कृष्ण सखी -२०२
कृष्णाने बिघडलेल्या श्वासांनी तिच्या गालावर ओठ टेकवले, त्याक्षणी तिच्या काळजाची लय बिघडली आणि त्याच्या हृदयाचे ठोके चुकले. त्या मधुर स्वर्शासोबत त्याच्या काळजात नाजूक तार छेडली गेली जिची कंपने त्याच्या शरीरावर अलवार उमटली. तिच्याकडे गालात हसत पाहताना तिचा लाजरा चेहरा पाहून पुन्हा तिच्या गालांना दातांनी बक्षीस देण्याचा त्याला असा मोह झाला आणि ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग मोबाईल वाजला.
त्या आवाजाने सखी दचकली पण कृष्णाच्या दातांना तिचे गाल खुणावत होते. त्याच्या ओठांना तो गोबरा मुलायम स्पर्श अजून हवा होता, त्याला काही ऐकू येत नव्हतं की दिसत नव्हतं. तनाला-मनाला फक्त सखी सखी आणि सखीच हवी होती!
मोबाईल वाजून बंद झाल्यावर सखीला गालावर पुन्हा त्याचे श्वास जाणवले आणि उघडून पाहणारे डोळे पुन्हा लाजेने बंद झाले. त्याच्या खांद्यावर तिचे नाजूक हात विसावताच तिची संमती समजून कृष्णा गालात हसला आणि पुन्हा त्या कोमल गालावर आरवचा बाप असल्यासारखा ओठांचा चंबू करून त्याने जोरात ‘पा’ घेतला.
गालाला त्याची बारीकशी दाढी टोचली आणि
सखीच सर्वांग मोहरलं!
सखीच सर्वांग मोहरलं!
‘अमृत ओठाला लागलेल्या माणसाचं मन कधी भरतं?’
कृष्णाचं ही अगदी तसंच झालं. लहान बाळासारखे तिचे मऊसूत गाल ‘खाऊ की ठेवू’ त्याला तरं असंच झालेलं!
डोळे बंद करून लाजऱ्या हसणाऱ्या सखीला
कृष्णा बिघडलेल्या श्वासांनी हळूच बोलला,
“मास्तरीनबाई, खाऊ का तुम्हाला?”
कृष्णा बिघडलेल्या श्वासांनी हळूच बोलला,
“मास्तरीनबाई, खाऊ का तुम्हाला?”
तिच्या पोटातील फुलपाखरं वळवळ करत होती. श्वासांची लय सुद्धा बिघडलेली. ती तर तहानलेलीच होती त्याच्या प्रेमाला, त्याच्या स्पर्शाला पण गालांवर त्याच्या ओठांची मोहर अजून हवी असतानाही ती लज्जेने गप्प बसली पण तिच्या कोमल गालांचा चाहता झालेला कृष्णा गप्प थोडीच बसणार होता.
तिच्या कोमल गालांना पाहून मघापासून शिवशिवणाऱ्या त्याच्या दातांनी कधीपासूनची त्यांची इच्छा पूर्ण केली आणि कृष्णाने हलकेच तिच्या गालांचा चावा घेतला आणि-
“आऊच!” गाल दुखल्याने सखीच्या तोंडून नैसर्गिक उद्गार बाहेर पडले!
त्याच्याकडून त्याच्या ओठांच्या अलवार स्पर्शाची अपेक्षा असताना त्याने जावा घेतल्याने सखी भुवयांमध्ये हलकीशी आठी आणत बारीक चेहऱ्याने त्याच्याकडे बघत बोलली,
असं पण असतं का?
असं पण असतं का?
कृष्णा तिच्या नाजूक गालावर त्याच्या दातांचा ओलसर व्रण पाहून त्यावर फुंकर घालत खट्याळपणे बोलला,
तसं तर लय कायबाय असतं!
त्याच्या शब्दांइतकीच ती फुंकर तिला गुदगुल्या देऊन गेली आणि सखी गालात हसली.
ते लय कायबाय जाणून घ्यायला, अनुभवायला जशी की ती आतुरलेली!
ते लय कायबाय जाणून घ्यायला, अनुभवायला जशी की ती आतुरलेली!
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग पुन्हा कृष्णाचा मोबाईल एकसारखा वाजू लागला. कृष्णा कमीत कमी मोबाईल तरी पाहील असं सखीला वाटलेलं पण छे! कृष्णा तिच्याकडेच एकसारखा पाहत होता.
त्या दोघांच्या वेळात त्याच्या मोबाईलला सुद्धा स्थान नव्हतं. सखीला इतकं भारी वाटलं पण दुसऱ्या वेळी फोन वाजून कट झाला पण पुन्हा फोन वाजायला लागल्यावर मात्र काहीतरी अर्जंट असेल असा अंदाज लागून सखीच प्रेमाने बोलली,
मोबाईल मघापासून वाजतोय क्रिष्ण्.
मोबाईल मघापासून वाजतोय क्रिष्ण्.
आजवर माझी ‘सखी-मैत्रीण’ फक्त या शब्दाखाली दाबून ठेवलेल्या त्याच्या भावना ‘माझी बायको’ या एका शब्दाने मोकळ्या झालेल्या. त्याला इतका आनंद झालेला त्याचं हक्काचं माणूस भेटल्याचा, सखीच्या रूपात त्याला बायको मिळाल्याचा. ती कवेत असताना तिला डोळे भरून पाहावं असं वाटत असतानाच त्या मोबाईलचा त्याला राग आला.
कोण असेल? याचा अंदाज येऊन तर त्याने मोबाईलकडे सरळ सरळ दुर्लक्षच केलेलं आणि अशातच सखी बोलली,
मोबाईल मघापासून वाजतोय क्रिष्ण्
मोबाईल मघापासून वाजतोय क्रिष्ण्
तो तिच्याकडे बघतच पुन्हा दुर्लक्ष करत बोलला,
काही अर्जंट नसेल, नाना असेल.
नानाच नाव ऐकून सखी काळजीने बोलली,
मग तर अर्जंट असेल. बघा ना काय बोलतोय?
मग तर अर्जंट असेल. बघा ना काय बोलतोय?
एक सारख्या वाजणाऱ्या मोबाईलकडे कृष्णा पुन्हा दुर्लक्ष करत बोलला,
नाना अर्जंट असेल तर घरी येतो. मोबाईलवर वेळ घालवत बसत नाही.
नाना अर्जंट असेल तर घरी येतो. मोबाईलवर वेळ घालवत बसत नाही.
त्याने सांगून सुद्धा सखीचं मन काळजी करू लागलं आणि ती तोंड बारीक करून काळजीने बोलली,
प्लीज बघा ना!
त्याची इच्छा नसूनही फक्त तिच्यासाठी कृष्णाने तिला कवेतून मोकळं केलं आणि मोबाईल पाहिला तर नानाच होता.
याचं काय अर्जंट असणार आहे मला माहितीये.
याचं काय अर्जंट असणार आहे मला माहितीये.
स्वतःशीच बडबडत कृष्णाने कॉल उचलला,
बोला शेठ.
बोला शेठ.
चार-पाच वेळा एक सारखा फोन करून वैतागलेला नाना पलीकडून बेकार सुरत बोलला,
“काय शेठ? इकडं शेठची वाट लागले.”
“काय शेठ? इकडं शेठची वाट लागले.”
“काय झालंय?”
नाना टेन्शनमध्ये बोलला,
“तू आत्ताच्या आत्ता घरी यं. मी वाट बघतोय.”
“तू आत्ताच्या आत्ता घरी यं. मी वाट बघतोय.”
कृष्णाला अजून थोडा वेळ टेकडीवर थांबायचं होतं. नानाच्या अर्जंट कामाचा अंदाज असल्याने कृष्णा सखीकडे बघत बोलला,
थोड्या महत्त्वाच्या कामात आहे, येतो नंतर.
नाना टेन्शनमध्ये मित्रत्वाच्या नात्याने अधिकाराने बोलला,
ए ऽ कृष्णा, तुझी सगळी महत्त्वाची कामे नंतर आधी घरी ये. काय राव इकडे मला टेन्शनमध्ये झोप लागेना आणि तुला महत्त्वाचं काम सुचतंय?
ते काही नाही आधी घरी ये.
ए ऽ कृष्णा, तुझी सगळी महत्त्वाची कामे नंतर आधी घरी ये. काय राव इकडे मला टेन्शनमध्ये झोप लागेना आणि तुला महत्त्वाचं काम सुचतंय?
ते काही नाही आधी घरी ये.
त्याला घायकुतीला आलेला पाहून कृष्णा धमकी दिल्यासारखा बोलला,
महत्त्वाचंच काम असू दे नाहीतर मी बघतोच तुला.
यं बाबा लवकर.
नानाने टेन्शनमध्ये फोन ठेवला.
फोन ठेवल्यावर सखीनेही ही काळजीने विचारलं,
काय झालं? काय बोलला नाना?
कृष्णा मोबाईलला खिसा दाखवत बोलला,
महत्त्वाचं काम आहे.
महत्त्वाचं काम आहे.
अरे बापरे! मग आपल्याला निघायला हवं.
सखी काळजीने बोलली.
सखी काळजीने बोलली.
कृष्णा तिच्याकडे बघून हसला,
बापरे! म्हणण्यासारखं एवढं काय नसतंय.
बापरे! म्हणण्यासारखं एवढं काय नसतंय.
असं कसं? नाना इतका टेन्शनमध्ये होता म्हणजे तसंच काही असेल ना? चला जाऊया.
टेन्शनमध्ये रस्त्याला लागलेल्या सखीचा हात पकडत कृष्णाने तिला थांबवली.
त्याला अजूनही खांबासारखा तिथेच उभा पाहून सखी पुन्हा मागे फिरून बोलली,
चला ना.. सपाटी काय रोजचीच आहे. नानाने कॉल केला म्हटल्यावर अर्जंट असेल. बिचारा टेन्शनमध्ये असेल. आपल्याला जायला हवं नाहीतर त्याचा पुन्हा कॉल-
“श्श ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ.”
तिची बडबड चालू असताना कृष्णा तिच्या गालावरचा तो लालसर दातांचा व्रण बघतच राहिला. तो अजूनही तसाच होता. तिची बडबड चालू असताना तिला थांबवण्यासाठी कृष्णा ओठांवर बोट ठेवत-
“श्श ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ, मास्तरीनबाई ही शाळा नाहीये बडबड करायला. किती बोलाल?”
तिची बडबड चालू असताना कृष्णा तिच्या गालावरचा तो लालसर दातांचा व्रण बघतच राहिला. तो अजूनही तसाच होता. तिची बडबड चालू असताना तिला थांबवण्यासाठी कृष्णा ओठांवर बोट ठेवत-
“श्श ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ, मास्तरीनबाई ही शाळा नाहीये बडबड करायला. किती बोलाल?”
सखी थोडीशी हसली,
“बडबड केली हे दिसलं काय बडबड केली हे नाही दिसलं?”
कृष्णा तिच्या गालावरल्या त्या वर्णावर उलटं बोट फिरवत खट्याळपणे बोलला,
“लयीच नाजूक आहात तुम्ही. मला चोरी करायला चान्सच नाही.”
त्याचा गालावरचा तो रांगडा स्पर्श! सखी बोलायचंच विसरली. ती गोंधळून बोलली,
म्हणजे?
म्हणजे?
कृष्णाने लगेच मोबाईल काढला आणि सेल्फी मोड ऑन करून तिचा गाल दाखवत गालात हसत बोलला,
“ही चोरी आता उघड होईल ना?
मग पुन्हा चोरी कशी करणार मी?”
सखी लाजरी हसली पण क्षणासाठीच ती लगेच टेन्शनमध्ये गालावर हात ठेवत जनलज्जेने तिच्या त्या सख्याला बोलली,
“कृष्णा, आता सगळे पाहतील की रे! कोणी विचारलं तर काय सांगू?”
“कृष्णा, आता सगळे पाहतील की रे! कोणी विचारलं तर काय सांगू?”
कृष्णा तिचा हात हातात घेत डोळे मिचकावत बोलला,
“सांगा नवरोबा चावले.”
“सांगा नवरोबा चावले.”
ते बोलण्याच्या कल्पनेनेच सखी लाजून ओठांत पुटपुटली,
“इश्श्य!”
“इश्श्य!”
तिची स्त्री-सुलभ लज्जा पाहून त्या एका शब्दाने कृष्णाच्या काळजाची तार पुन्हा छेडली गेली. तिचा लाजरा चेहरा असाच पाहत बसावं असं वाटत असतानाच पुन्हा ट्रिंग ट्रिंग ट्रिंग.
मोबाईल वाजल्यावर नानाच्या काळजीने सखीने पुन्हा नाजूक भावनांना आवर घातला आणि रस्त्याला लागत काळजीने बोलली,
“चला, बिचारा वाट पाहतोय.”
तिच निघाली म्हटल्यावर तिच्यासोबत अजून थोडा वेळ घालवण्याच्या इच्छेला मुरड घालावी लागल्यामुळे कृष्णा कुरकुरला,
“इतका घाईला आलाय, बघूना काय महत्वाचं काम आहे.. नाही तर मीच त्याला बघतो.”
“इतका घाईला आलाय, बघूना काय महत्वाचं काम आहे.. नाही तर मीच त्याला बघतो.”
रस्ता उतरताना नानाच्या काळजीने सखीला घरी येण्याची घाई होती. नानाचा फोन टेकडी उतरेपर्यंत चार वेळा येऊन गेलेला त्यामुळे तरं सखी टेंशनमध्ये त्याच्या पुढे पुढे सराईत असल्यासारखी चालत होती. तिच्याशी बोलणं नाही की तिचा हात हातात नाही त्यामुळे कृष्णा जरासा फुगलेला. त्याला सखीचा आणि नानाचा दोघांचाही राग येत होता.
तो मुद्दामून मागच्या पावलावर होता. नानाच्या काळजीने तो बराच मागे राहिलाय हे सुद्धा सखीला ठाऊक नव्हतं. सखी वेगाने घरपर्यंत आली आणि सरळ हाका मारतच घरात गेली,
नाना ऽ ऽ ऽ ऽ.. अरे काय झालं?
तिचा आवाज येताच स्वयंपाकघरातून सोनाई हसत बोलली,
बरं झालं आलाव. त्यो नाना नुसता आंड्याला आलाय.
बरं झालं आलाव. त्यो नाना नुसता आंड्याला आलाय.
सखी स्वयंपाकघरात जात काळजीने बोलली,
किती फोन केले त्याने! काय झालंय? बरं आहे ना तो?
सोनाई हसली,
त्याला काय धाड भरले? ब्येस हाये.
त्याला काय धाड भरले? ब्येस हाये.
नाना ठीक आहे, हे कळताच सखीने मोकळा श्वास घेतला आणि हात धुवून पाण्याचा ग्लास हंड्यातून भरला. तोंडावर पाण्याचे शिंतोडे देऊन सखी पाणी पिऊ लागली आणि तेव्हाच सोनाई तिला निरखून पाहू लागली.
सखीने पाणी पिल्यावर सोनाई लगबगीने चूलीपुढची उठली आणि तिचा चेहरा उजेडात करून गाल निरखून बघू लागली. सखीच्या एकाच गालावर अजूनही दिसणारी ती दातांची खूण पाहून सोनाई काय समजायचं ते समजून गेली.
त्यांच्या दोघांमध्ये परकेपणाची भिंत गळून पडल्याचा आनंद सोनाईच्या पोटात मावत नव्हता. सखीची हनुवटी वर करत सोनाई अत्यानंदाने बोलली,
“म्हाळसा ऽ, किशना चावला का काय गं?”
“म्हाळसा ऽ, किशना चावला का काय गं?”
सखीने लाजेने आळीपाळीने सोनाईकडे पाहिलं. हो नाही करताना ती पुरती गोंधळली. तिचा गोंधळ पाहून सोनाई हसायला लागली. ती आनंदाने बोलली,
“त्यो गुडीला आल्याव आसाच चावतो.”
“त्यो गुडीला आल्याव आसाच चावतो.”
सखी अश्शी लाजली!
ती लाजून चटकन सोनाईली बिलगली. सोनाई आनंदाने हसायला लागली.
सखीच्या पाठीवरून हात फिरवत सोनाई हसत बोलली,
“बरं झालं आता मला जरा निवरातान पडंल.”
“बरं झालं आता मला जरा निवरातान पडंल.”
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग इथं सोनईचा मोबाईल वाजला. मोबाईल सखीला दाखवत सोनाई हसत,
कोन हाये गं?
मोबाईलकडे बघत सखीही हसून
मावशी आहेत.
मावशी आहेत.
सोनाई हसतच मोबाईलवर बोलत परड्यात गेली,
“हालव….”
“हालव….”
सोनाई मावशीसोबत बोलत असतानाच बाहेरून नाना हाका मारतच आला,
ए ऽ कृष्णा, आलास का रे?
ए ऽ कृष्णा, आलास का रे?
नाना ऽ, अरे मीच आले पुढे.
सखी काळजीने पटकन बोलली आणि नंतर गालावरचं व्रण आटवून तिने तोंडावर हात ठेवला.
सखी काळजीने पटकन बोलली आणि नंतर गालावरचं व्रण आटवून तिने तोंडावर हात ठेवला.
प्रियांका सुभा कस्तुरी
१४/०८/२०२४
…….
जमलं तर भेटू उद्या!
सखी-कृष्णा आणि त्यांच्या नात्याची बोंबाबोंब करणारा तो दातांचा व्रण!