किती सांगायचं मला (भाग 8)

Nalini went to tushar's house

दुसरा दिवस उजाडला समायरा नेहमीसारखी तयार होऊन ऑफिसला निघाली... आधल्यादिवशी खरेदी केलेले खोटे मंगळसूत्र ????तीने पर्समध्ये???? व्यवस्थित आहे की नाही याची हळूच खात्री केली...... 

आज मात्र समायराला पून्हा भीती ????वाटायला लागली होती...असुरक्षित वाटायला लागलं होतं..खरंच नलिनीने जी शंका व्यक्त केली तसा जर तुषार असला तर..

 पण नाही आठ दिवस झाले आम्ही सोबत एका मोटरसायकल वर आम्ही फिरतो आहोत... त्याचा साधा धक्का देखील लागणार नाही याची तो काळजी घेत आहे.. ... त्याच्या बॉडी लँग्वेज वरून तो बिलकुल फालतू वाटत नाही...

एकदा फक्त तो खरं बोलत आहे की खोटं याची माहीती काढायला हवी..... 

असा विचार करूत समायरा नेहमीच्या ऑफिसजवळच्या बस स्टॉपवर बसने पोहोचली.... 

तुषार तिथे हजर होताच.... समायरा मोटरसायकलवर बसली... आज मात्र तीने तोंडाला बांधायला स्कार्फ आणला होता... तो आधी बांधला आणि नेहमीपेक्षा जास्त अंग चोरून ती मोटरसायकल वर बसली.... 

समायरा मधला हा बदल तुषारने पटकन ओळखला.... 
ऑफिसमध्ये पोहोचल्या पोहोचल्या तुषार ने विचारले 
तुषार : काय झालं समायरा??  आज एकदम स्कार्फ वगैरे !!

समायरा : कुणी मला ओळखू नये म्हणून.... माझ्या एका मैत्रिणीने बघितलंय आपल्याला !!नशीब ती माझी खास मैत्रीण होती.... म्हणून ठीक आहे पण जर माझ्या घरच्या लोकांनी कुणी बघितलं तर?? मी इतकी रीस्क घेऊ शकत नाही... 

तुषार : हो तूझं बरोबर आहे.... 

समायरा: तुषार मला तूझा ऍड्रेस सांग ना !!कधी अचानक वेळ आली तर माहीती असावं म्हणून विचारलं?? 

तुषारने लागलीच त्याच्या घराचा पत्ता समायराला लिहून दिला....
 
समायराने त्याचा फोटो काढून व्हाट्सअँप वर नलिनीला पाठवला.... 

नलिनीने पत्ता मिळताच तीची स्कुटी काढली.... आणि तुषारचं घर शोधायला निघाली.... 

तुषारने दिलेल्या पत्त्यावर नलिनी पोहोचली.... तीने दार वाजवले त्या आधी तीने शेजारील घराच्या दरवाजाच्या पाटीवर असलेले नाव बघून घेतले होते.... 

नलिनीने तुषारच्या घराच्या दरवाजाची कडी वाजवली... समोरून एका बाईने दार उघडले.... नलीनीने त्यांचे वय पाहून ह्याच तुषारच्या आई असतील असा अंदाज बांधला... 
 
 नलिनी : मला जरा पाणी मिळेल का?? 
 
ती स्त्री : हो, ये आतमध्ये....  मी आणते पाणी 

नलिनी  हॉलला न्याहाळू लागली .... भिंतीवर फोटो दिसले एका कोपऱ्यात तुषार आणि त्याच्या आईचा फोटो होता आणि एका ठिकाणी हार लावलेला फौजी माणसाचा फोटो होता.... नलिनी त्या फोटोजवळ गेली.... 

तितक्यात तुषारची आई पाणी घेऊन आली.... नलीनीला फोटोजवळ पाहून... हे माझ्या तुषारचे बाबा.... फौजी होते.... देशसेवा करताना शहीद झाले... 

नलिनी :तुषार?? 

तुषारची आई : माझा मुलगा... फार गुणी आहे... तो शिकत असतानाच त्यांचं पितृछत्र हरवलं.... आणि मला बीपी, शुगर अश्या बिमाऱ्यानी घेरलं... शिकत असतानाच त्याला नौकरी करावी लागली.... जी मिळेल ती नौकरी तो करत गेला.... 
बरं तू कोण आहॆस.... 

नलिनीने डोक्यावर हात मारून घेतला.... ज्या कामासाठी आले ते विसरलेच की... तुमच्या घराच्या बाजूला देशमुख राहतात ना?? कुठे गेले ते.... काही कल्पना आहे का?? त्यांच्या घराला कुलूप आहे..... 

तुषारची आई : नाही बाई नाही माहिती... तूला अजून पाणी हवं आहे का?? 

नलिनी : नाही नाही, धन्यवाद.... बाकी नशीबवान आहात मुलाच्या बाबतीत.... येते मी.... 

असं म्हणत नलीनीने काढता पाय घेतला.... 

क्रमश :
©® डॉ. सुजाता कुटे

🎭 Series Post

View all