कृष्णसखा
"वेणू, बेटा किती रडणार आहेस?अशी मुळूमुळू रडत बसून आपलं आयुष्य खराब करणार आहेस का ?" वेणूचे सासरे वेणूच्या पाठी उभे राहून विचारत होते.
पोरी अगं तू शिकलेली, समजदार तुच सांग,
"तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे,
किसको क्या समझायेंगे ?
सुनो द्रौपदी! शस्त्र उठालो अब गोविंद न आयेंगे..."

"विश्वास ठेव पोरी, मी बापासारखा उभा आहे गं तुझ्या पाठीशी...पण मी स्वतःलाच वाचवु शकलो नाही या कंसाच्या जमातीपासून. भोगत गेलो भोगत गेलो.
तू आली आणि माझी सुटका झाली. आता त्यांना तुझ्यारुपात नवीन बळीचा बकरा मिळाला होता ना.आता हा बकरा म्हातारा झाला होता .त्यांच्याच शब्दात सांगतोय पोरी मी.
आता सांगतांना अश्रुपण नाही येत ग डोळ्यात. तेही कोरडे झालेत बघ."
तुला सांगतो,

"तुझी सासु एकुलती एक पोरगी मायबापाला.लाडात वाढलेली. म्हणून वाया गेलेली.
गडगंज इस्टेट नावावर.त्याचा तोरा दाखवायची. पैशाची गुर्मी होती दुसरे काय? पैशात माणुसकी विकलेली. तिच्यासमोर सगळे तुच्छ.
नवऱ्याचा मानपान, आदर तर खूप दूरची गोष्ट पण कधी नवरा म्हणून धड बोलली नाही की खाऊ घातलं नाही. तिच्या लेखी नोकर होतो मी घरातला तिच्या तालावर नर्तन करणारा."

"पोरावर,पोरीवर तेच संस्कार. त्यांना गुलाबाच्या पायघड्या.
त्या अंथरायला हा फुकटचा नोकर होताच ना.घरच्या कामासाठी चांगली नोकरी सोडायला लावली तिने.
पण बाहेर अब्रु जाऊ नये म्हणून मुकाट सहन करत गेलो.
बंड पुकारावसं खूप वाटायचं पण परत मनात विचार यायचा,काय उपयोग? शेवटी जीवन तर बरबाद झालेच आहे.
खरे सांगतो,
तू आली आणि मला सुखाचे दिवस आले.तुझ्या समोर माझा अपमान करतील तर बदनामी होईल ना त्यांची.आणि आता तू आली होतीस ना त्यांचे गोंडे झेलायला.

ही लाडावलेली पोरं आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारी.दिवसभर टवाळक्या.पैशाचा माज नुसता.
अगं ती रंभा येऊन बसली नेहमीसाठीच बरं का...
तसंही काय अर्धे दिवस इकडेच असायची.पण आता सासरी सांगून आलीय," वेगळी चूल झाल्याशिवाय येणार नाही."
मायचीच शिकवण.'खाण तशी माती अन् गहू तशी रोटी.'
इथे तू आहेसच मोलकरीण.

पोरी,मी काढले दिवस तुझं आयुष्य बाकी आहे. असं रडून नाही जमणार. पक्की हो.ह्यांच्या छाताडावर पाय रोवून उभी हो.तरच निभाव लागेल नाहीतर ते तुला जगू देणारे नाहीत.
मी आहेच तुझ्या पाठीशी उभा.दुबळा असेल गं...पण... मनाने खंबीर आहे अजून."
'सुनो द्रौपदी शस्त्र उठालो...'
जणू त्यांनी वेणूत हळूच फुंकर भरली होती.
कृष्णाची वेणु वृंदावनी वाजली की
गोवर्धन गाजू लागे.
त्याने करंगळीवर गोवर्धन पेलला होता.
वेणुला संसार पेलायचा होता.
कृष्णाची वेणु वृंदावनी वाजली की
गोवर्धन गाजू लागे.
त्याने करंगळीवर गोवर्धन पेलला होता.
वेणुला संसार पेलायचा होता.
वेणू तिथून उठली ती निश्चयपूर्वकच.
सासू तर सासुच नुसती गांजून घ्यायची.ननंद होतीच आगीत तेल ओतायला.
आणि नवरा तो तर आईच्या हातचं बाहुलंच.तिनं नाचवावं आणि यानं नाचावं.
वीणाला माहेरी आधार नव्हता.आई गेली तेव्हा दोन वर्षांची.वडीलांनी दुसरे लग्न केले.सावत्र आई आणि भाऊ.
मन मोकळं करायला जागाच नव्हती.मन मारुन जगत होती.

तिचा सासरा तिची घुसमट बघत होता असहायपणे.
त्याला माहित होते डोक्यावरून पाणी गेले तर ही एखाद दिवशी जीवाचं बरंवाईट करुन घेईल.

त्याआधी हिला हिंमत द्यायची.
.............
.............
त्या दिवशी गोकुळ अष्टमी होती.
त्यांच्या फ्लॅट सिस्टीम मधे खाली ग्राउंड फ्लोरला कृष्णाची मुर्ती होती.
वीणाने दर्शन घेतले आणि तिथेच टेकली बाजुच्या खुर्चीवर.
"देवा दोन हात अन् तिसरे मस्तक" दुसरं काही नाही रे माझ्याकडे.
ती स्फूंदून स्फूंदून रडत होती.तिला बाहेरच यायला मिळत नव्हते आज कशीबशी संधी साधून आली ती दर्शनाला.

तिच्याच मागे तिचे सासरे आले जणू कृष्णरुपात.
आणि वेणूला झंकृत करून गेले.
आणि वेणूला झंकृत करून गेले.
ती वर गेली तेच रणरागिणी बनूनच.तिने वर जाताच ननंदेला ऑर्डर सोडली ," माझ्यासाठी चहा टाका डोकं दुखतय माझं."
तोच सासुचा बाॅम्बगोळा," काय धाड भरली ?"
वेणू डगमगली नाही.सासुला म्हणाली," आजवर ऐकले तुमचे आता ही वेणू मधूर स्वर छेडणे विसरली.आता या वेणूच्या तालावर तुम्हाला नाचायला लावते कि नाही ते बघा.नाहीतर वेणू नाव सांगणार नाही."
कुठून बळ आले कुणास ठाऊक पण ती सासु,नवरा,ननंद सर्वांवर वरचढ झाली.
ती मुळात शालीन.पण या लोकांनी तिला जगणे मुश्किल केलेले.तिने हे पाऊल स्वसंरक्षणार्थ उचललेले.सासर्यांच्या सेवेत मात्र कमी पडू दिली नाही.
दिवस जात होते.
एक दिवस चिडून तिचा नवरा म्हणाला,"चल चालती हो माहेरी."

तोच सासरे कडाडले," पहिले तुम्ही तिघेही जेलमधे जा नंतर ठरवेल ती तिला कुठे जायचे ते."
तिने शारीरिक तसेच मानसिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवलाय तुमच्या विरोधात.
ऐकून तो थंडच झाला.
ऐकून तो थंडच झाला.
सासरे म्हणाले,"अरे , तुम्हाला माणसाशी माणसासारखं वागायला पैसे पडतात का?"
कधी येईल माणुसकी ?मी वाट पाहत थकलो . संध्याछाया भिववायला लागल्यात.तिचे तर उभे आयुष्य शिल्लक आहे.
शिशुपालाचे शंभर अपराध माफ.आता पायली भरली.
वेणुनादे,
पक्षीकुळे निवांत राहिली
वैरभाव समूळ विसरली

तशी अवस्था झाली.आज तिचातला कृष्ण जागा झाला होता.त्याने अधरावर वेणु धरली आणि वातावरणच बदलले.
तिच्यातली ती तिला गवसली.
एका कृष्णसख्याने पाठीशी राहून आपली भुमिका पूर्णत्वास नेली होती.

©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा