मागील भागात आपण पाहिले की शेवटी स्वानंदी आणि रणजीतचे लग्न होते. आता बघू पुढे काय होते ते.
" आली हासत पहिली रात,
उजळत प्राणांची फुलवात.."
लहानपणी कधीतरी आई ऐकत असताना कानावर पडलेले गाणे स्वानंदीला आठवत होते. लाजेने आपसूकच तिची मान खाली जात होती. गाल लाल झाले होते. नव्या नवरीचा गृहप्रवेश होत असताना अधीर झालेला रणजीत तिला आठवत होता. तिला हसू येत होते. रणजीतच्या बहिणींनी तिला छान सजवले होते. हातात दुधाचा पेला घेऊन ती सलज्ज रणजीतच्या खोलीपाशी आली. दरवाजा लोटलेलाच होता. तिला खोलीत पाठवून रणजीतच्या बहिणी निघून गेल्या. स्वानंदी हलक्या पावलांनी आत आली. पलंग फुलांनी छान सजवला होता. या दिवसाची तिने किती आतुरतेने वाट पाहिली होती. तिच्या बर्याच मैत्रिणींची शाळा कॉलेजमध्ये असतानाच प्रेमप्रकरणं झाली होती. काहीजणी अजूनही पुढे गेल्या होत्या. स्वानंदी मात्र आपल्या राजकुमाराच्या शोधात होती. तिला जपणारा, तिच्यावर भरभरून प्रेम करणारा. आणि शेवटी तो आला होता.. आज ती हरवून जाणार होती त्याच्या मध्ये मनाने , तनाने. तेवढ्यात थंड वार्याची झुळूक आली. ती शहारली.
तिने घड्याळात बघितले. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. अजूनही रणजीत आला नव्हता. त्याला फोन करूया का? तिच्या मनात विचार आला. नको.. काहीतरी कामात अडकला असेल किंवा आपल्यासाठी काही आणायला गेला असेल का? या दिवसाची अंहं रात्रीची आठवण म्हणून. ती परत लाजली. तेवढ्यात बाहेर कोणाची तरी चाहूल लागली. तिने साडी सारखी केली. काय करू तिला सुचत नव्हते. रणजीतच आला होता. आत येताच त्याने दरवाजाला कडी लावली. स्वानंदीच्या ह्रदयाचा ठोका चुकला. ती वाट बघत होती रणजीतच्या जवळ येण्याची. तो आला पण सोबत दारूचा भपकारा घेऊन. तिला किळस वाटली.

" रणजीत, तू दारू पिऊन आला आहेस?"
" अग, ती थोडी मित्रांनी आग्रह केला म्हणून घेतली."
" आजच्या रात्री बायकोपेक्षा मित्र जास्त जवळचे वाटतात तुला?" स्वानंदी दुखावली होती.
" अग ए.. पहिल्याच रात्री टिपिकल बायकोसारखी नको ना वागूस. जरा तरी समजून घे. म्हणून मला लग्न नको वाटत होतं." रणजीत बोलून गेला.
" पण तू तर माझ्या त्या सगळ्या अटी पूर्ण केल्यास ना? तूच आला होतास ना? नंतर ते प्रेमपत्र? त्यात तर तू किती आर्जवं केली होतीस?"
" ते.. खरंतर मला तू हवी होतीसच.. पण बंधनं नको होती. ती ही एवढ्या लवकर. आता.. आता लग्नाचे विधी झालेच आहेत तर शेवटची गोष्ट पण उरकून टाकू."
" उरकून टाकू? आपल्या आयुष्यातले पहिले मिलन??" स्वानंदीला धक्का बसला होता
" पहिले असेल तुझ्यासाठी.. " हे ऐकून स्वानंदीचा दगड झाला. ती काही बोलत नाही हे बघून रणजीतने तिचा हात ओढला. तिने त्याला झुगारण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या ताकदीपुढे तिचे काहीच चालले नाही.. आपला कार्यभाग उरकताच रणजीत पलंगावर जाऊन झोपला. स्वानंदी मात्र तशीच बसून होती. सुन्नपणे.. आपल्या शरीराच्या आणि स्वप्नांच्या उडालेल्या चिंधड्या बघत.
कशी सामोरी जाईल स्वानंदी आपल्या फसवणुकीला? ती स्वीकारेल हे सगळे? की जाईल परत आपल्या माहेरी.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा