कृष्ण सखी -२१०
आत्ता कृष्णाचा चेहरा बघण्यासारखा झालेला. मनीच्या अबोल भावनांनी तो आपोआप फुलला. सखी लाजरी हसत बोलली,
म्हणून विचारलं मी... संध्याकाळी स्वयंपाक काय करू?
कृष्णा गालात हसत स्वभावाप्रमाणे बोलला,
काही नको. मी तुम्हाला खातो तुम्ही मला खा.
काही नको. मी तुम्हाला खातो तुम्ही मला खा.
"काहीही!"
ती लाजून ओठांत बोलली.
ती लाजून ओठांत बोलली.
तिचं लाजणं पाहून कृष्णाच्या काळजाचे ठोके आत्तापासूनच चुकायला लागलेले. तो श्वास सांभाळत बोलला,
"खरंच तरं! आणि सुरवात ओठांपासून करू."
"खरंच तरं! आणि सुरवात ओठांपासून करू."
त्या हव्याहव्याशा लाजऱ्या क्षणांच्या ओढीने सखी आताच लाजेने गोरीमोरी झालेली.
"सखी ऽ ऽ ऽ."
कृष्णा आनंदाने पुटपुटला.
कृष्णा आनंदाने पुटपुटला.
"हम्म ऽ.." तो समोर असल्यासारखी ती हुंकारली.
कृष्णा आनंदाने बडबडला,
"काही नाही."
"काही नाही."
त्या खुणावणाऱ्या हव्याहव्याशा लाजऱ्या क्षणांच्या ओढीने दोघेही बिघडलेल्या श्वासांनी फक्त गालात हसत राहिले.
'टन टन टन टन टन टन टन टन..'
बेल वाजल्यावर कृष्णा इच्छा नसतानाही बोलला,
शाळा भरली.
बेल वाजल्यावर कृष्णा इच्छा नसतानाही बोलला,
शाळा भरली.
त्याचा उतरलेला आवाज ऐकून सखी गालात हसत बोलली,
"लवकर या."
"लवकर या."
त्याचा चेहरा लगेच फुलला. तो मुलांच्या गोंधळात ही हळूच बोलला,
"आत्ताच येऊ काय?"
"आत्ताच येऊ काय?"
सखी लाजून बोलली,
तुम्ही याल पण माझ्यामुळे शाळा बुडली तरं मास्तर रागावतील की माझ्यावर.
तुम्ही याल पण माझ्यामुळे शाळा बुडली तरं मास्तर रागावतील की माझ्यावर.
व्हय काय! लयीच खवाट आहे ना मास्तर?
कृष्णा गमतीने बोलला.
कृष्णा गमतीने बोलला.
खूप.
सखी हसू लपवत बोलली.
सखी हसू लपवत बोलली.
तसा कृष्णा मोबाइलवर ही डोळे बारीक करून बोलला,
व्हय काय! किती खवाट आहे ते आता घरी आल्यावर दाखवतो.
व्हय काय! किती खवाट आहे ते आता घरी आल्यावर दाखवतो.
सखी पलिकडे खळखळून हसली. तिच्या हसण्याच्या आवाजाने इकडे कृष्णा ही मोकळेपणाने हसला.
मुलं वर्गात आल्यावर कृष्णा आपलं हसू आवरत घेत मुलांसमोर बोलला,
हा धडा इथंच थांबवू, भेटल्यावर इथूनच सुरवात करू.
हा धडा इथंच थांबवू, भेटल्यावर इथूनच सुरवात करू.
त्याचं शिक्षकी बोलणं ऐकून सखी अजूनच खळखळून हसायला लागली.
तिच्या हसण्याच्या आवाजाने तो तिकडे बेचैन होत वर्गाच्या बाहेर येत हळू आवाजात बोलला,
इतक्या सुरेल हसू नका की इकडे माझ्या संयमाचा कस लागेल.
इतक्या सुरेल हसू नका की इकडे माझ्या संयमाचा कस लागेल.
त्याच्या बोलण्याने सखीने हसू सावरलं आणि हळूच बोलली,
"ठेवते."
"ठेवते."
तो खट्याळपणे,
"असाच ठेवणार?"
"असाच ठेवणार?"
ती लाजून,
"मग?"
"मग?"
तो गालात हसत,
"नक्की असाच ठेवणार?"
"नक्की असाच ठेवणार?"
सखीने लाजून मोबाईल ओठ टेकवले आणि मोबाईलवर ही लाजून बोलली,
"दिली."
"दिली."
ऐकू न आल्याने तो,
"काय?"
"काय?"
ती लाजून,
"तेच!"
"तेच!"
तो मूडमध्ये,
"पण मला ऐकू नाही आलं."
"पण मला ऐकू नाही आलं."
ती लाजून,
"ते ऐकू नाही येत."
"ते ऐकू नाही येत."
तो गालात हसत हळूच बोलला,
"येत.. मी शिकवू काय?"
"येत.. मी शिकवू काय?"
सखी तो समोर नसतानाही बावरलेली. ती ही हळूच बोलली,
"तुम्ही ठेवा आता.. घरी आल्यावर शिकवणीचं बघा."
आणि तिनेच लाजून काॅल कट केला.
"तुम्ही ठेवा आता.. घरी आल्यावर शिकवणीचं बघा."
आणि तिनेच लाजून काॅल कट केला.
सकाळपासून चेहरा लटवून बसलेला कृष्णा सखीच्या काॅलने आनंदाने फुलला. तो नुसताच हसू लागला. त्याच्या हसण्यात ही छुपी आतुरता होती. शाळा भरल्यामुळे कृष्णा वर्गात गेला पण त्याच चित्त सखीजवळ होतं. घरी जाण्याची इतकी प्रचंड ओढ वाटत होती की वेळ पुढे सरकतच नाहीये, असंच त्याला वाटत होतं.
वर्गात असतानाही दोघांच्या एकांताचे भुरळ घालणारे क्षण त्याच्या नजरेसमोरून हटत होते. गोड बेचैनी त्याला चैन पडू देत नव्हती. दुपारनंतरचे अडीच तास एका युगासारखे घालवून शेवटी शाळेची बेल वाजली आणि कृष्णा लहान मुलांच्या उत्साहात त्यांचीही आधी वर्गातून बाहेर पडला.
'टन टन टन टन टन टन टन टन टन'
ऐकू आलं आणि सखी बावरली. ती घाईघाईत आपल्या खोलीत गेली. खोलीतून नजर फिरवली आणि आरशासमोर उभी राहिली. मुद्दामून तिने आज बऱ्यापैकी साडी नेसलेली. तिच्या सौंदर्याला गरज नसतानाही हलकासा मेकअप केलेला. मावशीची साडी विसरायला नको म्हणून आधीच पलंंगावर काढून ठेवलेली हे सगळं करताना दुपारपासून तिचं गालातल्या गालात हसणं तसूभरही कमी झालं नव्हतं.

तिरप्या नजरेने पलंगाकडे पाहताना ती लाजत होती. ज्या क्षणाची ती आतुरतेने वाट पाहत होती, तो क्षण जवळ आलेला. बायको म्हणून त्याला समर्पित होण्यासाठी सखी कमालीची आतुर होती. आपली आतुरता लाजेखाली लपवत सखी पलंगाच्या अवतीभवती रेंगाळत होती की बाईकचा आवाज आला आणि सखी हसतच लहान मुलाच्या उत्साहात
उंबऱ्यात पोहोचली.
बाईक आंब्याखाली लावून कृष्णाची नजर तिलाच शोधत होती की दरवाजात सखी दिसली. नजरानजर झाली. दोघेही गालातल्या गालात हसले आणि सखी लाजून घरात गेली.
बाईकची चावी हातात घेऊन कृष्णा हसतच बाईकवरून खाली उतरला.
"मास्तर ऽ, च्या घ्या की."
आवाज आल्यावर कृष्णा आवाजाकडे न बघताच हात हलवत बोलला,
"दत्तू, चहा पुन्हा कधीतरी.. आज काही नाही."
"दत्तू, चहा पुन्हा कधीतरी.. आज काही नाही."
दत्ताने चहाचा घोट घ्यायच्या आधीच कृष्णा हसतच
घरात गेला. सखी पाण्याचा तांब्या घेऊन ओटीवरच आलेली. समोरासमोर आल्यावर सखी त्याच्याकडे बघतानाही लाजली. तांब्या घेताना मुद्दामून तिच्या बोटांना झालेला त्याचा स्पर्श तिला त्याची आतुरता सांगून गेला.
घरात गेला. सखी पाण्याचा तांब्या घेऊन ओटीवरच आलेली. समोरासमोर आल्यावर सखी त्याच्याकडे बघतानाही लाजली. तांब्या घेताना मुद्दामून तिच्या बोटांना झालेला त्याचा स्पर्श तिला त्याची आतुरता सांगून गेला.
लाजेने त्याच्याकडे पाहणंही होत नव्हतं त्यामुळे सखी लगेचच पाठमोरी झाली आणि स्वयंपाकघरात जात बोलली,
"काही खायला आणते."
"काही खायला आणते."
दुपारपासूनच त्याच मन थाऱ्यावर नव्हतं. तिला पाहून तरं ते अजूनच कामातून गेलं. कृष्णा आपल्या खोलीत जात शर्टची बटणं काढत हसत बोलला,
"मघाशी सांगीतलंय तेच खाईन मी, दुसरं मला काही नको."
"मघाशी सांगीतलंय तेच खाईन मी, दुसरं मला काही नको."
सखी गोंधळली,
"काय सांगीतलं होतं?"
"काय सांगीतलं होतं?"
काॅलवर गोष्ट वेगळी होती पण प्रत्यक्षात बोलताना
कृष्णाला गुदगुल्या झाल्या. शर्ट अंगावेगळं करत तो गालात हसत सुरात बोलला,
"हेच की मी तुम्हाला खातो आणि तुम्ही ----"
कृष्णाला गुदगुल्या झाल्या. शर्ट अंगावेगळं करत तो गालात हसत सुरात बोलला,
"हेच की मी तुम्हाला खातो आणि तुम्ही ----"
त्याच्या बोलण्याने सखी स्वयंपाकघरात लाजली.
बोलता बोलता कृष्णाची नजर पलंगावर गेली आणि तो पुढचं बोलायचं विसरला. पलंगावरची नवीकोरी गुलाबी फुलांची मऊ चादर, नवे उशांचे कवर, जवळ जवळ ठेवलेल्या उशा पाहताना कृष्णा स्वतःशीच गालात हसला. कोपऱ्यात असलेल्या टेबलवर ग्लासात ठेवलेल्या गुलांबाचा मंद सुगंध खोलीभर पसरला होता. त्याच्या फुलणाऱ्या भावनांना खोलीतील वातावरण अगदी पुरक होतं. पलंगावर मावशीच्या साडीच्या घडी बघून तरं कृष्णा काय समजायचं ते समजून गेला. त्या क्षणांच्या ओढीने त्याच्या अंतर्मनात गोड काहूर माजलेलं.
"मास्तर ऽ ऽ ऽ."
दत्ताचा लांब सूर आल्यावर कृष्णाला शर्ट घालायचं ही भान राहिलं नाही.
दत्ताचा लांब सूर आल्यावर कृष्णाला शर्ट घालायचं ही भान राहिलं नाही.
तो तसाच स्वतःच्या धुंदीत बाहेरच्या उंबऱ्यात आला.
"काय रे दत्ता?"
"काय रे दत्ता?"
त्याला शर्टलेस पाहून दत्ता हसत बोलला,
मास्तर ऽ, उकाडतंय व्हयं?
मास्तर ऽ, उकाडतंय व्हयं?
कृष्णाने स्वतःकडे पाहिलं आणि स्वतःच्या अवस्थेवर हसला,
मला वाटलं शर्ट घातलं!
मला वाटलं शर्ट घातलं!
दत्ता आदराने बोलला,
तुमच्या मागं सतरा कामं त्यामुळं व्हतं कदी कदी.
तुमच्या मागं सतरा कामं त्यामुळं व्हतं कदी कदी.
मान थोडी तिरपी करत कृष्णाने सखीला आवाज दिला,
"सखी ऽ ऽ, दत्तासाठी चहा ठेवताय काय!"
"सखी ऽ ऽ, दत्तासाठी चहा ठेवताय काय!"
"रोजच्या मानसाला कशाला? नगो वैनी ऽ."
दत्ता आतल्या चौकटीकडे बघून बोलला आणि लागलीच आतून आवाज आला,
"आधीच ठेवलाय चहा!"
दत्ता आतल्या चौकटीकडे बघून बोलला आणि लागलीच आतून आवाज आला,
"आधीच ठेवलाय चहा!"
"आत ये."
"नगं, तुम्हीच भायर या."
दत्ता खालच्या पायरीवर जात खिशातून मोबाईल काढत बोलला,
"मास्तर ह्या मोबाईलला बगा की काय झालंय, फोनच लागना."
दत्ता खालच्या पायरीवर जात खिशातून मोबाईल काढत बोलला,
"मास्तर ह्या मोबाईलला बगा की काय झालंय, फोनच लागना."
"बघू."
कृष्णाने मोबाईल पाहिला आणि मान हलवत बोलला,
"काय दत्ता! गड्या सिमकार्ड हललेलं कळना व्हय तुला?"
कृष्णाने मोबाईल पाहिला आणि मान हलवत बोलला,
"काय दत्ता! गड्या सिमकार्ड हललेलं कळना व्हय तुला?"
दत्ता खांद्यावरचा फाड्या मानेवरून फिरवत आपल्या अडाणीपणावर हसत बोलला,
"मला कुठं काय कळत तवा! म्हनून तं हरघटकला तुमच्यापशी यतो."
"मला कुठं काय कळत तवा! म्हनून तं हरघटकला तुमच्यापशी यतो."
सिमकार्ड घालत असताना कृष्णाला सखीची चाहूल लागली आणि आपोआप अंतर्मनात चुळबुळ झाली.
दत्ताला चहा दिल्यावर कृष्णा सावकाश सिमकार्ड मोबाईल मध्ये घालू लागला. सखी हातात दूधाचा ग्लास पकडून काही क्षण उभी राहिली पण तिची चोरटी नजर त्याच्या तांबूस रुंद छातीकडे धावू लागली. आधीच थाऱ्यावर नसलेलं तिचं मन त्यांचंच गुलाम झालेलं जणू!

त्याचं झाल्यावर नजरेला सावरत तिने लगेच दूधाचा ग्लास पुढे केला,
"दूध?"
"दूध?"
तिचा नाजूक आवाज आल्यावर कृष्णा मोबाईलवर फुंकर घालत खट्याळपणे बोलला,
इतक्या लवकर?
इतक्या लवकर?
सखीने चमकून त्याच्याकडे पाहिलं. दत्ता समोर त्याचं असं बोलणं म्हणजे, सखीच नि:शब्द झाली. दत्ताने कुतुहलाने विचारलं,
"तुम्ही झोपताना बी दूध पेताव व्हय?"
"तुम्ही झोपताना बी दूध पेताव व्हय?"
तिच्या हातातून दूधाचा ग्लास घेताना तिच्या बोटांवरून अलवार बोटं फिरवत कृष्णा सखीकडे बघून सांकेतिक भाषेत बोलला,
आज प्यावंस वाटतंय, द्याल काय?
आज प्यावंस वाटतंय, द्याल काय?
सखी शहारली आणि तितकीच ती लाजली. खाली बघूनच लाजून उभी आडवी मान तिने कशीतरी हलवली आणि वेगाने घरात गेली. तिचा लाजलेला चेहरा बघून कृष्णाचे श्वास बिघडले आणि आपोआप छाती खालीवर होऊ लागली.
या दोघांच्या चोरीकडे दत्ताचं लक्ष नव्हतं. तो कृष्णाचा पिळदार बांधा बघण्यात गुंतला होता. दत्ता विचार करत स्वतःशीच बडबडला,
"मास्तर ऽ, आता मी बी रोज झोपताना दूध पेतो, म्हंजी जरा ताकद धरून ऱ्हाइन."
"मास्तर ऽ, आता मी बी रोज झोपताना दूध पेतो, म्हंजी जरा ताकद धरून ऱ्हाइन."
कृष्णा दूधावर फुंकर घालत हसला. तो शरीराने तिथं असला तरी त्याचं मन सखीभोवती पिंगा घालत होतं.
दत्ता कृष्णाजवळ आला आणि बारीक आवाजात बोलला,
"मास्तर तुमच्या बाॅडीच शिक्रेट सांंगा की."
"मास्तर तुमच्या बाॅडीच शिक्रेट सांंगा की."
कृष्णा हसला आणि मनातील काहूर सांभाळत त्याच्या हळू आवाजात बोलला,
"रात्री दूध बायकोच्या हातून प्यायचं आणि न विसरता 'दररोज' दोन वाक्य तिच्याशी प्रेमाने बोलायचं."
"रात्री दूध बायकोच्या हातून प्यायचं आणि न विसरता 'दररोज' दोन वाक्य तिच्याशी प्रेमाने बोलायचं."
दत्ताला कृष्णाचा रंग आज वेगळाच वाटला.
"मं त्यानंं काय व्हैल?"
त्याला साधा प्रश्न पडला.
"मं त्यानंं काय व्हैल?"
त्याला साधा प्रश्न पडला.
कृष्णा दत्ताच्या हातातून कप घेत मिश्किलपणे बोलला,
"लेका दत्ता, तुला काहीच कसं कळत नाही! त्याने दिवस कसाही गेला असला तरी रात्री बायको खूष होईल आणि बायको खूष तरं तू खूष... मग सगळाच आनंदी आनंद! मग हळूहळू तुझीच काय तुमच्या नात्याची पण तब्येत सुधारेल."
"लेका दत्ता, तुला काहीच कसं कळत नाही! त्याने दिवस कसाही गेला असला तरी रात्री बायको खूष होईल आणि बायको खूष तरं तू खूष... मग सगळाच आनंदी आनंद! मग हळूहळू तुझीच काय तुमच्या नात्याची पण तब्येत सुधारेल."
दत्ता एकदम तरतरी आल्यासारखा बोलला,
"लय झ्याक मास्तर! आजपास्न आसंच करतो. च्हला यतो."
"लय झ्याक मास्तर! आजपास्न आसंच करतो. च्हला यतो."
सायंकाळचा अंधार कृष्णाला एकांताची आठवण करून देऊ लागला. कृष्णाची पाऊले ही माघारी वळली. प्रत्येक पाऊल त्याच्या मनाला सुखावत होतं. कृष्णा बाहेरची पहिली पायरी चढला आणि दत्ताने आवाज दिला,
मास्तर ऽ ऽ.
मास्तर ऽ ऽ.
आतमध्ये सखीचा सहवास खुणावत असताना... तिच्यासोबत प्रत्येक क्षण घालवण्यासाठी आतुर असताना दत्ताची आलेली हाक ऐकून कृष्णाचं मन खट्टू झालं. तो माघारी फिरत बोलला,
"काय रे?"
"काय रे?"
"नंतर पाराव जाऊया का?"
दत्ताने हसत विचारलं.
दत्ताने हसत विचारलं.
कृष्णा लगेचच आपल्या कपाळाला हात लावून तोंड पाडून बोलला,
दोन चार दिवस नकोच, कणकण जाणवतीये. आता आराम करतो.
दोन चार दिवस नकोच, कणकण जाणवतीये. आता आराम करतो.
बरं बरं तुम्ही आराम करा आनि घरात जा. उगाच गार हवेनं डोकं धरंल.
कृष्णाने मान हलवली आणि उतरलेल्या चेहऱ्याने बोलला,
"दत्ता, प्रशांत आणि सुधीरला पण सांग, नाहीतर औषध खाऊन माझा डोळा लागायचा आणि ते बसायचे हाका मारत."
"दत्ता, प्रशांत आणि सुधीरला पण सांग, नाहीतर औषध खाऊन माझा डोळा लागायचा आणि ते बसायचे हाका मारत."
"व्हय व्हय सांगतो. ती न्हाय तुम्हाला तरास देनार. तुम्ही काळजी घ्या." दत्ता काळजीने बोलला.
कृष्णा गालात हसत माघारी फिरला. अगदी धावत आतमध्ये जाव असं वाटतं असताना संयमाचा दगड काळजावर ठेवून कृष्णा शांत पावलांनी घरात आला.
बाहेरचा दरवाजा ढकलताना त्याच्या मनातील चुळबुळ भलतीच वाढली. खोलीतील गुलाबाचा सुगंध घरभर पसरलेला. अचानक कानी पडणारी, त्याला नेहमीच भुरळ घालणारी ती बांगड्याची किणकिण ऐकून तोच रोमांचीत होत होता.
'मंजीलसे खुबसुरत सफर होता हैं'
याची प्रचिती तो क्षणाक्षणाला घेत होता.
त्या क्षणांमध्ये धुंद होत कृष्णा डोळे बंद करूनच स्वतःशीच पुटपुटला,
'सखी ऽ.. सखी ऽ.. सखी!'
याची प्रचिती तो क्षणाक्षणाला घेत होता.
त्या क्षणांमध्ये धुंद होत कृष्णा डोळे बंद करूनच स्वतःशीच पुटपुटला,
'सखी ऽ.. सखी ऽ.. सखी!'
उर्वरित भाग पुढे..
© प्रियांका सुभा कस्तुरी
२०/१०/२०२४
.........
२०/१०/२०२४
.........
कसा वाटला भाग?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा