किती सांगायचं मला (भाग 20)

Aashish called that girl

ऑफिसमध्ये आज एकदम उत्साहाचे वातावरण होते... कारणच तसे होते.... मार्थाचा मुलगा सुहास अमेरिकेहून भारतात येणार होता....सगळीकडे तीच चर्चा चालू होती.... 

रजनी :आता सुहास आपल्या ऑफिसला जॉईन होणार का??  

प्रदीप : सर्व काही त्याच्या मनावर आहे.... बडे लोग, बडी बाते..... आपण काहीच अंदाज लावू शकत नाही.... 

दिवाकर : मी तर एकदम अल्लड सुहास पाहिलेला आता जरा मॅचुअर झाला असेल..... 

आशिष : आज तर कुणाचाच कामाचा मूड दिसत नाही....आज सुहास काही ऑफिसला थोडीच येणार.... आजचा दिवस तर त्याचा जेटलॅग मध्येच जाईल..... 
आशिष : दिवाकरला हळूच... मी आज  त्या मुलीला बोलावले आहे.... अकरा वाजता येणार आहे... ....

दिवाकर : गुड, चला म्हणजे हे एक तरी काम मार्गी लागेल.... 

एक वाजत आला होता सगळेजण आपापल्या कामात व्यग्र होते... तितक्यात नलिनी समायरा आणि तुषारची केबिन शोधत आली.... 

नलिनी :येऊ का आत?? 

नलिनीचा आवाज ऐकून लॅपटॉप वर असलेल्या दोघांच्याही नजरा दरवाजाकडे वळाल्या.... 

समायरा : नलिनी तू !!

नलिनी :आता मी रोजच इथे असणार?? 

समायरा : म्हणजे?? 

नलिनी : अगं मी तुमच्या ऑफिसची app सॉफ्टवेअर developing चं काम घेतलं आहे.... आताच मी जॉईन करून येत आहे.... 

तुषार : काय ?????? 

समायरा : अगं नलिनी आज नाही उद्या जॉईन..... 

तुषार समायराची गोष्ट तोडून... नलिनी अभिनंदन... पण आता तू पटकन केबिनच्या बाहेर जा.... आणि एक गोष्ट लक्षात ठेव की आपण एकमेकांना ओळखत नाहीये.... 
समायरासुद्धा... प्लीज इथून निघ आता.... आपण संध्याकाळी भेटून या विषयावर बोलू...... 

तुषारच्या या वागण्याने समायरा गोंधळून गेली.... 

नलिनी तुषार आणि समायराच्या केबिन मधून बाहेर पडत असताना आशिषने पाहिलं... आणि नलिनीला टोकलं.... 

आशिष : नलिनी तू तिकडे काय करत आहॆस.... 

काय उत्तर द्यायचे असा नलिनी विचार करत असतानाच तुषार बाहेर आला.... 

तुषार : आशिष !! मला वाटलं की नवीन कस्टमर आहे... म्हणून मीच तीला आवाज दिला होता.... पण तीने सांगितलं की ती कस्टमर नाही app developer आहे.... 

ठीक आहे,  ठीक आहे आम्ही आता तीला फायनल केलं आहे... आशिष जरा करडया आवाजात म्हणाला..... 

तुषार : ग्रेट, आशिष you did it....

 हं, i am always great... आशिष कुत्सितपणे ???? म्हणाला.....

तुषार : yes, congratulations..... 

असं म्हणून तुषार त्याच्या जागेवर येऊन बसला.... 

तुषार : समायरा !! आशिष आणि दिवाकर यांना नक्कीच माझा संशय आला आहे..... 

समायरा : तूला असं का वाटतं?? 

तुषार : हे बघ मी यांना काल पाच developer शोधून दिले.... पण तू किंवा मी नलिनीबद्दल एक शब्दही बोललो नाही.... आणि या दोघांनाही आपली आणि नलिनीची ओळख आहे हे माहीती नसावं कदाचीत.... म्हणून त्यानी तीला हायर केलं..... तेही आपल्याला कसलीही कल्पना न देता..... 
समायरा :अरे बापरे ???? मग तर आता सगळंच अवघड आहे.... 

तुषार : नलिनीसोबत यांनी काय डील केलं काय माहीती.... तूम्ही मूली ना थोड्याश्या मूर्ख असतात ????... पटकन कुणावर विश्वास ठेवतात.... 

समायरा :काय म्हणालास?? माहिती तूम्ही पुरुष कसे असता ते.... नुसतं फसवेगिरी करता.... अन तुमच्यात पुरुषी अहंकार तर ठासून भरलेला असतो ????

तुषार: समायरा!! dont take it personally????... तूला कळतंय का??  बरं जाऊदे..... मला काय म्हणायचं आहे,  हे नलीनीला आपण भेटल्यावर कळेलच तूला.... तो पर्यंत आपण आपली कामे केलेली बरी..... 

जॉबला लागल्यापासून आज पहिल्यांदाच समायराने तुषारला  इतकं चिडलेला,अस्वस्थ, काळजी करताना पाहिलं होतं.... म्हणून तीने जास्त वाद घातला, नाही शांत बसली.... 

संध्याकाळी ऑफिस सुटलं......समायराने नलिनीला फोन लावला.... 

एका कॅफेमध्ये तिघेही भेटले..... त्या कॅफे मध्ये धूसर असा प्रकाश होता.... त्या धूसर प्रकाशात एका कोपऱ्यात तिघेही येऊन बसले.... आजूबाजूला कुणाला ऐकू येणार नाही अशी ती जागा आहे का याची खात्री तुषारने करून घेतली.... 

तिघांनीही कॉफीची ऑर्डर दिली...

तुषार : नलिनी !! तूला ऑफिसला कुणी बोलावले होते?

नलिनी : दिवाकर सरांनी !

तुषार : त्यांना तू app developer आहॆस हे कसं कळालं??
 
नलिनी : मी ज्या कंपनीचे app बनवून दिले त्या कंपनीतील  एक जण त्यांचा मित्र आहे... 

तुषार : बरं तूझं आणि त्यांचं काय डील झालं?? 

नलिनी : app तयार करण्याचे दोन लाख रुपये ठरले.... 

तुषार :तू काही कागदपत्रांवर सह्या केल्या आहेत का?? 

नलिनी : हो अग्रीमेंट पेपर वर.... 

तुषार :मग तू एक ना एक पेपर वाचलाच असेल ना?? 

नलिनी : हो.... पण काय झालं??  तू मला असे प्रश्न का विचारत आहॆस??  असं वाटत आहे की तू माझी झडती घेत आहॆस.... 

समायरा : झडती??  त्याने तर आपल्याला मूर्ख ठरवलं???? आहे.... 

थांब समायरा माझं विचारणं अजून पूर्ण नाही झालं.... तुषार एकदम सिरीयस चेहरा करून म्हणाला.. 

तुषार : नलिनी !! तू काही कोऱ्या व्हॉवचर वर सह्या केल्या.... किंवा एखादा कागद फोल्ड करून तुझ्याकडून सह्या घेतल्या का?? 

नलीनीने थोडा विचार केला.... आणि म्हणाली हो एक दोन कागदावर सह्या घेतल्या माझ्या..... 

तुषार :तूला संशय नाही आला का की ह्या गोष्टीचा ते आता एखाद्या फ्रॉड मध्ये वापर करून घेतील याचा.... 

नलिनी : काय?? फ्रॉड.... मला तर ते दोघेही खूप चांगले वाटले..... 

तुषार : आता बोल समायरा !! मी का मूर्ख म्हणालो ते.... 

समायराला तर बोलण्यासाठी काहीच उरले नव्हते आणि नलिनी मात्र पुरती गोंधळली होती.... तीला आलेले टेन्शन तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते... 

तुषार :अगं नलिनी तूला जेव्हा यांचा निरोप आला तेव्हा एकदा पण आमच्यापैकी कुणाला फोन करून कळवावे वाटलं नाही का?? किंवा आल्या आल्या जरी तू आधी आम्हाला भेटली असतीस तरी आम्ही तूला सावध करू शकलो असतो.... 

नलिनी : बापरे.... म्हणजे असं काय घडलं आहे?? मला जरा क्लिअर क्लिअर सांग ना.... 

तुषार : त्या दोघांनी कोऱ्या व्हॉवचर वर तूझ्या नकळत सह्या घेतल्या आहेत...त्यावर ते आता जास्त अमाऊंट लिहिणार.... आणि आमच्या कंपनीकडून लाटणार.... उद्या जर कुणाला संशय आला आणि त्याचं ऑडिट करून घेतलं तर ते पैसे तूझ्या नावावर दिसणार.... म्हणजे तूझ्या नकळत तू त्यांच्या फ्रॉड मध्ये गुंतली आहॆस असा त्याचा अर्थ होतो.... 

नलिनी : बापरे !!???? आता मी काय करू.... नलिनी एकदम टेन्शनने रडायला लागली..... 

समायरा : नलिनी !! हे बघ रडू नकोस....  काहीतरी मार्ग निघेल.. .... या तुषारला काय लागलं म्हणायला..... 

नलिनी : नाही गं समायरा तुषार उलट आपल्याला सावध करत आहे.... पण मीच मूर्ख.... त्या दोघांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवला..... 

नलिनीच्या डोळ्यात अश्रू पाहून तुषारचं मन द्रवलं ????.... त्याच्या हृदयात कालवाकालव झाली????..... 

तुषार : नलिनी !! मला तूला दुखवायचा हेतू नव्हता.... पण काय करू मला तू त्या लोकांच्या तावडीत सापडू नये असच वाटत होतं.... म्हणून आज नाही पण नंतर आम्ही आमच्या ऑफिसमध्ये तूझ्याबद्दल सांगणारच होतो.... 

नलिनी : हो आणि मला वाटलं,  उद्या काय आणि आज काय तुमच्याच ऑफिसमध्ये यायचं आहे म्हणून मी लागलीच होकार दिला..... 

तुषार:नलिनी !! बरं आता ऐक.... ज्या पद्धतीने त्या दोघांनीही तूला हायर केलं आहे याचा अर्थ असा की त्या दोघांनाही माझ्यावर आणि समायरावर संशय आला आहे... म्हणून आपली ओळख आहे हे ऑफिस मध्ये जाणवू देऊ नकोस....

समायरा : तुषार !! हात जोडले ????बाबा तूझ्यापुढे... 

तितक्यात त्यांच्या समोर कॉफी आली..... नलिनी मात्र टेन्शनने कॉफ़ी घेत नव्हती..... 

तुषार : नलिनी !! हे बघ तू आता टेन्शन नको घेऊस.... फक्त ह्या सगळ्या गोष्टीचा तूला अंदाज आला आहे हे कुणाजवळ नको बोलूस.... आपण काहीतरी मार्ग काढू... प्लीज आता तू ही कॉफी घे.... कॉफीचा कप नलिनी  पुढे करत तुषार म्हणाला.... 

समायरा : नलिनी इतक्या प्रेमाने माझा नवरा तूला कॉफी☕️ देत आहे.... घे ना ????

नलीनीने ???? तो कप घेतला आणि टेन्शनमय असलेलं वातावरण जरा हलकं फुलकं झालं..... 

समायरा : नलिनी!! आज आपल्याला उशीर झाला आपण उद्या मॉल मध्ये जाऊ...... 

नलिनी : हो... तसंही टेन्शनने आज माझ्या हातापायात त्राण उरले नव्हते..... मी तूला स्कुटीवर घरी सोडते.... पण तू चालवशील.... 

तुषार : कॉफीचे बिल देऊन... चला मग निघू या आपण.... माझ्या मातोश्री पण घरी वाट पाहत असतील..... 

तिघेही थोडे रिलॅक्स झाले होते..... आणि घरी जाण्यासाठी निघाले...... 
समायरा आणि नलिनी दोघीही घरी आल्या....समायरा स्कुटीवरून उतरली.... 

समायरा : नलिनी मध्ये येतेस?? 

नलिनी : नको गं, उशीर होतो आहे....

समायरा : नलिनी !!तू ठीक आहॆस ना... काही का असेना तुषार तूझी काळजी करतो गं... 

नलिनी : हो.. तू म्हणत आहॆस ते खरं आहे...बरं झालं तुषारला हे सगळं आधीच कळालं..... चल येते मी बाय... 
असं म्हणून नलिनीने तीची स्कुटी सुरु केली....

समायराची आई :आलीस का समु बेटा... मॉल मध्ये गेली होतीस ना !!

समायरा : नाही आई उद्या जाणार आहे.... आज काम थोडं जास्त होतं.... 
इकडे नलिनी तिच्या घरी पोहोचली.... तीचे आई बाबा तीची वाटच पाहत होते.... 

नलीनीचे बाबा : काय??  मिळालं का प्रोजेक्ट?? 

नलिनी : हो बाबा... आता महिनाभर तरी मला या नवीन ऑफिसला जावं लागेल....

जेवण उरकून नलिनी तिच्या बेडरूम मध्ये गेली..... आज तिचं कशातच मन लागत नव्हतं... रडून मोकळं व्हावंसं वाटत होतं.... खरंच आपण एखाद्या फ्रॉड मध्ये अडकलो तर.... टेन्शनने तिचं डोकं दुखत होतं.... 

तितक्यात मेसेंजरच्या नोटिफिकेशनची बेल वाजली..... 

नलिनीने बघितलं....
 तुषार : Hi

नलिनी :hi 

तुषार : कशी आहॆस?? टेन्शन कमी झाले की नाही..... 

नलीनी : तसं म्हणावं तर टेन्शन येत आहे  ... पण तूम्ही दोघे आहेत ना... मला सांभाळून घ्याल याची खात्री आहे .... म्हणून आता थोडं  रिलॅक्स.... 

तुषार :सॉरी 

नलिनी :सॉरी, कशाबद्दल??

तुषार : मी जरा जास्तच बोललो......पण काय करू??  तूझ्यावर काही आळ येऊ नये इतकंच मला वाटतं 

नलिनी : उलट तर मी तूला थँक्स म्हणायला पाहिजे... 

तुषार:आनंदाने  वेलकम वेलकम... बाकी झालं J1

नलिनी : हे काय टिपिकल माणसासारखं विचारत आहॆस.... जेवण वगैरे ????

तुषार :मग अटीपीकल माणसासारखं विचारू?? ????????तूला चालेल?? 

नलिनी :hmm 

तुषार : काय hmm, नलिनी..... 

नलिनी : काय?? 

तुषार : एक विचारू??

नलिनी : काय?? 

तुषार : जाऊ दे... 

नलिनी :????‍♀️, 

तुषार : जाऊदे विचारूनच टाकतो.... 
नलिनी will you be my friend?? 

नलिनी :????‍♀️... तूला हे विचारायचं होतं?? 

तुषार : घाबरून... काय झालं?? 

नलिनी :मला वाटलं तू मला प्रपोज करशील ????????

तुषार :????... नलीनीच्या अश्या अनपेक्षित बोलण्याने तुषार एकदम हुरळून गेला.... नलिनीला सांगून टाकू का एकदा... दोन तीन वेळेस type केलं पण पोस्ट करण्याची हिम्मत मात्र झाली नाही.... 

 तुषारचा काहीच रिप्लाय आलेला नाही हे पाहून नलिनी थोडी डिस्टर्ब झाली..... चल तुषार झोपते मी gn असं म्हणून तीने मोबाईल डाटा बंद केला.... 

तुषारला देखील बोलणं अर्धवट राहिल्याने त्याचं मन खट्टू???? झालं होतं....

आपण कीती मूर्ख आहोत समोरून इतका व्यक्त होण्याचा चान्स मिळाला तरी तो सोडला.... पण एक गोष्ट छान झाली नलीनीच्या मनात आपण आहोत याचा अंदाजा तरी आला..... असं विचार करत तुषारला झोप लागली.... 

दुसरा दिवस तुषार, नलिनी या दोघांमध्ये नवचैतन्य निर्माण करत होता.. दोघांनाही एकमेकांच्या भेटीची ओढ लागली होती....तसंच नवीन प्रोजेक्ट काय आव्हानं घेऊन करावं लागेल याची नलीनीला धाकधूक लागली होती...... 

नलिनी मात्र येता जाता स्वतःला आरशात न्याहाळत होती.... तिला ती छान दिसते का नाही असा वेळोवेळी प्रश्न पडत होता.... ड्रेस निवडताना तीची धांदल उडाली होती....

आज काय झालंय आपल्याला????.... आपण असं वागत आहोत की तुषारला आज पहिल्यांदाच भेटणार आहोत ????मनोमन स्मित करत नलिनी तयार व्हायला लागली....

 नलिनी फक्त प्रोजेक्ट पुरती जॉब वर असल्यामुळे ती 9 to 5 या वेळेसाठी बांधील नव्हती.... तिचा वेळ 11 ते 4 असा ठरला होता...

समायरा नी तुषार दोघेही नेहमीप्रमाणे ऑफिसला आले....

दोन महीने झाले होते समायरा आणि तुषार सोबत येत जात असत, पण इतकं खूष ती त्याला पहिल्यांदाच पहात होती.... 
त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसत होती... तसंच कधी बऱ्यापैकी सुरकुत्या असणारे कपडे आज कडक इस्त्री केलेले होते... 

माणूस प्रेमात पडल्यावर इतका बदलतो?? ???? समायरा मनोमन विचार करू लागली.... 

खरंच दोघेही एकमेकांना  छान सूट होतात ... यांना लवकरच एकत्र आणावं लागेल... परत असा समायरा मनातच विचार करू लागली.... 

तुषार मात्र थोडया थोडया वेळाने घड्याळ बघत होता आणि दरवाजाकडे बघत होता.... 

अकरा वाजता येणार आहे....  न राहवून समायरा बोलली..

समायराच्या त्या बोलण्याने तुषार एकदम कॉन्शियस झाला.... आणि लॅपटॉप मध्ये तोंड खुपसून बसला.... 

हा तोच तुषार आहे का?? मला माझ्याशी लग्न करशील का डायरेक्ट विचारणारा.... तुषार समोरचं लॅपटॉप हातात घेऊन समायरा म्हणाली.... 

तुषार :का?? ????तूला असं का वाटतं..... 

समायरा : नलिनी.... 

तुषारने लागलीच वळून दरवाजाकडे बघितलं..... नलिनीचं आगमन झालं होतं.... 

नलिनी बरोबर यांच्या केबिनच्या दरवाजा जवळ आली स्मित करून आशिष आणि दिवाकर असणाऱ्या केबिन कडे गेली... 

एकमेकांना पाहून दोघांचे चेहरे खुलले होते.... 

समायरा : तुषार !! नलिनी आली की तूझ्या चेहऱ्याचा रंग बदलला..... काय कारण आहे.... 

तुषार :काही नाही.... 

समायरा : हे बघ तुषार मला इतकं कळतं तू जर नलिनीला लवकर  बोलला नाहीस तर.... तीचे वडील खूप कडक आहेत.... आणि नलिनीच्या लग्नाचंही बघत आहेत..... तूझ्या हाती काही लागणार नाही.... 

तुषार : हूं

तितक्यात नलिनी तिथे आली.... 

नलिनी : Excuse me.!!.. मी नलिनी... तुमच्या कंपनीचं app बनवत आहे त्या साठी मी इथे आले आहे....  तूम्ही हनिमून पॅकेजवर काम करत आहात right?? 

समायरा  आणि तुषार अवाक होऊन नलिनीकडे बघायला लागले... 

नलिनीच्या मागे दिवाकर देखील त्यांच्या केबिन मध्ये घुसला.... 

समायरा :  yes नलिनी आम्ही हनिमून पॅकेज वर काम करत आहोत...... 

नलिनी : त्याच्या रिगार्डिंग तूम्हाला त्या पॅकेज मध्ये पाहिजे त्याचं एक फोल्डर तयार करून मला ई-मेल करा.... काही ऍनिमेशनच्या जाहिरातीपण आहेत ना त्या सगळ्या मला ई-मेल करा...... 

दिवाकर देखील नलीनीचे काम बघून अचंबित होत होता.... 

कामावर रुजू होऊन तास भरही झाला नसेल तर नलिनीने सगळ्या विभागाकडून त्यांच्या त्यांच्या पॅकेजची माहिती गोळा करण्याची जोरदार सुरुवात केली होती.... 

नलिनीचे  सगळ्यांना भेटून झाल्यावर ती स्वतःच्या जागेवर जाऊन बसली..... 

किती विचित्र वाटलं ओळख असूनही अनोळखी असं वागताना... खरंच समायरा आणि तुषारची कमाल आहे....अनोळखी असून नवरा आणि बायकोची acting करावी लागत आहे.... असं मनात म्हणायला लागलीm

ईकडे समायरा डोक्याला हात मारून बसली.????‍♀️.. 

तुषार : समायरा !! काय झालंय..... 

समायरा : किती हा सावळा गोंधळ.... लग्नाचं एक नाटक काय कमी होतं आता नलिनी आणि मी अनोळखी असल्याचं नाटक पण करावं लागणार..... 

तुषार : काय करणार.... मला मनापासून वाटतं की मार्थाला कुठला धोका होऊ नये.... 

समायरा : आपण तरी वेगळं काय करतोय?? आपण पण  तर मार्थाला धोका देत आहोत ना ..... समायरा थोडी इमोशनल झाली... 

तुषार : अगं पण ती आपली मजबुरी आहे अन आपण कुणाचं नुकसान थोडी करत आहोत...समायरा !! आशिष ईकडे येत आहे.... 

समायराने तीची नजर फिरवली... आशिषला पाहून लॅपटॉप वर काहीतरी काम करते आहे असे भासवू लागली. 

आशिष : तुषार, समायरा  कशी वाटली आपली app developer?? 

तुषार : आशिष !! तू निवडलीस ना तीला मग नंबर एक  असणारच त्यात वादच नाही.....तीची काम करण्याची पद्धत देखील अतीउत्तम आहे....त्यामुळे आपल्या कंपनीची app परफेक्ट होणार हे नक्की.... 

समायरा : हो, खूप हुशार आहे ती... 

थँक्स थँक्स, आशिष एकदम खूष होऊन मनाला.... खूप दिवसांनी पहिल्यांदाच त्याच्या मनासारखं झालं होतं.. 
त्यामुळे तो खूप खूष होता.....

क्रमश :
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे 
©®सुजाता. स्वानुभव /सप्तरंग 

🎭 Series Post

View all