"आई भूक लागली" ....
माझ्या मुलींनी आवाज दिला ...म्हटलं "घ्या जेवणाच्या पलेट्स मी पटकन गरम फुलके करून देते"
....त्या वर लगेच प्रश्न आला......
"कुठली भाजी केलीस आज?"
मी दबक्या आवाजात उत्तर दिलं...."कोबीची"....
बाहेरून हिरमुसले सूर आले........
"आई अगं ....कोबी काय!!"
मुली जेवायला बसल्या पटापट गरम एक फुलका संपला ...दुसरा वाढला ....तोही संपला....दोघींचे चेहरे पाहून मला कळेना नक्की काय प्रकार आहे. एरवी मी विचारत असे, कशी आहे भाजी, आवडली का? पण आज कोबीची भाजी असल्यामुळे मी काही विचारायची हिम्मत केली नाही...
तेवढ्यात मनाली, माझी धाकटी लेक बोलली ....
"आई वाटलं नव्हतं मला कोबीची भाजी आज एवढी आवडेल...."
त्या वर गुंजन माझी मोठी, पण लगेच म्हणाली....
"हो आई, आज भाजी खूप च टेस्टी झाली आहे....!"
मला थोडा धक्काच बसला.मनात म्हटलं एरवी ह्या कोबिला कित्ती सुंदर, छान प्रेझेंटेबल करावा लागतो .जस की कोबी मंच्चुरियान / हक्का नूडल्स मधाल थोडा कोबी, कोबी वड्या, पराठे आज त्या साध्या कोबीच्या भाजीची एवढी स्तुती? आज कोबी नशीब कस काय फळफळल? तेव्हा लक्षात आलं आज घरात केवढं काम केलं दोघींनी त्यामुळे चांगलीच भूक लागली होती आणि घरच गरम गरम ताज जेवण ! सुखच ते!! मग तो कोबी का असेना!!
आता घरात काम केलं दोघींनी म्हणजे त्याच झालं असं की कोरोन व्हायरस मुळे शाळेला सुट्टी जाहीर झाली आणि मुलींना रोज प्रश्न पडायला लागला की आता घरात वेळ कसा घालवायचा ??? शाळा चालू होती तेव्हा शाळेतून घरी आल्यावर थोड्यावेळ टीव्ही,थोड्यावेळ मोबाईल वर गेम्स खेळणे आणि शाळेचा अभ्यास असा दिवस पटकन संपायचा....
सध्या टीव्ही आणि मोबाईल दोन्ही चा कंटाळा आला (ते एक बरं झालं ) मग दोघींनी ठरवलं की आई ला मदत करायची...
"आई आम्ही काय करू सांग ना काम काहीतरी??"
मग मी रोजची लहान सहान काम सांगायला लागले.आज मात्र दोघींनी सगळ घर ( ४ रूम्स ) झाडून पुसून घेतल्या.
आणि हे एवढं काम करून चांगलीच दमछाक झाली आणि दोघींना कडकडून भूक लागली .त्याचा परिणाम असा की कोबीच नशीब उघडलं!! एरवी कशी तरी तोंड करून तो कोबी खाल्ला जायचा. तोच मात्र आज खूप छान टेस्टी लागत होता.
वाईटातून चांगला विचार करायचा झालाचतर . कोरोना व्हायरस मुळे लॉक डाऊन लागला तेव्हा मुलींना घरी राहून आई नक्की घरात काय काय करते हे अधिक जवळून पाहता आलं. इतर वेळा त्यांना सुट्टी असते तेव्हा शाळेचा होमवर्क , प्रोजेक्स, विकली टेस्ट .... वगैरची तयारी आणि फ्री टाईम मिळताच आपलं लाडकं छोट खेळणं मोबाईल घेऊन बसायचं.तेव्हा मान वर करून आई कडे बघायला पण वेळ नसतो हे असं घरातली काम करणं तर लांबच राहिलं!
©तेजल मनिष ताम्हणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा