसकडे एक महत्वाची केस म्हणूनच पाहतो.  "

"हो सर..! पण..."

" ठीक आहे. ठीक आहे...! तू थांब..! "

" थॅंक्यु सर..!" बोलून साक्षी केसची माहिती शिर्के सरांना देऊ लागली.  

काही वेळाने केतकीचे आई वडील पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांना एका रूम मध्ये बसवण्यात आलं. तिथे शिर्के सर , साक्षी मॅडम आणि हवालदार शिंदे ही उपस्थित झाले. शिंदेंकडे बघून शिर्के हसले. कारण शिंदेंची ही ड्युटी संपली होती, तरी ते थांबले होते.

शिर्के सर केतकीच्या आई वडिलांच्या समोर बसले. मध्ये टेबल होता. केस बद्दलची बरीच माहिती आधी जमा होती. पण अधिकची माहिती रात्री घेणं बरोबर न्हवत. शिर्के सरांनी प्रश्न विचारायची सुरुवात केली.

" तुम्ही काय करता..? "

" मी एका खाजगी बँकेमध्ये ऑफिसर आहे आणि माझी बायको घरीच असते. " केतकीचे वडील बोलले.

" घरी तुम्ही तिघेच असता का..?"

" हो.."

" घरी नोकर माणूस कुणी येत...?"

" नाही."

" इथे किती वर्षे राहता..?"

" ८ वर्षे झाली..."

" ८ वर्षात कोणाबरोबर काही वाद... म्हणजे विकोपाला गेला होता का...?"

" नाही ओ...! आम्ही साधी माणसं. कोणाबरोबर कसले वाद झाले नाहीत."

" ओके...! केतकी काय करते..? म्हणजे कॉलेज..?"

" हो.. हो... टी.वाय. ला आहे. न्यू कॉलेज मध्ये."

शिर्के शिंदेंकडे बघून बोलले, " केतकीच्या मैत्रिनींना कॉल केला होता का...?"

" आम्ही नाही केला सर. पण हे सांगत होते तीची कुणी खास अशी मैत्रीण नाही. बाकी काहींना त्यांनीच कॉल केला होता. त्यांना काही माहीत नाही. " शिंदेंनी उत्तर दिलं.

" हो सर.! हे केतकीच नवीन कॉलेज होत. जुने असे एक दोनच फ्रेंड तिच्या कॉलेजला तिच्या बरोबर होते. " केतकीचे वडील बोलले.

" ठीक आहे...! आम्ही तिच्या कॉलेज मध्ये चौकशी करूच. शक्यता आहे केतकीच अपहरण झालं असावं. तुम्हाला अपहरण कर्त्यांचा कॉल येऊ शकतो. तुमच्या कडे असलेल्या मोबाईलचे नंबर आम्हाला द्या. अपहरण कर्त्यांचा फोन येताच त्याची कोणतीही मागणी लगेच मान्य करू नका...! जर वेळ मागा...! आम्हाला ही त्याच्या पर्यंत पोहोचायला तेवढा वेळ मिळेल..!"

केतकीच्या वडिलांनी होकारार्थी मान हलवली. केतकीची आई हुंदके देत होती. शिर्के साहेबांनी चौकशी संपली म्हणून सांगितलं आणि ते बाहेर आले. तस साक्षी मॅडम आणि शिंदे ही बाहेर आले. 

" तुम्ही आता दोघे ही घरी जा...! आराम करा..! मी ह्यांच्या बिल्डिंमध्ये आणि केतकीच्या कॉलेज मध्ये चौकशी करायला  माणसं पाठवतो." अस बोलून शिर्के त्यांच्या केबिनमध्ये गेले. साक्षी मॅडम आणि शिंदे घरी जायला निघाले. शिर्के साहेबांनी काही माणसं शहरातील हॉस्पिटलमध्ये कुणी केतकीच्या वयाची मुलगी ऍकसिडन्ट केस मध्ये ऍडमिट आहे का किंवा डेडबॉडी मिळाली आहे का ही चौकशी करायला पाठवली.

केतकीचे आई वडील त्यांच्या घरी पोहोचले. बिल्डिंचे रहिवासी त्यांच्याकडे विचारपूस करायला यायला लागले. केतकीबद्दल अजून काहीच माहिती मिळाली न्हवती. केतकी राहत असलेल्या बिल्डिंमध्ये आणि परिसरात चौकशी करायला गेलेले पोलीस कर्मचारी माहिती मिळवून पोलीस स्टेशनला आले होते. केतकीच्या कॉलेजमध्ये चौकशी करायला गेलेले पोलीस कर्मचारी ही माहिती मिळवून परत आले होते. दोन्ही ठिकाणाहून केसच्या संदर्भात काही मदत होईल अशी माहिती लागली होती.

 पण केसला कलाटणी देणारी घटना घडली. दुपारी २ च्या दरम्यान केतकीचा मोबाईल चालू झाला होता. पोलीसांना त्याची खबर लागली. शिर्के साहेबांना कळवण्यात आलं. पण केतकीचा मोबाईल अपहरण कर्त्यांनी फक्त काही वेळासाठी चालू केला होता. तो ही केतकीच्या वडिलांकडे खंडणी मागण्यासाठी. हो.! केतकीचा मोबाईल फक्त तेवढ्या कारणासाठी ऑन झाला होता. अपहरणकर्त्यांनी त्यांचं डोकं चालवलं होतं. दुसऱ्या नंबर वरून कॉल करून ते त्यांची आयडेंटिटी पोलिसांना देणार न्हवते. केतकीच्या वडिलांच्या मोबाईलवर कॉल आला होता. 

" हॅलो..!"

" काही बोलायचं नाही. फक्त ऐकायचं. तुमची मुलगी सुरक्षित आहे. तिला आम्ही सोडून देऊ पण आम्हाला १० लाख हवे आहेत.तेही ५ तासात. पैसे आम्हाला भेटले की लगेच तुमची मुलगी तुम्हाला मिळेल.जर पोलीस मध्ये आले तर तुमची मुलगी गेली म्हणून समजा." समोरून कॉल केलेल्या व्यक्तीने कॉल कट केला. केतकीच्या वडिलांना काही बोलायला मिळालंच नाही. 

इकडे पोलिसांना ही मोबाईलच लोकेशन ट्रेस करायचाही वेळ मिळाला नाही. आता पोलिसांकडे दोनच पर्याय उपलब्ध होते. एक हा की कॉल आला होता तेव्हा केतकीच्या मोबाईलला कोणत्या टॉवरकडून रेंज मिळाली होती. पण त्याची माहिती मिळवायला सगळ्या परवानग्या घेण्यात खूप वेळ जाणार होता. ती माहिती मिळाली तरी ज्या टॉवरची रेंज केतकीच्या मोबाईलला मिळाली होती, त्या टॉवरची रेंज वापरला जाणारा परिसर मोठा होता. पोलिसांना तेवढा परिसर पिंजून काढावा लागणार होता. दुसरा पर्याय हा होता की फक्त अपहरण कर्त्यांच्या कॉलची वाट बघणं. 

​​​​​​

🎭 Series Post

View all