जलदलेखन स्पर्धा ऑक्टोबर 2025
भाग ३
त्यांचं ते बोलणं ऐकून त्या तिघांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे बाबा विनवणी करत त्यांना बोलू लागले,
"पण गुरुजी आता काय करावे? पोराकडून चूक झाली... निष्पाप जीव आहे. तुम्हीच त्याला ह्यातून बाहेर काढा मी तुमच्या पाया पडतो."
"पण गुरुजी आता काय करावे? पोराकडून चूक झाली... निष्पाप जीव आहे. तुम्हीच त्याला ह्यातून बाहेर काढा मी तुमच्या पाया पडतो."
ते गुरुजींच्या पाया पडत असताना अडवून गुरुजी त्यांना बोलू लागले,
"थांब माझ्या पाया नको पडूस... पडायचं असेल तर तो मंदिरात बसलाय त्याच्या पाया पड तो तारील तुझ्या लेकराला. त्याच्या हद्दीत कोणत्याही पिशाच्याला येण्याची परवानगी नाही म्हणून ह्याने तुझ्या लेकाला त्याच्या हद्दीच्या बाहेरच गाठले. तू चिंता करू नकोस त्याला काही नाही होणार. तो कुठे आहे? चल दाखव मला."
त्यांचं बोलणं ऐकून ते तिघे त्यांना अद्वैत असलेल्या खोली जवळ घेऊन गेले.

ते तिथे पोहोचून काही बोलणार इतक्यात आतून त्यांना विचित्र हसण्याचा आवाज येऊ लागला. ते ऐकून गुरुजींने त्याला कोण असल्याचं विचारलं.
त्यावर तो हसायचा थांबून विचित्र घोगऱ्या आवाजात बोलू लागला,
"काय रे म्हाताऱ्या... मला घालवायला आलास? मी आता ह्याला आणि ह्याच्या परिवाराला संपवल्याशिवाय इथून जात नसतो."
इतकं बोलून तो पुन्हा जोरजोरात हसू लागला.
"काय रे म्हाताऱ्या... मला घालवायला आलास? मी आता ह्याला आणि ह्याच्या परिवाराला संपवल्याशिवाय इथून जात नसतो."
इतकं बोलून तो पुन्हा जोरजोरात हसू लागला.
त्याचं ते बोलणं ऐकून ते तिघे घाबरून गेले. गुरुजी न घाबरता त्याला पुढे विचारू लागले,
"का? ह्या लोकांनी काय बिघडवले आहे तुझे? कोण आहेस तू? आणि का आला आहेस इथे?"
"का? ह्या लोकांनी काय बिघडवले आहे तुझे? कोण आहेस तू? आणि का आला आहेस इथे?"
त्यांच्या प्रश्नावर तो पुन्हा आतून तश्याच विचित्र आवाजात बोलू लागला,
"आधी ह्याच्या मोठ्या बहिणीला रितिकाला इथे बोलावून घे आत्ताच मग मी सांगतो."
"आधी ह्याच्या मोठ्या बहिणीला रितिकाला इथे बोलावून घे आत्ताच मग मी सांगतो."
त्याचं ते बोलणं ऐकून त्यांनी लगेच फोन करून शेजारच्या गावातून त्यांच्या मोठ्या मुलीला तिथे बोलावून घेतले.
ती तिथे आल्यावर त्यांनी सगळा झाला प्रकार तिला सांगितला आणि ती अत्तराची कुपी तिला दाखवली. तिने ती कुपी हातात घेतली. हातात घेऊन ती तिला नीट बघू लागली. तिला बघताना हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. तिच्या चेहऱ्यावर भिती दाटून आली. तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.
अत्तराची कुपी तशीच हातात घेऊन ती त्या दरवाजा जवळ गेली आणि थरथरत्या आवाजात बोलू लागली,
"निखिल... तू आहेस?"
"निखिल... तू आहेस?"
तिच्या त्या प्रश्नाने अचानक त्या खोलीचा दरवाजा उघडला गेला. आणि ते सगळे दरवाजातून आत शिरले. आत त्यांना अद्वैत एका कोपऱ्यात खाली गुढघ्यात डोके घालून बसलेला दिसला.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा