भाग-1 खालील लिंकवर...
https://www.irablogging.com/blog/ladhai-astatvachi-part-1_5135
भाग-2 खालील लिंकवर...
https://www.irablogging.com/blog/ladhaiastitvachi-part--2-_5164
बरेचदा शिक्षकही त्यांच्यात भागीदार असायचे पण आई रोज घरुन निघायच्या आधी एकच गोष्ट सांगायची,”हे बघ लाडो शाळेत कोणी काहिहि म्हणो, कितीही चिडवो पण चिडायच नाही. नुसतच स्मित हास्य देवुन दुर्लक्ष करायच आणि त्यांना कृतीतन दाखवुन द्यायच तू कोण आहेस. अस लढुन झगडुन आपण काहीच मिळवु शकत नाही”... बस तेच वाक्य तिच्या नेहमी स्मरणात असायचे आणि नव्याने उभ रहायची प्रेरणा ही द्यायचे.
हा नुसता एका जिद्दीचा प्रवास नाही तर माणसानं माणूस म्हणून आपल्या स्वतःची शेवटच्या टोकापर्यंत पोहचून घेतलेली परीक्षाच आहे. आपल्या मुलीला शिकवताना या आईला माहीत नव्हतं की, पुढं त्यात यश मिळेलच. पण ही आई लढत राहिली. किती तास शिकवावं, कसं शिकवावं, भाषेतला एक एक शब्द, त्या शब्दांच्या मागं उभं असलेलं आशयाचं जग आणि हे सगळं समजूनच पुढे जायचं. मुलीच्या आकलनाशिवाय, तिच्या समजण्याच्या प्रक्रियेशिवाय नुसत्या शब्दांची घोकंपट्टी करून ती फार तर परिक्षेतील गुण मिळवेल पण जगताना त्या शब्दांजवळ अडखळली तर काय करायचं? हे भेडसावणारे प्रश्न मुक्ताला रात्ररात्र झोपू द्यायचे नाहीत.
एक दिवस किंवा एखादा सण या आईने स्वतःच्या जगण्यासाठी अनुभवला नाही. फक्त एकच ठरवलं होतं. अभ्यासाला जे आहे ते समजून पुढे जायचं. आपल्या मुलीला ऐकू येत नाही. ती अपंग आहे असं कुणी म्हणलेलंही तिला रुचायचं नाही. मी तिला घडवीन, तिला या जगात जगण्यालायक बनवीन, तरच थांबेन हाच तिचा उद्देश होता. तिच्या आयुष्यातील दिवस ना दिवस शब्दांतून ऐकणं आणि पुस्तकातून वाचणं ही माणसाच्या खऱ्या जगण्याची अनुभूती देणारा आविष्करच म्हणायला हवा.
तिच्या बी॰एड. प्रशिक्षणाने तिच्या उज्ज्वल आयुष्यात मौलाचा नफा केला. ती सगळया आधुनिक शिक्षण प्राणालीने अवगत होती त्याचा सर्वोतोपरी त्याचा फ़ायदा तिला झाला. तिने १ ते ४ थी मराठी माध्यमतुन शिक्षण घेतल मग ५ ते ७ वी लोअर इंग्रजी माध्यमतुन आपल शिक्षण पुर्ण केल तर ८ वी ते १० वी हायर इंग्रजी माध्यमातुन प्राथमिक शिक्षण पुर्ण केल.
ईयत्ता ५वीत असतांनी मुक्ताने मोक्षाला डाॅ. हेलन केलर यांच पुस्तक आणुण दिल. तिने ते अवघ्या पंधरा दिवसात वाचल. मग काय परत एक नवीन अध्याय सुरु झाला. एक वाचुन झाल कि दुसर लगेच तयार राहायच अशी शेकडो संतांची आत्मचारित्र, वेद, उपनिषिद, धार्मिक पुस्तक तिने वाचले.
मुक्ताचे ही पाऊल ईथे थांबले. तिने ही पुढे कर्णबधिरांच एम॰एड० केल आणि त्याहुनही पुढे जाऊन पी॰एच॰डी॰ केल. दोघे ही आंतर आणि बाह्य दोन्ही ज्ञानाने परिपूर्ण होत्या. आई तशी लेक. हिला लपवा आणि तिला दाखवा अगदी एकमेकांच्या सावली. तशीच महत्वकांक्षी, ज़िद्दी, तत्पर.... म्हणाव आईची लेक आणि हे सगळ शक्य होवु शकले संजयच्या परिपूर्ण सहकार्य. तो सदैव असायचा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांची ढाल बनुण.
दोघांच्या अथक परिश्रमाने ती प्रत्येक वर्गात अव्वल असायची. ते स्पीच थेरपीस्ट बोलले होते ना,” हव तर आणखीन स्वप्न बघा आणि त्या स्वप्नांमध्ये आकाशात झेप घेण्याची क्षमता असु द्या”. अगदी तशीच ती झेप घेत होती..
अभ्यासा सोबतच स्केटिंग, कत्थक, तबला सगळच मन लावुन शिकायची. होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत ती सहभागी व्हायची आणि बाज़ी ही मारुन यायची. सामान्य ज्ञान तर अस कि मोठयांना हि लाजवेल. कत्थकच्या कित्येक मोठया मोठया स्पर्धेत तिने सहभाग घेतला आणि ती त्यात विजयी सुद्धा झाली.
एस॰एस॰सी॰च्या परिक्षेत ९२ टक्के घेवुन शाळेत तिने अव्वल क्रमांक पत्कारला. एक पालक म्हणून अजुन काय हव होत मुक्ता आणि संजयला.
एका कर्णबाधिर व्यक्तिला एका भाषेत निपुण असणं अवघड होवुन बसत पण मोक्षाला मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषा अस्खलिखितपणे यायला लागल्या. शिवाय राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रिय लेवल ती swimming champion बनली. पुढ़े महाविद्यालयीन शिक्षणाकरिता तिने विज्ञान शाखेची निवड केली. तिथे पण तिथे आपला परचंड लहरवला आणि एच॰एस॰एस॰सी॰ मध्ये ८९% घेवुन पुढे engineeringला अॅडमिशन घेतली. Electronic and telecommunication branch घेवुन ती त्यातही अव्वलच आली. तिने ठाणलच होत ज्या क्षेत्रात जायच तिथे आपला परचंड फडकवायचा.
मुक्ताने मोक्षाला या शिखरावर पोहोचवल. त्यासाठी तिला किती त्याग आणि समर्पण कराव लागल तिच तिलाच माहिती. आपला आत्मविश्वास दांडगा असेल तर काहीच अशक्य नसत....
ज़र प्रत्येक आईने अशीच जिद्द आणि महत्वकांक्षा मनात बाळगली तर परत कोणत्याही मोक्षाचा या समाजात अपमान होणार नाही. तिच्या फक्त गरजा विशेष आहे म्हणून कोणीही तिला कमी लेखणार नाही.
—————————-******——————————
घरात मुलाच्या जन्माचा सोहळा साजरा होतो त्यावेळी पालकांच्या मनात स्वप्नांचे इंद्रधनुष्य फेर धरून नाचत असते. आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा, स्वप्न, मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे त्यांचे ध्येय असते. मात्र प्रत्येकाचे हे स्वप्न, ध्येय पूर्ण होतेच असे नाही. मुलाच्या जन्माच्या आनंदावर विरजण पडते ते आपले मूल सामान्य नसून दिव्यांग असल्याचे समजते तेव्हा. हा मानसिक आघात सहन करून आता पुढे काय या प्रश्नाच्या चक्रव्यूहात ते अडकतात ते अगदी तहहयात.
येथून सुरू होतो मुलांचा आणि पालकांचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास.
आणि त्या प्रवासात वेगवेगळी अडचने आणायला समाजातील काही मुर्ख लोक सदैव तयार असतात. उलट आपण त्यांच्यांसाठी Barrier Free Environment तयार करायला हव जेणे करुन ते सामान्य जीवन जगतील व त्यांच्या विकासात अडथडे निर्माण होणार नाही..
मी पण एक विशेष शिक्षक आहे. मानसिक दिव्यांग आणि कर्णबधिर मुलांसाठी कार्य करते. म्हणुन मी सगळयांना हिच विनंती करेल की आश्या विशेष गरजा असणा-या मुलांची मदत करा. त्यांना हिनवु नका आणि त्यांच्या विकासत अडचण येईल अशी बाधा निर्माण करू नका. आपल्या समाजात त्यांना ही मनसोक्त वावरु दया.... त्यांच्या पालकांना धिर द्या. त्यांना समजाच्या मुख्य प्रवाहात आणुण सामान्यांनप्रमाणे जगु दया.... त्यांना ही जगण्याचा हक्क आहे... त्यांचा हक्क हिरावुन घेता कामा नये याची दक्षता घ्या...
धन्यवाद!!
©️®️अश्विनी दुरगकर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा