कोडे सुटेना (भाग चार)

Mystry Of An Accident

कोडे सुटेना? ? (भाग चार)


©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी

रात्र भर नीलू कुठे असेल?कशी असेल? या चिंतेने झोप लागली नाही. हवालदार म्हणाले होते , 'तुमच्या पत्नीला कुणी किडनाप तर नाही केलं ना?
त्या विचाराने तो रात्र भर चिंतेत होता.
सकाळीच तो उठला, घरासमोर थोडासा फिरला आणि इतक्यात त्याच्या फोनवर अननोन नंबर वरून कॉल आला.
आता मात्र त्याला धडकीच भरली .
काल साळुंखे म्हणाले होते काही ब्लॅकमेल किंवा खंडणीचे फोन आले तर आम्हाला कळवा वगैरे. त्याने दुर्लक्ष केलं.

पुन्हा दोन तीन मिनिटांनी फोन वाजला.

आता समोर काय वाढून ठेवले कोण जाणे?
तरी त्यांने फोन घेतला.

तिकडून एका अनोळखी माणसाचा पण मवाळ फोन आवाज आला.

"आपण रोहन बक्षी बोलताय का?"

" हो मीच बोलतोय. आपण कोण?"

"सध्या तुम्ही कुठे आहात? तुम्ही राहायला कुठे?" तिकडून
अशी काही चौकशी वगैरे केली गेली.

सगळं सांगून म्हणाला ," कोण तुम्ही? मला फोन का केलात ?" तो वैतागुन म्हणाला.

"नीलंबरी बक्षी तुमच्या कोण लागतात?"

"नीलांब s री. . माझी पत्नी आहे .तुम्ही कोण आहात? तिच्याबद्दल काय विचारताय?"

" हे पहा मिस्टर , घाबरु नका , एक मिनिट माझ्या पत्नीशी बोला."

असं म्हणून त्यांनी बहुतेक त्याच्या बायकोला फोन दिला. " सर मी सविता गुरव बोलते"

"मॅडम बोला, नीलंबरी विषयी काय माहीत आहे तुम्हाला?"

"सर त्या मॅडम आमच्या घरी आहेत. . आणि सुखरूप आहेत. तुम्ही काळजी करू नका. हे सांगायला फोन केलाय."

" आपण म्हणजे तुम्ही कुठे आहात आणि काय झाले आहे तिला ? ती तुमच्या घरी कशी ?तुम्ही कोण ?"

"थांबा सर किती प्रश्न विचारता?"

"काल दुपारपासून आमच्या जीवात जीव नाही , इथे एक्सीडेंट चे केस झाली आणि पोलिसांना ती महिला म्हणजे माझी पत्नीच वाटते आहे . . . आणि तुम्ही म्हणता प्रश्न? बरं, मी तुम्हाला एक मिनिटात कॉल करतो."


तो जोरात आवाज देत घरात आला," मम्मी एक फोन आलाय आणि ते म्हणतात की नीलू त्यांच्याकडे आहे आणि सेफ आहे."

"हो का, बाई देव पावला! माझं लेकरु ते. ."

सासरे पण आनंदाने जवळ आले, "कुठे आणि कशी पोचली तिथे?"

"ते विचारतो मी आता पण मग पोलिसांना कळवू का पप्पा?"

"एक मिनिट रोहन, जरा सावधगिरीने घे. सगळी परिस्थिती अवघड आहे. ती खरंच तिथे आहे का? कसा विश्वास ठेवणार? कोण लोक आहेत? तिला पाहिलास का किंवा आवाज ऐकला स का?"

"नाही पप्पा ते मी! थांबा तुमच्यासमोर बोलतो. स्पीकर r टाकतो फोन."
"हॅलो s सविता मॅडम का? प्लीज बोला आणि सांगा तिच्याबद्दल "

"साहेब , इकडे मंदिरा जवळ नदीच्या काठावर सापडल्या त्या. . आणि आता सकाळी शुद्धी वरती आल्या आणि सारख्या रोहन आणि कुहू असं म्हणायला लागल्या. त्या अजूनही पूर्ण शुद्धीत नाहीत. अजूनही ग्लानी आहे पण आम्ही पुन्हा पुन्हा विचारून त्यांच्याकडून तुमचा फोन नंबर घेतला आणि मग तुम्हाला कॉल लावला."

" अहो पण ती तिथे तुमच्याकडे कशी आली कळत नाहीय?"

"साहेब तुम्ही प्रत्यक्षात येऊन भेटा . आम्ही फार साधी माणसं आहोत. हे पोलिसांचा झंझट आम्हाला नको, तसं म्हणून माणुसकी सोडता येत नाही ना, "

" निलांबरी सुखरूप आहे आणि तुमच्या घरी आहे असं म्हणताय ना. . तिच्या वडिलांनी पुन्हा विचारलं .

"हो साहेब मी तुम्हाला इथे यावं लागेल. आत्ता येताल का, त्यांना दवाखान्यात दाखवा. तुम्हाला देवगाव माहित आहे का?"

" कुठला देवगाव? शहराच्या बाहेर ? पाच सहा मंदिर वगैरे आहेत तिथे?"

"हो , ते अगदी बरोबर. तिथेच एक दहाय घरांची वस्ती आहे, नदीकाठी , आम्ही सगळे त्या मंदिराचे सेवेकरी आहोत. तिथे या तीन नंबरच्या क्वार्टर मध्ये येऊन भेटा .

"तुमचं नाव काय म्हणालात ?"

"मी सविता गुरव अन् माझे मिस्टर एकनाथ गुरव ."

"तुमचे खूप उपकार झाले ."

"साहेब फक्त एकच काम करा, पोलिसांना वगैरे कळवू नका"

"अहो पण त्यांना कळवल्याशिवाय माझी सुटका होईल का त्या अपघाताच्या केसमधून ? इथे काय झालय माहित नाही तुम्हाला?"

"ते तुम्ही नंतर पहा. पहिले येऊन तुमच्या पत्नीला भेटा आणि घेवून जा."

"हो येतो आम्ही. "

रोहनला कोण आनंद झाला पण मनात शंका होत्या.

सासरे म्हणाले "चला आपण दोघे जण जाऊया,"

" नाही मला पण यायचं आहे. " आई म्हणली.

"पोलिसांना कळवून टाका म्हणजे ते ओळख पटवण्याचे कामाचं काही नाही राहणार. " सासरे बोलले.

"नाही , हे कोणीतरी गरीब कुटुंब आहे आणि ते विनंती करत होते की त्यांना पोलिसांच्या भानगडीत पडायचं नाही."

"रोहन ती आपली नीलू आहे ना पण ? हे नक्की असेल ना ते कोणाचं काही षडयंत्र तर नाही? कारण तिथे गेल्यानंतर पुन्हा काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला शेवटी पोलिसांच्याच मदत घ्यावी लागेल."

" हे पहा पप्पा . आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. मी व्हॉट्स ॲप कॉल करा आणि तिला दाखवा असं म्हणालो होतो पणं त्यांच्याकडे साधा फोन आहे असं म्हणाले. मी फकत कळवतो. लांबून एक हवालदार आणि लेडी कॉन्स्टेबल पाठवा अशी विनंती करतो. गरज लागली तर मदत घेता येईल. "

"रोहन माझा चांगल्या कर्मावर आणि देवा वरती पूर्ण भरोसा आहे."

"पप्पा आणि ज्या प्रकारे ती बाई बोलत होती त्यावरून तर मला काही फसवणुकीची शक्यता वाटत नाही त्यामुळे आपण जाऊया."
मग पटापट आवरून , कुहुंला तयार केलं सर्वांनी आवरलं आणि रोहन ने आपली गाडी काढली.


रोहन च्या डोक्यात सतत वादळ घोंगावत होतं.
नीलुची गाडी गावाबाहेर एका पुलाजवळ सापडली. नीलू कुणा तरी माणसांच्या घरी २५ किलोमीटर दूर कुठेतरी आहे . एक्सीडेंट इकडे बेंगलोर हायवे ला झाला आहे आणि सगळे नीलू चे दागिने आणि कागदपत्र त्या बाईकडे आहेत. हा सगळा काय प्रकार आहे? तिथे पोहोचेपर्यंत दुसरा काहीच इलाज नव्हता . त्याचे हात पाय लटपट कापत होते पण त्याने हिम्मत केली निलुचा चेहरा आठवला आणि गाडी घेवून निघाला.

रोहन, नीलूचे आई वडील आणि कुहू त्या माणसाने दिलेल्या पत्त्यावर तासाभरात पोहोचले .
शहराच्या बाहेर 25 30 किलोमीटर अंतरावर नदीच्या काठी असलेल्या सुंदर देवगाव आणि आसपास दहा-बारा घर तिसऱ्या कॉटर्स वरती पोहोचले.
रोहनच्या गाडीमागे मोटरसायकल वरती हवालदार माने अनेक लेडीज कॉन्स्टेबल तिथे पोचले होते, ते ठरल्याप्रमाणे लांब उभे होते. यात कुठे काही दगाफटका झाला तर मदत मिळावी या उद्देशाने ते आले होते.
एका मध्यम वयीन स्त्रीने दरवाजा उघडला," या या रोहन बक्षी का? आत या, बसा!"
मग ते छोट्याशा तीन खोलांच्या क्वार्टर मधल्या हॉलमध्ये प्लास्टिकच्या खुर्च्यांवर बसले .
अगदी सात्विकता होते तिथे ,त्यांनी पाणी दिलं .
रोहन खूप अगतिक होत होता. त्याला ही शांतता सहन होत नव्हती.
" निलू कुठे आहे?" त्याने लगेच विचारलं.
" त्या आत आहेत ,पण एक विनंती आहे त्यांना सध्या काहीच प्रश्न विचारू नका. त्यांची मनस्थिती बरी दिसत नाही."
" पण ती इथे कशी आली?"
" आम्हाला तर वाटते बहुतेक त्यांनी नदीत उडी टाकली असावी .का ? ते त्यांनाच ठाऊक .कालच्या पावसामुळे नदीचा प्रवाह जोरात होता, इकडे किनाऱ्याजवळ आल्या आमचा एक सेवेकरी पाण्यात उतरला व यांना बेशुद्ध अवस्थेत पाहिलं आणि आम्हाला मदतीला बोलावून ,त्यांना इथे आणलं . हाता पायाला बऱ्यापैकी खरचटले आहे. रात्रभर आम्ही काळजी घेतली. आज सकाळी ते शुद्धीवर आल्या. सतत रोहन ,कुहू म्हणू लागल्या .मग कसातरी त्यांच्याकडून तुमचा फोन नंबर विचारून काढला. त्यांना कळवू नका, मला मरू द्या, असं म्हणत होत्या ."

असं काय झालं असेल ?रोहन विचारात पडला.


क्रमशः

©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
दिनांक २८ .०६ .२४

🎭 Series Post

View all