"आज उनसे मिलना हैं हमे आज उनसे मिलना हैं हमे..."गाणं गुणगुणतच जान्हवी राधिकाला तयार करतं होती आणि सोबतच तिला चिडवत होती ...राधिका अल्मोस्ट तयारच होती आता फक्त कपाळाला टिकली, तिने तिच्या लांबसडक केसांची नेहमीप्रमाणे वेणी घातली होती आणी आता फक्त केसात गजरा माळायचा बाकी होता....राधिका आरशात बघत स्वतःशीच हसत होती, स्वतःशीच लाजत होती... तो फोटोवाला तिला खूपच आवडला होता... आणि आज तर तो प्रत्यक्ष समोर येणार होता.."काय लाजतेय काय लाजतेय..."जान्हवीने लाजत असलेल्या राधिकाकडे बघतच बोलते आणि आरशात बघतच शिट्टी मारते... राधिका नावाप्रमाणेच राधेसारखी सोज्वळ, सालस, नाजूक, सुंदर आणि मुख्य म्हणजे लाजाळू... एकदम परफेक्ट मुलगी अशी आपल्या कथेची नायिका राधिका... तर जान्हवी तिच्या उलटं एकदम बिनधास्त मेकअपची आवड असणारी आजच्या जमान्यातली अप टू डेट मुलगी...आज राधिकाला पाहायला पाहुणे येणार होते...पाहुणे येणार असल्यामुळे जान्हवी म्हणजेच राधिकाची छोटी बहीण तिला तयार करतं होती... राधिकाची ही पाहुणे वैगरे बघायला यायची पहिलीच वेळ होती त्यामुळे तिच्या मनात धाकधूक होतीच पण फोटोतल्या त्याला बघण्याची उत्सुकताही होती... फोटोतला तो... बाबांनी फोटो पाहायला सांगितला तेव्हा नाक मुरडणारी राधिका फोटो पाहताच आपलं हृदय हरवून बसली होती... फोटोतल्या त्याला तिने ते देऊन टाकल होतं आज तर फक्त शारीरिक भेट होणार होती... आज फक्त नजर भेटणार होती पण तिच मनं कधीच त्याच्यापाशी पोहोचल होतं आणि त्याचंच होऊन गेलं होतं ...आजचा हा सारा शृंगार त्याच्यासाठी होता फक्त त्याच्यासाठी... लोकं म्हणतात शृंगारामुळे सौंदर्य खुलत पण आज राधिकाच्या सौंदर्याने तो शृंगार खुलला होता... ओठांवरील लाल लिपस्टिक तिच्या कोरीव ओठांवर अगदी खुलून दिसतं होती... लांबसडक असणाऱ्या तिच्या केसात गजरा सजला होता.. कपाळावरची चंद्रकोरही (टिकली )आज तिच्या सौंदर्यात भर टाकत होती... तिने नेसलेली आंबा कलरची साडी तिच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसतं होती... कानातले झुमके तर कोणीतरी झाडाला झोके बांधावे तसे झुलत होते... नाजूकसा नेकलेस तिच्या सौंदर्यात अजून भर टाकत होता...डोळ्यातलं काजळ आणि आयलानरने तिच्या डोळ्याच सौंदर्य वाढवलंच होतं पण आज तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती... हातात साडीला मॅचिंग बांगडया तिने घातल्या होत्या ज्यांची किनकिन जणू तिलाच चिडवत होती..."गप गं...अजून किती छळशील मला ..."राधिका लाजतच जान्हवीला बोलली ..."खोटंय का मी जे बोलतेय ते... जीजूला बघायची उत्सुकता तर चेहऱ्यावर एकदम भरभरून दिसतेय ताईसाहेब... फोटोतच आवडले ना ते तुला काल रात्री बघितलेल मी लपूनछपून फोटो बघत होतीस ना त्यांचा...ते गाणं पण गायलं असशील ना 'जरा तस्वीर से तू निकल के सामने आ मेरे महबुबा'..."जान्हवी चिडवतच राधिकाला बोलते..."हम्म...पण गाणं वैगरे नाही गायलं हा"लाजतच राधिका होकार दर्शवते..."बर्रर्रर्र मग गायचस कि तसपण बाबा म्हणतात तुझा आवाज छान आहे... बाकी मग ही फॉर्मलिटी कशाला ना उगाच आधी कांदेपोहे अँड ऑल त्यानंतर साखरपुडा, बस्ता,मेहंदी, हळद,लग्न केवढं ते अंतर केवढा तो दुरावा होईल ... मी ना आता बाहेर जाऊन बाबांना सांगते... जीजूला सांगा येताना वरातच घेऊन या उदया सकाळी तुमच्या किचनमध्ये आमची तायडी कांदेपोहे बनवत असेल...काय दृश्य असेल ना ते जीजू बाहेर मस्त पेपर वाचतायत तुझ्या सासूबाई देवपूजा करतायत, सासरेबुआ सकाळी फिरून घरी आलेत मस्त कांदेपोह्यांचा सुवास पसरलाय घरभर... तुझी नणंद डोळे चोळतच वास काढत बाहेर येतेय... हे दृश्य लवकर बघायचंय जातेच सांगते बाबांना "जान्हवी हसतच राधिकाला बोलते आणि बाहेर जायचं नाटकं करू लागते...."गप गं आगाऊ... किती वाजले ते सांग बरं जरा..."राधिका जान्हवीला विचारते..."उफ्फ ये इंतजार जीजू अब आ भी जावो..."जान्हवी चिडवतच राधिकाला..."नौटंकी करून झाली असेल तर आता सांगते का किती वाजले..."राधिका पुन्हा जान्हवीला विचारते..."अब बस कुछ ही पलो कि देरी दीदी... पाच, चार, तीन, दोन, एक.... "जान्हवी बोलतच असते तितक्यात बाहेर कारच्या हॉर्नचा आवाज येतो..."कसला टायमिंग हाय रावं....माझे जीजू आले बघ डोली घेऊन...तेरी डोली आ गयी हैं बिट्टो...तू बस इथेच मी बघून येते..."म्हणून जान्हवी रुममधून बाहेर जाते... राधिकाही "आगाऊच आहे..."असं म्हणून खिडकीतून बाहेर बघण्याचा निष्फळ प्रयत्न करतं होती... फोटोतल्या तिच्या त्या राजकुमाराची पहिली झलक आज तिला दिसणार होती... "अरे पण ते कुठं आहेत हे सगळे तर वयस्कर दिसतायत... हे त्यांचे आईबाबा असावेत... हे कुलकर्णी काका आहेत ज्यांनी आमच स्थळ त्यांना दाखवलं आणि हे त्यांच्या घरचे कोणीतरी असतील मग ते कुठं आहेत?..."राधिका स्वतःशीच बोलत चेहरा लटकवतच परत आरशासमोर येऊन बसते...तिला फोटोतला तो काही दिसत नव्हता... दिसेलच कसा तो आलाच नव्हता...
जान्हवी व राधिकाचे आईबाबा आलेल्या पाहुण्यांच स्वागत करतात... सर्वजण आत सोफ्यावर येऊन बसतात...जान्हवी सगळ्यांना पाणी आणून देते..."नमस्कार मी अजित देशमुख... आणि या आमचं बिऱ्हाड...आणि हे मुलाचे काकाकाकू "मुलाचे वडील आपली ओळख सांगतात..."नमस्कार मी विलास पाटील... या आमच्या सौं आणि ही माझी छोटी मुलगी जान्हवी..."राधिकाचे वडीलही ओळख करून देतात... जान्हवी सर्वांना नमस्कार करते... पण तिची नजर सारखी सारखी दरवाजाकडेच जातं होती...तिच्याकडे बघून मुलाच्या काकू विचारतात,"काय गं बाळा कोणाला शोधतेयस का?.. सारखी दरवाजाकडे बघतेयस ते..."."माझ्या होणाऱ्या जीजूला विसरलात काय कुठे दिसेना झालेत ",उत्साहाच्या भरात जान्हवी बोलून जाते आणि नंतर स्वतःचीच जीभ चावत आईकडे बघते.. आईने डोळे वटारलेच होते ..."नाही नाही विसरलो नाही... येतोय तो मागून..."हसतच मुलाचे बाबा जान्हवीला बोलतात..."नशीब मला वाटलं विसरले कि काय...माझी सगळी मेहनत वाया..."जान्हवी स्वतःशीच..."काही बोललीस का?"मुलाच्या काकू तिला विचारतात..."काकूंचे कान लय तीक्ष्ण आहेत बाबा ताईसाहेब खरं नाय तुमच..."जान्हवी पुन्हा स्वतःशीच बोलू लागते..."काय गं पुटपुटतेयस ..."काकू पुन्हा बोलतात..."काय गं बाळा स्वतःशीच काय बोलतेयस आमच्याशी बोल..."मुलाच्या आई बोलतात..."नाही मी मी कुठे... मी आलेच..."असं म्हणून जान्हवी तिथून सटकते... इथे सर्वजण बोलणी सूरू करतात... जान्हवी आत रुममध्ये येते...
"काय गं काय झालं..."राधिका जान्हवीला विचारते..."कसलं काय?... तायडे तुझं काय खरं नाय बरं का तुझ्या चुलत सासूचे कान जाम तीक्ष्ण आहेत... आणि तुझ्या सासूबाई..."जान्हवीच बोलणं थांबवतच राधिका बोलते,"त्यांचं काय?..."."नाय त्या चांगल्या आहेत पण चुलत सासूबाई त्यांना मनात बोललेलं पण कळत ... "जान्हवी राधिकाला बोलते..."गप गं... आणि कोणाच्या मनातलं ओळखलं त्यांनी तुझ्या का?"राधिका जान्हवीला बोलते..."हो ना... "जान्हवी राधिकाला..."मग चांगल्या आहेत त्या... तुला मनात बोलता येत का येडपट... तुझं मनात बोलणं म्हणजे अख्या गावात बोभाटा.."राधिका जान्हवीला..."व्वा हे बरंय सासरवाले आ गये तो बहीण हुई परायी..."जान्हवी नौटंकी करतच बोलते..."शी गं.. इतकी घाण ऍक्टिगं करते ना ते नटसम्राट मधला डायलॉग आठवतो..."राधिका बोलता बोलताच थांबते..."कुठला गं.."जान्हवी राधिकाला विचारते..."तू नट म्हणून भी..."राधिका काही बोलणार तेवढ्यातच जान्हवी तिला थांबवते..."पोहोचल्या तुमच्या भावना पोहोचल्या ताईसाहेब..."जान्हवी तोंड वाकड करतच राधिकाला बोलते..."नशीब लवकर कळलं... बरं ते... मला एक सांग..."राधिका जान्हवीला..."काय?..."जान्हवी..."ते नाही आलेत?..."राधिका जान्हवीला..."ते कोण?...अच्छा ते होय... ते नाही येणार आहेत..."जान्हवी चिडवण्याच्या स्वरातच बोलते..."का?..."राधिका जान्हवीला..."किती म्हणजे किती ती उत्सुकता ना... येतायत येतायत ताईसाहेब तुमचे राजकुमार येतायत..."जान्हवी राधिकाला बोलतच असते इतक्यात बाहेर बुलेटचा आवाज येतो..."जीजू?..."असं म्हणून ती खिडकीपाशी जाते... राधिकाही तिच्यासोबत खिडकीपाशी जाते...एकदाची त्याची एक झलक राधिकाला दिसतेच जिच्यासाठी ती इतकी आतुर झाली होती... आज तिचा फोटोतला तो प्रत्यक्ष दिसला...चेहरा तर ती पाहू शकली नव्हती पण एक झलकही सही... ती एक झलकही पुरेशी होती तिच्या पोटात फुलपाखर उडवण्यासाठी...तिच्या हृदयाची तार छेडण्यासाठी.... गालावर लाली आणण्यासाठी... आणि सभोवती व्हायलीन वाजवण्यासाठी...

तुम्हीही राधिकासारखे उत्सुक आहात का त्याला भेटायला पहायला अनुभवायला... कोण असेल तो?, कसा असेल तो हे जाणून घ्यायला?... मग पुढचा भाग नक्की वाचा...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा