Jul 11, 2020
सामाजिक

कोरोना अन काळजी

Read Later
कोरोना अन काळजी

"आयुष्य अगदी सुसाट चाललं होतं, एकदम कुणीतरी पॉज बटण दाबले अन सगळेच थांबले", असेच काहीसे झाले आहे प्रत्येकाचे.
 सर्वीकडे कोरोनाचा अंधार दाटलाय. सर्वीकडे फक्त एकच विषय. त्याचे सिम्पटम्स, प्रत्येक देशातल्या रुग्णांची संख्या. बातम्या , सोशल मीडिया झाले तिथेही तेच. जरावेळाने मोबाईल हातात घेतला तरीही त्याचबाबतचे नोटिफिकेशन. अर्थात एकमेकांची काळजीनेच मेसेज पाठवले जातात. डोक्यात तेच विचार घोळत राहतात थोडावेळही कोणी विसरूच देत नाही. 
पण ह्याचा नकळत प्रत्येकाचा मनावर किती नकारात्मक परिणाम होतोय ह्याचाही विचार व्हायला हवा. 
रोजचा घडामोडीसाठी 15 ते 20 मिनिट बातम्या जरूर ऐका. पण सारखे तेच बघून, ऐकुन मनात एक भीती निर्माण होते. भीतीमुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडते.

 स्वतःला शारिरीक अन मानसिक स्ट्रॉंग बनवूया. आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे आपल्याच हातात आहे.अशा परिस्थितीत ही तग धरण्यासाठी सकारात्मक उमेदीने सामोरे जाऊया.इतरवेळी वेळे अभावी जमत नाही असे छंद जोपासून मन आनंदी ठेवूया. 
प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करुन, कोणत्याही देवाला साकडे न घालता स्वतःच्या मनाला साकडे घालूया. 

परिस्थिती बदलण्यासाठी पहिले मनःस्थिती बदलूया.... मनाचा स्थितीचा नक्कीच सभोवतालचा परिस्थितीवर जास्त परिणाम होतो.#stayhome#staysafe