कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.. भाग ९
मागील भागात आपण पाहिले की स्वानंदी आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याचा निर्धार करते. आता बघू पुढे काय होते ते.
" ताई.. हे काय बरोबर केलं नाही तुम्ही. आम्हाला बोलवायचे तरी लग्नाला. आम्ही होतो म्हणून तर.." हिरा बोलत होती. बबल्याने तिला गप्प बसवले.
" ताई.. खूप बरं वाटलं, तुमचं साहेबांशी लग्न झालं हे ऐकून."
" तुम्ही रणजीतला ओळखता?" स्वानंदीला आश्चर्य वाटले. त्यांच्याशी बोलत असताना वत्सलाबाईंसोबत मिहीर तिथे आला. त्याला बघून बाबल्याचा चेहरा फुलला.
" साहेब.. " त्याने हाक मारली. त्याला बघून मिहीर मात्र टेन्शनमध्ये आला
" तू इथे?"
" मग साहेब.. ताईंचं एवढं लग्न झालं , त्यांना भेटल्याशिवाय राहवेना म्हणून आलो." स्वानंदी सगळ्यांच्या चेहर्यावरचे भाव निरखत होती.
" तुमचं चालू दे. मी आत स्वयंपाकाचे बघते." वत्सलाताई आत गेल्या.
" ताई, तुम्हाला इथे साहेबांबरोबर बघितलं. बरं वाटलं. निघतो आता मी."
" हिरा, काहीतरी गैरसमज होतो आहे.. हा??"
" मग ताई.. हेच तर आले होते आपल्या बंगल्यात माझ्यासोबत. लय जीव आहे बघा तुमच्यावर.." हिरा बोलत होती. स्वानंदी मिहीरकडे बघत होती. तिच्या नजरेला नजर न देता आल्यामुळे तो मान खाली घालून उभा होता. स्वानंदी हिराकडे वळली.
" तुम्ही गावाला का गेला होता?"
" साहेबांनीच तर पैसे दिले गावचं घर बांधायला. लई गुणाचे आहेत. त्या दुसर्या साहेबांसारखे नाही.. खूप प्रेमळ बघा." बाबल्या बोलत होता. त्याचा एकेक शब्द स्वानंदीला विदीर्ण करत होता.
" बबल्या, हिरा ही गोष्ट तुम्ही बाबांना सांगणार नाही. वचन द्या मला."
" कोणती गोष्ट ताई?"
" हीच की हे साहेब आपल्या गावी येऊन राहिले होते."
" पण का ताई?" बबल्याचा प्रश्न विचारण्याआधीच रणजीत जिन्यावरून खाली आला होता.
" कोणाशी बोलते आहेस बायको? याला कुठेतरी बघितल्यासारखे वाटते आहे.." रणजीत स्वानंदीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. ते बघून विस्मयाने बबल्याने मिहीरकडे बघितले. त्या नजरेत विश्वासघाताचे दुःख होते.
" ताई, मी नाही काही बोलणार साहेबांना. मी तर परत जाणारच नाही परत आपल्या गावाला. मी जातो माझ्या गावी." बबल्या दुःखी आवाजात बोलला.
" तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस. मी तुला कुठेतरी बघितले आहे.." रणजीतचा आवाज चढला होता.
" आपण ज्या हॉटेलमध्ये उतरला होतो तिथे तो होता रणजीत.." मिहीर पटकन बोलला.
" ओह्ह... मग इथे?" त्याने प्रश्नार्थक नजरेने बबल्याकडे बघितले.
" ताईच्या लग्नाला नव्हतो म्हणून आलो होतो भेटायला.."
" स्वानंदी त्यांना पैसे वगैरे दे.. आणि बघ काय ते.." हातातली चावी उडवत रणजीत तिथून निघाला. तोपर्यंत आतून चहा आला होता.
" घ्या.." स्वानंदी बोलली.
" नको ताई.. तुम्हाला बघून पोट भरलं. सुखी रहा हाच गरिबाचा आशीर्वाद.." बबल्या आणि हिरा गहिवरल्या आवाजात बोलून निघाले. स्वानंदीने त्यांना अडवले नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी ती मिहीरकडे वळली.
" मला तुझ्याशी बोलायचे आहे."
" बोल.."
" वर खोलीत चल."
" चांगले नाही दिसणार."
" तुम्ही जे वागलात ते चांगले होते?"
मिहीर न बोलता स्वानंदीच्या पाठी तिच्या खोलीत गेला.
मिहीर न बोलता स्वानंदीच्या पाठी तिच्या खोलीत गेला.
" मी बोलले होते ना, मला गरीब, कुरूप कसाही चालेल पण तो माझ्यावर प्रेम करणारा हवा.. तरिही का वागलास तू असा?"
" माझी मजबुरी होती स्वानंदी.. रणजीत वेडा झाला होता तुझ्यासाठी. आणि माझ्यावर त्याचे खूप उपकार आहेत."
" त्या वेड्याने काय केले बघायचे आहे? " स्वानंदीने पदर बाजूला केला. पूर्ण अंगावर लव्हबाईट्स होते. मिहीरने डोळे बंद करून घेतले.
" का बघवत नाही? आणि मी हे सहन करायचे.. का? तर तुझ्या खांद्यावर रणजीतच्या उपकारांचे ओझे होते.. आता ते उतरलं असेल तरी आता माझ्या फसवणुकीचे हे नवीन ओझे परत आले आहे.."
स्वानंदीने मिहीरला त्याच्या चुकीची जाणीव तर करून दिली आहे. पण आता यातून ती बाहेर पडणार कशी? पाहू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा