Login

कितीदा नव्याने तुला आठवावे... भाग 1

Love Story
कितीदा नव्याने तुला आठवावे...भाग 1


कितीदा नव्याने तुला आठवावे....
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे....

©® ऋतुजा वैरागडकर


सकाळचे आठ वाजले होते,
शिरीष अजूनही झोपेतच होता कारण रात्री त्याची झोप पूर्ण झालेली नव्हती. त्याच्या आईने त्याला हलवून झोपेतून जागे केले.

"आई, थोडावेळ झोपू दे ना प्लिज."

"मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण नंतर कॉलेजला जायला तूला उशीर होणार आहे." तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

शिरीष हसून उठून बसला.

"स्वारी आज खुश दिसत आहे आणि काय रे रात्रभर मोबाईल मध्ये काय करत होता?"

"काही नाही."

तो हसला आणि उठून फ्रेश व्हायला गेला.

आज शिरीषचा कॉलेजचा पहिला दिवस होता आणि दहा वाजेपर्यंत त्याला कॉलेजला पोहचायचे होते. त्याने लवकर आवरले आणि आईच्या पाया पडून तो राहुलच्या घरी पोहचला. 

राहुल म्हणजे शिरीषचा जिवलग, बालपणीचा मित्र, शिरीष आणि राहुल दोघांनाही एकाच कॉलेजला ऍडमिशन मिळाली होती आणि लहानपणापासून दोघे एकाच क्लास मध्ये होते.

राहुल शिरिषची वाट बघत उभा होता, शेवटी त्यालाही कधी एकदा कॉलेजला जाईल असं झालं होतं. अखेर दोघे बाईक वरून कॉलेजला पोहचले. 

पहिला दिवस असल्याने दोघांनाही कॉलेज कॅम्पस बघण्यात एक तास गेला. नोटीस बोर्ड वर क्लास नंबर बघून दोघे क्लास बघायला गेले. पण एवढ्या मोठ्या कॉलेजचा पहिलाच दिवस असल्याने दोघांचाही जरासा गोंधळ उडालेला होता. शेवटी कसातरी क्लास सापडला आणि दोघे क्लासच्या दरवाजाजवळ पोहचले.

”मे आय कम इन सर"  शिरीषने विचारले.
"येस."

दोघे क्लासच्या आत गेले.

क्लास संपल्यावर हळूहळू बाकीच्या मुलांशी दोघांचीही ओळख झाली. असेच चार पाच दिवस कशे गेले दोघांनाही कळले नाही. 

आज शिरीषला ती दिसली आणि तो तिच्याकडे बघतच राहिला जणू शिरीषच्या स्वप्नातली परीच ती. पहिल्याच नजरेत त्याला ती भावली. मग काय राहुलने आपल्या वहिनीची सगळी माहिती काढली.

ती.. त्याच्या स्वप्नातील राजकुमारी
आरोही...
गोरीपान, देखणी, लांब काळेभोर केस दिसताच क्षणी कुणीही भाळेल अशी..

शिरीष बघता क्षणी तिच्या प्रेमात पडला, त्याला सगळीकडे आरोही दिसायला लागली. शिरिषने फेसबुक वर तिला रिक्वेस्ट पाठवली, पण एक आठवडा झाला तरी तिचा प्रतिसाद आलेला नव्हता.


आरोही तशी छान मुलगी होती. शांत स्वभाव आणि कुणाच्याही मनात भरावी अशीच होती. काही महिन्यानंतर आरोहीचा रिप्लाय आला. आता ते दोघेही मॅसेंजर वर बोलायला लागले. मग व्हॉटसअप वर बोलणं सुरू झालं.
हळूहळू मैत्री फुलायला लागली.

भेटी वाढायला लागल्या, कोणत्या ना कोणत्या कारणाने ते रोज भेटत होते.

एक दिवस शिरीषने तिला प्रपोज केलं.
त्याचा स्वभाव तिला आवडायला लागायला होता म्हणून तिनेही त्याला होकार दिला.


कॉलेजला पहिल्याच वर्षी दोघांचं जुळून आलं होतं. मग काय दररोज कॅन्टीन वर कॉल्ड कॉफी तर कधी क्लास बुडवून गार्डन मध्ये फिरायला जाणं असं सगळं सुरू झालं.
दोघेही एकमेकांत अखंड बुडालेले होते.


दोघांना कुठेही जायचे असेल तर राहुल त्यांना मदत करायचा,  दोघेही राहुलच्या बाईकने फिरायला जायचे.
एकमेकांसोबत वेळ घालवायचे.


शिरीष आता एक क्षणही आरोही शिवाय राहू शकत नव्हता आणि ती सुध्दा.

दोघेही तासनतास बोलत बसायचे, रात्र रात्र जागायचे.


एक दिवस अखेर जे व्हायला नको तेच झाले, आरोहीच्या घरी  दोघांच्या प्रेमाबद्दल कळल. आरोहीचे बाबा खुप कडक आणि शिस्तीचे होते, त्यांनी आरोहीचं कॉलेज बंद केलं. तिच्याकडून मोबाईल पण काढून घेतला.


आता मात्र शिरीषला काय करावं सुचत नव्हतं. हळुहळु तो कॉलेजला बंक करायला लागला.

कॉलेज सोडून कॅन्टीन मध्ये जाऊन बसायचा. त्याला आरोहीशिवाय काहीच चांगल वाटत नव्हत. त्याला काहीही सुचत नव्हतं, तिच्या आठवणीत तासनतास घालवायचा. एकटाच बसून असायचा.



तो एकटा राहायला लागला आहे आणि कमी बोलायला लागला आहे, काहीतरी बिनसलंय हे त्याच्या आईच्या लक्षात आलं.