डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ३०
रात्र आता मध्यरात्रीच्या दिशेने झुकली होती. सदाशिव पेठेतील रस्ते सामसूम झाले होते आणि पावसाने धुवून काढलेल्या नर्मदा सदनच्या भिंतीं तून मातीचा एक मंद, ओला सुगंध दरवळत होता. गॅलरीत तन्मयने स्वतःच्या हाताने बनवलेला आल्याचा वाफाळलेला चहा दोन कपात आणला होता.
साक्षी आज कित्येक महिन्यांनंतर शांतपणे, कोणताही कॉर्पोरेट ताण न घेता तन्मयच्या शेजारी त्या जुन्या लाकडी बाकावर बसली होती.
काही दिवसांपूर्वी तिला अमेय जहागीरदारच्या आलिशान मर्सिडीजच्या मऊ सीटवर बसताना जो श्रीमंतीचा अभिमान वाटला होता, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने सुरक्षितता आणि शांतता तिला आज या वाड्याच्या साध्या लाकडी बाकावर जाणवत होती.

अमेयच्या जगात शब्दांना किंमत होती, पण इथे मौनालाही अर्थ होता. अमेयच्या जगात स्टेटस महत्त्वाचं होतं, पण इथे फक्त माणूस महत्त्वाचा होता.
"तन्या..."
साक्षीने चहाचा घोट घेतला आणि ती खूप वेळ शांत राहिली. मग अत्यंत जड अंतःकरणाने तिने विचारलं,
" मी तुझ्याशी खूप वाईट वागले ना ? मी तुझा फोन घेतला नाही, तुला आउटडेटेड ठरवलं, तुझ्या त्या निखळ साधेपणाला मी कमी लेखलं...
अमेयच्या त्या ग्लॅमरस जगाच्या नादात मी आपल्या मैत्रीलाही डागाळलं. तरीही, इतकं सगळं होऊनही तू माझ्या पाठीशी आज ढाल बनून का उभा आहेस ?
तुला राग नाही येत माझा ? "
अमेयच्या त्या ग्लॅमरस जगाच्या नादात मी आपल्या मैत्रीलाही डागाळलं. तरीही, इतकं सगळं होऊनही तू माझ्या पाठीशी आज ढाल बनून का उभा आहेस ?
तुला राग नाही येत माझा ? "
तन्मयने गिटारच्या एका तारेवर हलकी टिचकी मारली. त्यातून निघालेला एक मधुर स्वर रात्रीच्या शांततेत विरून गेला. तो शांतपणे हसला आणि म्हणाला,
" साक्षी, मैत्रीमध्ये सॉरी किंवा थँक्यू ची खरं तर गरजच नसते ग !
आणि तू जे काही वागली होतीस, ती तू नव्हतीस. तो तुझ्यावर चढलेला अमेयच्या त्या झगमगत्या जगाचा प्रभाव होता.
मोहाचा तो क्षण असाच असतो, तो माणसाला स्वतःच्याच सावली पासून दूर नेतो. मला फक्त माझी ती जुनी साक्षू परत हवी आहे.ती, जी संकटात रडत बसण्यापेक्षा पाय रोवून लढायला घाबरत नाही. तू चुकली होतीस, पण हरली नव्हतीस."

साक्षीच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं, पण यावेळी ते अपमानाचं किंवा दुःखाचं नव्हतं, तर ते कृतज्ञतेचं होतं. तिला जाणीव झाली की, ज्या मोहाने तिला स्वतःच्या मुळांपासून तोडलं होतं, त्याच संकटाने तिला तिच्या आयुष्यातील सर्वात खऱ्या आणि हिऱ्यासारख्या माणसाची ओळख करून दिली होती.
तन्मयने ठरवलं होतं की तो केवळ साक्षीचं नावच स्वच्छ करणार नाही, तर अमेय जहागीरदारचा तो इगो आणि मिस्टर खन्नांचं ते कारस्थान दोन्ही मुळासकट मोडून काढणार.
नर्मदा सदनच्या डोक्यावरचे काळे ढग आता हळूहळू पांगले होते आणि चंद्राचा शीतल प्रकाश वाड्याच्या ओसरीवर पसरला होता. वातावरणात एक प्रकारची नवी उमेद होती. तन्मयने साक्षीकडे पाहून तिला वचन दिलं,
" जोपर्यंत तुझं नाव या डेटा चोरीच्या आरोपातून पूर्णपणे मुक्त होत नाही आणि तुझे गुन्हेगार जगासमोर येत नाहीत, तोपर्यंत हा तन्मय स्वस्थ बसणार नाही. उद्यापासून आपण आपला समांतर तपास सुरू करतोय. पोलीस त्यांचं काम करतील, पण आपण आपल्या बुद्धीने सत्याचा शोध घेऊ."
तन्मयने दिलेला तो आश्वासक, राकट पण मायेचा हात साक्षीने घट्ट पकडला. तिच्या मनातली भीती आता जिद्दीत बदलली होती. क्षण मोहाचा आता कायमचा संपला होता आणि आता काळ सुरू झाला होता एका खऱ्या प्रीतीचा आणि न्यायासाठी दिलेल्या संघर्षाचा.
तिला आता अमेयच्या काचेच्या महालाची हाव नव्हती, तिला हवी होती ती फक्त तिची प्रतिष्ठा
आणि ती मिळवून देण्यासाठी तन्मय सज्ज झाला होता.
आणि ती मिळवून देण्यासाठी तन्मय सज्ज झाला होता.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा