कृष्णाची झाली राधा
कृष्णच मग झाली राधा
कृष्णच मग झाली राधा
दोन जीव जरी वेगळे
परी खरे अद्वैत कळे
द्वैताची नव्हती बाधा
कृष्णच मग झाली राधा
परी खरे अद्वैत कळे
द्वैताची नव्हती बाधा
कृष्णच मग झाली राधा
अनंत एकच जर आत्मा
सारेच इथे परमात्मा
मग कुठली उरते राधा
कृष्णच मग झाली राधा
सारेच इथे परमात्मा
मग कुठली उरते राधा
कृष्णच मग झाली राधा
मिळते दिक्षा आध्यात्माची
ओढ लागते अद्वैताची
कृष्णाची होते राधा
कृष्णच मग होते राधा
ओढ लागते अद्वैताची
कृष्णाची होते राधा
कृष्णच मग होते राधा
©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे