मी – फसवलंस तू मला..
आराधना – फसवावं लागलं.. का कशासाठी सगळं कळेलच हा तुला...
श्रीधर – बाय द वे तुला आठवतंय का की माई आजारी असताना माईने काय वचन मागितलं होतं आप्पांना ते ? अर्थात माईने सर्वांनाच बाहेर जायला सांगितलं होतं पण मी मात्र खिडकीला कान लावून ऐकलं होतं.. तू सख्खा , पोटचा मुलगा नाहीस हे तुला कधीच कळू न देण्याचं वचन माईने आप्पांकडे मागितलं होतं.
मी – म्हणजे मी..
श्रीधर – सांगतो रे सोन्या सगळं.. आधीच तर्क वितर्क करत बसू नको.. स्टोरी संपायला वेळ आहे अजून.. आप्पांना उतारवयात कसले भास व्हायचे आठवतंय ? हे घराणं नष्ट होत जाण्याचे भास , माईचे भास , तू त्यांच्यापासून दूरावशील असे भास त्यांना होत असायचे आणि .. आणि त्या तुला मिळालेल्या फोटोतल्या बाईचे भास त्यांना व्हायचे. आता ती बाई कोण विचारू नको कानफटात पेटवीन विचारलंस तर.. सगळं सांगतो...आता हे मला कसं माहीत असं जाणून घ्यायचं असेल ना ? आप्पा नेहमी माड्यावर वहीत काहीतरी लिहीत बसायचे आणि वही ट्रंकेत लपवून ठेवायचे . मी हळूच सगळ्यांच्या नकळत ती वही वाचायचो. ती वही आप्पा गेल्यावर लगेच तुझ्या हातात मिळू नये म्हणून चुलीला लावली.. आणि तू वेड्यासारखं इथे शोधत बसलास डायरी !
चारूहास – त्यादिवशी तुला ती आप्पा आणि त्या बाईची फोटोफ्रेम सापडली आणि तू जेव्हा ती फोटोफ्रेम घेऊन माळा उतरत होतास ना तेव्हा मी तिथेच होतो लपलेला.. तुझ्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी ह्याच घरात लपलो होतो. तुला कळलं पण नाही !
श्रीधर – इतका कसा रे तू मंदबुद्धीचा ? तू दुसऱ्या दिवशी एसटीत बसलास पुण्याला जाण्यासाठी ..
आराधना – आणि तिथेच मी तुझ्या समोर आले.. तुला बरबाद करण्यासाठी ! मुद्दाम एसटीत तुझ्याच शेजारी बसले. हे सगळं ठरवून करण्यात आलं होतं. बंडूने रात्री फोन करून सांगितलं होतं मला की पुण्यात जायला निघणार आहेस ते !
मी – म्हणजे बंडू तू पण ह्या सगळ्यात सामिल आहेस ?
बंडू – हो.. आयुष्यभर नोकर बनवलंत , ताटाखालचं मांजर केलंत म्हणून सामिल झालो मी !
मी – खूप मोठी गद्दारी केलीस रे..
बंडू – गद्दारी माझ्याशी आणि माझ्या बा शी तुम्ही आप्पांनी केली आणि त्यांच्या पापांची फळ तुला खायला घालणार मी !
आराधना - त्यावेळी आपण स्वारगेटला उतरलो. तू रिक्षेत बसून निघून गेलास आणि मी तुझा पाठलाग करू लागले. तुझ्यावर मी , चारूहास आणि आमची माणसं लक्ष्य ठेवून होतो. दुसऱ्या दिवशी झालेली आपली ऑफिसमधील भेट .. योगायोग वगैरे नव्हतं काहीच. तुझ्या त्या बॉसच्या तोंडावर पैसे फेकले , गन रोखली आणि आम्ही त्याला आमच्या मर्जीने नाचवलं.
श्रीधर – हा आता तू तिथे पुण्यात 28 वर्षांपूर्वी नक्कीच अनेक वर्ष पुण्यात राहत होतास साधारण पुण्यात गेल्यानंतर 2-3 वर्षांनी तुझा अँक्सिडेन्ट झाला होता . तुला नोकरी मिळाली होती आसावरीच्या नवऱ्याच्या ओळखीवर.. खरा हेतू आसावरीचा काय होता माहीतीये ? तुला तिने सायकँट्रिस्ट कडे नेलं होतं तिने.. तू तिरसटल्या सारखा वागत होतास म्हणून ! आसावरी पण तुझ्याच सारखी वेडी ! आसावरीच्या नवऱ्याने तुला नोकरीवर चिकटवलं आणि आम्ही एका फटक्यात तुला काढून टाकलं तसंही तुझा तो बॉस तुझ्या कामाला कंटाळलाच होता.. तू जेव्हा त्या तुझ्या बॉसनं हाकलवल्यावर बाहेर आलास ना तेव्हा तो तुझा डॉक्टर.. तुझ्यावर वेश बदलून लक्ष्य ठेवत होता. तुझ्याच आजूबाजूला होता रे तो . तुला कळलंही नाही.. तू एकदा लिफ्ट ने फ्लॅटवर जात होतास ना तेव्हा डॉक्टरांनी ती लिफ्ट बंद पाडली.. तुला घाबरवण्यासाठी.
चारूहास – तुझ्या बाथरूममध्ये camera मीच लावलेला.. कारण आम्हाला बघायचं होतं की तुला खरंच आठवत नाहीये कि न आठवल्याचं नाटक करतोस ते.. म्हणून प्रत्येक क्षणी आम्ही तुझ्यावर नजर ठेवून होतो.
श्रीधर – तुला आणि डॉक्टर ला पुन्हा कोकणात जायला आसावरीने भाग पाडलं.
मी – म्हणजे आसावरी सुध्दा ?
श्रीधर – नाही ! ती तिसरी व्यक्ति म्हणजेच आसावरी. तुझा तो डॉक्टर आमच्याशी डबलगेम खेळत होता. खरा तो आसावरीचा माणूस होता. आम्ही त्याला पैसे देऊन आमच्याबाजूने केलेलं.. पण तो आमच्याशी डबलगेम खेळतोय हे उशीरा कळलं.
निलिमा – आणि त्या दिवशी तो कपड्यांची बँग घ्यायच्या निमित्तानं आला ना माझ्यापाशी तेव्हा आपण एकमेकांसमोर आलो.. तो कपड्यांची बँग नाही. पैशांची बँग नेण्यासाठी आलेला माझ्या बिल्डिंगच्या इथे. फोनवर code language मध्ये बोलत होता आमच्याशी तो.. आणि तुमच्या गाडीच्या मागे जी गाडी होती ना त्या गाडीत आसावरी होती आणि आसावरीच्या गाडीच्या पाठी आमची गाडी .. त्या गाडीत मी आणि श्रीधर होतो..
श्रीधर – ज्यावेळी डॉक्टर पैसे घेण्यासाठी बिल्डिंगच्या खाली आलेला ना .. तेव्हा मी , आसावरी बिल्डिंगच्या टेरेसवरून बघत होतो.. आणि तुम्ही तुमच्या बिल्डिंग मधून निघायच्या आधीच चारूहास पार्किंग एरीयात घुसला.. तुमच्या गाडीच्या ब्रेकची केबल कापू लागला पण तुमच्या येण्याची चाहूल लागली आणि त्याने पळ काढला.. केबल अर्धीच कापली गेली. तरीही प्लँन झालाच सक्सेसफुल .. पण अर्धाच.. एका दगडात दोन पक्षी मारायचे होते उडाले तीन पक्षी ! त्यावेळी तुमची गाडी दरीत कोसळली पण तूच नेमका वाचलास.. आसावरी आणि तिच्या मिस्टरांनी तुला वाचवलं.. डॉक्टरांची बॉडी कशीबशी गाडीत टाकली आणि तुलाही गाडीत ठेवलं.. आणि तुला भोरला अँडमिट केलं.. आता तिचा आणि तिच्या नवऱ्याचा काटा काढणं गरजेचं होतं.. तिचा नवरा तेव्हा मेडीकल मध्ये औषधं आणण्यासाठी बाहेर पडला तेव्हा त्याला आम्ही किडनँप केलं आणि आसावरीला धमकी द्यायला सुरुवात केली.. आसावरीला एका बिल्डिंग मध्ये बोलावलं आणि दोघांनाही तिथेच मारलं आम्ही.. आणि अखेर तू आमच्या ताब्यात आलास..
आराधना – आणि त्या भोरच्या हॉस्पिटल मधून मी आणि चारूहास ने तुला इथे ह्या घरात आणलं. 1 आठवडा तू बेशुध्द होतास.
श्रीधर – आता हे सगळं करण्यामागचा उद्देश काय होता ते सांगतो तुला.. बाबांचा बदला घेतला मी.. बाबांच्या सुखात जे जे आडवे आले ना त्यांना संपवत गेलो.. माई आजारी पडली तेव्हा बाबांनी तिला चुकीची औषधं देऊन मारून टाकलं. बाबांनी आणि आईने मला सांगितलं होतं की तुझ्या सुखात जो जो आडवा येईल त्याला जिवंत ठेवू नकोस.. आणि तुला माहीत आहेच हक्कांसाठी माणूस काय काय करू शकतो ते.. आता प्रश्न आला राधाचा... राधा तुझी नव्हतीच कधी . तुला वेडा बनवून पेढा खात होती ती.. तुला आठवतंय का राधा कधीच तुला जवळ येऊ देत नव्हती.. कारण ती माझ्या जवळ असायची.. मीच तिला सांगितलं होतं त्याला बिघडव म्हणून.. आणि राधा माझ्या प्रेमासाठी काहीही करू शकत होती.. काहीही. राधा आणि तू तुमच्या पिकनिक ला भलेही जवळ आलात.. काही दिवसांनी तुला कळलं की राधा प्रेग्नंट आहे. राधा तुझ्यामुळे नाही माझ्यामुळे प्रेग्नंट होती मित्रा ! आणि हे तुला राधाने कधीच सांगितलं नसणार.. शेण मी खाल्लेलं..शेण खाल्ल्याचा आव तुझा तूच दाखवू लागलास. मला राधा एकदा म्हटलेली की तुला फसवणं बास करूया.. तिला ते पटत नव्हतं.. म्हटलं नाही.. बरबाद प्रत्येकाला करायचं.. सुरूवात माझी तुझ्यापासून झाली होती. गणपतीला राधा घरी आली होती तेव्हा आसावरीद्वारे चिठ्ठी दिलीस ना राधाला ? नंतर राधाने सांगितलं रे मला. राधा खूप प्रामाणिक होती बिचारी.. पण तिला माझं ऐकावच लागलं.. मुळात राधाला सदाकाका भेटलाच नव्हता.. तो मी केलेला प्लँन होता. राधाने तुला खोटं सांगितलं की सदाकाकाला चिठ्ठी दिली होती म्हणून.. मला माहीत होतं की तू रागाच्या भरात सदाकाकाला जाब विचारायला जाणार.. सदाकाकाने तर तुला अजूनच मीठमसाला लावून सांगितलं.. तुला वाटलं राधा आणि तुला आप्पांनी वेगळं केलंय पण तसं काहीच नव्हतं. त्या राधाच्या बापाला मी आधीच लग्नाची मागणी घातली होती आणि राधा प्रेग्नंट असल्याचं देखील सांगितलं होतं. आता आपलं जोशी घराणं श्रीमंत , पंचक्रोशीत आपलं मोठं नाव आणि त्यात राधा प्रेग्नंट. तो लगेच आमच्या लग्नाला तयारही झाला. दुसऱ्या दिवशी कचेरीत आप्पांना माझ्या सांगण्यावरून भेटलाआणि आप्पा तिची पत्रिका घेऊन घरी आले.. तेव्हा पहिल्यांदा आप्पांनी बाबांना माझ्या लग्नाविषयी मत विचारलं पण मोठेपणा आप्पांनीच मिरवला राधाच्या बाबांसमोर.. राधाला आपण बघायला गेलो तेव्हा आप्पांनी आम्हाला एकांतात बोलायला सांगितलं आठवतंय ? तेव्हा आम्ही बागेत गेलो आणि तुला पुढे कसं छळायचं हे तिला सांगत होतो.. तिला ते पटत नव्हतं पण शेवटी जबरदस्तीने तिला पटवून दिलं.. राधा आणि माझं लग्न होणार हा धक्का सहन होणार नाही हे माहिती होतं मला. सगळा माझा प्लँन परफेक्ट सेट झाला होता.. तू जेव्हा आप्पांना टेकडीवर भेटायला गेलास ना तेव्हा मी तिथेच दगडापाशी होतो लपलेला.. तू आप्पांना ढकलून माझा मार्ग सोप्पा केलास.. आता ह्या घरावर , माणसांवर फक्त माझे बाबा अधिकार गाजवू शकत होते.. बाबांचं एक स्वप्न मी पूर्ण केलं.आता माझी सगळी पापं मी तुझ्या अंगावर टाकू लागलो.. तुला माझ्या जाळ्यात ओढलं आणि मी आणि बाबा नामानिराळे होऊ लागलो.. आता तू म्हणशील तुलाच का ? तर तूच आमचा हुकमाचा एक्का होतास !
क्रमशः
SWA membership no. 51440
®© Poornanand Mehendale
SWA membership no. 51440
®© Poornanand Mehendale