डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ३२
केवळ बँकिंग ट्रान्झॅक्शन्स किंवा संशयास्पद पैशांचा प्रवास मनी ट्रेल अमेय जहागीरदार सारख्या माणसाला पटवून देण्यासाठी पुरेसा नव्हता. अमेय हा विज्ञानावर आणि ठोस पुराव्यांवर विश्वास ठेवणारा माणूस होता.
त्याला काहीतरी गडबड आहे असे तर्क नको होते, तर काय गडबड झाली आहे, याचे तांत्रिक पुरावे हवे होते. हे ओळखून तन्मयने आपल्या एका जुन्या मित्राला पाचारण केले.निखिल.
निखिल हा एका नामांकित आंतरराष्ट्रीय सायबर सिक्युरिटी फर्ममध्ये एथिकल हॅकर आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून काम करायचा.
रविवारची रात्र होती, पण नर्मदा सदनच्या त्या खोलीत दिवे मालवले नव्हते. निखिल आपले हाय-एंड लॅपटॉप्स, काही विशेष हार्डवेअर आणि प्रगत फॉरेन्सिक सॉफ्ट वेअर्ससह हजर झाला होता.
तन्मयने आपल्या बँकेतील ओळखीचा वापर करून आणि साक्षीने ऑफिसमधून निघताना आणलेल्या बॅकअप फाईल्स मधून साक्षीच्या लॅपटॉपची एक मिरर इमेज म्हणजे अशी प्रत जी लॅपटॉप मधील प्रत्येक हालचालीची नोंद ठेवते ती मिळवली होती.
" निखिल, मला एक महत्त्वाचं कोडं सोडवायचं आहे." तन्मयने कॉम्प्युटर स्क्रीनकडे निर्देश करत विचारलं.
" आयटी टीमचा दावा आहे की, त्या मंगळवारी रात्री ११:४५ ला ईमेल साक्षीच्या सिस्टिम वरून गेला होता. साक्षी म्हणते तिने तो पाठवला नाही. मला हे शोधायचं आहे की, हा ईमेल फिजिकली त्या की -बोर्डवरून पाठवला गेला होता की तो रिमोट एक्सेस वापरून दुसऱ्या कोठून तरी कंट्रोल केला गेला होता ? "
निखिलने आपली बोटे वेगाने की-बोर्डवर चालवायला सुरुवात केली. तासन तास कोडिंग आणि लॉग फाईल्सचे विश्लेषण सुरू होते. खोलीत फक्त निखिलच्या लॅपटॉपचा फॅन आणि बटणांचा खटा -खट असा आवाज येत होता. पहाटेचे तीन वाजले असताना निखिलच्या चेहऱ्यावर एक समाधानाची छटा उमटली.
" तन्या, यु आर अ जीनियस ! तुझा संशय अगदी बरोबर होता." निखिलने स्क्रीन तन्मयकडे वळवली.
" या लॅपटॉपच्या सिस्टिम मध्ये एक ट्रोजन हॉर्स मालवेअर अतिशय चलाखीने प्लांट करण्यात आलं होतं. हे मालवेअर कदाचित एखाद्या साध्या दिसणाऱ्या इमेज फाईल किंवा डॉक्युमेंट मधून सिस्टिममध्ये शिरलं होतं.
ज्या रात्री हा ईमेल पाठवला गेला, त्या वेळी साक्षीच्या लॅपटॉपचा ताबा तिच्याकडे नव्हता. हे रिमोट कंट्रोलद्वारे करण्यात आलं होतं. म्हणजेच साक्षी कॉम्प्युटरसमोर असूनही तिला कळलं नाही की बॅकग्राउंडमध्ये तिची स्क्रीन कोणीतरी दुसरीकडून वापरत आहे."
साक्षीने सुटकेचा नि:श्वास सोडला, पण तन्मयला अजूनही अंतिम पुराव्याची गरज होती.
" निखिल, हे कंट्रोल कोठून केलं जात होतं ? त्या मागच्या माणसाचा आयपी ॲड्रेस सापडेल का ? " तन्मयने विचारलं.
निखिलने पुन्हा काही कमांड्स दिल्या आणि स्क्रीनवर एक डेटा मॅप उमटला.
" गंमत बघ तन्या, ज्या आयपी ॲड्रेसवरून हे मालवेअर ऑपरेट केलं गेलं, तो ॲड्रेस कोणत्याही परदेशाचा किंवा निटको कंपनीचा नाहीये. तो ओरियन ऑफिसच्याच अंतर्गत वाय फाय नेटवर्क मधील इंटर्नल लॅन आहे. याचा अर्थ गुन्हेगार बाहेरील नसून तो ऑफिस मधीलच असावा अशी दाट शक्यता आहे, ज्याला ऑफिसच्या फायरवॉल आणि नेटवर्कचा पूर्ण एक्सेस होता. "
तन्मयच्या डोळ्यांत आता मिस्टर खन्नांचा चेहरा स्पष्टपणे दिसू लागला. त्याने आता त्या विशिष्ट आयपी ॲड्रेसची मॅपिंग सुरू केली. त्या रात्री ओरियनच्या सर्व्हर रूममध्ये कोणता कर्मचारी ॲक्टिव्ह होता, कोणाच्या केबिन मधील वायफाय नोड वरून हे रिमोट कनेक्शन तयार झालं होतं आणि त्या वेळी त्या ठिकाणी कोणाची उपस्थिती होती, हे शोधणं आता सोपं झालं होतं.
तन्मयने पैशांचा तो संशयास्पद ट्रॅक आणि निखिलने शोधलेले हे डिजिटल फूट प्रिंट्स एकत्र जोडायला सुरुवात केली.
" साक्षी, मिस्टर खन्नांच्या केबिनमध्ये जाण्याचा एक्सेस कोणा कोणा कडे असतो ? " तन्मयने विचारलं.
" फक्त त्यांचे पीए आणि आयटी हेड, जे खन्ना सरांचे अत्यंत विश्वासू आहेत." साक्षीने आठवत सांगितलं.
तन्मयने भिंतीवरील चार्टवर खन्नांच्या नावाभोवती आता लाल पेनाने वर्तुळ काढलं.
" खन्नांनी तुला अडकवण्यासाठी डिजिटल जाळं विणलं खरं, पण त्यांनी हे विसरलं की डिजिटल जगात प्रत्येक पाऊल एक ठसा सोडून जातं. उद्या सकाळी आपण एक शेवटची लिंक जोडणार आहोत आणि त्यानंतर अमेय जहागीरदारला कसं भेटायचं, हे मी ठरवेन." तन्मयच्या या तांत्रिक पुराव्यांनी आता खन्नांच्या गळ्याभोवतीचा फास अधिकच घट्ट केला होता.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा