Login

कृष्णसख्याची जडली बाधा भाग 2

एक नाजूक विषय आपल्या वयात येणाऱ्या मुलाला कसा समजातील दोघे. याचा त्यांच्या जीवनाशी काय संबंध असेल?

कृष्ण सख्याची जडली बाधा भाग 2

मागील भागात आपण कोल्हापूरहून पुण्यात आलेल्या रंजनाला भेटलो. तिला भेटलेला गोड मुलगा कोण असेल? पुढे त्यांचे नाते कुठे जाईल?


वरदला पेपरला सोडून अवी हॉस्पिटलमध्ये यायला निघाला. आज तो आणि रंजना मिळून शहरातील सर्वात मोठे इन्फर्टिलिटी सेंटर चालवत होते. भव्य हॉस्पिटल,गाडी,बंगला,प्रसिध्दी आणि सगळेच आज त्याच्या आयुष्यात होते. कारण त्याची लाडकी बायको डॉक्टर रंजना. विचारांच्या तंद्रीत हॉस्पिटल आले.

"मॅडम एक सीझर करतायेत. तुम्ही मॅडमचे पेशंट पहाल का सर?"

रिसेप्शनवरून त्याला फोन आला. त्याने पेशंट पाठवा असा निरोप दिला. मागे असलेल्या गणरायाला हात जोडले आणि कामाला सज्ज झाला.


जवळपास तीन तासांनी रंजना बाहेर आली.

"इट वाज अ रिअली टफ सिच्युएशन आय समहाऊ मॅनेज टू सेव बेबी अँड मदर बोथ."

रंजना बोलत होती. अविनाश मात्र फक्त शांत बसून होता.

"सिस्टर टू स्ट्राँग कॉफी. पेशंट किती आहेत बाहेर." नर्सला तिने विचारले.

"मॅडम पेशंट संपत आलेत." नर्सने उत्तर दिले.

"जे आहेत त्यांना डॉक्टर विवेकला पहायला सांग." रंजनाने सूचना दिली.

नर्स बाहेर निघून गेली. तिने हळूच उठून मंद आवाजात गाणी लावली. आशाचा सुर आसमंत व्यापून उरला आणि मग तिने हळूच अविनाशला विचारले,"अवी,काही झालेय का? काही अडचण आहे का?"

"जुन्या जखमा ताज्या झाल्या की जरा उदास व्हायला होत. ठीक आहे मी."

इतक्यात वरदचा फोन आला. त्याचा पेपर संपला होता.

"चल आज मस्त तिघे धम्माल करू." रंजना त्याला उठवत म्हणाली.


थोड्याच वेळात दोघेही गाडीने बाहेर पडले. वरद गाडीत बसला.

"पेपर जॅम भारी लिहिला बाबा. खूप मार्क भेटतील." असे म्हणून वरदने जीभ चावली.

"माणसे भेटतात आणि......" दोघे मायलेक हसताना पाहून अविनाश रिलॅक्स झाला.

इतक्यात वरदने एक संदर्भ विचारला,"बाबा,मेल इन्फर्टीलिटी मध्ये जर सिमेन मध्ये स्पर्म नसतील तर ते टेस्टीकलमधून काढायचे तंत्र साधारण कधी विकसित झाले."

रंजना काही बोलणार इतक्यात अवीने शांतपणे उत्तर दिले,"साधारण पंच्याण्णवच्या सुमारास."

"बट बाबा इफ यू बोथ आर कनफरटेबल कॅन आय आस्क अ डाऊट?"

रंजनाने प्रश्न ओळखला होता.

"येस यंग मॅन वुई आर डॉक्टर्स ." अवी शांतपणे म्हणाला.

"बाबा,ह्याचा त्या पुरुषाच्या सेक्स लाईफवर परिणाम होतो का? इव्हन स्पर्म नाहीत तर तो पुरुष आहे का?"

वरद अगदी शांतपणे विचारत होता.

"वरद,ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मी देईल. पण आज नको. आज आपण छान एन्जॉय करू."

रंजनाने हळूच विषय बदलला.


मस्त पिझ्झा पार्टी करून तिघे घरी आले. संध्याकाळी रंजनाने छान जगजीतच्या गजल लावल्या.

"अवी,इकडे ये. तुझ्या केसांना छान कोमट तेल लावते."

"ओय,होय,आज कतल करनेका इरादा है क्या?"
"चल चावट." रंजना लाजली.

अवी हळूच तिच्या जवळ गेला. तिची हनुवटी वर करून तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला,"अजूनही तितकीच सुरेख लाजतेस तू."


असे म्हणून तो पुढे सरकणार इतक्यात फोन वाजला. रंजना हसत फोनवर सूचना देऊ लागली.

"इट्स डॉक्टर्स लाईफ डियर." रंजना त्याला चिडवत होती.


अविनाश हळूच येऊन खाली बसला. रंजनाने तेलाची वाटी घेतली आणि त्याच्या केसात तिची लांबसडक नाजूक बोटे हळूवार फिरू लागली.


"प्राजक्त तुझ्या ओठातला,
सदैव फुलत रहावा.
संसार तुझा अन माझा
बहरून हर्षाने जावा."


रंजनाच्या ओठांतून आपसूक कवितेच्या ओळी येऊ लागल्या.


"हात तुझा साजणी,
हाती असाच असावा.
शेवटचा श्वास माझा,
तुझ्या मिठीत घ्यावा."
अवीने उत्तर दिले. हळूहळू अवी शांत झाला.


"आता सांगशील काय झालेय?"

अवीने शांतपणे एक फाईल तिच्यासमोर ठेवली.

"अवी,अभय प्रधान! हा वरदच्या मित्राचा मामा आहे. आता तुला कळतेय का? दुपारचे प्रश्न का येत होते.पण मुलांना हे रिपोर्ट कसे माहीत झाले?"

अविनाश म्हणाला,"आता ती वेळ आलीय. आपली प्रेमकथा लेकाला सांगायची. पुरुष - स्त्री हे सगळे पारंपरिक त्याच्या डोक्यात आणखी फिट्ट व्हायच्या आत."

दोघेही आता शांत झाले होते. अवीला एकदम मोकळे वाटत होते.

काय असेल ह्या सगळ्याचे कारण? अविनाश इतका अस्वस्थ का होता? कशी असेल अविनाश आणि रंजनाची प्रेमकथा?

वाचत रहा.
कृष्णसख्याची जडली बाधा.