जलद लेखन स्पर्धा माहे जुलै 2025
कुलूप
भाग-1
भाग-1
" कपाटाला कुलूप लावण्याआधी तुमच्या तोंडाला कुलूप लावा अगोदर. नाहीतर आपल्या रक्षणासाठी फक्त कुलूप किल्लीच उरेल म्हातारपणी. "
वामनराव अगदी पोट तिडकीने अगदी दात ओठ खाऊन विभावरी बाईंना बोलत होते.
पण विभावरी बाई कुठल्या ऐकायला तयार.त्यांचा ताठा कायमच. "असं बरं कपाट तसं ठेवणाराय
बिना कुलपाच." म्हणत स्वतःच उठल्या आणि कपाटाला कुलूप लावू लागल्या.

" अहो, पहिल्यापासून सहाव्या पर्यंत आलात पण एकाही सुनेशी पटले नाही तुमचे. विचार करा. "
हे ऐकून विभावरी बाईंनी डोळ्याला पदर लावला आणि रडत रडत म्हणाल्या,
" तुम्ही प्रत्येक वेळी मलाच दोष देत जा. एवढं आयुष्य गेलं मेलं तेच ऐकतेय मी. वाटलं होतं तुम्ही तरी समजून घ्याल पण...
सासुबाई असताना त्यांच्याशी, जावांशी भांडण झालं तरी मीच दोषी आणि आता सूना आल्या सुनांशी भांडण झालं तरी मीच दोषी. भांडण कसलं, घर म्हटलं की भांड्याला भांडे लागतेच.एवढी वर्ष तशीच का काढलीत एकत्र
कुटुंबात ? नवऱ्याचा पगार होता कधीच वेगळे राहिले असते."

" अहो,एवढा राईचा पर्वत करण्या अगोदर मी काय म्हणतोय, कोणत्या उद्देशाने म्हणतोय ते समजून तरी घ्या. "
वामनराव समजुतीच्या स्वरात म्हणाले. त्यांनाही सवय झाली होती विभावरीबाईंच्या वागण्याची. कितीही चिडले तरी काही उपयोग नव्हता. कुत्र्याचे शेपूट नळकांड्यात घातले तरी वाकडे ते वाकडेच.
वामनराव आणि विभावरीबाई हे जोडपं म्हणजे एक उत्तर ध्रुव तर एक दक्षिण ध्रुव.
वामनराव कमालीचे शांत सोशिक. तर विभावरी बाई अगदी त्याच्या विरुद्ध. तापट आणि चिडक्या.
वामनराव कमालीचे शांत सोशिक. तर विभावरी बाई अगदी त्याच्या विरुद्ध. तापट आणि चिडक्या.
आता त्यांचा संसार साठ वर्षांचा झालेला. वामनरावांना माहिती होते विभावरी बाई जितक्या तापट तितक्याच प्रेमळही आहेत.पण एकदा का त्या भडकल्या तर सगळ्या घराला आग लागायची.
त्यांची आई असताना तर वामनरावांना तारेवरची कसरतच करावी लागायची. कारण ही जुनी खोडं बदलायला तयार नाहीत.
सगळं कुलूप किल्लीत.आणि विभावरीबाई आपला हेका सोडायला तयार नाहीत.
सासुबाई म्हणतील तेच करावं लागायचं. मग ते स्वयंपाकाच्या बाबतीत असो घर कामाच्या बाबतीत असो की बाहेर कुठे जाण्याच्या बाबतीत असो वा माहेरी जाण्याच्या बाबतीत असो.

आता विभावरी बाईंचे म्हणणे, " मी नाही केलं का?मी नाही ऐकलं का?मग यांना सुनांना काय होतंय ऐकायला?"
आता सुनांच्या राज्यात, आपली सासू आपल्याशी जशी वागली तशा विभावरी बाई आता सुनांशी वागू लागल्या.
वामनरावांना वाटायचे हिला कोणत्या शब्दात समजावून सांगू की तो काळ वेगळा होता. आता काळ बदलला. सुना ऐकणार नाहीत.तुम्हाला सुनांचं ऐकून घ्यावं लागेल.
तरी पहिल्या तिघी सुना ह्या जुन्या पिढीतच मोडत होत्या त्या बिचार्या ऐकून घ्यायच्या. आता त्याही सासू बनण्याच्या तयारीत होत्या. त्यांनाही वाटायचं आपणच कुठवर ऐकून घ्यावं. खालच्या लहान्या जावा तर ऐकत नाहीत
असे करत आता एकाची सहा घरं झाली होती प्रत्येक मुलाने आपला वेगळा संसार थाटला होता.
पण त्या सहाही जणी तशा आपसात कितीही भांडल्या तरी सासूच्या बाबतीत मात्र एकमताने सासूचा विरोध करायच्या.
वामनराव कंटाळले होते या वातावरणाला.
क्रमश:
पुढील भाागात
भाग-2मधे
©®शरयू महाजन
वामनराव कंटाळले होते या वातावरणाला.
क्रमश:
पुढील भाागात
भाग-2मधे
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा