डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ४६
मिस्टर खन्नांच्या अटकेनंतर आणि ओरियन ग्रुपमधील त्या मोठ्या गोंधळानंतर कॉर्पोरेट विश्वातील वादळ थोडे निवळले होते. वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स बदलल्या होत्या आणि ऑफिसमधील कर्मचाऱ्यांच्या दबक्या आवाजातील चर्चाही आता थांबल्या होत्या.
मात्र, अमेय जहागीरदारच्या मनातील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच होती. ज्या दिवशी तन्मयने त्या जुन्या वाड्याच्या साधेपणातून येऊन अमेयच्या आलिशान साम्राज्यातील गद्दारीचा बुरखा फाडला, त्या दिवसापासून अमेयच्या मनात साक्षीबद्दल एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते.
हे आकर्षण केवळ साक्षीच्या कामापुरते किंवा तिच्या सौंदर्या पुरते मर्यादित नव्हते. अमेयला भुरळ पडली होती ती तिच्या त्या अढळ प्रामाणिकपणाची आणि तिला लाभलेल्या तन्मय सारख्या खंबीर, बुद्धिमान साथीदाराची.
अमेयला पहिल्यांदाच जाणवले होते की, त्याच्या कोट्यवधींच्या संपत्तीत अशी एकही गोष्ट नाही, जी तन्मयच्या त्या निस्वार्थी विश्वासाची बरोबरी करू शकेल. अमेयच्या अहंकारी मनाला आता साक्षीला पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात ओढून घेण्याची एक तीव्र ओढ लागली होती.
एका संध्याकाळी अमेयने साक्षीला आपल्या वैयक्तिक निवासस्थानी, 'जहागीरदार व्हिला'मध्ये बोलावले. यावेळी तिथे कोणतीही झगमगती 'पेज-थ्री' पार्टी नव्हती, की कोणताही बड्या लोकांचा राबता नव्हता. त्या प्रचंड महालात आज एक अनाकलनीय शांतता पसरली होती.
साक्षी जेव्हा तिथे पोहोचली, तेव्हा अमेय बागेतील एका एकांत कोपऱ्यात तिची वाट पाहत बसला होता. तिची चाहूल लागताच तो उभा राहिला. त्याच्या वागण्यात आता तो पूर्वीचा ताठपणा नव्हता, तर एक प्रकारची कमालीची नम्रता होती.
" साक्षी, थँक्स तू आलीस ! " अमेयने शांत स्वरात सुरुवात केली.
" मी तुला इथे फक्त नोकरीत परत येण्याची विनंती करण्यासाठी बोलावलेले नाही. मला माहितीये की ओरियनने तुला दिलेली ती जखम खूप खोल आहे. पण मला तुला एक अशी पार्टनरशिप ऑफर करायची आहे, जिचा तू कधी विचारही केला नसेल.
ओरियनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये तुझे नाव असावे आणि कंपनीच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुझा पन्नास टक्के वाटा असावा, अशी माझी इच्छा आहे."
ओरियनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये तुझे नाव असावे आणि कंपनीच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुझा पन्नास टक्के वाटा असावा, अशी माझी इच्छा आहे."
अमेयच्या बोलण्यात आता तो जुना हुकमी अहंकार नव्हता, तर एक प्रकारची भावुक ओढ होती. त्याने टेबलावर असलेले एक मखमली बॉक्स उघडले. त्यात सोन्याचे एक अतिशय नाजूक आणि मौल्यवान पेंडंट होते. त्याने ते साक्षीसमोर सरकवले.
" हे माझ्याकडून एक छोटीशी भेट... किंवा कदाचित माझ्या चुकीचे प्रायश्चित्त समजा. साक्षी, या काही दिवसांत मला प्रकर्षाने जाणवलंय की, तुझ्याशिवाय हे साम्राज्य आणि माझं आयुष्य दोन्ही अपूर्ण आहेत. तू फक्त माझी कर्मचारी नाहीस, तर तू माझी प्रेरणा होऊ शकतेस. आपण एकत्र मिळून स्कायलाईन हूनही अनेक पटीने मोठे आणि जागतिक दर्जाचे प्रकल्प उभे करू शकतो. तू यावर विचार करशील का ? "
अमेयने पहिल्यांदाच साक्षीकडे केवळ कामाच्या दृष्टिकोनातून नाही, तर एका वेगळ्याच अपेक्षेने आणि हक्काने पाहिले. अमेयचा हा नवा अवतार साक्षीसाठी पुन्हा एकदा एका मोठ्या मोहाचा क्षण घेऊन आला होता. एकीकडे नर्मदा सदन मधील तो साधा पण सुरक्षित कोपरा होता, आणि दुसरीकडे अमेयने देऊ केलेले हे अफाट सामर्थ्य, सत्ता आणि प्रतिष्ठेचे शिखर होते.
अमेयचा हा बदललेला दृष्टिकोन साक्षीला पुन्हा एकदा प्रलोभनांच्या अशा वळणावर घेऊन आला होता, जिथे निर्णय घेणे तिच्यासाठी कठीण होणार होते. अमेयने टाकलेले हे जाळे सोन्याचे असले, तरी ते तिला पुन्हा एकदा तिच्या खऱ्या जगापासून दूर नेण्याची ताकद ठेवत होते.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा