बाळकृष्ण नांदतो घरी

childhood

छोट्या लोभसच्या आगमनाने, मीनाताईंच्या घरामध्ये आनंदी आनंद पसरलेला होता.
दिवसभर लोभसच्या , मागे मागे करण्यामध्ये ,अक्षरा आणि मीनाताईंचा वेळ कसा जायचा? ते कळतच नव्हतं. त्याच्या बालीलांमध्ये, त्याच्याशी खूळण्यात. खूपच मजा येत होती.
अक्षराने ही पाच वर्षाचा होईपर्यंत ,त्याचा बालपण अनुभवायचं ठरवलं होतं.
त्यामुळे ती नोकरी सोडून घरीच होती. नुकताच लोभसचा दुसरा वाढदिवस साजरा झाला होता, आणि आता त्याचा घरामध्ये कारभार करण्याचा वेग वाढला होता. कधी काय उद्योग करून ठेवेल, याचा काहीच नेम नसायचा.
मीनाताई आणि अक्षराला ,डोळ्यात तेल घालून, त्याच्यावर लक्ष ठेवावं लागत होतं.
आता किचनच्या ट्रॉलीजलाही त्याचा हात पोहोचत होता. तिथुन भांडे काढून टाकणे चालायचं.त्यामुळे अक्षराने ट्राॅलीलॉक आणले होते, पण हळूहळू, ते उघडण्याचा प्रयत्नही लोभस करत होताच.
फ्रिजच्या हँडलला त्याचा हात पोचत नव्हता.
आज सकाळी अक्षराने विरजवलेल्या साईतून, लोणी आणि ताक काढून, फ्रिजमध्ये ठेवलं होतं .
अक्षराची फ्रिज कडे पाठ होती, आणि ती गॅसवर भाजी हलवत होती. तेवढ्या वेळात लोभस हलतडुलत किचनमध्ये आला.
फ्रीजच्या हँडलला हात पोचतो का?हे त्याने बघितलं. हळूच टाचा उंचावून फ्रिजचे दार उघडले आणि हातात लोण्याचा गोळा घेऊन ,तो तोंडात टाकणार, तेवढ्यात मीनाताईंच त्याच्या मागोमाग आल्या.
त्यांनी पाहिलं ,पण आता काय अडवणार?
त्या अक्षराला म्हणाल्या ,"बघ बाळकृष्ण कसा लोणी खातोय."
अक्षराने ही हसत हसत लोभसकडे बघितलं .
"आई आता याचा फ्रीजमध्ये हात पोहोचायला लागला. आता फ्रीची आधी किल्ली शोधते आपण फ्रीजही आता लॉक करून ठेवूया."
लोभस मात्र लोण्याचा आस्वाद घेण्यात मग्न होता.


भाग्यश्री मुधोळकर