आपण मागच्या भागात बघीतले की शाळेत सगळी मुले सौंदर्याला जाडी, जाडी म्हणुन चिडवु लागले होते. त्यामुळे सौंदर्याची चिडचिड वाढुन तिला शाळेत जायला नको वाटु लागले. आता पुढे.
सौंदर्या तिच्या आईला म्हणते, आई मला शाळेत नाही जायचे मला शाळेत सर्वजण जाडी म्हणुन चिडवितात. सौंदर्याचे वाढते वजन व बेढप चेहरा बघुन सौंदर्याच्या आईला तिची काळजी वाटु लागली. ती सौंदर्याच्या वडीलांना म्हणाली, आपल्या सौंदर्याचे वजन खुपच वाढत आहे. त्यामुळे तीचा चेहराही बेढप दिसु लागला आहे. ती वयाच्या मानाने खुपचं मोठी वाटु लागली आहे. आपण तिला डॉक्टरकडे नेऊ या का ?
त्यावेळी सौंदर्याचे वडील सौंदर्याच्या आईला म्हणाले. सौंदर्याच्या वाढत्या वजनाला तु आणि आई जबाबदार आहात. सौंदर्या आपल्या दोघांच्या आयुष्यात बारा वर्षांनी आली मान्य; पण म्हणुन सौंदर्याचे तु आणि आईने एवढे फालतु लाड केले त्यामुळे मुळे तीचे वजन वाढले आहे.
ती लहान होती तिला कळत नव्हते. लहान मुले हट्टीपणा करणारच म्हणुन आपण त्यांचे सर्व हट्ट पुरवायचे नसतात. लहानपणी तिला तुम्ही कधीच भाजीपोळी खायची सवय लावली नाही. त्यामुळे आज ती बारा वर्षांची झाली तरी तिला भाजीपोळी खायला आवडत नाही. तिला फास्टफुड किंवा चॉकलेट दिले नाही तर ती रडते, उपाशी राहते. त्यामुळे तुम्ही तिला नेहमीच मॅगी, न्युडल्स, पास्ता व चॉकलेट असे पदार्थ खायला देत गेला.
तुम्ही दोघांनी तुमचे सगळे प्रेम तिला तिच्या फास्टफुड व चॉकलेट मधुन खायला दिले. त्यामुळेच तिचे वजन वाढत गेले, दात किडले. चेहऱ्यावर फोड आले. तिचा चेहरा बेढप दिसु लागला आहे. तिला कधीच तुम्ही दोघींनी पोष्टिक आहाराची सवय लावली नाही. ती खेळताना पडली तर तिला लागेल त्यामुळे तिला कधीच घराबाहेर खेळायला जाऊ दिले नाही. शाळेत पण तिच्या शिक्षकांना खोटे सांगितले. ती नाजुक आहे त्यामुळे डॉक्टरांनी तिला मैदानी खेळ खेळायला नाही सांगितले आहे. त्यामुळे तिची शारीरिक हालचाल झाली नाही. तिला डॉक्टरकडे नेण्यापेक्षा तिला फास्टफुड व चॉकलेट खायला देणे बंद करा. तिला भाजी पोळी, सॅलड असे पदार्थ खायला द्या. तिचा शारीरिक व्यायाम होईल असा खेळ खेळु द्या. तिचे वजन आपोआप कमी होऊन ती पहिल्यासारखी नाजुक व सुदंर होईल.
सुरवातीला ह्या सर्व गोष्टी करताना तिला व तुम्हा दोघींना पण खुप त्रास होईल; पण तिचे वजन कमी करायचे असेलतर त्यासाठी तिच्याबरोबर तुम्हालाही प्रयत्न करावा लागेल.
©️®️सौ. ज्योती प्रशांत सिनफळ

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा