Login

गावाकडच्या गोष्टी : कोरोनातलं गाव

गावातील संस्कृतीचे जतन व संवर्धन काळाची गरज आहे.
कोरोनातलं गाव : एक आठवण..!

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील सरोळी हे पंधरासे वस्तीचे छोटस गांव. हिरण्यकेशी नदीच्या पाण्याने समृद्ध झालेल व अनेक डौलदार पिकांनी सजलेल आणि माणुसकीने ओथंबलेले , सर्व सुविधांची रेलचेल येथे सतत बहरलेली..! शाळा ,दुधसंस्था , बॕंक , सेवा सोसायटी , स्वस्त धान्य दुकान व आठवडी बाजार ह्या महत्वपुर्ण सुविधा ईथे कायम आस्तीत्वात....दोन चांगले डॉक्टर गावक-यांच्या सेवेला त्यामुळे गावातील लोकांचे आरोग्य अबाधित....!

कोरोनाच्या संसर्गाचे आपल्या देशात आगमन झाले आणि आमचा गाव सतर्क झाला .शासनाने लॉकडाउन जाहिर केला व गावातील लोक दक्षता घेऊ लागले.ग्रामपंचायत सक्रिय झाली व कोरोनाच्या युद्धाला सज्ज झाली.तातडीने ग्रामपंचायतींने ग्रामसभा बोलावून "कोरोना दक्षता समिती "स्थापन केली .यामध्ये गावातील होतकरु व अनुभवी तरुणांचा समावेश करण्यात आला .ग्रामसभेत शासनाच्या वेळोवेळी आलेल्या सुचनांचा मसुदा तयार करुन त्याची अमलबजावणी करण्याचे ठरले .

कोरोनाच्या प्रतीबंधासाठी अंगणसेविका दररोज घरोघरी माहिती घेऊन खबरदारीचे उपाय सांगू लागल्या.कोरोना समितीचे सदस्य कामाची विभागवार वाटणी करुन गावात फिरु लागले.कोपरा सभा आयोजित करुन लोकांना कोरोना बाबतचे नियम पटवून सांगू लागले .सरपंंच , ग्रामसेवक दररोज कामांचा आढावा घेत राहिले .गावातिल गर्दीच्या ठिकाणी थांबू नये यासाठी प्रत्येकठिकाणी व्यक्तिंची सोय केली.गावात दुधसंस्था , सेवासोसायटी , स्वस्त धान्यदुकान या ठिकाणी व्ववहार करताना तीन फुटाचे चौकोन आखून त्या चौकोनातच उभे राहून व्यवहार करण्याचे कसोशीने पालन केले .नियोजनबद्ध वेळ ठरवून आठवड्यातुन दोन दिवस सकाळी आकरा ते पाच गाव पुर्णता लॉकडाउन केले गेले .अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्तिने मास्क घालणे अनिवार्य केले.सॕनीटायझरचे वाटप घरोघरी करुन स्वच्छतेला प्राधान्य दिले . गावातील अनेक तज्ञ लोक विविध पदावर कार्यरत आहेत त्यांच्या विचारांचा आदर्श व माहीती घेण्यासाठी झुम अॕपव्दारे मोबाईलवरुन सोशल डिस्टींगक्शन चे अंतर ठेवून आठवड्याला कोरोना संदर्भात मिटींग घेतली जाते .जागोजागी कोरोना बाबत घोषवाक्य फलक लावून लोकांना जागृत केले जाते ...या सर्व कामात गावातील नागरीकांचा अभुतपुर्व प्रतीसाद मिळाला आहे.

गावात बाहेरील व्यक्तीला प्रवेश बंद आहे. फिरते विक्रेते , फळे भाजीपाला विक्रेते यांना फिरण्यास मनाई केली आहे. गावातील बाहेर गावावरुन आलेल्या व्यक्तिला गावाकडील मराठी शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था केली आहे. चौदा दिवसानंतरच त्यांनी नियमांचे पालन केले असलेस त्यांंची मुक्तता केली जाते .

गावातील आजारांची व कोरोनाबाबतच्या कामकाजाची माहितीचा आढावा घेऊन सरपंंच तालुकास्तरावर वेळेत माहीती दररोज देत असतात. असे कोरोनाच्या प्रतीबंधासाठी झटलेल गाव .. निश्चितपणे कोणताही रोगाला कधीच बळी पडणार नाही....गावातील नागरीकांनी दृढ निश्चय केल्यामुळे कोरोनासारखा महाभयंकर रोग फिरकणारही नाही..शासनाला सहकार्य करत आज हे गाव समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहे …!

असे असावे आपले गाव
रोगाचे नसावे तेथे नाव

©नामदेव पाटील
0