डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग २२
ओरियन ग्रुपच्या चकाकत्या काचेच्या इमारतीमध्ये जितका प्रकाश होता, तितकाच अंधार तिथल्या अंतर्गत राजकारणात दडलेला होता. या अंधाराचा मुख्य सूत्रधार होता. तो म्हणजे मिस्टर खन्ना.
खन्ना हे ओरियनचे सीनियर मॅनेजर आणि अमेय जहागीरदारचे आज वरचे सर्वात विश्वासू सल्लागार मानले जायचे.
अमेयच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात खन्नांचा शब्द अंतिम असायचा. पण साक्षीच्या एन्ट्रीमुळे आणि अमेयने तिच्यावर दाखवलेल्या अतीव विश्वासामुळे खन्नांचे साम्राज्य डळमळीत झाले होते. अमेयच्या केबिनचे दरवाजे खन्नांसाठी आता तासनतास बंद राहू लागले होते, तर साक्षीचा तिथे मुक्त वावर होता.
खन्ना हे अतिशय धूर्त, अनुभवी आणि मुरलेले खेळाडू होते. त्यांना हे चांगलेच ठाऊक होते की अमेय जहागीरदार सारख्या माणसाला सरळ मार्गाने हरवणे अशक्य आहे.
अमेयला कमकुवत करायचे असेल, तर त्याच्या इगोवर वार करावा लागेल आणि त्यासाठी साक्षी हे सर्वात सोपे आणि सरळ सॉफ्ट टार्गेट होते. त्यांनी ठरवले की, साक्षीला इतके एकटे पाडायचे की तिचा पाय आपोआप घसरेल.
एके दिवशी दुपारी कॅफेटेरियामध्ये सर्व कर्मचारी एकत्र जमलेले असताना, खन्ना मुद्दाम साक्षीच्या टेबलपाशी आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक गुढ पण तितकच मृदू स्मित हास्य होते.
" काय मॅडम, आज काल साहेबांच्या केबिन मध्येच जास्त वेळ असतो तुमचा ? आम्ही पंधरा-वीस वर्षांपासून या कंपनीला रक्ताचं पाणी करून उभं केलंय, पण आमची साधी कामं आणि फाईल्स पण आता तुमच्या सही शिवाय पुढे सरकत नाहीत.
नशीबवान आहात तुम्ही, इतक्या कमी वयात अमेय सरांनी तुम्हाला थेट चिफ कॅबिनेट मध्ये जागा दिलीय ! "
नशीबवान आहात तुम्ही, इतक्या कमी वयात अमेय सरांनी तुम्हाला थेट चिफ कॅबिनेट मध्ये जागा दिलीय ! "
खन्नांनी मारलेला हा टोमणा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या कानावर गेला होता .
साक्षीने शांत राहून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण खन्ना तिथेच थांबले नाहीत. त्यांनी ऑफिसमध्ये एक छुपी फळी तयार केली होती, ज्याला कॉर्पोरेट भाषेत लॉबिंग म्हणतात. लंच ब्रेक असो किंवा संध्याकाळची चहाची वेळ, खन्नांनी कर्मचाऱ्यांच्या मनात साक्षी बद्दल विष पेरायला सुरुवात केली होती.
" बघा फ्रेंड्स , ही मुलगी केवळ सरांच्या जवळ जाऊन संपूर्ण स्कायलाईन प्रोजेक्ट काबीज करतेय. हिच्यामुळे आपल्या अनुभवाला किंमत उरलेली नाही. कदाचित उद्या आपल्या नोकऱ्यांवर गदा आली किंवा आपल्याला हिच्या अंडर काम करावं लागलं, तर नवल वाटायला नको ! " खन्नांच्या या चिथावणीखोर वागण्या बोलण्यामुळे, चर्चां मुळे ऑफिसचे वातावरण पूर्णपणे विषारी झाले होते.
हळूहळू साक्षीला ऑफिसमध्ये एकट वाटू लागले. पूर्वी जे कलीग्स तिच्याशी हसून बोलायचे, तिला नवीन गोष्टी शिकायला मदत करायचे, ते आता तिला लांबून पाहताच गप्प व्हायचे किंवा रस्ता बदलून निघून जायचे.
साध्या साध्या कामांसाठी तिला संघर्ष करावा लागत होता. तिला हव्या असलेल्या फाईल्स मुद्दाम उशिरा मिळणे, तिच्याकडे येणाऱ्या डेटा शीटमध्ये तांत्रिक चुका असणे, मीटिंग्सच्या वेळा तिला ऐनवेळी कळवणे अशा छोट्या पण त्रासदायक गोष्टींमधून तिचा मानसिक छळ सुरू झाला होता.
साक्षीला हे सर्व जाणवत होते, पण तिने एक मोठी चूक केली. हे सगळं तिने अमेयला सांगितले नाही. तिला वाटले की, जर ती अमेयला या राजकारणा बद्दल सांगेल, तर अमेयला वाटेल की ती एक कच्ची खेळाडू आहे आणि हे कॉर्पोरेट प्रेशर हाताळू शकत नाही. तिला अमेयच्या नजरेत स्वतःची स्ट्रॉंग इमेज टिकवून ठेवायची होती.
पण यामुळे ती अनवधानाने खन्नांच्या योजनेचाच एक भाग बनली. तिचं तिलाच समजल नाही. ती जितकी इतर कर्मचाऱ्यांपासून लांब जात होती, तितकीच ती अमेयवर अधिक अवलंबून राहू लागली होती.
खन्ना आता फक्त एका मेगा संधीची वाट पाहत होते. त्यांना अशी एक चूक हवी होती, जिथे स्कायलाईन प्रोजेक्ट धोक्यात येईल आणि त्याचे खापर थेट साक्षीच्या डोक्यावर फोडता येईल !
त्यांच्यासाठी साक्षी ही फक्त एक अडथळा नव्हती, तर अमेयच्या अहंकाराला दिलेले ते आव्हान होते. नर्मदा सदनच्या साध्या वातावरणातून आलेल्या साक्षीला हे माहित नव्हते की, ज्या खुर्चीवर ती बसली आहे, त्या खुर्चीचे पाय आधीच कापले गेले आहेत.
खन्नांची धूर्त नजर आता स्कायलाईनच्या त्या सिक्रेट पासवर्ड्सवर आणि फायनान्शिअल डेटावर होती, जो केवळ साक्षीच्या ताब्यात होता. तो क्षण मोहाचा आता साक्षीला एका भयानक जाळ्यात ओढून नेत होता, जिथून बाहेर पडणे केवळ तिच्या कल्पने पलीकडचे होते.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा