Login

लड़की का चक्कर , मौत से टक्कर ! पार्ट 4

.
ही खबर ऐकून रुद्रच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पिस्तुल घेऊन तो सरळ समिधाच्या घरी गेला. समिधाच्या घरचे घाबरले.

" हे बघ , समिधा आमची मुलगी. तिच्यासोबत आम्ही काहीही करू. तुला काय ?" समिधाचे वडील म्हणाले.

" तुमची मुलगी माझी होणारी बायको आहे. जर माझ्या आणि समिधाच्या मध्ये कुणी आलं तर इथंच मुडदे पाडीन सर्वांचे. " रुद्र पिस्तुल फिरवत म्हणाला.

तिथे असणारी लहान मुले रडू लागली.

" घाबरू नका बाळांनो. तुमचे काका तुमच्या आत्याला घ्यायला आले आहेत. " रुद्र म्हणाला.

मग रुद्र समिधाच्या खोलीकडे गेला. त्याने दार उघडले. समिधा बेशुद्ध होऊन पडली होती. रुद्रने तिला उचलून आपल्या कारमध्ये बसवले आणि स्वतःच्या घरी नेले. अर्थात इथेही विरोध होताच.

" ही मुलगी या घरात राहणार नाही. " रुद्रची आई म्हणाली.

" का ?" रुद्र म्हणाला.

" कारण मला ती आवडत नाही. " रुद्रची आई म्हणाली.

" मलापण तुम्ही आवडत नाही पण इतकी वर्षे राहतातच ना तुम्ही या घरामध्ये. " रुद्र म्हणाला.

तेवढ्यात रुद्रच्या लहान सावत्र भावाने त्याच्या वडिलांना व्हिडीओ कॉल लावला. रुद्रचे वडील परदेशात होते. ते व्हिडीओ कॉलमधून बोलू लागले.

" रुद्र , ही घाण माझ्या घरात नको. तुला हिला घेऊन जिथे जायचे तिथे जा. " रुद्रचे वडील म्हणाले.

" डॅड , या घरावर माझा काहीच हक्क नाही का ? तुमची होणारी सून आहे ही. तुमच्या बिजनेसचे सर्व लूपहोलस मला माहिती आहेत. त्यामुळे जर मी घराबाहेर पडलो तर तुम्हीही पोलिसांच्या रडारवर याल. " रुद्र हसत म्हणाला.

शेवटी रुद्रच्या वडिलांनी परवानगी दिली. कारण त्यांचे " काळे धंदे " फक्त रुद्रलाच माहिती होते.

***

समिधा रुद्रसोबत राहू लागली. पण शौर्य कुठे होता हे अजून कुणालाच माहिती नव्हते. एकेरात्री रुद्रने लडिवाळपणे समिधाला मांडीवर बसवले होते आणि तो तिच्या देहाचा मनसोक्तपणे चावा घेत होता. त्याने तिच्या कानात उष्ण श्वास सोडले. अचानक समिधाची नजर तिच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर गेली. समिधा थांबली. तिचे डोळे पाणावले.

" काय झाले बेबी ?" रुद्रने विचारले.

" शौर्यची आठवण येत आहे. इतके दिवस मी वाट पाहिली पण आईवडील शौर्यला माझ्याकडे सोपवत नाहीत. राधेयलाही काही माहिती नाही. मला शौर्य हवाय रुद्र. त्याला कसेही करून आणून दे. " समिधा रडू लागली.

" मी तुला वचन देतो. तीन दिवसात शौर्य तुझ्या जवळ असेल. " रुद्र म्हणाला.

रुद्रने आपल्या सर्व माणसांना कामाला लावले. मग कुठूनतरी टीप भेटली की शौर्य त्याच शहरात असून एका हॉटेलमध्ये त्याला समिधाच्या आईवडिलांनी लपवून ठेवले आहे. ही बातमी मिळताच रुद्र जराही थांबला नाही आणि त्याने शौर्यला तिथे जाऊन किडनॅप केले. त्या नंतर त्याने शौर्यला समिधाकडे सोपवले. आईमुलाचे मिलन पाहून रुद्रचे डोळे पाणावले.

" का करतोय हे सर्व ? एका पुरुषासोबत झोपलेली , एक मुलगा असलेल्या मुलीला बायको बनवायला चाललाय ? मी शोधते तुझ्यासाठी अविवाहित कन्या. हीचा नाद सोड. " रुद्रची सावत्र आई फणकारत म्हणाली.

" तुम्ही केला ना माझ्या वडिलांशी विवाह ? माझे वडील पण दुसऱ्या स्त्रीसोबत झोपलेले , एक मुलगा होता त्यांना तरीही केलं ना ? आमचेही तसच. फक्त मी माझ्या प्रेमाखातर हे सर्व करतोय आणि तुम्ही पैश्यांसाठी. " रुद्र म्हणाला.

क्रमश...
0

🎭 Series Post

View all