लिखाण सोडून कित्येक दिवस झाले होते. कधीतरी सुरूवात करायचं, असं मनात होतं. पण वेळच मिळत नव्हता. मग ईरा कडून स्पर्धेची घोषणा झाली. मग ठरवलं की लिखाण सुरूवात करण्याची हे कारण पुरेस आहे. म्हणून मी या स्पर्धेत भाग घेतलं. या स्पर्धेत मी एका संघाचा भाग झालो. मला सगळे अनोळखी होते. मग मेसेज वाचून सगळ्यांचं थोडं ओळख झाली. त्याच संघामध्ये ' सूनिध ' या नावाने एका लेखकाची ओळख मला झाली. वयवर्ष २१ असलेला , कॉलेजमध्ये विद्यार्थी असलेला हा सुनिध माझ्यासारखाच ग्रूपमध्ये होता. त्याचे मेसेज व्हॉट्स अप ग्रूपमध्ये कमी यायचे. मी सुद्धा त्यातलाच होतो . फक्त मेसेज पाहत होतो, पण मी स्पर्धेत होतो.
सुनिधने केलेलं लिखाण मी स्पर्धेत असतानाच वाचलो. त्याची लिखाणाची शैली वेगळीच आहे. अगदी कमी शब्दात तो कथेची बांधणी करतो. त्याच्या कथेतील पात्रांची भावना एकदम कमी शब्दात वर्णन करतो. त्या शब्दांमुळेच पात्रासोबत आपण जोडलो जातो. या स्पर्धेत मला मेसेज करून ओळख झाली नाही , तर त्यांच्या कथा वाचून ओळख झाली.
ईरा चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेत 'आत्मचरित्र' हि फेरी चालू होती. प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल लिहीत होते. त्यात सुनिध आपल्या जीवनाबद्दल लिहिला होता. सगळ्या आपल्या जीवनातले समस्या , छंद , लिखाणाबद्दल लिहिले होते. पण सुनिधच्या जीवनात वेगळीच समस्या होती. लहानपणापासून त्याला दिलेलं जाणार कित्येक नाव तो त्याच्यात लिहिलेला होता. त्याच्या वागणुकीमुळे त्याला मिळणार अपमान तो लिहिला होता. त्यात पण त्याची चुकी नव्हती . त्याच्या भावनात होणारी बदल हे त्याच्या हातात नव्हतं. तरीही तो सर्वकाही अपमान सहन केला.
आपल्यात उद्भवणारी भावना बद्दलची अपमान ऐकून घ्यायला खूप मोठं मन लागत. जसं जसं तो मोठा झाला , त्याला आणखी शब्दांचा मार सहन करावं लागला. असं असून सुध्दा तो लेखनामध्ये भाग घेतला. समाजात स्वतःची भावना प्रकट करण्याचं काम त्याची ही लेखणी करते. पूर्ण वाचक श्रेणीला आपली भावना लिहून सांगणे इतकं मोठं मन फक्त तुझ्याकडेच असेल.
अजून एक सांगतो. समाज काय विचार करतो , हे विचार तू करू नकोस. तुझं मन काय सांगत याच विचार कर आणि तेच लिही. तुझ्या सारख्या लेखकाची खूप गरज आहे. तुझे भावना वेगळे असले तरी समाजाचे एक अंग आहे. ते व्यक्त होणं खूप गरजेचे आहे. तुझ्या सारखे कित्येक जण आपले भावना सांगण्यासाठी घाबरतात. त्यांना बळ देण्यासाठी तू प्रयत्न कर. तू त्यांच्यासाठी लिही. तुझे भावना व्यक्त कर. तुझ्यापुढे खूप मोठं आयुष्य आहे. त्याला मनोसक्त जगून घे.
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...
********************************
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा