" आज पर्यंत एकदा पण मला सोन्याचा साज नाही बनवला." हेमलता म्हणाली. तिचं बोलणं ऐकून भाऊ म्हणजे अच्युत एकदम गप बसले.
" अहो, मी तर सहजच म्हणलं, इतकं काही मनाला लावून नका घेऊ. तूम्ही आधी तुमची गरजेचं काम पुर्ण करा. आपल्याला इतकी काही घाई गडबड नाही ओ ! साज काय नंतर बनवून घेऊ." हेमा समजुतीच्या स्वरात म्हणाली.
आज हेमाच बोलणं ऐकून त्यांना अस्वस्थ वाटतं होत. मनात अनेक विचार आठवणी प्रसंग एका मागून एक पिंगा घालत होते. त्यामुळें झोप येत नव्हती. अतिविचार करून ते थकले होते. बेडवर आडवे पडले होते तरी डोळा लागत नव्हता. सारखी कुस बदलून झोपण्याचा प्रयत्न करत होते. पण आज निद्रा देवी त्यांच्यावर रुसली होती.
" अहो काय झालं ? पाणी हवं आहे का ?" हेमाने त्यांच्या कपाळावर हात ठेवून विचारलं.
" काही नाही."
" काय झालं ? माझी नजर नका चुकवू. मी ओळखते तुम्हाला." हेमा प्रेमाने म्हणाली.
" पाणी दे." ते उठून बसत म्हणले. एक घोट पाणी पोटात गेल्यावर बरं वाटलं. ते पुन्हा आडवे होऊ लागले. हेमा त्याचा हात हातात घेऊन म्हणली,
" अहो अस्वस्थ वाटतं आहे का ?"
" छे ग्. चक्. ते आज जास्त गरम होत आहे ना त्यामुळे झोप येत नाही. तु झोप शांत."
हेमा ने फॅनचा स्पीड वाढवला. मग ते दोघं झोपी गेले. पण अच्युतना काही झोप येत नव्हती. ते पण बसले. घड्याळात बघितलं तर रात्रीचे अडीच वाजले होते. समोर खिडकीच्या मागच्या बाजूला असलेल्या कॅलेंडर वर नजर गेली. आज दहा तारीख होती.
" अजून पूर्ण दिड महिना हातात आहे." ते मनाशी पुटपुटले.
त्याचं झालं असं की, अच्युत आणि हेमा यांची अनिव्हरसरी बावीस नोव्हेंबरला आहे.त्यांच्या लग्नाला बेचाळीस वर्षे पुर्ण होणार आहेत. मुलगा सून नात यांनी ठरवल होत की आजी आबांची अनिव्हरसरी साजरी करायची. मस्त पैकी फिरायला जायचं.त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना देखील बोलावण्याचा प्लॅन होता. दिवाली एकदम जोशात साजरी करायची ठरवली होती.
अच्युत त्याचे भाऊ बहिण त्यांची मुलं सूना नातवंडं सगळे मिळून चार दिवस फिरायला जाणारं होते. कोकणात एक मोठं घर त्या साठी बुक केलं होतं.
" गेल्या चाळीस वर्षांपुर्वी तुला एक प्रॉमिस केलं होतं. पण ते पुर्ण करता आलं नाही. पण बास. आज नाही. आता कोणतेही कारण नाही. सबब नाही. या वर्षी मी माझं प्रॉमिस पुर्ण करणारं म्हणजे करणारचं." त्यांनी मनाशी पक्कं ठरवलं.
त्यांनी समोर बघितलं तर हेमा अजूनही झोपली होती. चेहेऱ्यावर तेचं नेहमीचे शांत भाव. झोपेत मध्येच हासत होती. त्यांना वाटलं, हेमा आजही तितकीच सुंदर आहे जितकी लग्नाच्या वेळी होती. तोच निरागस चेहरा, वागायला कधी अवखळ अल्लड पण गरजेच्या वेळी माझी वाघीण आहे.
' देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत.' अच्युत नी हेमाच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्या अंगावरची चादर व्यवस्थित केली. शेजारी आडवे पडून तिचा हसरा चेहरा बघत राहिले. मग कधी तरी त्यांचा डोळा लागला.
' देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत.' अच्युत नी हेमाच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्या अंगावरची चादर व्यवस्थित केली. शेजारी आडवे पडून तिचा हसरा चेहरा बघत राहिले. मग कधी तरी त्यांचा डोळा लागला.
सकाळी देव पूजा झाल्यावर ते नेहमी प्रमाणे नाष्टा करायला बसले. पण आज ते जरा लवकरच आवरत होते. त्यांनी मस्त पैकी शर्ट घातला. ते बाहेर जाण्यासाठी तयार होते. त्यांना असं तयार झालेलं बघून हेमा ने विचारलं,
" अहो, इतक्या सकाळी कुठं बाहेर वगेरे निघालात का ?"
" तुला किती वेळा सांगितल आहे, मी बाहेर जातं असताना पाठीमागून असं टोकत नको जाऊस." ते चिडचिड करत म्हणले. तसा हेमाचा चेहरा उतरला. तिच्या चेहऱ्याकडे लक्ष न देता अच्युत बाहेर निघाले.
" याचं हे असं आहे बघ. सरळ उत्तर दिलं तर शपथ. आता बाहेर उन्हं आहे. काळजी वाटणारं ना. पण ऐकतील तर ना ! "
अच्युत तयार होऊन सर्वात आधी ज्वेलरी शॉप मध्ये गेले. समोर पी न सराफ यांचे दुकान दिमाखात उभ होत. ते आत गेले. तिथ त्यांच्या मुलाचा मित्र मॅनेजर म्हणून नोकरीला होता. त्याने काकांना बघून त्यांचे स्वागत केलं.
" काका या या. दुकानात तुमचं स्वागत आहे. आज इकडे वाट चुकली. काही खास कारणं ? "
प्रथम त्यांच्या मुलाचा जवळचा मित्र होता याशिवाय त्याचं घरात येणं जाणं होतचं. जवळचा होता. त्यामुळे आपुलकी जिव्हाळा होताचं. त्याचं नात्याने त्याने चौकशी केली होती.
उन्हातून आले होते तर ते बसले. त्यांनी घोटभर पाणी प्यायलं. एसी मुळे त्यांच्या जीवाला शांतता वाटली. मग त्यांनी त्यांच्या खिशातून एक फोटो काढून टेबलवर ठेवला.त्यांच्या लग्नाचा फोटो होता. संपूर्ण कुटुंबासोबत.
" प्रथम या फोटो मध्ये माझ्या आईच्या गळ्यात कोल्हापुरी साज आहे. मला सेम तसचं डिझाईनचा कोल्हापूरी साज घडवून हवा आहे. आणि त्याला साजेसे कानातले पण. किती रुपये होतील ? "
प्रथम चकित होऊन काकांच्याकडे बघत राहिला. मग त्याच्या चेहेऱ्यावर समाधानाच हसू आलं.
" अरे वा काका. नक्कीच बनवून देऊ."
असं म्हणून त्याने तो फोटो हातात घेतला. जुना कलर फोटो होता. अच्युत आणि हेमा यांच्या लग्नाचा फोटो होता. बाजुला त्यांचे आई वडील बसले होते.
असं म्हणून त्याने तो फोटो हातात घेतला. जुना कलर फोटो होता. अच्युत आणि हेमा यांच्या लग्नाचा फोटो होता. बाजुला त्यांचे आई वडील बसले होते.
" काका यातल्या कोणाचा फोटोतला व्यक्तीचा हार बनवायचा आहे ? " फोटो मध्ये तीन स्त्रीया होत्या. त्यामुळे तो गोंधळला.
" ही माझी आई. तिच्या गळ्यात आहे ना अगदीं तसाच अस्सल कोल्हापूरी साज घडवून हवा आहे." त्यांनी एका स्त्रीच्या फोटोवर बोट दाखवत सांगीतलं.
" प्रथम साज सेम टू सेम बनवून हवा आहे. पुढच्या महिन्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मला तिला हा साज देऊन सरप्राइज करायचं आहे." अच्युत बोलतं होते.
पण त्यांच्या मनात आता देखील त्यांच्या लग्नाच्या वेळची ती उभी राहिली, लाजलेली, नाजूक, टपोऱ्या डोळ्यातून त्याला हळूच बघणारी. मनातल्या मनात अच्युत ने हेमाला तो साज घातलेल्या नंतर ती कशी दिसेल हे इमॅजिन केलं. तशी त्यांची कळी खुलली. मन आनंदाने भरून आलं. सराफाच्या कारागीरला योग्य त्या सूचना देऊन अँडव्हान्स पेमेंट करुन ते निघाले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा