Login

कुरुप

बेढप
सौंदर्या हरिश व सावनीची एकुलती एक मुलगी होती. हरीश व सावनीला लग्नानंतर बारा वर्षांनी सौंदर्या झाली होती. त्यामुळे तिची आई व आजी तिला खुप जपायच्या. आजीची तर ती खुप लाडकी होती. आजी तिचा कुठलाही शब्द खाली पडू द्याची नाही.
सौंदर्या नावाप्रमाणेच दिसायला खुप सुंदर व नाजुक होती. लहानपणापासुन सौंदर्या म्हणेल ती वस्तू तिची आई आणि आजी तिच्या समोर हजर करायच्या. सौंदर्याला लहानपणापासुनच चॉकलेट व फास्टफुड खायची सवय लागली होती. ते तिला नाही मिळाले की ती हातपाय आपटत जोरजोरात रडायची, नाहीतर उपाशी रहायची. त्यामुळे तिची आजी आणि आई तिला नेहमी चॉकलेट व फास्टफुड खाऊ द्यायच्या. सौंदर्या घरातील पोष्टिक जेवण कमी व फास्टफुड जास्त खायची.
सौंदर्याचे वडील तिच्या आईला व आजीला नेहमी म्हणायचे, तिला घरचे पोष्टिक जेवण द्या; पण सौंदर्याला लहानपणापासुन भाजी खायची सवय तिच्या आईने लावली नव्हती. त्यामुळे ती भाजी, चपाती अजिबात खायची नाही. ती जॅम, साखर तुपासोबत चपाती खायची किंवा वरणभात खायची. सौंदर्या शाळेतील डब्यात पण बऱ्याच वेळेला पिझ्झा, बर्गर, बिस्कीट व केक असे पदार्थ घेऊन जायची.
सौंदर्याला लहानपणी तिची आई आणि आजी घराबाहेर इतर मुलांसोबत खेळायला पाठवायच्या नाही. बाहेर खेळताना ती कुठे पडली तर तिला लागेल. सौंदर्याचे वडील तिच्या आईला व आजीला नेहमी सांगायचे सौंदर्याला एवढे जपु नका. तिला बाहेर इतर मुलांसोबत खेळु द्या. मुल मातीत खेळलेले चांगले असते. त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती वाढते. पण त्या काही तिच्या वडीलांचे ऐकायच्या नाही.
शाळेत सौंदर्या मैदानी खेळ खेळायची नाही कारण ते खेळताना जर ती पडली तर तिचा चेहरा खराब होईल अशी तिला भिती वाटे. त्यासाठी शिक्षक तिला ओरडायचे. त्याविषयी तिच्या पालकांकडे शिक्षकांनी तक्रारही केली; पण उलट तिची आई शिक्षकांना म्हणाली, डॉक्टरांनी तिची तब्येत नाजुक आहे, त्यामुळे तिला मैदानी खेळ खेळु नये असे सांगितले आहे.
आई व आजीच्या अती लाडामुळे सौंदर्याचे वजन दिवसेंदिवस वाढत होते. सौंदर्याचा नाजुक चेहरा बेढप दिसु लागला. चेहऱ्यावर पुरळ व फोड येऊ लागले. शाळेत सगळे तिला जाडी, जाडी म्हणुन चिडवु लागले. त्यामुळे तिला शाळेत जायला नको वाटु लागले.

©️®️सौ. ज्योती प्रशांत सिनफळ

🎭 Series Post

View all