कॉर्नर मनाचा..!
कॉर्नर म्हणजे 'कोपरा' हा कोपरा भिंतीचा किंवा एखाद्या कलाकृतीचा बिंदू, एक टोक, हवा तसा मॅचिंग कॉर्नर किंवा दूरची जागा, अडचणीत असलेला कोपराही असू शकते. पण 'मनाचा कॉर्नर' ही आपल्या मनाची आपल्या एकांताची जागा आहे. मनाचा कॉर्नर म्हणजे आपल्या हक्काची जागा असणे. मनाचा कॉर्नर हा आपल्या जगण्याला बळ देत असते. आपल्या अंतर्मनाला नव्याने जगणं शिकवत असते. कितीतरी गोष्टी मनाला त्रासून सोडणाऱ्या ज्या जगण्यास असह्य होतात आणि तरी मनाचा एक कोपरा आपल्या जगण्याला निरंतर प्रेरणा देत असतो. आपल्याला घरातील कोणी बोललं असेल तर त्या व्यक्तीबद्दल कितीतरी राग आपल्याला येतो. पण, आपण काही करू शकत नाही. आपल्याला बोलणारी व्यक्ती ही जवळची किंवा दूरची ही असू शकतात. आपली चूक नसतानाही आपल्याला त्या चुकांसाठी गृहीत धरल्या जाते. आपल्यावर आरोपांचा वर्षाव होतो. तुझ्यामुळे असं झालं. तुला समजत नाही. तू सतत असंच करते. तुझ्याकडून सतत अशा चुका होतात. अशा कितीतरी अप शब्दांचा मारा हा जेव्हा आपल्यावर होतो तेव्हा थोड्या क्षणांसाठी मन दुखावल्या जाते. मन भरून येते. कारण आपली काहीही चूक नसते. तरीही आपल्याला अपशब्दाने अपमानित केल्या जात असते. आपण आपल्या बाजूने बोलून सांगत असतो. मी काहीही केलं नाही. यात माझी चूक नाही. पण समोरची व्यक्ती आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. यामुळे नको ते विचार मनात येतात. किती तरी राग समोरच्या व्यक्तीबद्दल येतो. पण काही वेळानंतर किंवा थोड्या वेळानंतर तो राग निघून जातो. मात्र सर्व वातावरण नॉर्मल होते. आपण कितीही रडलो. किंवा कितीही म्हटलं आता मी कधीच त्या व्यक्ती बरोबर बोलणार नाही. मनाला कितीही समजून सांगितले तरी सुद्धा आपण मात्र समोरच्या व्यक्तीचं टोचून बोलणाऱ्या, मन दुखणाऱ्या व्यक्तीला सोडून देत नाही. हे का होते. किंवा असं का घडते. यात आपल्याला बोलणारे, आपले जन्म देणारे, आई वडील, आपले भाऊ-बहीण किंवा आपला जिवलग जीवनसाथी ही असू शकतो. पण आपण एका क्षणात कितीतरी राग मनातल्या मनात गिळून टाकतो आणि थोड्या वेळाने सर्व व्यवस्थित होऊन जाते. जीवन काय तर प्रत्येक वेळी आपली प्रशंशा, कौतुक होईल असं काहीही नाही. प्रत्येक वेळी आपल्यावर भरपूर प्रेम केला जाईल असं ही नाही. आपल्या मनासारख्या बऱ्याच गोष्टी होईल किंवा होणारं ही नाही. पण कधी कधी आपली चूक नसतानाही आपल्यावर अप शब्दांचा मारा होईल. यासाठी आपण निरंतर मनाचा कॉर्नर हा प्रेमाने अगदी मनाने सहन शीलतेसाठी राखून ठेवावा. मनाला सांगत रहावे निरंतर सुख पदरी पडणार नाही. कधीतरी आपल्या जवळच्यासाठीही आपण नकोशी होऊ शकतो. म्हणून मनाचा एक कप्पा मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करावे. कोणी काहीही बोलले, तरीही मनावर मात्र घ्यायचं नाही. मग ती माणसे जवळची असो किंवा दूरची असो. होईपर्यंत आपण आपल्याकडून चुका होणार नाही याची दक्षता, काळजी घ्यावी. सतत होणाऱ्या चुकांमधून शिकत राहावे. आयुष्य म्हणजे काय तर निरंतर चालत रहाणारा प्रवास. आयुष्य म्हणजे काय तर निरंतर शिकत राहण्याच्या प्रवास. आयुष्यात येणारे अनुभव घेत राहणे. आपल्याकडून होणाऱ्या चुका दुरुस्त करत राहणे. स्वतःलाच प्रेरणा देत राहणे म्हणजे आयुष्य असते. आपल्या मनाचा एक कप्पा सतत प्रकाशमान असावा. त्यात दया, प्रेम, करुणा, आपुलकी इत्यादी भावनांनी सतत भरून असावा. आपले हात काम करण्यासाठी, सोबत दान करण्यासाठी सुद्धा आहे. याची जाणीव आपल्या मनात असावी. मनात असा मनोभाव जो दुसऱ्याचे दुःख पाहून दूर करण्यासाठी प्रेरणा देतो. तो करुणामय भाव मनात असला पाहिजे. इतरांच्या दुःखाच्या भावनिक पैलूबद्दल संवेदनशीलता, निष्पक्षता, न्याय आणि परस्परावलंबन यासारख्या संकल्पनांवर आधारित प्रेम संपन्न असा मनाचा कप्पा असला पाहिजे. आयुष्यात येणाऱ्या दुःखाच्या वादळांना तोंड देता आलं पाहिजे. वादळ हे एक नैसर्गिक आपत्ती समजून त्या दुःखातून बाहेर निघता आलं पाहिजे. तेव्हा आपल्या मानवी मनाच्या कप्प्याचे अस्तित्व कायम राहील. क्षणात मन अस्वस्थ होते. क्षणात मन पक्षांसारख आकाशामध्ये उंच झेप घेते.तर क्षणात मन दुःखाच्या खायीतही पडते. क्षणात मान कोणाच्या बोलण्यात येऊन जाते. कधी मन मग कोणाचा द्वेष ही करते. मन हे दिसत नाही मात्र मन दुखते. मनाला आपल्या जवळचे असो किंवा दूरचे कोणीतरी आपल्याला वाईट किंवा टाकून बोलल्यावर मन जास्त दुखते. मनात राग उत्पन्न होतो. मन संवेदनशील अशी ही एक संस्था आहे. कितीतरी भावना मनात उत्पन्न होत असतात. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. म्हणून मनाचा कप्पा नेहमी ताकदीचा असावा बळकट राहावा याकडे अगोदर लक्ष द्यावे. कोणीही यावं आणि येऊन काहीही बोलून जावं असं होता कामा नये. मनाला सांगत रहावे की कोणी काहीही बोललेलं की मी मात्र मनावर जास्त घेणारं नाही. एका कानाने ऐकणार तर दुसऱ्या कानाने ऐकलेलं शब्द सोडून देणार. उगाच शब्दांचा गोत्यात येणार नाही. मग ते शब्द टोचून बोललेले असो किंवा प्रेमाचे असो, पण आपल्या मनाला प्रेमाने बोलणारी लोक जास्त आवडतात. त्यांच्याशी बोलण्याची आपुलकीची भावना, एक ओढ मनाला झालेली असते. त्यांची सोबत असणं मनाला आनंद देऊन जाते. अशा व्यक्तींच्या प्रेमळ स्वभावामुळे मनाचा कप्पा सतत प्रेमाने भरलेला असतो. अशी लोक जगणं शिकवतात जगण्याचा अर्थ कळतो व मनाचा कप्पा सतत तरुण राहतो.
कॉर्नर मनाचा असतो..
सुख दुःखासंग जगण्याचा
दया, प्रेम, करुणा संपन्न
मानवी हृदयी अस्तित्वाचा
मॅचिंग कॉर्नर तल्लीनतेचा
ओढ लागता रमण्याचा
मनाचा कॉर्नर एकांताचा
सांगतो अर्थ जगण्याचा..!
सुख दुःखासंग जगण्याचा
दया, प्रेम, करुणा संपन्न
मानवी हृदयी अस्तित्वाचा
मॅचिंग कॉर्नर तल्लीनतेचा
ओढ लागता रमण्याचा
मनाचा कॉर्नर एकांताचा
सांगतो अर्थ जगण्याचा..!
©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
मूर्तिजापूर, जि अकोला
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा