Login

लड़की का चक्कर , मौत से टक्कर ! पार्ट 1

.
सकाळचा प्रहर होता. जिममध्ये फारशी गर्दी नव्हती. समिधाने त्याच दिवशी जिम जॉईन केले होते. समिधा एक सव्वीस वर्षाची , नाजूक बांध्याची मुलगी होती. अप्सरेला लाजवेल असे तिचे सौंदर्य होते. दिसायला गोरीपान , कमळासारखे डोळे , गुलाबी ओठ , चाफेकळी नाक असलेली समिधा जिम जॉईन करताच सर्वांच्या नजरेत आली नसती तर नवलच. पण ती विवाहित होती आणि तिला एक आठ वर्षाचा मुलगा होता. असो. समिधा कारडीओ करत होती. तेवढ्यात जिममध्ये रुद्र आला. रुद्र सहा फूट उंचीचा , बलदंड पिळदार देहयष्टी लाभलेला , रेखीव चेहरा , कोरीव दाढीमिश्या असलेला राजस राजबिंडा तरुण होता. तो जिममध्ये येताच सर्व मुली त्याच्याकडे चोरट्या नजरेने पाहू लागल्या. त्याच्या गळ्यात सोन्याचे लॉकेट , बोटांमध्ये महागड्या अंगठ्या आणि मनगटात चांदीचे कडे होते. त्याला पाहूनच तो श्रीमंत घरातील तरुण आहे हे कुणालाही कळत असे. सुरुवातीला समिधा आणि रुद्रमध्ये नजरानजर झाली. पण रुद्र " सख्त लौन्डा " होता. तो सहजासहजी कुण्याही मुलीला भाव देत नसे. पण समिधा मात्र रुद्रच्या रूपावर भाळली होती. जिममधील इतर तरुण तिला भाव देत असताना फक्त रूद्रच तिला दुर्लक्ष करतो यामुळे तिचा " स्त्री अहंकार" दुखावला गेला होता.

" रुद्र आहे तो. त्याचे वडील खूप मोठे बिजनेस मॅन आहेत. पण तो कोणत्याच मुलीला भाव देत नाही. आम्ही सर्वांनी ट्राय मारला पण काही फायदा नाही. " समिधाची मैत्रीण पूजा म्हणाली.

" यु जस्ट वेट अँड वॉच. अप्सरा समोर आल्यावर मोठमोठ्या ऋषीमुनींची तपस्या भंग होते. मग हा काय टिकणारे ?" समिधा तोऱ्यात म्हणाली.

***

एकेदिवशी जिममध्ये फारशी गर्दी नव्हती. समिधाने पुढाकार घेतला आणि ती रुद्रच्या जवळ गेली.

" एक्सक्यूज मी , या ट्रेड मिलची स्पीड कमी होत नाहीये. " समिधा शांतपणे म्हणाली.

" मी जिम ट्रेनर दिसतोय का ?" रुद्र रागात म्हणाला.

" ओके सॉरी. " समिधाने लहान तोंड केले.

दुरूनच पाहत असलेली पूजा गालातल्या गालात हसली. मग समिधाने परत ट्रेड मिल चालू केले आणि क्षणार्धात ती धाडकन भूमीवर आपटली. नेमक्या त्याच दिवशी जिम ट्रेनर बाहेरगावी गेला होता. रुद्र धावत तिथे आला आणि त्याने समिधाला उचलले. समिधाच्या डोक्यावर जखम झाली होती. रुद्र तिला उचलून डॉक्टरांकडे घेऊन जाऊ लागला. पूजा दुरूनच हे सर्व बघत होती. तिलाही समिधाची खूप काळजी वाटत होती. समिधाने तिला डोळा मारला. तिने हे सर्व मुद्दाम केले असल्याचे पूजाला कळून चुकले.