कृष्ण सखी (अंतिम भाग)- २१४
सखी अगदी दरवाजापर्यंत पोहोचलेली. तिच्या सहवासाचे अजून काही क्षण चोरण्याच्या हेतूने कृष्णाने दरवाजावर हात ठेवला. इतका वेळ त्याच्याशी बोलून सुद्धा अजूनही सखीचं मन भरलं नव्हतं. तिचा सुद्धा हात आपोआप दरवाजावर गेला आणि ती त्याच्या डोळ्यांत पाहत बोलली.
"त्या राजा राणीला दोन राजकुमार असतील. त्यांना घरंदाज पण तितकीच प्रेमळ राजमाताही असेल हं!"
"त्या राजा राणीला दोन राजकुमार असतील. त्यांना घरंदाज पण तितकीच प्रेमळ राजमाताही असेल हं!"
लगेचच कृष्णा मनीची सुप्त इच्छा वर आणत तिचा अंदाज घेत त्याच्या हळू आवाजात संथपणे बोलला,
"राजाला राजकुमारी पण हवी असेल तर?"
"राजाला राजकुमारी पण हवी असेल तर?"
बाळाचा विषय कधी नाही आणि असा अचानक निघाल्यामुळे सखी लाजली. ती त्याच्याकडे बघत गालातल्या गालात हसली.
तिचं अगदी कंठाशी आलं,
'राणीलाही मुलीची फार ओढ आहे.'
'राणीलाही मुलीची फार ओढ आहे.'
पण बोलेपर्यंत स्वयंपाकघरातून सोनई वैतागून कडाडली,
'किशना ऽ, माजी आंगूळ पन झाली. तू लैच मातर हायेस हां!'
'किशना ऽ, माजी आंगूळ पन झाली. तू लैच मातर हायेस हां!'
तिच्या आवाजानेच सखी दचकली आणि ती कृष्णावर वैतागणार एवढ्यात कृष्णाने दरवाजा उघडला. सखी बाहेर जाण्याआधी कृष्णाला हळूच रागावली,
"आई मला काय बोलल्या तर तुमचंच नाव सांगणार. नेहमीचच तुमचं हूं!"
"आई मला काय बोलल्या तर तुमचंच नाव सांगणार. नेहमीचच तुमचं हूं!"
कृष्णा हसतच तिच्या मागे मागे स्वयंपाकघरात गेला. सोनाई लुगडं नेसत होती. तिची आंघोळ झालेली पाहून सखी लाडीगोडी लावत चुलीपुढे बसत बोलली,
"आई, अंघोळ पण झाली!"
"न्हाय, तुजी वाट बगत बसते की!"
सोनाई मोकळ्या आवाजात कासोटा खोचत बोलली.
सोनाईचा चढलेला आवाज ऐकूनच सखी एवढूसा चेहरा करून सगळं कृष्णा वर ढकलत बोलली,
"आई तुम्हाला क्रिष्ण् माहिती आहेत ना कसे आहेत ते.... मग मी काय करणार!"
स्वयंपाकघराच्या दरवाज्यात हसतच उभ्या असलेल्या कृष्णाकडे बघून सोनाई डोक्यावरून पदर घेत कृष्णाला रागावली,
"कशाला तरास देतोस तिला?"
कृष्णा कमरेवर हात ठेवत हसतच सखीकडे बघून बोलला,
"हाये का आता? तुला माहित नाही तुझी सूनच मला किती त्रास देते."
"हाये का आता? तुला माहित नाही तुझी सूनच मला किती त्रास देते."
सखीचं बोट ओठांवर गेलं आणि सोनाई कृष्णाचीच उलट तपासणी घेतल्यासारखी बोलली,
"तू गप बस! तुला काय मी आज वळाखते व्हय? सवता तं यडाच हायेस आनि दुसऱ्याला बी याड लावतोस."
"हाये का आता? तू माझी आई आहेस की सखींची मलाच कळत नाही. कृष्णा हसत बोलला आणि दारातूनच नाना ओरडला,
"कृष्णा ऽ, ए ऽ काकू ऽ, सखी ऽ उठला का सगळे?"
सोनाई कपाळावर हात मारत बडबडली,
"हा आजून योक यडा."
कृष्णा हसतच ओटीवर येत बोलला,
"तू उठवायला येतोयस हे माहिती असतं तर झोपून राहिलो असतो की."
नानाने सॅंडल घाईत उतरवले आणि हसतच ओटीवर आला. आरव, सुरज अंथरुणात असल्याने तो अंथरूण चुकवत कृष्णाकडे जसा की धावला.
"अरे हळू."
कृष्णा बोलेपर्यंत नानाने उत्साहात हातातील मिठाई कृष्णाला भरवली नंतर सोनईला भरवली.
त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कृष्णा आणि सोनाई दोघेही हसले. सोनाईने हसून विचारलं,
"आरं पन झालं काय?"
"आरं पन झालं काय?"
नाना हसत आनंदाने बोलला,
"काकू ऽ, तू आजी होणार आहेस."
"काकू ऽ, तू आजी होणार आहेस."
नाना बाप होणार आहे हे कळताच कृष्णा आनंदाने हसायला लागला,
"नाना? मी मामा होणार आहे काय?"
"नाना? मी मामा होणार आहे काय?"
नानाने लाजून कृष्णाला मिठी मारली. सोनाईलाही खूप खूप आनंद झाला. कोणाकोणाला सांगू या विचाराने नानाने झोपलेल्या आरव आणि सुरजला गदागदा हलवून उठवलं,
"ए आरव सुरज उठा!"
गदा गदा हलवल्यामुळे दोघेही घाबरून उठून बसले.
आरव घाबरून बोलला,
"काय झालं?"
आरव घाबरून बोलला,
"काय झालं?"
सुरज फक्त रडायचा बाकी होता. नानाने हसतच दोघांच्याही हातावर मिठाई ठेवली आणि हसत बोलला,
"पेढे खा. तुम्ही दादा होणार आहात."
"पेढे खा. तुम्ही दादा होणार आहात."
झोपेत असणाऱ्या आरवला 'पेढे खा' एवढंच कळलं तर सुरजची नजर ही हातातील पेढ्यावरंच अडकली. नाना हसतच इकडे तिकडे बघत बोलला,
"अरे सखी कुठे राहिली? सखी ऽ."
..लगेचच सोनाई स्वयंपाकघराकडे बघत,
"हितंच तं व्हती."
"हितंच तं व्हती."
नाना हसतच स्वयंपाकघरात जात,
"ए ऽ सखी, आत्या झालीस तू!"
"ए ऽ सखी, आत्या झालीस तू!"
स्वयंपाकघर मोकळं पाहून नानाने खांदे उडवले,
"कुठे गेली?"
कृष्णा हसला,
"अंघोळीला गेल्या असतील."
बाप नाना होणार होता पण आनंद कृष्णाला झालेला. कृष्णा नानाचा खांदा थोपटत हसत बोलला,
"यार नाना, मी मामा होणार.. विचार करूनच लयीच भारी वाटतंय लेका."
"यार नाना, मी मामा होणार.. विचार करूनच लयीच भारी वाटतंय लेका."
नाना आपली बत्तीशी दाखवत हसत बोलला,
"मला पण!"
"मला पण!"
मध्येच सोनाईने गुगली टाकली आणि ती हसतच हनुवटीला हात लावत बोलली,
"पन किशना ऽ, तू मामा व्हनार का काका?"
"पन किशना ऽ, तू मामा व्हनार का काका?"
कृष्णाने हसतच नानाकडे पाहिलं,
"नाना, मी मामा होणार का काका?"
"नाना, मी मामा होणार का काका?"
नाना कृष्णाच्या खांद्यावर हात टाकत हसत बोलला,
"तू आपला मोठा भाऊ आहे यार. तू तर मोठा काकाच होणार नंतर मामा हो."
"तू आपला मोठा भाऊ आहे यार. तू तर मोठा काकाच होणार नंतर मामा हो."
आपल्या खांद्यावरचा हात काढत कृष्णाने हसतच त्याच्या पाठीत धपाटा घातला,
"बेन्या, आता तरी मोठा हो आणि काळजी घे तिची."
"बेन्या, आता तरी मोठा हो आणि काळजी घे तिची."
"मी कधीच मोठा झालोय पण तुला दिसतच नाही." नाना हसतच बोलला आणि बॉक्स मधील पाच-सहा पेढे कृष्णाच्या हातात देत बोलला,
"हे सखीसाठी. आता सासुरवाडीत आनंदाची खुशखबरी देऊन येतो." आणि तो हसतच निघाला.
"हे सखीसाठी. आता सासुरवाडीत आनंदाची खुशखबरी देऊन येतो." आणि तो हसतच निघाला.
त्याच्या मागे मागे जात सोनाई सुद्धा गडबडीत बोलली,
"आरं ऽ, फकस्त त्यांनाच सांग. गावाला सांगंत बसू नगं. तीन म्हैनं कुनाला सांगत न्हाईत."
"आरं ऽ, फकस्त त्यांनाच सांग. गावाला सांगंत बसू नगं. तीन म्हैनं कुनाला सांगत न्हाईत."
इकडे सगळे आनंदात असताना सखी मात्र न्हाणीघरात होती. हातात पॉझिटिव्ह प्रेग्नेंसी किट घेऊन त्याच्याकडे अविश्वासाने बघत डोळ्यांत आनंदाश्रू घेऊन ती काही क्षण स्तब्ध झाल्यासारखी झालेली. तिने पुन्हा पुन्हा ते किट चेक केलं.
तिचा हात अलगद आपल्या पोटावर गेला. ती आई होणार होती. तिच्या आणि कृष्णाच्या प्रेमाचा अंकुर तिच्या पोटात....... कल्पनेनेच ती शहाली.
आई तर पहिल्यांदा ही झालेली. घृणा असलेल्या माणसाच्या मुलाची आई. तेव्हा हीच खबर अश्रू घेऊन आलेली तेव्हा आईपणातील सुख तिला कळलंच नव्हतं.
'या जाणीवेत आनंद असतो'
ही तिला भाबडी कल्पना वाटलेली पण आत्ता..
ती तोच सुखद क्षण जगत होती.
ही तिला भाबडी कल्पना वाटलेली पण आत्ता..
ती तोच सुखद क्षण जगत होती.
'कृष्णाचं बाळ... तिचं बाळ' आनंदाने तिच्या डोळ्यांतील पाणी ओसरू लागलेलं. न्हाणीघरापासून स्वयंपाकघर अगदी दहा पावलांवर असेल पण ती दहा पावलं सुद्धा तिला खूप दूरची वाटली. एका क्षणात धावत जावं आणि कृष्णाच्या मिठीत शिरून त्यालाच पहिली ही आनंदाची बातमी द्यावी, या विचाराने ती मोहरली. आनंदाच्या विचारांनी सखी हसता हसता रडली.
तिने डोळे पुसले आणि कशी बशी स्वयंपाकघरात आली. कृष्णा प्लेटमध्ये पेढे ठेवत होता. ती आलेली पाहताच तिच्या हातात पेढा ठेवत कृष्णा हसत बोलला,
"बायको ऽ, अभिनंदन. आत्या होणार आहात म्हटलं."
एका हातात प्रेग्नेंसी किट घट्ट आवळून सखी हसतच कृष्णाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत होती. तो हसत बोलला,
"मी काका पण झालो आणि मामा पण... आजचा दिवस लयीच भारीये! इतका आनंद झालाय मला!"
काका झाल्यावर इतका आनंद मग तो बाप होणार आहे हे कळल्यावरचा आनंद पाहण्यासाठी सखी आतुरली. तिने हसतच त्याच्यासमोर आपल्या हाताची मूठ उघडली.
तिच्या मुठीतील ते प्रेग्नेंसी किट पाहून कृष्णाने हसतच ते उचललं,
"काय आहे हे?"
"काय आहे हे?"
आनंदात आणि आयुष्यात पहिल्यांदाच ते कीट प्रत्यक्ष पाहताना क्षणासाठी तो चलबिचल झाला. त्या प्रेग्नेंसी किटकडे पाहताना एक सुखद विचार त्याला सुखावून गेला आणि सखीच्या ओठांतून हवेहवेसे मधुर शब्द त्याच्या कानी पडले,
"तुम्ही बाबा होणार आहात क्रिष्ण्!"
"तुम्ही बाबा होणार आहात क्रिष्ण्!"
अनपेक्षित सुखद धक्का!
त्या शब्दांनीच कृष्णा शहारला!
'मी बाप होणार'
तो ओठांत पुटपुटला.
इतका आनंद.. इतका आनंद क्षणात झेपावला की कृष्णाला काय करू आणि काय नको असं झालं. मोठमोठ्याने हसतच अत्यानंदाने त्याने सखीला कवटाळलं. आनंदाच्या भरात पहिल्यांदाच त्याने आवेगाने अगदी घट्ट कटाळलं.
सखी हसतच दंड दुखल्याने ओठांत पुटपुटली,
"आह ऽ हळू!"
"आह ऽ हळू!"
त्याने तिला क्षणात मोकळं केलं आणि हसतच चाचपडत बोलला,
"माफ करा. ते आनंदाच्या भरात..... पण तुम्ही ठीक आहेत ना?"
"माफ करा. ते आनंदाच्या भरात..... पण तुम्ही ठीक आहेत ना?"
सखी त्याचा आनंद पाहून हसत बोलली,
"हो क्रिष्ण. मी अगदीच ठीक आहे."
..इतक्यात पेढा खाऊन पदर तोंडावरून फिरवत सोनाई स्वयंपाकघरात येत बोलली,
"कलीचं थोबाड उजाळंल म्हणायचं!
"कलीचं थोबाड उजाळंल म्हणायचं!
सोनाईला पाहताच कृष्णा तिला आनंदाने घट्ट कवटाळत अत्यानंदाने बोलला,
"आई ऽ, आई तू आजी होणार आहेस. मी बाबा होणार आहे आई!"
"आई ऽ, आई तू आजी होणार आहेस. मी बाबा होणार आहे आई!"
त्याच्या शब्दांनी जणू सोनाई स्तब्ध झाली.
पहिल्यांदाच त्याच्या घट्ट मिठीने दंड दुखून सुद्धा सोनाई आपल्या मुलाची वाढणारी वंशवेल पाहून खोलवर सुखावली.
या क्षणाची तिच्या इतकी वाट तर कोणीच बघीतली नव्हती. तिची नजर लगेच सखीकडे वळली. सखीने लाजून गालात हसतच वरून खाली मान हलवली.
तसा सोनाईचा चेहरा फुलला.
तसा सोनाईचा चेहरा फुलला.
आजी होण्याचा आनंद सोनाईच्या डोळ्यांत उतरला. कृष्णाला मिठी मारून ती भोळी माय आपसूकच रडली! तिच्या तोंडून काहीच निघालं नाही पण तिचे ओले डोळे बरंच काही सांगून गेले. त्या दोघांच्या प्रवासाची ती खरी खरी साक्षीदार होती. हा दिवस नक्की येणार आणि येणारच हा विश्वास बाळगून फक्त तिच तरं होती.
तिचे डोळे पुसत कृष्णा घोगऱ्या आवाजात बोलला,
"म्हातारे ऽ, नातुंड सांभाळायला लागेल म्हणून रडतेस काय!"
पदराने डोळे पुसत सोनाई थोडीशी हसत बोलली,
"कोमट्या, तुला न्हाय कळायचं. तू गप."
"कोमट्या, तुला न्हाय कळायचं. तू गप."
सोनाईने आपल्या खरबडीत हातांनी सखीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि मायेने नजर काढत बोलली,
"कुनाची नजर लागाया नको माज्या म्हाळसाला!"
आई होत असताना आईची आठवण आली नाही तर नवलच!
आईच्या आठवणीने सखी भाऊकपणे सोनाईला बिलगली.
"आई ऽ ऽ."
फक्त एवढंच उद्गारली आणि सोनाई आपला खरबडीत हात तिच्या पाठीवरून फिरवत मायेने बोलली,
"वैनीला बी कळवू आपून. सागर तंं तिकडं बी पेढं वाटंल."
फक्त एवढंच उद्गारली आणि सोनाई आपला खरबडीत हात तिच्या पाठीवरून फिरवत मायेने बोलली,
"वैनीला बी कळवू आपून. सागर तंं तिकडं बी पेढं वाटंल."
"ए ऽ कृष्णा ऽ, येतो रे ऽ."
बाहेरून आरोळी आल्यावर कृष्णा हसतच बाहेर धावला. उंबऱ्यातून पायऱ्या गाळत कृष्णाने सरळ अंगणात उडी मारली आणि अंगणातून धावत पुन्हा उतरत्या दगडी पायऱ्यांना गाळत कृष्णाने सरळ रस्त्यावर धाव घेतली. नाना हसतच त्याचा उत्साह बघत बघत होता.
नानाचे दोन्ही खांदे घट्ट आवळून कृष्णा हसता हसताच आत्यानंदाने दाटल्या कंठाने बोलला,
"नाना ऽ, मी बाबा होणारे यार! तू छोटा काका...."
"नाना ऽ, मी बाबा होणारे यार! तू छोटा काका...."
"कृष्णा ऽ !"
नानाचं तोंड उघडच राहिलं.
नानाचं तोंड उघडच राहिलं.
बाप होण्याचा आनंद नुकताच अनुभवत असलेल्या नानाला कृष्णाच्या आनंदाचा अंदाज होताच. आता त्याच्या काळजात आनंद मावत नव्हता. दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली आणि दोघेही हसता हसताच तिथेच रस्त्यावर आनंदाने नाचायला लागले. त्या दोघांना नाचताना पाहून कारण माहीत नसतानाही सुधीर, प्रशांत, राकेश कृष्णाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी पारुशेच आले आणि तेही हसतच वेड्यासारखे नाचू लागले.
त्यांच्या नाचण्याला कारण एकच होतं-
त्यांचा मास्तर नाचत होता.
त्यांचा मास्तर नाचत होता.
त्यांचं हसणं आणि काळजात पसरलेला आनंद आणि आनंद .... तिथे नाचण्यासाठी पुरेसा होता. ना कोणती डॉल्बी, ना कोणतं संगीत तरीही ते सगळेच नुसतेच आनंदाने नाचत होते.
मोबाईल वाजल्यावर नानाने मोबाईल पाहिला आणि नैनाचा मिस्ड कॉल पाहून नाना आपलं नाचणं थांबवत कृष्णाचा निरोप घेत बोलला,
"चल यार, अजून बाळाचं नाव ठरवायचं आहे. बाळाच्या कपड्यांच्या खरेदीला तुला सुट्टी असल्यावर जाऊ."
"चल यार, अजून बाळाचं नाव ठरवायचं आहे. बाळाच्या कपड्यांच्या खरेदीला तुला सुट्टी असल्यावर जाऊ."
कृष्णा हसतच त्याच्या पाठीवर थापाटा घालत बोलला,
"बेन्या, तुला कायमच घाई!"
"बेन्या, तुला कायमच घाई!"
नाना हसतच सगळ्या मित्रांचा निरोप घेऊन गेला. नाचून नाचून धापा टाकणारी त्याची दोस्त मंडळी! त्याच्या आनंदात विनाअट सामील झालेली त्याची दोस्त मंडळी! त्यांना पाहून तर कृष्णाला अजूनच आनंद झाला.
प्रशांत हसत बोलला,
"मास्तर ऽ, आता का नाचलो ह्यं बी सांगूनच टाका की."
"मास्तर ऽ, आता का नाचलो ह्यं बी सांगूनच टाका की."
कृष्णाने प्रशांतच्या खांद्यावर हात टाकत सर्वांवरून नजर फिरवली. बोलताना त्याचा हलकासा पुरुषार्थही कुठेतरी सुखावला. तो हसतच आनंदाने बोलला,
"नानाकडे तर आहेच पण आपल्याकडे सुद्धा आनंदाची बातमी आहे."
"नानाकडे तर आहेच पण आपल्याकडे सुद्धा आनंदाची बातमी आहे."
सुधीर आनंदाने,
"मास्तर ऽ! म्हणजे आम्ही पुन्हा काका..."
"मास्तर ऽ! म्हणजे आम्ही पुन्हा काका..."
"व्हय!"
कृष्णा प्रशांतचा खांदा दाबत हसत बोलला.
कृष्णा प्रशांतचा खांदा दाबत हसत बोलला.
"पार्टी... पार्टी ... पार्टी... पार्टी...."
एवढाच शब्द ओरडत ते तिघे पुन्हा नाचायला लागले. हसता हसताच राकेश बोलला,
"पण यावेळी ढाब्यावरच न्हाय..
तं काकूच्या हातचंच मटन पायजे."
एवढाच शब्द ओरडत ते तिघे पुन्हा नाचायला लागले. हसता हसताच राकेश बोलला,
"पण यावेळी ढाब्यावरच न्हाय..
तं काकूच्या हातचंच मटन पायजे."
"दिलं."
कृष्णा हसला आणि हसतच पुन्हा घरात यायला निघाला.
कृष्णा हसला आणि हसतच पुन्हा घरात यायला निघाला.
तो ओटीवर आला तेव्हा सोनाई आरवला सांगत होती,
"तुला भैन येनारे राखी बांधायला. ल्हानी भावली आसंल बग तुज्या संग ख्येळायला."
"तुला भैन येनारे राखी बांधायला. ल्हानी भावली आसंल बग तुज्या संग ख्येळायला."
तिचं सोपं बोलणं आरवला लगेच कळलं. तो धावतच खोलीत गेला आणि सखीच्या कमरेला बिलगला. तो नेहमीसारखा हसतच मान वर करून सखीकडे बघत आनंदाने बोलला,
"आयं ऽ, तुला बाळ व्हनारे व्हय?"
"आयं ऽ, तुला बाळ व्हनारे व्हय?"
सखीला लाजल्यासारखं झालं. ती वरून खाली मान आणत प्रेमाने त्याच्या केसांतून हात फिरवत बोलली,
"हम्म ऽ... पण बाळ येणार म्हटल्यावर आई बाळाचे पण लाड करणार हं आरु. तुला चालेल ना?"
"हम्म ऽ... पण बाळ येणार म्हटल्यावर आई बाळाचे पण लाड करणार हं आरु. तुला चालेल ना?"
आरवने हसतच बाळाला स्वीकारलं. तो सखीच्या पोटावर वरूनच ओठ टेकवत बोलला,
"तू यकटीच न्हाय, मी बी लाड करनार तिजं."
"तू यकटीच न्हाय, मी बी लाड करनार तिजं."
आईच्या प्रेमातील वाटेकरी त्याने स्वीकारल्याने सखी मोकळेपणाने हसली. आरवच्या गालाची पापी घेतल्यावर तो हसतच आजीकडे गेला आणि बाहेरून त्याचा आवाज आला,
"आज्जे ऽ, कदी येनार माजी भावली?"
"आज्जे ऽ, कदी येनार माजी भावली?"
लगबगिने सुरजसुद्धा सखीकडे आला. त्याला काय कळलं कुणास ठाऊक पण तोही सखीच्या पायांना बिलगत हसत बोलला,
"आई ऽ, मै बी लाड करेगी भावलीच!"
"आई ऽ, मै बी लाड करेगी भावलीच!"
"चालेल!"
सखीने हसतच त्याच्याही गालाची पापी घेतली तसा तोही बाहेर सोनाईकडे पळाला-
"आज्जी, मला बी दुसरी भावली."
सखीने हसतच त्याच्याही गालाची पापी घेतली तसा तोही बाहेर सोनाईकडे पळाला-
"आज्जी, मला बी दुसरी भावली."
सोनाई हसतच बिछाना काढत बोलली,
"व्हय तं. तुमच्या आयबापाला दुसरी कामं हायेत का?"
"व्हय तं. तुमच्या आयबापाला दुसरी कामं हायेत का?"
तिच्या बोलण्याने सखी लाजली. मुलं बाहेर गेल्यावर कृष्णा हसतच खोलीत आला. दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. पुन्हा हसले आणि पुन्हा हसले.
'म्हणजे बरंच काही बोलायचं असताना उगाचच एकांत हवा असतो, असं झालेलं त्यांचं!'
कृष्णाने हलकेच दरवाजा ढकलला आणि हलकासा हात खोलला. सखी लगेचच त्याच्या मिठीत आली.
दोघांच्याही उरात आनंद जसा की वाहत होता. तिने प्रेमाने त्याच्या छातीवर ओठ टेकवले आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली.
'तिचं लाजरे प्रेम आयुष्यभर असंच राहावं'
अशी तिच्या कृष्णाला विनवणी करून या कृष्णाने तिला अलगद मिठीत घेतलं.
काही क्षण मूकपणे गेले. जे फक्त त्यांचे होते. स्पर्शातूनच त्यांनी आनंद व्यक्त केला मग कृष्णाची नजर आरतीच्या फोटोकडे गेली.
इतक्या आनंदाच्या क्षणी तो तिला विसरेल तरी कसा! तिच्या फोटोकडे पाहताना तो स्वतःशीच बोलल्यासारखा बोलला,
'आरु ऽ ऽ ऽ ऽ.'
'आरु ऽ ऽ ऽ ऽ.'
त्याला आतून बाहेरून ओळखू लागलेली सखी कृष्णाच्या मिठीतून हलकेच बाजूला झाली आणि आरतीच्या फोटोकडे पाहून कृष्णाचा हात आपल्या पोटावर ठेवत नेहमीसारखी शांत हसत शांतपणे बोलली,
"आरतीताई ऽ, तुम्ही मोठ्या आई होणार आहात."
"आरतीताई ऽ, तुम्ही मोठ्या आई होणार आहात."
बस् कृष्णाच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. आजवर पावलोपावली त्याला सखीच्या मनाच्या मोठेपणाचा पदर भावलेला पण या क्षणी जणू तो तिच्या स्त्रीत्वापुढेच झुकला.
सखीचे दोन्ही हात आपल्या कपाळाला लावून कृष्णा भाऊक होत बोलला,
"सखी ऽ तसं तरं तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीच नाही पण माझा प्रत्येक श्वास तुमचा ऋणी राहील. तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुमच्यामुळे माझं घर आहे. माझा संसार आहे. तुम्हाला सांगू ही शकत नाही... तुम्ही माझ्यासाठी काय आहात सखी!"
"सखी ऽ तसं तरं तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीच नाही पण माझा प्रत्येक श्वास तुमचा ऋणी राहील. तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुमच्यामुळे माझं घर आहे. माझा संसार आहे. तुम्हाला सांगू ही शकत नाही... तुम्ही माझ्यासाठी काय आहात सखी!"
"क्रिष्ण् ऽ ऽ ऽ."
त्याच्या हातातून आपला हात काढून घेत सखी त्याच्या डोळ्यांची कडा पुसत भाऊकपणे बोलली,
"खरंतर आभार मी मानायला हवेत.
वाळवंटात कधी फुलं उमलतात का? पण तुम्ही ती फुलवली. बेरंग चित्रात रंग तुम्ही भरले. या सखीच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने अर्थ तुमच्यामुळे आला, खरंतर तुम्ही आहात म्हणूनच मी आहे क्रिष्ण्." आणि तिच भाऊक होत त्याला बिलगली.
तिला नेहमीसारखी घट्ट बिलगलेली पाहून कृष्णा तिला स्वतःपासून थोडीशी दूर करत काळजीरूपी प्रेमाने बोलला,
"आता आई होणार आहात ना, मग जरा लांब रहा माझ्यापासून."
सखी डोळे पुसत हसत त्याचीच थट्टा करत बोलली,
"हे तुम्हीच लक्षात ठेवा आणि कटाक्षाने लांब राहा माझ्यापासून."
तिच्या सूचक बोलण्याने कृष्णा गालात हसत हलकेच तिचा गाल ओढत बोलला,
"लयीच आगाव झालाय!"
..आणि तो आठवल्यासारखं अचानक बोलला,
"पण माझ्या परीच नाव मीच ठेवणार हां!"
"पण माझ्या परीच नाव मीच ठेवणार हां!"
"असं कसं? ते मी ठेवणार!"
सखीची लगेच रिएक्शन आली.
सखीची लगेच रिएक्शन आली.
कृष्णा हसत बोलला,
"तुम्ही ठेवणार म्हणजे तुमच्या सारखंच नाजूक, कोमल असणार. अरे नाव कसं पाहिजे, एकदम मर्दानी."
"तुम्ही ठेवणार म्हणजे तुमच्या सारखंच नाजूक, कोमल असणार. अरे नाव कसं पाहिजे, एकदम मर्दानी."
सखी हसत बोलली,
"तुम्हाला कोणी सांगितलं मुलगी होणार?"
"तुम्हाला कोणी सांगितलं मुलगी होणार?"
"मला माहितीये."
"आणि मुलगा झाला तर?"
कृष्णा डोळे मिचकावत बोलला,
"मग पुन्हा मुलीसाठी प्रयत्न!"
"मग पुन्हा मुलीसाठी प्रयत्न!"
सखी लाजरी हसत बोलली,
"गप्प बसा हं!"
"गप्प बसा हं!"
का कुणास ठाऊक पण कुठेतरी तिलाही हा विश्वास होता की तिला मुलगीच होणार. सखीने वही पेन कृष्णाच्या हातात दिला आणि हसत बोलली,
"यावर तुम्ही तुमच्या मनातील नाव लिहा. मी माझं नाव लिहिते. जे नाव छान असेल तेच नाव फायनल."
"यावर तुम्ही तुमच्या मनातील नाव लिहा. मी माझं नाव लिहिते. जे नाव छान असेल तेच नाव फायनल."
"एक नंबर आयडिया!"
कृष्णाने लगेच वही पेन घेतला.
कृष्णाने लगेच वही पेन घेतला.
सखीचा पेन कागदावर चालण्याआधी मनात एकच नाव उमटलं. जे तिच्या सुखात, दुःखात, आनंदात, एकटेपणात तिचा सोबती होतं!
'कृष्णा'
त्याचा आशीर्वाद नेहमी आपल्या बाळासोबत राहावा आणि त्याचं नाव नेहमी सर्वांच्या मुखात राहावं या हेतूने सखीच्या पेनातून आपोआप एक नाव उमटलं!
कृष्णाने वही पेन हातात घेतला. त्याची छाती आनंदाने भरून आलेली. 'आपण बाप होणार'
हा आनंद काही औरच होता.
'त्याची परी' त्याच्यासारखीच व्हावी. मेहनती पण तितकीच बिनधास्त आणि बेडर हे विचार मनात घोळत असताना पेनातून अलगद एक नाव उमटलं-
'कृष्णाई'
'कृष्णाई'
बिछाना आवरून पोरांना आंघोळीला पिटाळून सोनाई खोलीत येत तोऱ्यात बोलली,
"तुमच्या दोघांचं ऱ्हाव द्या! माज्या नातीचं नाव मीच ठेवनार आनि मी त्यं तुमचं लगीन व्हयाच्या आदीच ठरावलंय!"
"तुमच्या दोघांचं ऱ्हाव द्या! माज्या नातीचं नाव मीच ठेवनार आनि मी त्यं तुमचं लगीन व्हयाच्या आदीच ठरावलंय!"
कृष्ण सखी दोघेही आश्चर्याने एकदमच बोलले,
"कोणतं नाव?"
"कोणतं नाव?"
सोनाई डोक्यावरून पदर घेत तोऱ्यात पण काहीशी प्रेमाने बोलली,
"माज्या आयंच नाव हाये त्यं! किशनाई!"
"माज्या आयंच नाव हाये त्यं! किशनाई!"
"कृष्णाई!"
कृष्ण सखी एकदमच आश्चर्याने पुटपुटली.
दोघांनीही एकमेकांना आपली वही दाखवली. दोघांच्याही वहीवर एकच नाव-
'कृष्णाई!'
'कृष्णाई!'
हा कसला संकेत होता!
कृष्ण सखी आनंदाने हसले. कृष्णाने आनंदाने सोनाईला मिठी मारली,
"तू म्हणतेस तरं कृष्णाईच नाव ठेवू!
तुझ्या शब्दाबाहेर आहे काय आम्ही?"
कृष्ण सखी आनंदाने हसले. कृष्णाने आनंदाने सोनाईला मिठी मारली,
"तू म्हणतेस तरं कृष्णाईच नाव ठेवू!
तुझ्या शब्दाबाहेर आहे काय आम्ही?"
आपल्या नातीचं नाव आपण ठेवल्याच्या आनंदात पुन्हा सोनाईचे डोळे ओले होऊ लागले. सोनाई आणि कृष्णा दोघेही सखीकडे बघत होते. सखीचे डोळे मिटलेले. हात जोडले गेलेले.
ती मनात तिच्या सख्याशी बोलत होती,
'कृष्णा ऽ, तुझी लीला अगाध आहे. आज तुझ्या कृपेने माझ्या आयुष्याचं सोनं झालंय. माझ्या संसाराचं सोनं झालंय. तू असाच माझ्यासोबत असं हं कृष्णा! माझ्या संसारावर, माझ्या मुलांवर तुझा वरदहस्त कायम असू दे! प्लीज, प्लीज, प्लीज माझ्या मुलांसोबत तू असं हं कृष्णा!'
सोनाईने कृष्णाच्या हाताला धरून त्याला सखीजवळ उभं केलं. सखीच्या डोळ्यांतून अश्रू आणि जोडलेले हात तसेच होते. ती तिच्या कृष्णासोबत, सख्यासोबत व्यस्त होती.
सोनाई लगबगीने स्वयंपाकघरात गेली. मीठ, मिरची, मोहरी, काळा तिला जे काही घावेल ते घेऊन तशीच लगबगीने पुन्हा खोलीत आली आणि कृष्ण सखीची नजर काढू लागली. नजर काढताना ती भाऊक झालेली. तेव्हा हातालाच नव्हे, तरं तिच्या आवाजालाही हलकासा कंप आलेला. आनंदाची भरती आल्यावर असंच होतं. त्या दोघांची नजर उतरवून खोलीतून बाहेर जाताना तिने मघाससारखाच नव्हे तरं आता पूर्ण दरवाजा ओढून घेतला आणि चुलीपुढे येऊन ते मीठ मिरची चुलीत टाकली. तटातटा वाजल्यावर तिने पदराने डोळे पुसले.
सख्याशी हितगूज उरकल्यावर सखीने डोळे उघडले. तिच्याकडेच पाहणाऱ्या कृष्णाकडे बघत सखी अलगद त्याच्या मिठीत शिरली. पुन्हा तिचे डोळे बंद झाले. अगदी शांत वाटत होतं तिला. तरीही डोळ्यांना भरती का येत होती तेच कळत नव्हतं.
"क्रिष्ण् ऽ ऽ ऽ!"
ती ओठांत पुटपुटली.
ती ओठांत पुटपुटली.
तिच्या केसांवर ओठ टेकत कृष्णाही ओठांत पुटपुटला,
"आय लव्ह यू सखी!"
"आय लव्ह यू सखी!"
सखी आनंदाने हसली. कृष्णा तिला प्रेमाने थोपटत बोलला,
"आता तुम्हाला मी एक क्षण देखील दूर करणार नाही. तुमची मुऱ्यावरची शाळा आजपासून बंद. जे काही आहे ते रविवारी मीच बघेन. तुम्ही फक्त तुमची आणि बाहुलीची काळजी घ्यायची आणि तुम्हाला काय हवं नको ते मला सांगायचं."
सखी काळजीने बोलली
"तुमच्यावर लोड येईल क्रिष्ण्. तुम्ही थकून जाल!"
"तुमच्यावर लोड येईल क्रिष्ण्. तुम्ही थकून जाल!"
तो पुन्हा तिच्या केसांवर ओठ टेकवत प्रेमाने बोलला,
"काही नाही होत. रात्री तुमच्या कुशीत आलो की दुसऱ्या दिवसासाठी ताकत आपोआप मिळते. तुम्हीच माझी ताकत आहात सखी."
"काही नाही होत. रात्री तुमच्या कुशीत आलो की दुसऱ्या दिवसासाठी ताकत आपोआप मिळते. तुम्हीच माझी ताकत आहात सखी."
त्याच्या शब्दातच नव्हे तर त्याच्या स्पर्शात ही प्रेम होतं... निव्वळ प्रेम होतं. सखी गालात हसली.
"आपलं बाळ!"
ती ओठांत उद्गारली की कृष्णाने अलगद तिच्या ओठांवर बोट ठेवलं.
ती ओठांत उद्गारली की कृष्णाने अलगद तिच्या ओठांवर बोट ठेवलं.
"श्श ऽ काहीच बोलू नका."
आणि त्याने तसंच तिला मिठीत घेतलं.
आणि त्याने तसंच तिला मिठीत घेतलं.
त्याच्या काळजावर डोकं ठेवून तिनेही अलगद त्याच्या कमरेला वेढा दिला. त्यांच्या हक्काचे, आनंदाचे क्षण त्या प्रेमाच्या मिठीत सामावलेले.
स्वयंपाकघरात सोनाई तिच्या पांडुरंगाला हात जोडून आपल्या मुलाच्या सुखासाठी विनवत होती,
'पांडुरंगा, तुजी आशीच किरपा ऱ्हावदे! तुजी सावली माज्या लेकराबाळांवर आशीच ऱ्हाव दे रं बाबा!'
सोनाईच्या नजरेसमोरून कृष्णसखीचा अगदी लग्न ठरण्याच्या आधीपासून ते आत्तापर्यंतचा प्रवास असा झरझर गेला. सुरुवात किती खडतर होती.
लग्न का करावं? इथपासूनचा त्यांचा प्रवास!
लग्न का करावं? इथपासूनचा त्यांचा प्रवास!
आपला मुलगा आणि सुनेच्या सुखी संसाराचं कौतुक वाटून सोनाई स्वतःशीच बोलल्यासारखी बोलली,
"यकमेकानं जुडीदाराच्या कालच्या दिसाची इज्जत किली, कदर किली, झालं गेलं सुडून फुडचं पाऊल टाकलं, मोठ्या मनानं नवऱ्याला नवरा आनि बायकूला बायकू म्हनलं तं दुसरा सौंसार बी सोन्यासारा व्हतो! आगदी किशना आनि म्हाळसावानी नजर लागन्यासारखा व्हतो!'
'कधी कधी दोन अपूर्ण गोष्टी एकत्र आल्यावर एक सुंदर गोष्ट तयार होते, अगदी कृष्णसखी सारखीच!'
समाप्त!
© प्रियांका सुभा कस्तुरी
१२/११/२०२४
१२/११/२०२४
.............
(मनोगत -
असं झालंय कुठून बोलू आणि किती बोलू!
दीड वर्षांचा आपला प्रवास त्यामध्ये आलेले उतार चढाव, तुम्ही दिलेली सोबत, सगळं सगळं आठवतंय.
दीड वर्षांचा आपला प्रवास त्यामध्ये आलेले उतार चढाव, तुम्ही दिलेली सोबत, सगळं सगळं आठवतंय.
मला हे सांगायला फार आनंद होतोय की या कथेचं बीज याच व्यासपीठावर उमलंल आणि ही कथा पहिली इथेच लिहिली गेली. खरंतर सोळाव्या भागानंतर जवळपास तीन महिन्याचा गॅप होता. कथेची सुरुवात होती तरीसुद्धा महिन्याने मेसेज येत होते, 'पुढील भाग कधी?' तिथेच विश्वास मिळालेला की आपण वेगळं लिहिलेलं वाचकांना आवडतंय. त्यानंतर जो आपला प्रवास चालू झाला त्याला तोडच नव्हती.
कथेने दोनशेचा टप्पा पार केला याचं सगळं श्रेय तुम्हां वाचकांना जातं कारण प्रत्येक भागानंतर भागाचं तोंड भरून कौतुक करणं हे प्रत्येक लेखकासाठी खूप महत्त्वाचं असतं. मी तर म्हणेन इरावरील तुम्हाला कोणतंही साहित्य आवडलं की दोन शब्द तरी बोलत जा, त्या लेखकाला लिहिण्यासाठी उत्साह मिळतो. असो,
अनघा, टीना, सत्वशीला, निशा, सायली, प्रियांका, निकिता, जयश्री, मनीषा, ज्योती, मेघा, रेणुका, मधुरा, अनिता, नुतन, स्वप्नीला, रिटा, धनदीपा, शुभांगी अशा कितीतरी सख्यांनी मला कायम प्रोत्साहन दिलं. फेसबुकवर सुद्धा कथेला भरभरून प्रेम दिलं त्यासाठी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार! चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर समीक्षेमध्ये माझे कान धरू शकता आणि त्याबद्दल आधीच मी माफी मागते.
हा प्रवास इथेच संपला म्हणून नाराज होऊ नका. ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहेच. कथा संपतीये हे पाहून तुमच्यापैकी बरेच जण नाराजही होतील कदाचित निगेटिव्ह समीक्षा करतील पण तसं करू नका कारण तब्येतीच्या कारणाने गेले साडेचार महिने मी सफर करतीये. आणि तब्येतीच्या कारणानेच मी हा निर्णय तेव्हा घेतलेला.
आणि कथा घाईघाईत संपवली असं अजिबात नाही. तिला चांगला दीड वर्षाचा कालावधी दिला आणि कादंबरीच्या सगळ्या कडाही जुळलेल्या म्हणूनच मी हा निर्णय घेऊ शकले. पण एका भागात कथा संपवणं योग्य नव्हतं. ज्या फ्लोने कथा आलेली त्याच फ्लोने तिला संपवायची होती आणि त्यासाठी मला दोन महिने लागले.
आणखी एक -
दुसऱ्या व्यासपीठावर कथा चालू आहे, एक्स्ट्रा... एक्स्ट्रा असं बोलून नाराज होऊ नका. तिकडे कथेचा ट्रॅक अगदीच वेगळा आहे त्यामुळे त्या कथेची तुलना या कथेची कृपया कोणीही करू नका आणि पुन्हा सांगतीये, नाराज होऊ नका.
दुसऱ्या व्यासपीठावर कथा चालू आहे, एक्स्ट्रा... एक्स्ट्रा असं बोलून नाराज होऊ नका. तिकडे कथेचा ट्रॅक अगदीच वेगळा आहे त्यामुळे त्या कथेची तुलना या कथेची कृपया कोणीही करू नका आणि पुन्हा सांगतीये, नाराज होऊ नका.
एक गावठी लहेजा असलेली, हृदयस्पर्शी कादंबरी वाचली याचं समाधान मनात बाळगा. कृष्णसखी, सोनाई, नाना कायम तुमच्या मनात राहतील हा कुठेतरी विश्वास आहे. अगदीच आठवण आली इथं येऊन कधीही कृष्णसखी आणि सोनाईला भेटू शकता.
आणि काहीतरी हिंट लागली का?
'कृष्णाई' नाव कसं वाटलं?
'कृष्णाई' नाव कसं वाटलं?
पर्व दोन लिहिण्याचा विचार सध्यातरी नाही पण लिहिली तर स्वतंत्र कथा लिहेन .. कृष्णाईची!
म्हणजे हा फक्त सध्या विचार आहे! तसे बरेच प्रोजेक्ट पेंडिंग आहेत ते पूर्ण झाल्यावर बाकी इतर कथांचा विचार. आपण नक्की नक्की पुन्हा भेटू फक्त आता तुमचा निरोप घेत आहे नवीन कथेसह, नवीन विषयासह, तुम्हाला नवीन दुनियेची सफर घडवण्यासाठी मी नक्की पुन्हा येईल..
तोपर्यंत दुवाओं में याद रखना!
(आता तब्येत ठीक आहे, त्यामुळे काळजी नसावी.)
तोपर्यंत दुवाओं में याद रखना!
(आता तब्येत ठीक आहे, त्यामुळे काळजी नसावी.)
कमीत कमी आज तरी तुमच्या मन भरून समीक्षा येऊ द्या. कथेतील पात्र, एकंदर कादंबरीविषयी, तुमचं मनोगत, जे काही असेल ते भरभरून बोला. मला आवडेल वाचायला.
कृष्णा -
काय वाचकहो, मग आम्हाला निरोप देताना कसंतरी होतंय काय?
काय वाचकहो, मग आम्हाला निरोप देताना कसंतरी होतंय काय?
सखी -
मला तुम्ही फार फार प्रेम दिलं त्यासाठी मी तुमची आभारी आहे सख्यांनो!
मला तुम्ही फार फार प्रेम दिलं त्यासाठी मी तुमची आभारी आहे सख्यांनो!
नाना -
च्यामारी! जातोय म्हणून लगेच विसरू नका राव.
च्यामारी! जातोय म्हणून लगेच विसरू नका राव.
सुरेखा-
या बया! आठवन आली तं हितंच याचं की तवा, त्यात ताॅंड बारीक करायला काय झालं?
या बया! आठवन आली तं हितंच याचं की तवा, त्यात ताॅंड बारीक करायला काय झालं?
आणि-
सोनाई-
पोरांनू, तुम्ही कोन कुटली तरी बी आम्हाला लै पिरेम दिलं बगा. ही पुरगी हाये ना पिरेंका तिला बी तुमची लै आटवन यिल आनि माजं तं इचरूच नका. मलाच तुमची लै सवय झाल्याली पन तुम्ही शिकल्या सवारल्याल्यांनी आम्हाला डोक्याव घेतलं त्यं मी न्हाय इसरायचे! मी चुरून मशेरी लावते ( त्यंवढं किशनाला सांगू नका बरं) पन तुम्ही समदी व्यसनापास्न लांब ऱ्हा आनि आदीमदी यत जा हितंच मला भेटायला! यते बरं का! समद्यांना माजा आशीर्वाद-
खश ऱ्हा. हसत ऱ्हा!
पोरांनू, तुम्ही कोन कुटली तरी बी आम्हाला लै पिरेम दिलं बगा. ही पुरगी हाये ना पिरेंका तिला बी तुमची लै आटवन यिल आनि माजं तं इचरूच नका. मलाच तुमची लै सवय झाल्याली पन तुम्ही शिकल्या सवारल्याल्यांनी आम्हाला डोक्याव घेतलं त्यं मी न्हाय इसरायचे! मी चुरून मशेरी लावते ( त्यंवढं किशनाला सांगू नका बरं) पन तुम्ही समदी व्यसनापास्न लांब ऱ्हा आनि आदीमदी यत जा हितंच मला भेटायला! यते बरं का! समद्यांना माजा आशीर्वाद-
खश ऱ्हा. हसत ऱ्हा!
चला मंडळी.. पोट भरून भाग वाचलात ना मग पटापट समिक्षा करा... नाही तरं मी कट्टी घेऊन गायब होईल हंं! पण खरं सांगू, तुमचा निरोप घेताना मलाच कसंतरी होतंय.
आपली कथा ईरा व्यासपिठावरील सर्वात जास्त भाग असलेली कथा आहे म्हणजे असं सायली जोशी सखी आहेत त्या सारखा सांगायच्या. ही खरंच आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार कारण तुम्ही होता, तुमची सोबत होती म्हणूनच हे शक्य झालं.
लव यू आॅल!
धन्यवाद!)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा