कृष्ण सखी -१९९
रात्रीचं जेवण उरकल्यावर सखी आपल्या खोलीत येऊन खिडकीपाशी उभी राहून खांद्यावर सुरजला थोपटत खोलीतून येरझाऱ्या घालणाऱ्या कृष्णाकडे पाहत उभी होती. त्याला काय बोलायचं होतं याचा तिला अंदाज येत नव्हता, त्यामुळेच तिच्या जीवाची उगाचच धाकधूक होत होती. त्याचं आरतीवरील प्रेम तिने पाहिलेलं, अनुभवलेलं आणि तिला जाणीवसुद्धा होती त्यामुळे तर तिचं मन जास्तच घाबरत होतं.
‘मी आरुला कधीच विसरू शकत नाही सखी, त्यामुळे तुम्ही माझ्या सखीच म्हणजे माझी मैत्रीणच राहाल.’ असं काही त्याच्या तोंडून तिला सहन होणारं नव्हतं.
असलं काही ऐकण्यापेक्षा जे आहे तेच बरं आहे असंच तिला वाटत होतं. सत्य सूर्यप्रकाशासारखं तेजस्वी असतं. तापलेला सूर्यप्रकाश म्हणजे प्रखर सत्य! तो सूर्यप्रकाश जसा डोळ्यांना सहन होत नाही, नकोसाच वाटतो अगदी तसंच सखीला त्याच्या तोंडून बाहेर पडणारं सत्य भीतीने नकोसं झालेलं.
कृष्णा सुरजला नेहमीसारखा झोपवत होता. पेंगुळलेला सुरज झोपल्यावर कृष्णाने त्याला पलंगावर झोपवून पांघरून घातलं आणि समोरंच भिंतीवर असलेल्या आरती आणि त्याच्या फोटोकडे पाहू लागला.
आरतीच्या फोटोकडे पाहताना कृष्णाच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं आणि पाहता पाहता त्याचे डोळे ओले झाले. तिच्या फोटोकडे पाहताना नेहमीसारखाच तो तिच्या पहिल्या भेटीपासून ते तिच्या शेवटच्या क्षणांपर्यंत तिच्या आठवणींत हरवला.
जोराचं वादळ येतं आणि झाडाचं पान अलगद त्यात गुरफटलं जातं. स्वतःचं अस्तित्व विसरतं, त्या वादळासोबत वाहत जातं, कृष्णाही आरतीच्या आठवणींच्या वादळात तसाच वाहत गेला. त्याला आजूबाजूचं भानंच उरलं नव्हतं. तो एकटक आरतीच्या फोटोकडे बघत उभा राहिला.
कृष्णा आता बोलेल, आता बोलेल याची वाट पाहून बराच उशीर झालेला. बाहेरून मधूनच सोनाईच्या घोरण्याचा आवाज येत होता. बाहेर शांतता, खोलीत शांतता सखीला ती शांतता नकोशी झालेली. ऐकायची इच्छा नव्हतीच पण ही वेळ कधी ना कधी येणारच होती त्यामुळे मन घट्ट करून सखी त्याच्या जवळ येत हळू आवाजात बोलली,
“क्रिष्ण् ऽ ऽ ऽ.”
तिचा आवाज त्याच्या आठवणींच्या वादळात मध्येच कुठेतरी हरवला. जवळून सखीने त्याच्याकडे बारकाईने पाहिलं. डोळ्यांत पाणी घेऊन तो एकटक समोरच्या फोटोकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. तिला जाणीव होती, तो त्यांच्या भूतकाळातील आठवणींमध्ये हरवलाय.
आरतीचा विषय निघाला की कृष्णाला त्रास होतोच हे माहीत असल्याने तिला स्वतःपेक्षा त्याचीच काळजी वाटली आणि त्याचा हात हातात घेऊन तिने प्रेमाने त्याला आवाज दिला,
“क्रिष्ण् ऽ ऽ.”
घोंगावणाऱ्या वादळात आपल्या माणसाचा आवाज यावा आणि आपण श्वास घेतोय याची जाणीव व्हावी असंच काहीसं त्याचं झालं आणि त्याची संथ नजर सखीवर आली,
“हां?”
“हां?”
त्याचा बावरलेला चेहरा पाहून सखीही मन घट्ट करून बोलली,
“तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? आपल्याबद्दल? म्हणजे आपल्या तिघांबद्दल?”
“तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? आपल्याबद्दल? म्हणजे आपल्या तिघांबद्दल?”
मोठा उच्छवास सोडत कृष्णा खांदे सैल सोडत हुंकारला,
“हम्म ऽ.”
आरतीच्या आणि त्याच्या ऐन तारुण्यातील नटखट, मधुर, काही लडिवाळ आठवणींमध्ये गुरफटलेला कृष्णा थोडासा बावरलेलाच. तो आरतीच्या फोटोकडे पाहत किंचित हसून बोलला,
“सखी ऽ मी तुम्हाला माझी आणि आरुची पहिली भेट सांगितलीच नाही काय?”
“सखी ऽ मी तुम्हाला माझी आणि आरुची पहिली भेट सांगितलीच नाही काय?”
सखी शांतपणे,
“नाही.”
“नाही.”
कृष्णा त्या क्षणांत हरवलेला. आता ही आरती जशी की त्याच्या नजरेसमोर होती. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आणि डोळ्यांत तिच्या आठवणींचा ओलावा दाटून आला.
त्याही अवस्थेत कृष्णा हसून बोलला,
“तशी धांदरट होती ती.. पण स्वभावाने निर्भीड.
मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा. कॉलेज भरून इकडे तिकडे दोन महिने झाले असतील. मी मित्रांसोबत वर्गातून थट्टा मस्करी करत बाहेर येत होतो आणि सहजच समोर पाहिलं आणि माझे पाय जागीच थबकले... नजरकैद झालेली कारण एक सुंदर मुलगी हसतच माझ्याकडे बघत धावत येत होती.
ती मुलगी आपल्याकडेच धावत येतीये, हे बघूनच माझे विचार थांबले आणि हृदयाची धडधड वाढली. हातातील वही गळून पडली. मनात किती सारे प्रश्न उमटले,
‘कोण ही? माझ्याकडे का येतीये?
मिठी बिठी मारते की काय?’
एका मुलीची पहिलीच मीठी!
विचाराने मी शहारलो!
विचाराने मी शहारलो!
त्या काही सेकंदामध्येच-
'अत्तरही आजच संपायचं होतं?' हा दु:खद विचार ही मनात डोकावून गेला आणि तिचं खळखळत हसू कानांवर पडलं.
ते निर्मळ हास्य ऐकून मी रोमांचित झालो. तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहताना माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटलं. हृदयाची धडधड ऐकू येईल इतकी वाढलेली. ती टप्प्यात येताच माझे हात आपोआप तिला सावरायला पुढे झाले. तेव्हा हातातील शिल्लक राहिलेली पुस्तके ही कधीच खाली पडलेली. मी तिला बाहूपाशात बंदिस्त करण्यासाठी तयार होतो आणि ती माझ्या खांद्याला धक्का मारून निघून गेली..
त्या बरसणाऱ्या पावसाकडे!
ती जाताना तिच्या ओढणीचा मंद सुगंध श्वासात भरून मी वळून पाहिलं. ती त्या सरीसरीने येणाऱ्या पावसात चिंब भिजत होती. पावसाचे थेंब हातावर घेत हवेत भिरकावत होती."
तो बोलता बोलता त्याच क्षणांमध्ये गुरफटलेला. त्याच्या चेहऱ्यावर तेज आणि त्याच्या डोळ्यांमध्ये चमक आलेली. सखीनेही कुतूहलाने विचारलं,
"मग काय झालं?"
तो तसाच भूतकाळात हरवल्यासारखा उत्सुकतेने बोलला,
"मी भारावल्यासारखा तिला बघत होतो. तिचा सावळा पण रेखीव चेहरा भिजल्याने अधिक सुंदर दिसत होता. त्याउपर तिचं ते खळखळत हसू माझ्या काळजाचा ठोका चुकवत होतं. तिला पहिल्यांदा पाहून सुद्धा मला प्रचंड ओढ जाणवत होती. मी यंत्रवत तिच्याकडे बघत चाललो होतो. मला समोर बघून तिच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आलं.
मी हात पुढे करत थोडसं हसून बोललो,
“बॅग? तिलाही भिजायचं आहे काय?”
“बॅग? तिलाही भिजायचं आहे काय?”
आपल्या खांद्यावरील बॅग माझ्या हातात देत ती खळखळून हसत बोलली,
“थँक्स मित्रा.”
तिच्या या शब्दांनी तिथेच आमची मैत्री झाली. ती होती आमची पहिली भेट. तो पहिला पाऊस नसतानाही तिच्या सोबतीचा तो पहिला पाऊस होता.”
बोलता बोलता त्याचे श्वास जड झाले आणि तो बोलायचा थांबला. नजर पुन्हा भिंतीवर..
आता फक्त फोटोपुरत्या उरलेल्या तिच्या फोटोवर आली.
तिच्या आठवणींचा त्रास होऊन त्याला भरून आलं. त्याला आज किती काही बोलायचं होतं पण तिच्या विरहाचं दुःख त्याच्या गळ्यात अडकलं आणि शब्द मुके झाले. आवंढा गिळत त्याला फोटोकडे पाहताना बघून सखीलाही वाईट वाटलं.
अंग गळून गेल्यासारखं वाटल्यावर कृष्णा तोंडाने श्वास घेत आधाराला पलंगावर बसला. सखी त्याच्या खांद्यावर हात ठेवून काळजीने बोलली,
“ठीक आहात ना तुम्ही?”
“ठीक आहात ना तुम्ही?”
नेहमीचा दुःखाचा सुनामी काळजात उमटल्यावर गळ्यापर्यंत आलेला आवंढा कसाबसा गिळत कृष्णा घोगऱ्या आवाजात बोलला,
“मी ठीक नाहीये सखी.”
“मी ठीक नाहीये सखी.”
त्याचा रडवेला चेहरा पाहताना, त्याच्या डोळ्यांत पाणी पाहताना सखीसुद्धा रडवेली झाली.
त्याच्या खांद्यावरून प्रेमाने हात फिरवत सखी त्याला समजावत बोलली,
“ताई आपल्याला सोडून खूप लांब गेलेत क्रिष्ण्!
हेच सत्य आहे.”
‘तिने आरतीला स्वीकारलंय’
या भावनेने कृष्णाच्या नजरेत सखीबद्दलचा आदर कैकपटींनी वाढला आणि तो तिच्यात आधार शोधत तिचा हात घट्ट पकडून तिला जाब विचारल्यासारखा बोलला,
“का सत्य आहे हे?”
सखी त्याचे डोळे पुसत प्रेमाने त्याला समजावत बोलली
“काही गोष्टी कृष्णाच्या सुद्धा हातात नसतात क्रिष्ण्, जे व्हायचं ते होतंच.”
सखीचा हात घट्ट पकडून कृष्णा काळजात सलणाऱ्या सलीने कंपलेल्या आवाजात बोलला,
"प्रेम इतकं दुःखदायी का असत सखी? का सोबत असूनही नसतं? का इतका त्रास देतं?”
त्याच्या प्रश्नांनी सखीच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या. त्याच्या प्रत्येक शब्दातील दुःख जणू तिच्या काळजातूनच उमटलेलं. दोघेही समदुखी असल्यासारखे त्या क्षणी कोसळलेले. त्याच्या केसांतून हात फिरवत सखी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण दाटलेल्या भावनांनी तिला बोलताच येईना ती फक्त त्याच्या केसांवरून हात फिरवत राहिली.
आरतीच्या आठवणींनी पुन्हा तीच खपली निघालेला कृष्णा तडफडत होता, जसा पाण्याविन मासा! पुनःपुन्हा तेच दुःख त्याला आता सहन होत नव्हतं. सखीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवताच भरलेल्या डोळ्यांनी त्याने तिच्याकडे पाहिलं.
‘माझीच सखी.. माझं माणूस’
या हक्काने तिच्या कमरेला हातांचा वेढा देऊन कृष्णा तिला आधाराला बिलगला आणि आपसूकच त्याच्या वेदनाचा बांध फुटून तो रडू लागला.
या हक्काने तिच्या कमरेला हातांचा वेढा देऊन कृष्णा तिला आधाराला बिलगला आणि आपसूकच त्याच्या वेदनाचा बांध फुटून तो रडू लागला.
कृष्णाला कोसळलेला पाहून आपल्या छातीशी कवटाळत सखी मुसमुसत दुःखाने बोलली,
“खरंय, प्रेम इतकं दुःखदायी का असतं? का सोबत असूनही नसतं? का इतका त्रास देतं?”
“खरंय, प्रेम इतकं दुःखदायी का असतं? का सोबत असूनही नसतं? का इतका त्रास देतं?”
कृष्णा तिला घट्ट बिलगून घोगऱ्या आवाजात कसातरी तुटक तुटक बोलला,
“सोपं नसतं सखी, एखाद्याला… एखाद्याला स्वतःपेक्षा जीव लावायचा, त्याच्यासाठी वेड… ठारवेडं व्हायचं आणि एका क्षणात त्याची साथ सोडायची… आपण वेडं होतो सखी! नाही सहन होत ते दुःख!”
सखी त्याच्या पाठीवरून हात फिरवत मुसमुसत हुंकारली,
“हम्म ऽ.”
कृष्णा सखीच्या कुशीत रडत बोलला,
“माझं खूप प्रेम होतं तिच्यावर आणि आजही आहे पण ती… ती नाहीये.”
सखीने आधीच कृष्णाला आरतीसकट स्वीकारलेलं. तिला त्याच्यासाठी याक्षणी खूप वाईट होतं इतकं की कुठूनतरी आरतीला शोधून आणावं आणि कृष्णासमोर उभं करावं.
सखी कशीतरी बोलली,
“क्रिष्ण् सावरा स्वतःला!”
“क्रिष्ण् सावरा स्वतःला!”
कृष्णा तसाच रडत होता,
“भीती वाटते सखी पुन्हा त्याच रस्त्याने चालण्याची! पुन्हा कोणाला आपलं बोलण्याची! आता पुन्हा कोणाला गमवायची ताकद नाहीये माझ्यात.
आयुष्यभराची वचनं देऊन अर्ध्यात सोडून गेली ती मला… कायमची सोडून गेली!”
“भीती वाटते सखी पुन्हा त्याच रस्त्याने चालण्याची! पुन्हा कोणाला आपलं बोलण्याची! आता पुन्हा कोणाला गमवायची ताकद नाहीये माझ्यात.
आयुष्यभराची वचनं देऊन अर्ध्यात सोडून गेली ती मला… कायमची सोडून गेली!”
सखी त्याच्या दुःखाचा सागर पाहून नि:शब्द होती. कोणत्या शब्दांत त्याचं सांत्वन करायचं तिला कळतच नव्हतं.
त्या भावनेच्या प्रवाहात तिच्या नाजूक कंबरेला घट्ट कवटाळात कृष्णा कंपलेल्या आवाजात बोलला,
“सखी ऽ तुम्ही नाही ना मला सोडून जाणार?”
त्याची एकाकीपणाची भीती त्याच्या डोळ्यांत पाहून सखी त्याला आपल्या छातीशी घट्ट कवटाळून मुसमुसत बोलली,
“नाही क्रिष्ण् मी तुम्हाला कध्धी कध्धी सोडून जाणार नाही.”
“नाही क्रिष्ण् मी तुम्हाला कध्धी कध्धी सोडून जाणार नाही.”
त्याने आधीच ठरवलेलं तिच्याशी खूप बोलायचं, अगदी अंतर्मनातील कप्पे खोलायचे पण आरतीचा विषय निघाल्यावर नेहमीसारखे त्याचे शब्द मुके आणि अश्रू बोलके झालेले पण आज त्याला आधाराला पलंग, खिडकी किंवा एकांताची गरज नव्हती.
“तुम्ही हव्या आहात मला सखी!...
हव्या आहात!”
तो ओठांत पुटपुटला आणि एकाकीपणाला घाबरून भेदरलेल्या कोकरासारखा त्याच्या हक्काच्या कुशीत शिरला.
© प्रियांका सुभा कस्तुरी
०८/०८/२०२४
०८/०८/२०२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा