यासाठी कुठेच क्षमा नाही भाग 1

Kshma Nahi
यासाठी कुठेच क्षमा नाही
भाग 1

ह्यासाठी कुठे क्षमा नाही भाग 1

ती लग्न होऊन घरात आली तेव्हा मोठ्या घरची लेक म्हणून जरा कौतुक झालं.. तर कोणी भरमसाठ हुंडा घेऊन आली म्हणून ,तर कोणी ती सुंदर दिसते म्हणून कौतुक केलं.. तर कोणी ती डॉक्टर आहे म्हणून कौतुक केलं...

घरातील सर्व जण खुश होते, का तर मोठ्या सुनेला काहीच झाले नाही..तिने वंशाचा दिवा दिला नाही पण ही नक्कीच देईल...हिच्या मुळे घरात बाळ येईल..म्हणून तिच्यावर वंशाच्या दिवाच्या येण्याची आस होती.


आता लग्नाला एक वर्ष झालं होते तरी सगळ्यांनी धीर धरला, वंशाचा दिवा देईल तर हीच देईल हे मनाशी ठाम होते सासरचे.

तिला मात्र आपण ही मोठ्या वहिनी सारखेच निघालो तर काय ?? ह्याची भीती होती..पण आत्ताशिक तर एक वर्षच झालं आहे मग कसली भीती...

दोन वर्षे झाले आणि अजून ही मूल नाही ह्याची चिंता सतावत होती घरच्यांना...आता छोटी सून ही अशीच निघते की काय मोठी सारखी ह्याची भीती वाटत होती, सासू सासरे सगळे इतर तिच्या कडे सतत हेच प्रश्न घेऊन जात...घरात मूल कधी..? अजून किती वाट पहायची आम्ही ,काय ते इलाज करा नाहीतर वंश मिळायचा नाही...

तेव्हा नंदेच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम होता ,सगळ्या सुवासिनी ,लेकराबळाच्या आया जमल्या होत्या ओटी भरायला....आता दोघी वाहिन्या माझ्या लेकीची ओटी भरणार नाही असे सासू ने जाहीर केले..

दोघी बसल्या होत्या त्यांना उठून बाहेर पाठवले, दोघींचा ही खूप अपमान झाला, मोठी तर हे नेहमी सहन करत आली होती पण छोटी हे सहन करू शकली नाही..