रुद्रने मनसोक्तपणे समिधाच्या ओठांचे रसपान केले आणि समिधाला बेडच्या दिशेने ढकलले. मग त्याने अंगावरचा शर्ट काढला आणि तो समिधाच्या जवळ गेला. त्याचे मादक रूप पाहून समिधाच्या देहातही चैतन्य संचारले. तिने रुद्रच्या मजबूत खांद्यावर हात ठेवला आणि रुद्रने तिला घट्ट मिठीत घेतले. वस्त्रांची बंधने गळून पडली आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत विरघळले. रुद्रने वेगात समिधाच्या नाजूक देहाचा चावा घेतला. त्याचा आक्रमकपणा समिधाला तृप्त करून गेला. रुद्रने समिधाच्या सर्वांगावर चुंबनांचा वर्षाव केला. दोघेही प्रणयक्रीडेत मग्न झाले. सरतेशेवटी रुद्रने समिधाच्या गालांना गच्च दाबले.
" काय करतोय रुद्र , मला त्रास होतोय. " समिधा म्हणाली.
" तुला माझ्यासोबत झोपायचे होते ना ? तुझी ती इच्छा पूर्ण झाली. आता शेवटच्या खुणा देतोय. म्हणजे तुला जगाला ओरडून सांगता येईल की तू एकेकाळी रुद्रसोबत झोपली होतीस. " रुद्र म्हणाला.
समिधाने रुद्रला जोरात हिसका दिला.
" स्टॉप इट. काय झाले आहे तुला ?" समिधा म्हणाली.
" राधेय आला होता काल भेटायला. तू सांगितले नाही की तू विवाहित आहेस आणि तुला एक मुलगा पण आहे म्हणून. " रुद्र म्हणाला.
" ओह. म्हणून राग आलाय तुला. मी विवाहित आहे कळल्यावर तुझं माझ्यावर असलेले प्रेम क्षणार्धात बदलले ना ? हो आहे मला पती आणि आठ वर्षाचा मुलगापण. मी अठरा वर्षाचे होते तेव्हाच माझं जबरस्ती लग्न लावून देण्यात आले. तेही वयस्कर माणसाशी. वयाने दहा वर्षे मोठा होता तो. त्याच्या मारहाणीला कंटाळून काही दिवस माहेरी आले होते. तुझ्यावर प्रेम झाले. तुला गमवायचे नव्हते म्हणून तुला सांगितले नाही काही. पण आता तुला संबंध ठेवायचे नसतील तर ठिके. " समिधा म्हणाली.
समिधा तिथून जाऊ लागली पण रुद्रने तिचा हात धरला. मग तिला स्वतःकडे खेचले.
" माझ्या सावत्रआईने लहानपणीपासून माझा खूप जाच केला. म्हणून स्त्रियांपासून दूरच राहतो. फक्त वासनेची तहान भागवण्यासाठी वेश्यांकडे जात होतो. तू मला शिकवले प्रेम काय असते ते आणि स्त्री ही फक्त उपभोगण्याची वस्तू नसते. आता हा रुद्र तुझ्या प्रेमासाठी पूर्ण जगाशी भांडेल. " रुद्र म्हणाला.
रुद्रने पुन्हा समिधाला मिठीत घेतले आणि दोघेही प्रणयक्रीडेत रमले.
***
दुपारी टपरीवर राधेय आणि रुद्र चहा घेत होते.
" मी तुला तुझ्या जातीवरून चिडवतो म्हणून तू मला आणि समिधाला तोडायचे बघतोय ?" रुद्र म्हणाला.
" नाही भाई. आपले शत्रुत्व आणि आपली मैत्री आपल्या ठिकाणी पण तू आत्याच्या नादी नको लागूस. " राधेय म्हणाला.
" का ?" रुद्र म्हणाला.
" आत्याचे पती काही साधेसुधे इसम नाहीत. शिवाय आपल्या पोटजाती वेगळ्या. त्यामुळे खापपंचायतपण सामील होईल यात. तलवारी उपसल्या जातील. आपल्या दोन कुटुंबामधले जुने वैर विसरला का ?" राधेय म्हणाला.
" जे प्रेम सहजासहजी भेटते ते प्रेम नसते. अरे आपल्या प्रेमासाठी नाही भांडायचे तर कुणासाठी भांडायचे ? तर तू आता मला " काका " म्हणण्याची सवय घाल. " रुद्र हसत म्हणाला.
तेवढ्यात तिथे साकेत आला.
" भाई , आईची तब्येत बिघडली आहे. डॉक्टर दहा हजार रुपये मागत आहेत. " साकेत हात जोडून म्हणाला.
रुद्रने त्याच्या हातावर हात ठेवला.
" वीस हजार देतो. अजून लागले तर संकोच न करता सांग. काकूंना काही नाही होणार मी जीवंत असेपर्यंत. " रुद्र म्हणाला.
रुद्र खूप उदार मनाचा होता. सर्वानाच सढळ हाताने अडचणीत मदत करत असे.
***
काही दिवसांनी रुद्र-समिधाच्या प्रेमप्रकरणाची खबर समिधाच्या घरी कळली. समिधाच्या आईवडिलांनी तिच्या मुलाला म्हणजे शौर्यला कुठेतरी लपवून समिधाला घरातच कोंडले. तिचे खाणेपिणे बंद केले. तिच्यासोबत मारहाण केली. राधेयमार्फत ही खबर रुद्रपर्यंत पोहोचली.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा