कृष्ण सखी -२०१
बायको या नात्याने त्याच्या हातात हात देताना
सखीवर जसा की फुलांचा वर्षाव होत होता. जोरजोरात हसावं, नाचावं, बागडावं इतका इतका आनंद तिच्या मनात मावत नव्हता. ती वेड्यासारखी खळखळून हसायला लागली. हसता हसताही तिच्या डोळ्यांतून आनंदश्रू मात्र झिरपत होते.

भावनांची गुंतागुंत झाल्यावर जे त्याच्या काळजावर ओझं होतं ते आता पूर्ण उतरलेलं. तिला बायको म्हणून स्वीकारल्यानंतर तो सुद्धा तिच्या सारखाच हसत होता, अगदी आनंदाने!
तिच्या आयुष्यातील आजपर्यंतचा हा सर्वात सर्वात सुंदर क्षण होता. तिच्या कृष्णाने जणू तिला घबाड दिलेलं. तिचा आनंद मनातच काय पण चेहऱ्यावर सुद्धा मावत नव्हता. त्या आनंदाच्या क्षणीच
सखी त्याचा हात हातात असताना तशीच खळखळून हसत बोलली,
“क्रिष्ण् ऽ ऽ ऽ ऽ.”
सखी त्याचा हात हातात असताना तशीच खळखळून हसत बोलली,
“क्रिष्ण् ऽ ऽ ऽ ऽ.”
तोही हसतच,
“काय?”
सखीने त्याच्या दोन्ही डोळ्यांत आळीपाळीने पाहिलं आणि नजर झुकवत हसली,
काही नाही.
काही नाही.
तिच्या नजरेतील काहीतरी त्याला न कळल्यामुळे कृष्णाने तिची हनुवटी हलकीशी वर केली आणि प्रेमाने बोलला,
“बोला की.”
मला हसावंस वाटतंय, नाचावंस वाटतंय, अगदी आनंदाने उड्या माराव्या वाटतायेत हे त्याला सांगताना सखी लाजली. तिने फक्त एकदा त्या शेजारच्या टेकडीकडं पाहिलं आणि स्वतःच्या वेडेपणावर हसत बोलली,
“काही नाही.. असंच!”
“काही नाही.. असंच!”
टेकडी चढताना तिच्या कमरेला खोचलेला पदर चिमटीत पकडून तो बाहेर ओढत हसत बोलला,
“लयीच बुजऱ्या आहात तुम्ही!”
..आणि त्याने हसतच पुढे जात आवाज दिला,
“सखी ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ.”
“सखी ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ.”
काही क्षणांमध्ये तो सूर तिथल्या वळणदार टेकड्यांमध्ये घुमत राहिला-
‘सखी ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ… सखी ऽ ऽ ऽ ऽ .. सखी ऽ ऽ सखी ऽ.’ ते ऐकताना सखी पुन्हा खळखळून हसायला लागली. तिच्या पदरासारखेच तिचे हातही हवेवर पसरले.
‘सखी ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ… सखी ऽ ऽ ऽ ऽ .. सखी ऽ ऽ सखी ऽ.’ ते ऐकताना सखी पुन्हा खळखळून हसायला लागली. तिच्या पदरासारखेच तिचे हातही हवेवर पसरले.
कृष्णा हसतच आनंदाने ओरडला,
“कृष्णसखी ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ.”
“कृष्णसखी ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ.”
‘कृष्णसखी ऽ ऽ ऽ ऽ ऽ कृष्णसखी ऽ ऽ ऽ
कृष्णसखी ऽ ऽ’ सखीच्या कानांमध्ये ते मधुर सूर घुमत राहिले आणि सखी तिच्या पदरासारखीच त्या हवेवर तरंगू लागली. तिचं खळखळत हसू, कृष्णाचे सूर आणि त्या दोघांचा आनंद त्या सपाटीवर त्या वाऱ्यासोबत आसमंतात पसरू लागला.
“माझ्या सखी ऽ ऽ ऽ… माझ्यासखी ऽ ऽ….. माझ्यासखी ऽ…”
कृष्णा तीन वेळा ओरडल्याने तिथल्या दऱ्याखोऱ्यांत तेच शब्द घुमत राहिले.
कृष्णा तीन वेळा ओरडल्याने तिथल्या दऱ्याखोऱ्यांत तेच शब्द घुमत राहिले.
ते सूर ऐकताना आणि कृष्णाच्या तोंडून ऐकताना, कृष्णाच्या आवाजात ऐकताना, त्याने बायको म्हणून स्वीकारलेलं असताना सखीचा आनंद तिच्या देहाला झेपत नव्हता. ती आनंदाने थरथरत होती आणि त्या थरथरत्या देहाने तिच्या पदरासारखीच ती स्वच्छंदीपणे हलकी हलकी होत जात थरथरायला लागलेली.
कृष्णा हसतच दोन्ही हात ओठांजवळ आणून जोरात पुन्हा पुन्हा ओरडत होता,
“कृष्णसखी ऽ ऽ ऽ ऽ,
माझ्या सखी ऽ ऽ ऽ ऽ ऽ…,
सखी सखी सखी ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ.” आणि त्याचा आवाज पुन्हा पुन्हा तिथल्या दरी खोऱ्यांत घुमत राहिला. जणूकाही कृष्णा आयुष्याची जोडीदार मिळाल्याचा आनंद पानापानांसोबत साजरा करत होता.

ओरडून ओरडून श्वास घेण्यासाठी तो थांबला आणि त्याने सहज मागं पाहिलं तरं सखी हसतच स्वतःच्याच धुंदीत नाचत होती. हवेने पदराला आलिंगन दिल्यामुळे तो तर हवेसोबत मग्न होता पण नाचताना हवा तिच्या शरीरासोबत सुद्धा लबाडी करत होता.
स्वतःच्याच धुंदीत गोल गोल फिरताना तिची पांढरीशुभ्र कंबर क्षणासाठी त्याला बघून पुन्हा पदरात लपली मात्र तिच्या ओघवत्या दर्शनाने कृष्णाच्या काळजात चुळबुळ झाली. नजर जशी की मोहात पडली. तिचा नाजूक देह, तिचं स्त्री-सौंदर्य वाऱ्यामुळे त्याच्या नजरेसोबत लपंडाव खेळू लागले. क्षणासाठी त्याला पाहून पुन्हा हवेवर स्वार होऊ पाहणाऱ्या तिच्या पदरात लपू लागले. हे कमी होत म्हणून तिच्या चेहऱ्यावरचं ते खळखळत हसू अगदी पांढऱ्या शुभ्र धबधब्यासारखंं नजरकैद करणारं! कृष्णा तिची एक एक लोभस अदा पाहताना आपोआपच तिचा होत होता.
तन- मन- नजर त्याच्यामध्ये सखी आता पुरती भिनलेली; कदाचित भिनलेली तरं आधीच, वेड्याला जाणीव मात्र आता झालेली!
तिच्याकडे पाहताना कृष्णा यंत्रवत चेहऱ्यावर फक्त तिच्यासाठीच हसू घेऊन तिच्याजवळ पोहोचला. गोल गोल फिरताना अचानक त्याला समोर पाहून सखी दचकलीच पण तोल जाण्याआधीच उघड्या कमरेवर त्याच्या मजबूत पण उबदार हाताचा स्पर्श झाला तशी सखी शहारली.
नाचून नाचून श्वास आधीच वाढलेले तिचे; इतके की त्याच्या डोळ्यांत पाहताना सखी मोठे श्वास घेत होती; अगदी तोंडाने श्वास घेत होती. पाऊस नसतानाही तिला घामाने ओली झालेली पाहून कृष्णा तिच्या थोडासा जवळ येत गालात हसत बोलला,
“चेहरा तरं आहेच पण कंबरही ओली झालीये!”
कंबरेवर अलगद मागेपुढे होणाऱ्या त्याच्या हाताने सखीने लाजून श्वास रोखला आणि ती लाजरी हसली. कृष्णाची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळली. नाचून नाचून ओलसर लालसर झालेले तिचे गाल, तोंडाने श्वास घेण्यासाठी त्या नाजूक ओठांची होणारी हालचाल पाहताना कृष्णाची स्पंदने बिघडू लागली.
बायको म्हणून पहिल्यांदाच कवेत असताना कृष्णा तिच्या ओठांकडे बघून बिघडलेल्या श्वासांनी ओठांत पुटपुटला,
श्वास कमी पडतोय काय?
लाजेने सखीचे क्षणात ओठ मिटले गेले पण गाल पुरते लाल झालेले. तिच्या ओठांपेक्षा तिच्या त्या गोबऱ्या नाजूक लालसर गालांनीच त्याला भुरळ घातली.
कधी असाच फुगा बनून, कधी हसताना खुलून, तरं कधी लाजेने लाल होऊन आजवर किती वेळा या गालांनी त्याला खुणावलेलं पण कधी सुरजच्या गालावर समाधान मानून तरं कधी गालाचा गालगुच्चा
घेऊन त्याने वेळ मारून नेलेली पण आज ते ओलसर लालसर गाल त्याला मोहात पाडत होते.
घेऊन त्याने वेळ मारून नेलेली पण आज ते ओलसर लालसर गाल त्याला मोहात पाडत होते.
कष्टाने कडक झालेले त्याचे हात आणि हातावरची ती रफ अँड टफ बोटे मोहात असल्यासारखी तिच्या गालावरून फिरली आणि सुरजपेक्षाही मुलायम असणाऱ्या त्या गोबऱ्या गालांचा कृष्णा उघड उघड चाहता झाला.
“सखी ऽ ऽ ऽ ऽ.”
“काय?”
बोलताना एरवीपेक्षा त्याच्या नजरेतील वेगळे भाव पाहून लाजली आणि कृष्णा गालत हसत हळूच बोलला,
“मी मास्तर म्हणून कसा आहे?”
बोलताना एरवीपेक्षा त्याच्या नजरेतील वेगळे भाव पाहून लाजली आणि कृष्णा गालत हसत हळूच बोलला,
“मी मास्तर म्हणून कसा आहे?”
सखी त्याच्या डोळ्यांत पाहत कौतुकाने बोलली,
“अभिमानास्पद!”
त्याचा प्रश्न तयारच होता,
“आणि बाप म्हणून?”
“आणि बाप म्हणून?”
ती नजरेत आदर घेऊनच,
“कौतुकास्पद!”
“कौतुकास्पद!”
तो गालात हसत,
“मुलगा म्हणून?”
“मुलगा म्हणून?”
ती गालात हसली,
“लय भारी!”
“लय भारी!”
“मित्र म्हणून?”
ती पुन्हा त्याच्या डोळ्यांत पाहत कौतुकाने बोलली,
“कृष्णासारखेच!”
“कृष्णासारखेच!”
शेवटी त्याचा मुख्य प्रश्न आला आणि
त्याने त्याच ओघात विचारलं,
“नवरा म्हणून?”
त्याने त्याच ओघात विचारलं,
“नवरा म्हणून?”
लगेचच सखीची नजर चलबिचल झाली आणि इकडे तिकडे बघत ती गालात हसत बोलली,
“मला नाही माहीत.”
“मला नाही माहीत.”
कृष्णा हसला आणि स्वतःच पुढे होऊन तिच्या कानात कुजबुजला,
“बाकी सगळं ठीक आहे पण मी नवरा म्हणून लय खवाट आहे. आधीच सांगतोय.”
“बाकी सगळं ठीक आहे पण मी नवरा म्हणून लय खवाट आहे. आधीच सांगतोय.”
सपाटीवर ऐकायला तर कोणीच नव्हतं; तरीही त्याची कुजबुज तिथंही चालूच होती. तसंही तो कृष्णा होता त्यातही आता नवरा म्हटल्यावर वो करे सो कायदा!
तो महत्वाचं बोलला पण तिच्या कानात कुजबुजल्यामुळे तिला गुदगुल्या झाल्या. ती मान हलकीशी चोरत बडबडली,
“म्हणजे?”
“म्हणजे?”
तिला जवळ ओढून कृष्णा तिच्या गालाकडे बघत बिघडलेल्या श्वासांनी पुटपुटला,
“म्हणजे आपण जबाबदारीसोबत अधिकार सुद्धा तितक्याच मनापासून निभावतो.”
“म्हणजे आपण जबाबदारीसोबत अधिकार सुद्धा तितक्याच मनापासून निभावतो.”
त्याची गालावर खिळलेली नजर आणि त्याला जवळ आलेलं पाहूनच त्याच्या खांद्यावर हात ठेवत सखीने आपोआप अंग चोरलं. तिचे डोळे लाजून मिटले गेले. तिच्या गालांना त्याचा स्पर्श होणार..!
कल्पनेनेच तिच्या पोटात फुलपाखरं फडफड करू लागली आणि क्षणाचाही विलंब न करता बायको म्हणून स्वीकारलेल्या तिच्या गालावर कृष्णाने बिघडलेल्या श्वासांनी ओठ टेकवले.
कल्पनेनेच तिच्या पोटात फुलपाखरं फडफड करू लागली आणि क्षणाचाही विलंब न करता बायको म्हणून स्वीकारलेल्या तिच्या गालावर कृष्णाने बिघडलेल्या श्वासांनी ओठ टेकवले.
त्याक्षणी तिच्या काळजाची लय बिघडली आणि त्याच्या हृदयाचे ठोके चुकले. त्या मधुर स्वर्शासोबत
त्याच्या काळजात नाजूक तार छेडली गेली जिची कंपने त्याच्या शरीरावर अलवार उमटली. तिच्याकडे गालात हसत पाहताना तिचा लाजरा चेहरा पाहून पुन्हा तिच्या गालांना दातांनी बक्षीस देण्याचा त्याला असा मोह झाला आणि ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग मोबाईल वाजला.

त्या आवाजाने सखी दचकली पण कृष्णाच्या दातांना तिचे गाल खुणावत होते. त्याच्या ओठांना तो गोबरा मुलायम स्पर्श अजून हवा होता, त्याला काही ऐकू येत नव्हतं की दिसत नव्हतं. तनाला-मनाला फक्त सखी सखी आणि सखीच हवी होती!
उर्वरित भाग पुढे..
©प्रियांका सुभा कस्तुरी
१२/०८/२०२४
१२/०८/२०२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा