कुलूप
भाग-3 अंतिम
भाग-3 अंतिम
विभावरीबाई कुठेही जातील तरी हास्याचा विषय होत्या. कारण त्यांच्या कमरेचा किल्ल्यांचा झोक. त्यांच्या बरोबरीच्या मैत्रिणी चिडवायच्या, " हे बघा हिचा छल्ला."
वामनराव विनोदाने म्हणायचे, "अहो हे ओझे कमी करा."
विभावरीबाईंचा तीळ पापड व्हायचा.
विभावरीबाईंचा तीळ पापड व्हायचा.
त्यांच्याकडे फोन नव्हता. एक दिवस घरी पाहुणे आले. भांडारगृहाची किल्ली विभावरी बाईंच्या कमरेला.सकाळी जेवढे लागते तेवढं काढून गेलेल्या. आता काय करणार? नातू आला बोलवायला. पण बाईने कमरेची किल्ली काढून काही दिली नाही. प्रवचनातून उठून गेल्या घरी.
त्यांची एकुलती एक मुलगी ती ही माहेरी यायला कंटाळा करायची.आईच्या अशा स्वभावामुळे.
संसारातून चार दिवस विरंगुळा म्हणून माहेरी यावे तर यांच्याच कटकटी ऐकत बसा आणि तिलाही ओशाळल्यासारखे व्हायचे तिच्या आईची तिच्यावहिनींसोबतची वागणूक बघून.
यापेक्षा आपण घरी बरे सुखात आहोत.
यापेक्षा आपण घरी बरे सुखात आहोत.
ती एकट्यात आईला समजावायची, "आई तुझ्या मुली सोबत तिची सासू अशी वागली तर चालेल का ग तुला?"
विभावरी बाई नकारार्थी मान हलवायच्या पण स्वतःत मात्र बदल नाही. तिलाही चार गोष्टी ऐकवून द्यायच्या.
तिच्या वहिनी तिच्याजवळ आईचे गाऱ्हाणे सांगायच्या. तिला खूप वाईट वाटायचे.भाऊ सुद्धा आई बद्दल काही बाही बोलायचे. पण तिलाही माहित होता आईचा स्वभाव. त्यामुळे तिचीगत लिंबू पिळण्याच्या यंत्रात घातलेल्या लिंबू सारखी व्हायची.
ती वडिलांशीही बोलायची पण काय करणार सगळ्यांनीच हात टेकलेले.
नातू मात्र मजा घ्यायचे. कारण वयोमानानुसार त्या कधी चष्मा शोधायच्या कुठे ठेवला आठवायचाच नाही. तेव्हा नातू चिडवायचे, "आजी तू चष्मा बरी विसरते पण किल्ल्या नाही विसरत हो."
नातू मात्र मजा घ्यायचे. कारण वयोमानानुसार त्या कधी चष्मा शोधायच्या कुठे ठेवला आठवायचाच नाही. तेव्हा नातू चिडवायचे, "आजी तू चष्मा बरी विसरते पण किल्ल्या नाही विसरत हो."
एकदा वामनराव मुलीला म्हणाले,
" काळजी वाटते हो हिची.आज मी आहे सांभाळून घेतो. आता पिकलं पान कधी गळेल सांगता येत नाही. माझ्या माघारी हीच कसं होईल? "
" काळजी वाटते हो हिची.आज मी आहे सांभाळून घेतो. आता पिकलं पान कधी गळेल सांगता येत नाही. माझ्या माघारी हीच कसं होईल? "
त्यांचे वाक्य खरे ठरले. एक दिवस हार्ट अटॅकचे निमित्त होऊन वामनराव एकटेच परतीच्या प्रवासाला निघून गेले विभावरी बाईंना मागे ठेवून.
मुलगी तेरा दिवस राहिली. जायच्या दिवशी आईला समजावत म्हणाली, " आई बघ आता एकटी आहेस. हट्टीपणा सोड.
आपण खाली हात आलो खाली हात जाणार.
तेव्हा आधीच या किल्ल्या मुलं सुनांच्या सुपूर्द कर.
आपण खाली हात आलो खाली हात जाणार.
तेव्हा आधीच या किल्ल्या मुलं सुनांच्या सुपूर्द कर.
खऱ्या सुखाची किल्ली हीच आहे ग.
मला काही नकोय त्यातले. मुलांमध्ये वाटून दे.तेही आनंदाने सेवा करतील तुझी."
मला काही नकोय त्यातले. मुलांमध्ये वाटून दे.तेही आनंदाने सेवा करतील तुझी."
असेच कटाकटीत दोन वर्ष गेली.खाटेला खिळल्या पण कमरेची किल्ली सुटली नाही.
एक दिवस झोपेतच विभावरीबाई गेल्या.कमरेला किल्ल्या तशाच होत्या.
सकाळी चहासाठी साखर चहा पावडर हवी म्हणून सून उठवायला आली. बघते तर कलेवर पडलेले.
शेवटी तिनेच त्यांच्या कमरेच्या किल्ल्या काढल्या.
सकाळी चहासाठी साखर चहा पावडर हवी म्हणून सून उठवायला आली. बघते तर कलेवर पडलेले.
शेवटी तिनेच त्यांच्या कमरेच्या किल्ल्या काढल्या.
शेवटी सोबत काय घेऊन गेल्या कुलूप किल्ली? की क्रोध मान माया लोभाचे गाठोडे?
उलट स्वतःच आपणहून किल्ली मुलांकडे किंवा सुनेकडे दिली असती तर कदाचित 'मुक्तीची किल्ली' सापडली असती.
उलट स्वतःच आपणहून किल्ली मुलांकडे किंवा सुनेकडे दिली असती तर कदाचित 'मुक्तीची किल्ली' सापडली असती.
समाप्त
©®शरयू महाजन
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा