Login

कितिदा नव्याने तुला आठवावे... भाग 2

Love Story
कितिदा नव्याने तुला आठवावे...भाग 2
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे...

©®ऋतुजा वैरागडकर


एक दिवस तो दुपारी लवकर घरी आला.

"शिरीष आज लवकर आलायेस बाळा, आज क्लास नव्हते तुझे?"

"होते ग पण मला करायचे नव्हते."

"शिरिष काय झालं असा का वागतो आहेस?"

"काही नाही."

शिरिषच्या आईला त्याची काळजी वाटायला लागली म्हणुन तिने राहूलला फोन केला.
त्याला सगळ विचारलं, नाईलाजास्तव राहूलला सगळ सांगाव लागलं.

काही दिवस असेच निघून गेले, शिरिषच्या वागण्यात काहीच बदल होत नव्हता.

आता राहूलला पण त्याची काळजी वाटायला लागली. तो शिरिषला धीर देत होता. पण काहीही झालं तरी दोघांचंही कॉलेज पूर्ण व्हायला हवं होत, जे झालेल नव्हतं आणि अभ्यासाकडे लक्ष देणही तेवढचं गरजेचं होतं.

राहूलने त्याला खुप समजावंल, शिरिष थोडा स्टेबल झाला.
कॉलेजला जाऊ लागला, अभ्यासाकडे लक्ष देऊ लागला.

एक दिवस अचानक आरोहीचा कॉल आला, तिने त्याला चोरून फोन केला आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

दोघेही बराच वेळ बोलले.


एकमेकांना मनातील व्यथा सांगितल्या, एकमेकां जवळ रडले.
आरोही रडली तसा शिरिषही खूप रडला आणि शेवटी फोन कट झाला. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते पण नियती समोर दोघेही लाचार होते.


शिरिषने अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. सगळं विसरून तो अभ्यास करू लागला होता. आरोहीची आठवण येऊ नये म्हणुन स्वतःला कुठल्यान कुठल्या कामामध्ये व्यस्त ठेवायचा पण तरीही एखाद्या संध्याकाळी निवांत एकटं असताना त्याला तिची खूप आठवण येत असे.


तीही त्याच्या आठवणीत झुरत होती. तीही हताश झाली होती. तिचं घराबाहेर पडण बंद झालं होत, दिवसभर ती तिच्या खोलीत बसून असायची. मन रमावं म्हणून पुस्तक वाचायची पण पुस्तकातील एक एक पान उलगडताना आयुष्याची कोरी पाने नजरेसमोरून निघून जायची आणि अलगद डोळ्यातून अश्रू ओघळायचे.


दिवसामागून दिवस जात होते.

त्याच शिक्षण पुर्ण झाल. त्याला नामांकित कंपनीत नोकरी मिळाली.

आरोहीच तिच्या मनाविरुद्ध लग्न झालं, लग्न जुळवताना तीला फक्त गृहीत धरलं होतं, तिची इच्छा विचारलीच  नव्हती.

लग्नाच्या आदल्या रात्री आरोही खुप रडली, मनात साठवलेल्या वेदनांना बाहेर काढल. इच्छा असो नसो नविन आयुष्याची सुरुवात करावी लागणार होती.

लग्न करून आरोही सासरी गेली, शिरीष फक्त तीला बघत राहिला.

स्वतःला सावरुन त्याने कामावर लक्ष केंद्रित केलं.


शिरीष एक सक्सेसफुल माणूस झाला होता पण जिच्यासाठी हे सगळं केलं ती मात्र आपली होऊ शकली नाही याची खंत आजही त्याला होती. राहूललाही चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आणि त्याच लग्नही झालं.


शिरीषला मात्र आजही प्रेम म्हटल्यावर फक्त आरोही आठवते.


ती माझी झाली नाही म्हणून काय झाले, तिच्यावर प्रेम करण्याचा अधिकार मला आहे आणि मी नेहमी तिच्यावर प्रेम करत राहील अस तो नेहमी म्हणायचा.


बऱ्याच वर्षानंतर एका कॅफे मध्ये अचानक दोघेही समोरासमोर आले.

बराच वेळ एकमेकांकडे बघत राहिले.

"कशी आहेस?"

"मी बरी आहे." नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

"तू कसा आहेस?"


"मी पण बरा आहे."

तो समोर काही बोलणार त्याच्या कानावर शब्द पडले.

"मम्मा आईस क्रीम."

ती आरोहीला बिलगली.

"तूझी मुलगी?"

तीने फक्त होकारार्थी मान हलवली.

"काय नाव आहे बाळा?"

"शिर्षा.."

"तुझ लग्न झालं असेल काय आहे तुला मुलगा मुलगी?"


"मी अजून लग्न केलेलं नाही, आयुष्यात मी फक्त एका मुलीवर प्रेम केलं होतं आणि तिच्यावर सदैव प्रेम करत राहील. ती माझ्या जवळ नसली तरीही..."

त्याचं बोलण ऐकून तिचे डोळे पाणावले.
आणि नकळत तोंडातून निघालं

कितीदा नव्याने तुला आठवावे...
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे...
कितीदा नव्याने तुला आठवावे....

दोघांनी एकमेकांना डोळ्यात साठवलं.

दोघेही वळले आणि आपापल्या मार्गाने निघून गेले आयुष्याची नविन सुरुवात करायला एकमेकांच्या आठवणींत जगायला.