Login

लडक़ी का चक्कर मौत से टक्कर पार्ट 6 अंतिम भाग

.
शौर्य परत आला. समिधाच्या आनंदाला पारावार तो उरला नाही. आता मार्गातले सर्व अडसर दूर झाले होते. रुद्र समिधाला एका नवीन बांधलेल्या बंगल्यात घेऊन गेला. त्या बंगल्याचे नाव होते " घरटे ".

" छान बंगला आहे. कितीला पडला ?" समिधाने विचारले.

" तुझ्या आनंदासमोर काहीच किंमत नाही त्याची. हे बघ ही बेडरूम आपली असेल. शौर्यची ही बेडरूम असेल. या गार्डनमध्ये मी आणि शौर्य रोज क्रिकेट खेळणार. जेव्हा शौर्य सिक्स मारेल आणि त्याने घरात काहीतरी फुटेल तेव्हा तू आम्हाला रागावणार. हा डायनिंग टेबल. इथं आपण तिघे जेवणार. या हॉलमध्ये बसून तू गोपीचे सिरीयल बघणार. " रुद्र हसला.

" अरे बस बस. किती आनंदी होतोय. जास्त आनंद झाला की ग्रहण लागते त्या आनंदाला. " समिधा म्हणाली.

" आता आपल्या आनंदाला कसलेच ग्रहण लागणार नाही. तू माझी बायको होणार. कुणाचा बाप अडवू शकणार नाही आपल्या मिलनाला. " रुद्र समिधाला मिठीत घेत म्हणाला.

जणू समिधाच्या बोलण्याला वास्तू " तथास्तु " म्हणत होती. काही दिवसात समिधा शौर्यसमवेत पळाली. जाताना मी कॉलेजमधल्या एका प्रियकरासोबत पळून जात आहे अशी चिठ्ठी तिने सोडली होती. नंतर कळाले की त्या प्रियकरासोबत ती पळून जाऊ नये म्हणून तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न जबरदस्ती विक्रमसोबत लावले. विक्रमच्या तावडीतून सुटणे एकट्या समिधाला कधीच शक्य नव्हते. त्यासाठी तिला समाजाच्या प्रभावक्षेत्रात एक वजनदार व्यक्तिमत्त्व असलेला व्यक्ती हवा होता. म्हणून तिने मुद्दाम रुद्रला जाळ्यात अडकवले. त्याचा " वापर " करवून घेतला. योग्य संधी मिळताच ती फरार झाली. ही सर्व हकीकत राधेयकडून रुद्रला समजली.

" भाई , आपल्यात खुन्नस होती. पण मित्र म्हणून तुझं हृदय तुटावं अस स्वप्नातपण वाटलं नाही रे. आत्या या थराला जाईल वाटले नव्हते. सर्वांना वेड्यात काढलं तिने. " राधेय म्हणाला.

" भाई , तू वाईट नको वाटून घेऊ. माझं नशीब खराब होते. तू लक्षात ठेव. लडक़ी का चक्कर , मौत से टक्कर. " रुद्र इतके बोलून खळखळून हसला.

***

त्यानंतर रुद्र फार कमी वेळा लोकांना भेटत होता. तो दारू , ड्रग्स याच्या प्रचंड आहारी गेला. अनेकदा लोकांनी त्याला " घरटे " बंगल्यात रात्री-अपरात्री दारू पिताना बघितले होते. कदाचित उध्वस्त झालेल्या स्वप्नांचे तुकडे जमा करत असावा तिथे. एकेकाळी सिक्स पॅक अब्स असलेल्या रुद्रचे वजन आता कमी झाले होते. त्याचे मित्र त्याला नैराश्यातून बाहेर काढायला आटोकाट प्रयत्न करत होते पण रुद्रला स्वतःलाच या सर्वांमधून बाहेर यायचे नव्हते. त्याचे पुण्य अपार होते. असंख्य गरिबांना त्यांनी मदत केली होती. मित्रांवर सढळ हातांनी पैसे उडवले होते. म्हणून सर्वजणच त्याची अवस्था बघून हळहळत होते. काहींनी सुचवले की समिधाला शोधून आणू पण रुद्रने ती सुखात तर मी सुखात म्हणून विषय संपवला. एकेदिवशी तो रात्री दारू पिऊन बुलेट चालवत होता. त्याला दोन्ही हात पसरवून बोलावणारी समिधा दिसली. रुद्र हसला आणि एक ट्रक येऊन त्याला धडकली. रुद्र संपला. त्याच्या देहातून प्राणपाखरू उडाला. थोड्या वेळाने पोलीस वगैरे जमा झाले. तिथे कुणाच्या तरी मोबाईलची रिंगटोन वाजली.


प्यार झूठा था जताया ही क्यूँ
ऐसे जाना था तो आया ही क्यूँ
ऐ सितमगर तू जरा और
सितम करदेया
आजा बेवजासा ये रिश्ता
खतम करदेया
ओ बेदरदेया यार बेदरदेया
दर्दे दिल के बिना मेहफिल ही क्या
जो ना टूटा कभी वो दिल ही क्या
है मेरा हाल बुरा
और बुरा करदेया
मेरे जख्मों को जरा
और हरा करदेया
ओ बेदरदेया यार बेदरदेया