कृष्ण सखी -२००
त्याने आधीच ठरवलेलं तिच्याशी खूप बोलायचं, अगदी अंतर्मनातील कप्पे खोलायचे पण आरतीचा विषय निघाल्यावर नेहमीसारखे त्याचे शब्द मुके आणि अश्रू बोलके झालेले पण आज त्याला आधाराला पलंग, खिडकी किंवा एकांताची गरज नव्हती.
“तुम्ही हव्या आहात मला सखी!...
हव्या आहात!”
तो ओठांत पुटपुटला आणि एकाकीपणाला घाबरून भेदरलेल्या कोकरासारखा त्याच्या हक्काच्या कुशीत शिरला.
सखी त्याला एका हाताने छातीशी कवटाळून दुसरा हात त्याच्या पाठीवरून फिरवत राहिली.
त्याला जितकं बोलायचं होतं, तितक्याच त्याच्या भावना अगदी आतपर्यंत हेंदकाळलेल्या. त्याचे अश्रू तिला सहन नव्हते. थोडावेळ त्याच्या अश्रूंना वाहू दिल्यावर सखी त्याच्या पाठीवरून हात फिरवत प्रेमाने बोलली,
“क्रिष्ण्, राहिलेलं उद्या बोलूया का प्लीज?
आता खूप रात्र झालीये.”
“क्रिष्ण्, राहिलेलं उद्या बोलूया का प्लीज?
आता खूप रात्र झालीये.”
रडण्याची सवय नसलेल्या माणसाचं रडल्यावर डोकं लगेच पकडतं. कृष्णाचं ही डोकं लगेच जड झालेलं. विचारांनी, आरतीच्या आठवणींनी की रडल्यामुळे की सगळ्याचमुळे पण तो लगेच सखी पासून दूर होऊन पलंगावर आडवा पडला. सखीने त्याच्यावर गोधडी पांघरली. जड डोक्यामुळे त्याचे जड डोळे लगेच मिटले गेले.
ही रात्र कृष्ण सखीच्या बऱ्याच अव्यक्त भावनांना घेऊनच मागे सरली पण सखीची सकाळ नेहमीसारखी घाईची झालेली.
“म्हाळसा ऽ ऽ ही किटली घरात घिवून जा.”
सोनाईच्या बाहेरून आलेल्या आरोळीने कृष्णाला जाग आली त्याने डोळे उघडले आणि पदराला हात पुसत स्वयंपाकघरातून ओटीवर जाणारी सखी त्याच्या नजरेस पडली.
“आई हे ओट्यात काय आहे?”
सखीचा आवाज आला.
सखीचा आवाज आला.
“श्यंडवालाची भाजी दिले चिम्यानं.”
मेहंदीरंगी नाजूक वेलासारखी कोपरावर लांबसकट भाजी पाहून सखी कुतुहलाने बोलली,
“अय्या, ही रानभाजी आहे? मी पाहते ना ही भाजी पण मला तर या वेली वाटतात.”
“अय्या, ही रानभाजी आहे? मी पाहते ना ही भाजी पण मला तर या वेली वाटतात.”
सोनाई हसली,
“धर घिवून जा घरात. मी गोठ्यात जाते.”
“धर घिवून जा घरात. मी गोठ्यात जाते.”
सखी उत्साहात बोलली,
“आई ऽ, मला रानभाज्या दाखवाल का? म्हणजे मी येताजाता आणत जाईन.”
“आई ऽ, मला रानभाज्या दाखवाल का? म्हणजे मी येताजाता आणत जाईन.”
सोनाई गोठ्याकडे जात बोलली,
“मीच कशाला पायजे? त्या कामदाराला सांग की, लय सुगरावा त्याला. त्यो दावल समद्या भाज्या.”
कृष्णा पलंगावरून त्यांचं संभाषण ऐकत होता. सखी पुन्हा ओटीवरून ओझरती दिसली. पाठ आखडल्याने कृष्णा पलंगावर बसल्याबसल्याच पाठ मोडत होता आणि स्वयंपाकघरातून सखीच्या पैंजणाची छमछम, बांगड्यांची किणकिण आणि गुणगुणण्याचे स्वर सगळं एकदमच ऐकू येत होतं. कान आणि मनावर अप्रत्यक्षरीत्या सखी सखी पसरल्यावर कृष्णाला सकाळी सकाळी एकदम प्रसन्न वाटलं.
गोठ्यातूनच पुन्हा आरोळी ऐकू आली,
“त्यो कामदार उठला नसला तं उठव त्याला.”
“त्यो कामदार उठला नसला तं उठव त्याला.”
“हो आई ऽ ऽ, उठवते.”
त्यांचं बोलणं ऐकून कृष्णाच्या काय मनात आलं पण तो क्षणातच गोधडी अंगावर घेऊन पुन्हा पलंगावर आडवा झाला.
सोनाईने सांगितल्यावर सखी कृष्णा उठला का नाही हे पहायला आपल्या खोलीत आली तेव्हा कृष्णा झोपलेला होता. काल झोपेपर्यंत त्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होत्या पण आता किती शांत झोपलेला तो. सखी हळूच पंगावर बसली.
त्याला आवाज देण्याआधी त्याच्या सावळ्या चेहऱ्यावरून तिची नजर फिरली आणि नेहमीप्रमाणे त्याच्या विस्कटलेल्या केसांमधून हात फिरवण्याचा तिला मोह झाला. तो झोपलेला म्हणून अगदी सावकाश नेहमीप्रमाणे स्वतःलाही कळू नये इतक्या सावकाश तिने त्याच्या केसांमधून हात फिरवला. बांगड्यांचं पाणी त्याच्या गालावर पडलेलं दिसताच तिने चोरासारखा हात मागे घेतला आणि चटकन उठून बाजूला उभी राहिली.
कृष्णा पलंगावर डोळे मिटून पडलेला आणि छमछम पैंजणाचा आवाज करत सखी आल्याची चाहूल लागली. डोळे बंद असतानाही काळजात उगाचच त्याच्या चुळबुळ झाली आणि खळकन तिच्या बांगड्यांचा आवाज झाला बहुतेक तिने पदराने बांगड्या पुसल्या असाव्यात.
आता ती हाक मारेल, असा अंदाज असतानाच काही क्षणांतच त्याच्या केसांतून तिचा ओला हात फिरला.
तो कोमल स्पर्श!
स्पर्श होऊन ही न झालेल्या त्या अलवार स्पर्शानेसुद्धा कृष्णाच्या मनात अलवार तरंग उठले आणि मनातील चुळबुळ वाढली.
स्पर्श होऊन ही न झालेल्या त्या अलवार स्पर्शानेसुद्धा कृष्णाच्या मनात अलवार तरंग उठले आणि मनातील चुळबुळ वाढली.
आपण झोपेचं सोंग घ्यावं आणि जोडीदाराचा ओलसर हात आपल्या केसांतून फिरावा!
सुख दुसरं काय असतं!
त्या अलवार क्षणांमध्ये कृष्णा गुरफटला. तिने असाच केसांतून हात फिरवावा असं वाटत असतानाच गालावर थंड पाण्याचे थेंब पडले आणि त्याचे बंद डोळेही क्षणासाठी मिटले. त्याचक्षणी तो स्पर्श ही दूर गेल्याचा जाणवलं.
‘सखी चोरी ही करतात तरं!’
कृष्णा मनातही खोडकरपणे बोलला.
कृष्णा मनातही खोडकरपणे बोलला.
थंड पाण्याचे थेंब चेहऱ्यावर पडून सुद्धा त्याची झोपमोड झाली नाही याचं सखीला आश्चर्यच वाटलं.
प्रेमाने हाक मारत सखीने त्याचा दंड अलगद हलवला,
“क्रिष्ण् ऽ ऽ ऽ ऽ.”
“क्रिष्ण् ऽ ऽ ऽ ऽ.”
…आणि कृष्णाने संथपणे डोळे उघडले. नजर समोर असलेल्या सखीवरच गेली. नेहमीसारखी अंघोळ उरकलेली, पदर कमरेला खोचलेली, चेहऱ्यावर प्रसन्न हसू असलेली सखी त्याच्याकडे पाहून गोड हसली. तोही तिच्याकडे पाहून थोडासा हसला.
कालचा प्रसंग आठवून थोडसं हसूनच पण तिने काळजीने विचारलं,
“डोके दुखत नाही ना?”
तो हसला,
“मी तुमच्यासारखा नाजूक आहे काय?”
“मी तुमच्यासारखा नाजूक आहे काय?”
त्याचं नेहमीसारखं बोलणं पाहून तिला बरं वाटलं आणि सखी खोली बाहेर जात हसत बोलली,
“आवरा लवकर नाहीतर उशीर होईल.”
“आवरा लवकर नाहीतर उशीर होईल.”
दूध काढून आलेल्या सोनाईने तिला स्वयंपाकघरात विचारलं,
“उठला व्हयं गं?”
“आत्ताच उठवलं. त्यांचं उरकेपर्यंत मला सांगा ना ही नाजूक शेंडवल भाजी कशी करतात?” तिने उत्सुकतेने विचारलं.
“उठला व्हयं गं?”
“आत्ताच उठवलं. त्यांचं उरकेपर्यंत मला सांगा ना ही नाजूक शेंडवल भाजी कशी करतात?” तिने उत्सुकतेने विचारलं.
“भाजीला बी किती पिरमानं हाक मारतीस.”
सोनाई हसली आणि सोनाईचं बोलणं ऐकून कृष्णाही हसला.
सोनाई हसली आणि सोनाईचं बोलणं ऐकून कृष्णाही हसला.
कृष्णा उठून बसलेला. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचं आयुष्य सखीने व्यापलेल्याची जाणीव त्याला प्रकर्षाने होत होती. काल रात्री त्याला हेच बोलायचं होतं, तिला हेच सांगायचं होतं पण हे सोडून बाकी सगळं बोलून झालेलं. सखीच्या विचारांतच त्याची नजर पायालगतच्या टेबलवर असणाऱ्या त्यांच्या लग्नातील फोटोवर गेली. त्याने पुढे होऊन तो फोटो हातात घेतला.
सखी मुंबईला गेलेली तेव्हा हा फोटो शोधूनही सापडला नव्हता पण आज तो जागच्या जागेवर होता. मुंडवळ्या बांधलेल्या फोटोतील कृष्ण-सखीला पाहून कृष्णा थोडासा हसला. त्या फोटोकडे प्रेमाने पाहताना दोघांमध्ये ते चार इंचाच अंतर पाहून त्याला लग्नातील अट आठवली.
सखीने सोनाईला रानभाजी शिकवण्याचा हट्ट केल्यावर सोनाई शेंडवालाची भाजी खुडत नेहमीसारखी मायेने बोलली,
“आगं सुप्पी आसती. पाताळ करायची आसली तं चिरून, शिजवून, घाटून फुडनी द्यायची पन तशी घुट्ट्यासारखी चिकाट व्हती.
सुक्की बी करत्यात-
बारीक चिरून कांदा, मिरची, मीठ आनि कूट टाकून तशीच परतून घायची—”
सोनाईच बोलणं अर्ध्यातच राहिलं कारण कृष्ण सखीच्या खोलीतून ठक ठक असा आवाज येऊ लागला. सोनाई दरवाजाकडे बघत हनुवटीला भाजीचा चिकट हात लावत बोलली,
“कसला गं ह्यो ठाॅक ठाॅक आवाज?”
“कसला गं ह्यो ठाॅक ठाॅक आवाज?”
सखी सुद्धा लगबगिने ओटीवर आली आणि कृष्णाला भिंतीवर खिळा ठोकताना पाहून काही सेकंद ती तिथेच थांबली. कृष्णाने टेबलवरचा त्यांच्या लग्नाचा फोटो हातात घेताच सखीचा श्वास जड झाल्यासारखा झाला. सोनाई ही तिच्या शेजारी येत बडबडली,
“काय गं करतोय?”
“काय गं करतोय?”
कृष्णाने त्यांच्या लग्नाच्या फोटोवरून हात फिरवून तो फोटो आरती कृष्णाच्या शेजारीच लावला. ज्या भिंतीवर तो फोटो लावल्यावर कधीकाळी कृष्णाने अख्खं घर डोक्यावर घेतलेलं, आज त्यानेच स्वतः त्यांच्या फोटोच्या शेजारी हा फोटो लावलेला पाहून सखीच्या डोळ्यांत आनंदाने पाणी आलं. तिच्या भावना शब्दांत मांडण्यासारख्या नव्हत्या, तरीही सखी समोरचा फोटो बघतच सोनाईचा हात हलवत बोलली,
“आई ऽ, फोटो…”
“आई ऽ, फोटो…”
सोनाई सुद्धा कौतुकाने हसली,
“व्हय. जरा कळ सुसली की समदं मनासारखं व्हतं बग!”
“व्हय. जरा कळ सुसली की समदं मनासारखं व्हतं बग!”
कृष्णा बराच वेळ त्या दोन्ही फोटोंना प्रेमाने बघत होता. रस्त्यावरून बारीकसा ओळखीचा आवाज आल्यावर कृष्णा पटकन बाहेर आला आणि अंगणातून चिमाजीअप्पाला हाक मारली,
आप्पा ऽ, जरा इकडे याल काय.
चिमाजीअप्पा अंगण चढताना दुधाच्या किटलीसोबत धोतर सावरत बोलले,
यतो की बोला.
चिमाजीअप्पा अंगणात आल्यावर कृष्णा शांतपणे बोलला,
बापूंना सांगा आज बाई शाळेत येणार नाहीत.
बापूंना सांगा आज बाई शाळेत येणार नाहीत.
कावं? बऱ्या हायेत ना?
अप्पांच काळजीने विचारणं आलंच.
अप्पांच काळजीने विचारणं आलंच.
कृष्णा हसला,
त्या बऱ्या आहेत आणि बऱ्याच राहू द्या. माझीच तब्येत जरा–
त्या बऱ्या आहेत आणि बऱ्याच राहू द्या. माझीच तब्येत जरा–
“बरं बरं.. तुम्ही बी काळजी घ्या. मी सांगतो बापूंना, बाई काय दोन-चार दिस याच्या न्हायता.”
“या. चहा घेऊन जा.”
कृष्णा घराकडे वळत बोलला आणि चिमाजीअप्पा अंगण उतरत गडबडीत बोलले,
“नगं.. नगं. दरयळी च्या घ्याला साखरचं पोतं काय घरात आनून ठेवलंय व्हय.”
कृष्णा पुन्हा माघारी बघून त्यांना हाक मारेपर्यंत अप्पा रस्त्याला लागलेले. तेच चालता चालता मागे वळून हात करून बोलले,
“मास्तर काळजी घ्या. उद्या यताना चिचूरटी आनतो. नाचन्याच्या भाकरीबरूबर खाल्याव ताॅंडाला लगीच चव यील बगा.”
“मास्तर काळजी घ्या. उद्या यताना चिचूरटी आनतो. नाचन्याच्या भाकरीबरूबर खाल्याव ताॅंडाला लगीच चव यील बगा.”
कृष्णाने कृतज्ञतेने हसत हात केला.
“मास्तर ऽ काय व्हतंय?” दत्ताने दातांवरून मशेरी फिरवत विचारलं.
अंगणातच ब्रश करत असलेला सुधीरही काळजीने,
“मास्तर ऽ, दवाखान्यात जाऊया का?”
“मास्तर ऽ, दवाखान्यात जाऊया का?”
कृष्णा हसला. तेव्हाच रस्त्यावर लावलेली वडाप पुसद त्यांचं बोलणं ऐकणारा प्रशांत कृष्णा आजारी आहे हे कळताच गाडी पुसायचं अर्ध्यात ठेवून त्याच्याकडेच येत बोलला,
“काय झालं मास्तर? तब्येत बरी न्हाय व्हय? काढू का गाडी?
“काय झालं मास्तर? तब्येत बरी न्हाय व्हय? काढू का गाडी?
प्रशांत सोबतच दत्ता आणि सुधीर सुद्धा पारूशा कपड्यांवर त्याच्याजवळ आले. कृष्णा त्या तिघांकडे पाहत होता. कोण म्हटलं त्याला मित्र नव्हते,
हे होते की लंगोटी यार! मुऱ्यावरचे, गावातले, नात्यातले सगळेच अगदी जीव लावतात आपल्याला आणि आपल्याला साथी जाणीवसुद्धा होऊ नये?
कुठल्या धुंदीत आपण दहा वर्ष जगलो? त्याचं त्यालाच नवल वाटलं.
हे होते की लंगोटी यार! मुऱ्यावरचे, गावातले, नात्यातले सगळेच अगदी जीव लावतात आपल्याला आणि आपल्याला साथी जाणीवसुद्धा होऊ नये?
कुठल्या धुंदीत आपण दहा वर्ष जगलो? त्याचं त्यालाच नवल वाटलं.
त्याचा हात चाचपडत असणाऱ्या सुधीरला पाहून कृष्णा थोडासा हसत बोलला,
प्रवास झेपला नाही त्यामुळे पाठ जाम झालीये बाकी काही नाही.
प्रवास झेपला नाही त्यामुळे पाठ जाम झालीये बाकी काही नाही.
“म्हनून परत याची गडबड किलीव व्हय? आवं यकदा बोलायचं तरी.” प्रशांतच्या बोलण्यातून कृष्णाप्रती प्रेम दिसून येत होतं.
“किशना ऽ ऽ, आंगूळ घरात यिवून करनार हायेस का पानी भायर आनून दिव?” सोनाईचं सरळ बोलणं ऐकून दत्ता अंगणाच्या पायऱ्या उतरत हसत बोलला,
“च्हला रं ऽ, न्हाय तं आपली बी आंगूळ हितंच व्हयाची.”
“च्हला रं ऽ, न्हाय तं आपली बी आंगूळ हितंच व्हयाची.”
सोनाईला घाबरून तिघेही मिनिटात गायब झाले आणि कृष्णा हसतच घरात आला. सखी कधीची तयार होऊन बसलेली तो तयार झाल्यावर दूध संपून लगेच बाहेर निघाला तशी सोनाई गडबडीने डब्याची पिशवी देत बोलली,
“आरं पिशशी इसारलास की.”
“आरं पिशशी इसारलास की.”
कृष्णा पायात सॅंडेल चढवत बोलला,
“जेवायला परत येऊ.”
“जेवायला परत येऊ.”
सखीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं,
म्हणजे?
म्हणजे?
सोनाईलाही प्रश्न पडला,
कुठं जाताय? पण विचारेपर्यंत कृष्णाचं बोलला,
कुठं जाताय? पण विचारेपर्यंत कृष्णाचं बोलला,
“महत्त्वाचं काम आहे. ते उरकून घेऊया.
आजच्या दिवस राहू द्या शाळा.”
आजच्या दिवस राहू द्या शाळा.”
तरीही सोनाई आणि सखीच्या मनात एकच प्रश्न उमटला,
कोणतं महत्त्वाचं काम?
आता पुन्हा त्याला विचारून त्याचं तिरसट बोलणं ऐकण्यापेक्षा सोनाई सखीला बोलली,
“पान्याची बाटली तरी ने.”
“पान्याची बाटली तरी ने.”
सखी सुद्धा हळूच,
“लवकर येते.”
“लवकर येते.”
हातात फक्त पाण्याची बाटली घेऊन सखी कृष्णाच्यापाठी अंगणातून उतरली. कृष्णा नेहमीच्या वाटेकडे लागलेला. त्यांच्याविरुद्ध दिशेला असणाऱ्या बाईककडे पाहून सखीला आश्चर्यच वाटलं. रस्ता तर रोजचा होता त्यामुळे तिनेच अंदाज लावला,
“शाळेत काहीतरी काम असेल ते करून लगेच यायचं असेल.”
“शाळेत काहीतरी काम असेल ते करून लगेच यायचं असेल.”
नेहमीचा बांध संपल्यावर सखीचा हात नेहमीसारखाच कृष्णाच्या हातात होता. तो सखीला सवयीचा कृष्णा मात्र तिचा तो नाजूक हात सैलसर पकडून चालता चालता मधूनच तिच्याकडे पाहत होता. जणू आज त्याचं अंतर्मन जागं झालेलं. जी प्रत्येक गोष्ट नव्याने पाहत होतं, नव्या नजरेने पाहत होतं.
तिचं इकटे तिकडे बघत चालणं, मध्येच हसणं, मध्येच काहीतरी विचारणं, शाळेतील गमतीजमती सांगणं. त्याचे हां, हूं, हम्म एवढेच हुंकार तिला पुढे बोलण्यासाठी पुरेसे होते.
सपाटीवर पोहोचल्यावर बोलून बोलून दमलेली सखी बसली. तिने थोडं पाणी प्यायलं आणि पुन्हा हसून बोलली,
किती दिवसांनी आपण गप्पा मारल्या ना?
किती दिवसांनी आपण गप्पा मारल्या ना?
कृष्ण हसला,
व्हय काय? कधीपासून एकटीची चिव चिव चालू आहे आणि गप्पा?
व्हय काय? कधीपासून एकटीची चिव चिव चालू आहे आणि गप्पा?
पाणी पिता पिता सखी पाणी प्यायचं थांबून तोंडाला लागलेलं पाणी पुसत तक्रारीच्या सुरात बोलली,
“मी एकटे कुठे? तुम्हीही बोलत होता की.”
“मी एकटे कुठे? तुम्हीही बोलत होता की.”
पावसाने चांगली उघडीत दिल्याने हिरवं गवत कोरडं खडखडीत होतं. कृष्णा त्या लुसलुशीत गवतावर बसत तिच्या फुगलेल्या गालांना अजून फुगवण्यासाठी बोलला,
तुम्ही तर मला बोलूच दिलं नाही. आरूसारखी नुसती बडबड बडबड..
सखी थोडीशी शांत झाली,
म्हणजे मी बडबड करते?
म्हणजे मी बडबड करते?
तिच्या हातातून पाण्याची बॉटल घेत कृष्णा चेहरा भावनारहीत करत बोलला,
व्हयं.
व्हयं.
आपण इतकं मन भरून त्याच्याशी गप्पा मारत होतो आणि त्याला बडबड वाटावी?
याचं सखीला थोडसं वाईट वाटलं त्यामुळे चेहरा बारीक करून गुडघ्यांना हाताचा वेढा देऊन सखी समोरचा धबधबा पाहत बडबडली,
इतका त्रास होत होता तर आधीच सांगायचं ना यानंतर नाही बोलणार.
याचं सखीला थोडसं वाईट वाटलं त्यामुळे चेहरा बारीक करून गुडघ्यांना हाताचा वेढा देऊन सखी समोरचा धबधबा पाहत बडबडली,
इतका त्रास होत होता तर आधीच सांगायचं ना यानंतर नाही बोलणार.
कृष्णा गवतातील छोटासा खडा उचलून दूरवर भिरकावत मुद्दामून वाकड्यात शिरत बोलला,
तसंही तुम्ही एरवी कुठे बोलता?
तसंही तुम्ही एरवी कुठे बोलता?
त्याच्या दोन्हीकडून बोलण्याने कपाळावर आठी आणत सखी किंचित वैतागून बोलली,
बोललं तरी बोलणार? नाही बोललं तरी बोलणार? माणसाने करायचं तरी काय?
तिचा फुगलेला गाल कापाळावरची आठी बघून कृष्णाला हसू आलं पण पुन्हा निर्विकार चेहरा दाखवत तो दुसरा खडा उचलून हवेत भिरकावत बोलला,
मुंबईच्या माणसांना साधं बोललं तरी कधी समजत काय? उगाच प्रश्नावर प्रश्न!
मुंबईच्या माणसांना साधं बोललं तरी कधी समजत काय? उगाच प्रश्नावर प्रश्न!
सखीला त्याचं तुसड्यासारखं बोलणं पाहून जितका राग आला तितकंच वाईट वाटलं पण डोळ्यांत पाणी येण्याचं तिने थोपवलं आणि तिथून झटक्यावर उठत त्याच्याकडे बघायचं टाळत ती रागात बोलली,
चला. मुंबईच्या माणसांना सगळं वेळेत आवडतं, गावच्या माणसांसारखी टंगळमंगळ आवडत नाही.
त्याच्या सहज बोलण्यावर तिचा आलेला सणसणीत टोला कृष्णा पाहतच राहिला पण कळून सुद्धा न कळल्यासारखा बोलला,
व्हय तरं पण तुम्ही कितीही वेळेच्या पक्क्या असल्या तरी आरुसारख्या नाही. तिची बातच न्यारी!
सरळ सरळ आरती बरोबर केलेली तुलना सखीला दुखावून गेली. रागातच एक कटाक्ष त्याला पाहून ती पुढे चालत बोलली,
मी आरु नाही.
कृष्णा मुद्दामून बोलला,
तुम्ही आरु नाहीच.
तुम्ही आरु नाहीच.
त्याचे शब्द पुन्हा सखीच्या मनाला लागले. पावले आपोआप साखळदंड घातल्यासारखी जडावली आणि सखी जागीच थांबली.
पाठमोऱ्या तिच्याकडे पाहून कृष्णा पुन्हा बोलला,
“हेच मला काल रात्री बोलायचं होतं.”
“हेच मला काल रात्री बोलायचं होतं.”
याचीच भीती होती सखीला. तिचे डोळे पाण्याने तुडुंब भरलेले. अनामिक भीतीने काळीज दाटून आलं आणि कंपलेल्या आवाजात तिने विचारलं,
“काय?”
तिच्या आवाजातील फरक कळून सुद्धा कृष्णा जीभ थोडीशी सैल सोडत पुन्हा बोलला,
हेच की तुम्ही आरूची जागा कधीच घेऊ शकत नाही.
त्याच्या कडवट, तीक्ष्ण, जळजळीत शब्दांनी सखीच्या डोळ्यांतून पाणी काढलं. काळजात भसकन सुरा खुपसावा त्याच्यापेक्षा हजारो पटींनी वेगाने त्याच्या शब्दांनी तिच्या काळजाला भगदाड पाडलं आणि डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. पुढे काय बोलायचं बाकीच नव्हतं.
त्याच्या शब्दांच दुःख सहन न होऊन सखी आतल्या आत आक्रोश करू लागली. सगळं संपल्यासारखं तिला वाटलं. आयुष्यभर हे दुःख कसं सहन करायचं? जिथं प्रत्येक क्षण काळजावर वार असेल.
‘जगण्यात काही राम उरला नाही, असंच पुढे जावं आणि सपाटीवरून स्वतःला झोकून द्यावं’
हा विचार तिच्या दुःखी मनात डोकावला नाही कृष्णा पुन्हा बोलला,
जरा इकडे फिराल काय?
हा विचार तिच्या दुःखी मनात डोकावला नाही कृष्णा पुन्हा बोलला,
जरा इकडे फिराल काय?
कठोर मन करून तोंडाने श्वास घेत तिने डोळे पुसले आणि गर्रकन त्याच्याकडे वळली,
बोला आणि आजच बोला.
बोला आणि आजच बोला.
तिच्या डोळ्यांच्या ओल्या कडा पाहून कृष्णा स्वतःच तिच्या जवळ जात बोलला,
आजच बोलणार आहे, पुन्हा माझ्याकडून अपेक्षा करू नका काय.
आजच बोलणार आहे, पुन्हा माझ्याकडून अपेक्षा करू नका काय.
काहीच न बोलता सखीने बाजूच्या टेकडीवर नजर फिरवली. कृष्णाने डोळे बंद करून मोठा श्वास घेतला. काही क्षण थांबला आणि पुन्हा तिच्याकडे बघून प्रेमाने बोलला,
“तुम्ही आरु नाहीच कारण तुम्ही सखी आहात, जशा आहात तशाच भारी आहात.”
“तुम्ही आरु नाहीच कारण तुम्ही सखी आहात, जशा आहात तशाच भारी आहात.”
त्याच्या तोंडून वेगळंच ऐकून आश्चर्याची एक छटा चेहऱ्यावर आणत सखीने त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्याकडे पाहत तसाच प्रेमाने बोलत होता,
“तुम्ही आरुची जागा कधीच घेऊ शकत नाही कारण तुमची जागा वेगळी आहे सखी.”
“तुम्ही आरुची जागा कधीच घेऊ शकत नाही कारण तुमची जागा वेगळी आहे सखी.”
“काय!”
सखी ओठांत पुटपुटली.
सखी ओठांत पुटपुटली.
तो काळजावर हात ठेवून बोलला,
इथे तुमची जागा वेगळी आहे सखी.
इथे तुमची जागा वेगळी आहे सखी.
सखी अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती. कृष्णा बोलता बोलता थोडासा भाऊक झाला आणि घोगऱ्या आवाजात बोलला,
“मला वाटलं माझ्या आयुष्यात आरुची जागा कोणीच घेणार नाही आणि तुम्ही नाहीच घेतली. तुमची जागा वेगळीच आहे सखी. अगदी आरुसारखीच!”
“मला वाटलं माझ्या आयुष्यात आरुची जागा कोणीच घेणार नाही आणि तुम्ही नाहीच घेतली. तुमची जागा वेगळीच आहे सखी. अगदी आरुसारखीच!”
काही क्षणांपूर्वी आलेल्या अश्रूंचा अर्थ बदलत होता. आनंदाने पुन्हा तिचे डोळे ओले होण्याच्या मार्गावर होते. दुःखाने दरवाजावर भला मोठा टाळा लावून सुखाने महाद्वार खोलण्याचा प्रकाश तिच्या डोळ्यांना झेपत नव्हता.
मग हे आता… जे बोलले ते…?
सखी थोडीशी गोंधळली.
सखी थोडीशी गोंधळली.
कृष्णा किंचित हसला,
मस्करी होती.
मस्करी होती.
त्याच्या हातावर चापट मारत सखी बावरलेल्या मन:स्थितीत बोलली,
कुठेही मस्करी सुचते!
कुठेही मस्करी सुचते!
तिचं इतकं हक्काचं वागणं त्याला अजून अजून हवं होतं. हातावरून हात फिरवत तो थोडासा हसला आणि तिच्या समोर हात करत बोलला,
आयुष्यभराची साथीदार होणार काय?
आयुष्यभराची साथीदार होणार काय?
त्याच्या हाताकडे बघून सखी पुन्हा गोंधळली. साथीदार म्हणजे? सखी, मैत्रीण या शब्दांना ती आता कंटाळलेली. तिला तिचा हक्काचा शब्द हवा होता. तिचं हक्काचं नातं हवं होतं. आतापर्यंत संयमाने वागणाऱ्या सखीतील संयम आता संपलेला. ती त्याच्या हाताकडे बघून अधीरतेने बोलली,
साथीदार म्हणजे?
तिचा गोंधळ ओळखून कृष्णा थोडासा हसला आणि तिचं मनगट पकडून प्रत्येक बोट पकडून बोलला,
तुम्ही आरवच्या आई आहात,
आईची लेक आहात,
पाटलांची थोरली सून आहात,
काशीची वहिनी आहात..”
तुम्ही आरवच्या आई आहात,
आईची लेक आहात,
पाटलांची थोरली सून आहात,
काशीची वहिनी आहात..”
तिचं शेवटचे बोट पकडून कृष्णा तिच्याकडे बघत बोलला,
इथे मला संधी आहे काय?
इथे मला संधी आहे काय?
सखीने हसतच त्याच्याकडे पाहिलं.
आरतीला प्रपोज करताना झालेली अगदी तशीच अवस्था या क्षणी कृष्णाची होती. तिच्यासमोर हात करत तो तिच्या डोळ्यांत आळीपाळीने पाहत प्रेमाने पण तोऱ्यात बोलला,
“या मास्तरची मास्तरीनबाई होणार काय?”
“या मास्तरची मास्तरीनबाई होणार काय?”
सखीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. हसता हसता रडत तरीही स्वतःला सावरत ती कशीतरी बोलली,
“अजून?”
“अजून?”
तो तिच्या डोळ्यांत पाहत तिला प्रपोज केल्यासारखा धडधडत्या काळजाने बोलला,
“माझी बायको होणार काय?”
“माझी बायको होणार काय?”
तिचा सखा... तिचा क्रिष्ण् ज्याला तिने मनापासून पती म्हणून स्वीकारलेलं आज तो स्वतः तिला बायको म्हणून साद घालत होता. तिच्यासाठी किती किती आनंदाचा क्षण होता.
अगदीच अविश्वसनीय घडत होतं पण ते सत्य होतं. तिच्या कृष्णाने तिच्या आयुष्याचं ग्रहण कायमचं संपवलेलं.
या कृष्णाच्या हातात हात देत सखी कशीतरी ओठांत पुटपुटली,
“आहेच मी बायको!”
“आहेच मी बायको!”
बायको या नात्याने त्याच्या हातात हात देताना
सखीवर जसा की फुलांचा वर्षाव होत होता. जोरजोरात हसावं, नाचावं, बागडावं इतका इतका आनंद तिच्या मनात मावत नव्हता. ती वेड्यासारखी खळखळून हसायला लागली. हसता हसताही तिच्या डोळ्यांतून आनंदश्रू मात्र झिरपत होते.
सखीवर जसा की फुलांचा वर्षाव होत होता. जोरजोरात हसावं, नाचावं, बागडावं इतका इतका आनंद तिच्या मनात मावत नव्हता. ती वेड्यासारखी खळखळून हसायला लागली. हसता हसताही तिच्या डोळ्यांतून आनंदश्रू मात्र झिरपत होते.
© प्रियांका सुभा कस्तुरी
१०/०८/२०२४
१०/०८/२०२४
…….
आपल्या कथेचे आज २०० भाग पूर्ण झाले, त्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन! कारण तुमच्यामुळेच हा प्रवास शक्य झाला. प्रवास अगदीच सोपा नव्हता बरेच चढउतार आले तरी सुद्धा तुम्ही माझी साथ सोडली नाही. कथेला कायम प्रेम देत राहिला त्यामुळेच आपण हा पल्ला गाठू शकलो खरंच मनापासून खूप खूप आभार तुमचे!
आता तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी-
सहा-सात वाचक आहेत जे नियमित समीक्षा करतात तुमचेसुद्धा खूप खूप आभार तुमच्यामुळेच या कठीण काळात कथा चालू आहे परंतु मागचे काही भाग मी पाहत आहे इथे आणि फेसबुकवर सुद्धा समीक्षा फार कमी झाले आहेत. पाहून थोडूसं वाईट वाटतं पण चलता है असो!
सहा-सात वाचक आहेत जे नियमित समीक्षा करतात तुमचेसुद्धा खूप खूप आभार तुमच्यामुळेच या कठीण काळात कथा चालू आहे परंतु मागचे काही भाग मी पाहत आहे इथे आणि फेसबुकवर सुद्धा समीक्षा फार कमी झाले आहेत. पाहून थोडूसं वाईट वाटतं पण चलता है असो!
पुढच्या काही भागांत आपण कथेला निरोप देणार आहात. नानाच लग्न सोडून माझ्या हिशोबाने सगळं झालेलं आहे तरीही एखादी कडी सुटली असेल तर आत्ताच सांगा..
पुन्हा एकदा नियमित समीक्षा करून प्रोत्साहन देणाऱ्या वाचकांचे खूप खूप आभार!
भेटू लवकर!