कोडे सुटेना -भाग पाच (अंतिम)
©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
मरण्यासारखा काय झालं असेल ?रोहन विचारात पडला.
मग त्या बाई म्हणाल्या "आई तुम्ही आत या."
नीलू ची आई कूहुंला घेऊन आत गेली.
आत पलंगावर नीलू क्षीण अवस्थेत पडलेली होती त्या महिलेने तिला उठून बसवलं .
" मम्मा तू तुझ्या फ्रेंड कडे आली ना पिकनिकला !"असं म्हणून कूहुं ने आईला मिठी मारली .
आवाज बाहेर आला आणि रोहन आणि नीलू चे वडील आत आले .
समोर नीलू च होती यात काही शंका नाही पण तिला बोलण्याची देखील त्राण नव्हते.
तिला सुखरूप पाहून रोहांचा जीव भांड्यात पडला मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणतात. कालपासून काय काय विचार मनात येऊन गेले .

नीलू सापडू दे ,मी तिला काहीच बोलणार नाही असं त्याने ठरवलं होतं.
त्याच्या डोळ्यातून अश्रू गळत होते.
तशा परिस्थितीत ती त्याला हात जोडून सॉरी म्हणायला लागली .
"अग माफी काय मागतेस? तू सापडलीस ना पुरे !"
तिला व्यवस्थित खाऊ घालून, तयार करून वगैरे दुपारी बारापर्यंत ते सगळेजण परत आले.
दरम्यान बाहेर येऊन रोहनने हवालदार मानेंना माझी पत्नी सापडली आणि ती सेफ आहे हे सांगितल्याने ते परत गेले होते.
साळुंखे यांना फोन करून सांगितलं त्यांच्याही डोक्याला रिलॅक्स वाटला पण आता हे प्रकरण वेगळंच वळण घेत होतं. साळुंखे रोहन ला कालपासून बँकेत जाऊन कार्ड ब्लॉक करा मग सांगत होते पण त्यावेळी तो नीलू च्या टेन्शनमध्ये होता शिवाय तिचा फोन बंद असल्याने त्यांचा सगळच गोंधळ झाला होता .
आता पुन्हा तेच म्हणाले "काळजी घ्या. मी पाहतो संध्याकाळी दवाखान्यात एक चक्कर मारतो, तुमच्या पत्नीचे दागिने वगैरे तुम्हाला हँड ओव्हर करण्याचा प्रयत्न करतो ."

नीलू तिच्या आईकडे घरी आली होती. रोहन तिथेच होता कुणीच तिला काही विचारलं नाही.
दुपार उलटून गेल्यावर रोहनला बँकेत जाण्याची इच्छा नाही, तर साडेचारला आराम झाल्यावर चहापाणी करून तिने रोहनला तिच्या खोलीत बोलावलं आणि रडायला लागली .
"सगळं संपलं रोहन, आपण बरबाद झालो .मला माफ करा!"

" अग काय झालं ,ते तरी सांग?"
" तू जमा केले पाच लाख रुपये, जे माझ्या अकाउंट मध्ये होते ,ते पूर्ण गेले."
" काsय ?" रोहन उडालाच .
"बाबांनी कू हुंच्या जन्माच्या वेळी दिलेले अडीच लाख पण आणि माझे पाच तोळे दागिने ,अगदी मंगळसूत्र अंगठ्या. . . काहीच राहिलं नाही आपल्याकडे! आता कशाला जगायचं आणि कसं जगायचं?"
"नीलू सोड ते! तू सोबत आहेस ना, ते पुरे मला."
"नीलू,रडू नको, उद्या बोलु आपण!"
"पण रोहन ऐका ना ,ते सगळे कसे गेले? ते तर विचारा? म्हणजे माझ्या मनातलं गिल्ट दूर होईल."
"बरं सांग मग ."
हळूहळू तिने सगळी कथा सांगितली.
' कशी सोनिया नावाची तिची फेसबुक फ्रेंड झाली होती, दोघींच्या मेसेंजर वर रोज गप्पा व्हायच्या, मने जुळली मग फोन नंबर एक्सचेंज झाले. ती मोकळेपणाने बोलायची मग हिने पण बरंच पर्सनल शेअर केलं. या सगळ्याला महिन्याभर झाला असेल, एक दिवस अचानक तिच्या बँकेतून फोन आला की तुमची एक लेटेस्ट केवायसी अपडेट करा. बँकेत जमत नसेल तर मी लिंक पाठवतो त्याच्यावर क्लिक करा. '
रोहन मी पॅन कार्ड, आधार कार्ड अपलोड केले, ओके व्हेरीफाय आले, मग ऑनलाईन ट्रांजेक्शन ठेवण्यासाठी त डेबिट कार्ड चा फोटो आणि अकाउंट नंबर सगळं दिलं. कसे काय जाणे, रोहन दोन तासात माझ्या अकाउंट वरचे दीड लाख रुपये कट झाले. मेसेज आला पण फोन करून सांगावे तर कॉल भलतिकडेच लागू लागला. बँकेत, तुला पण कॉल लागत नव्हता. "

"तुझा फोन हॅक झाला होता ,कळलं ?"
" आणि अर्ध्या तासात पुन्हा एकदा अडीच लाख आणि एकदा एक लाख असे पैसे काढून घेतलेले मेसेज आले."
" हे कधी?"
"दोन दिवसांपूर्वी. मी त्या दिवशी सहन केलं तू ऑफिसच्या कामाने बाहेरगावी होतास. काल मी हे सोनियाला सांगितलं तर ती म्हणाली की नवऱ्याला आताच सांगू नकोस तुझ्याकडे दुसरे कुठले पैसे असतील माझ्या कंपनीचे स्टॉक मध्ये लाव ती शेअरची कंपनी चालवत होती मग मी अडीच लाख, तिच्यावर विश्वास ठेवून ट्रान्सफर केले .ती म्हणाली दोन महिन्यांमध्ये हे पाच लाख होतील मग रोहनला काहीच कळणार नाही. तिने सांगितल्याप्रमाणे मी केले तर रोहन ते पैसे पण केले आज सकाळी गेले. . . मला मेसेज आला."

" मग?"
"मी सोनियाला फोन लावला तर ती मला म्हणाली की तुझ्याकडे असतील ते दागिने आणि कागदपत्रे घेऊन मला भेटायला ये तू तुझे सगळे पैसे परत करते ,आजच्या आज. तिने सांगितलेल्या जागी ,नवीन कॉलनी आहे ना तिथे एक नवीन फ्लॅटमध्ये मी गेले. एक काळा गुंड सा माणूस तिथे होता, सोनिया पण होती. त्यांनी अचानक सगळी कागदपत्रे घेतली ,माझं मंगळसूत्र , दागिने घेतले, एका कागदावर माझी सही आणि अंगठा घेतला. हातातल्या अंगठ्या पण मागून घेतल्या रे आणि मला खुर्चीला बांधून ठेवलं ."
"बाप रे?"
"फेसबुकवर माझ्याशी बोलणारी ती मैत्रीण नसून तो माणूस होता चेहरा फक्त सोनियाचा होता. त्याने माझा फोन हॅक केला होता आणि माझे सगळे अकाउंट रिकामे केले होते. मी स्वतःला सोडून घेत असतानाच नेमकं सेक्युरिटी गार्डन दरवाजा वाजवला ,त्यांनी काही बाही सांगून वेळ मारून नेली आणि मला जोरात ढकलून दिले. मला डांबून ठेवून तुला ब्लॅकमेल करण्याचा विचार होता. मी म्हणाले की मी पोलिसांना सगळे पुरावे दाखवीन आणि तुम्हाला गजाआड करीन, तेंव्हा त्यांने माझा फोन माझ्यासमोर फॉरमॅट केला रे ! मला ओरडता येत नव्हते , इतके घाबरले होते. सगळं भविष्य मला अंधारात दिसायला लागलं. त्यांना कुणाचा तरी कॉल आला आणि मला ढकलून ते दोघेजण निघून गेले."
"मग?"
"मी स्वतःला कसं बसं सोडवलं ,घरी येण्याचं किंवा तुझ्याशी बोलण्याचाही भान मला राहिलं नव्हतं .माझ्याकडे फोनही नव्हता आणि काहीच नव्हतं .मी सरळ गाडी घेऊन गावाच्या बाहेर त्या पुलावरती गेले आणि तुमच्या सगळ्यांची माफी मागून उडी टाकली रे! मला वाटलं माझ्या जाण्याने सगळे प्रॉब्लेम सुटतील. पण काय माहिती देवाने मला पुन्हा वाचवलं ." आता मात्र रोहनने तिला घट्ट मिठी मारली. कितीतरी वेळ ती आणि तो रडत राहिला.

" आता मी तुला दोन दिवसातली स्टोरी सांगतो , ऐक."
त्याने घडलेल्या सगळ्या घटना तिला ऐकवल्या. स्पष्ट उलगडा झाला होता. तो म्हणाला साळुंखेना हे सांगायलाच पाहिजे. रेकॉर्डिंग पाठवतो.
त्याचवेळी साळुंखे चा फोन आला ," रोहन ,मी दवाखान्यात पोहोचलो आहे, तो माणूस शुद्धीवर आला आहे ,आता आपल्याला कळेल की नेमकं काय झालं होतं? आणि तुम्ही तुमच्या दागिने घेण्यासाठी येऊ शकता."
मग रोहनने त्यांना जुजबी माहिती दिली आणि रेकॉर्डिंग पाठवलं.
"हेच सगळं जर तो सांगणार असेल तर, मी तुमची केस सायबर क्राईम डिपार्टमेंटला पाठवून देतो. पुढचा तपास ते करतील. रक्कम मिळेल परत." साळुंखे म्हणाले.

त्या माणसाने सुरुवातीला कबूल केलं नाही पण त्याची सोबतीण सोनिया अपघातात गेली आणि नीलू सापडली म्हणल्यावर त्याने सगळं सांगितलं.
त्याला कबूल करणं भागच होतं ,"तरी तिला सांगत होतो गाडी इतकी जोरात चालवू नको पण ऐकलं नाही. इतका मोठा मासा गळाला लागला होता, यानंतर आम्ही कुठेतरी जाऊन निवांत राहणार होतो आणि हे सगळे धंदे बंद करणार होतो .नियतीला ते मान्य नव्हतं." तो नाराजीने म्हणाला.

अशा प्रकारे तो अपघात आणि नीलूच गायब होणे
हे कोडे शेवटी सुटले.
हे कोडे शेवटी सुटले.
क्रमशः
©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
दिनांक २८ .०६ .२४
दिनांक २८ .०६ .२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा