पुढे कोर्टात केस गेली. समिधाचा पती " विक्रम " ही केस हरला. शौर्यची कस्टडी अर्थातच समिधाला भेटली. सर्व सुरळीत चालू होते. रुद्र सुंदर भविष्याची स्वप्ने बघत होता. त्याने नवीन घर घेतले. तो त्याच्या लग्नाची तयारी करू लागला पण जणू नियतीला हे सुख बघवले नाही. विक्रमने शौर्यला किडनॅप केले. समिधाने पूर्ण खोलीत पसारा केला. फ्लॉवर पॉट तोडून टाकला. रुद्र तिथे आला.
" बेबी.." रुद्र म्हणाला.
समिधा त्याच्या छातीवर डोके टेकवून रडू लागली.
" जोपर्यंत शौर्य नाही भेटणार तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही. " समिधा रडत म्हणाली.
" मी शौर्यला पाताळातूनही शोधून आणेल. आपण लग्न करू. शौर्यही सोबत असेल आपल्या. तू काळजी करू नको. " रुद्र म्हणाला.
रुद्र निघून जाताच त्याची सावत्र आई समिधाजवळ आली.
" तुला जेवढे पैसे हवे तेवढे घे. पण आमच्या जीवनातून दूर जा. मला नाही वाटत विक्रम शौर्यला परत करेल. त्याच्या वंशाचा दिवा आहे तो. सहजासहजी तर नाही परत करणार. तुझ्यासाठी योग्य राहील की शौर्यला विसरून जा नाहीतर विक्रमकडे परत जा. " रुद्रची सावत्र आई म्हणाली.
समिधा काहीच बोलली नाही. रुद्रची सावत्र आई जाताच समिधा परत रडू लागली.
***
दोन महिने झाले पण रुद्रला शौर्यचा काहीच पत्ता लागत नव्हता. राधेय घरचा " बिभीषण " आहे हे जाणून समिधाचे आईवडील त्याला कायम दूरच ठेवू लागले. खापपंचायतचे प्रकरण चिघळले. रुद्रसमिधाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. पण रुद्रच्या वडिलांनी पैसे देऊन प्रकरण मिटवले. आता रुद्रने दुसरा फासा फेकला. समिधाच्या कुटुंबाचा एक विश्वसनीय वकील होता. रुद्रने दोन हजारच्या नोटांनी भरलेली एक बॅग त्याच्या समोर फेकली आणि तो वकील रुद्रला विकला गेला. आता आतली इत्यंभूत माहिती रुद्रला भेटत होती. पोलिसांकडे प्रकरण गेलेच होते पण त्यांनाही यश येत नव्हते. शौर्य गुजरातला असल्याची टीप रुद्रला भेटली. त्याने रातोरात महाराष्ट्राहून गुजरातच्या दिशेने प्रयाण केले. जवळपास तीस दिवस रुद्र त्या वकिलासोबत कारमध्ये बसून शाळेवर पहारा देत होता. शौर्य कधीतरी शाळेच्या बाहेर येईल या संधीची वाट रुद्र बघत होता. कारण विक्रमनेही आपली माणसे आजूबाजूला पेरली होतीच. अखेरीस ती संधी आली. शौर्य टिफिन खाण्यासाठी बाहेर आला. त्याने रुद्रला ओळखले. त्यालाही आईला भेटायचे होते. मग रुद्रने शौर्यला कारमध्ये बसवले आणि पुन्हा तो आपल्या शहरी रवाना झाला.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा