बुलेटचा आवाज येतो तश्या राधिका आणि जान्हवी खिडकीपाशी जातात आणि खिडकीतून बघू लागतात... तोच फोटोवाला आला होता.. त्याची एक झलक राधिकाला दिसली होती... तिच्या पोटात फुलपाखर उडू लागली होती, आजूबाजूला व्हॉयलेन वाजत होते, गाली लाज पसरली होती आणि हृदय धडधडू लागलं होतं...
राधिकाची ही अवस्था बघून जान्हवी तिला चिडवण्याच्या सुरातच बोलते, "आले बाबा एकदाचे माझे जीजू.... चला कोणाचातरी जीव भांड्यात पडला एकदाचा..."राधिका जान्हवीच्या पाठीत हळूच एक धपाटा घालते आणि म्हणते "गप गं आगाऊ.... तुला ना मी नंतर बघूनच घेणार आहे..."जान्हवी हसतच चिडवण्याच्या स्वरात बोलू लागते,"बरोबर आता काय आता आमचा नंबर नंतरच लागणार आता कोणीतरी स्पेशल आलंय ना..."राधिका पुन्हा जान्हवीच्या पाठीत एक धपाटा घालते आणि बोलते,"घे लागला तुझा नंबर... अजून दाखवू का किती प्रेम आहे माझ तुझ्यावर?..."जान्हवी पाठ चोळतच,"नको ताईसाहेब सध्या पुरेसं आहे... जास्त झालं तर अजीर्ण व्हायचं... बरं मी आता बाहेर जाते आणि माझ्या जीजूला बघते तू बस इथे..."असं म्हणून जान्हवी बाहेर निघून जाते..
इथे बाहेर तो मुलगा त्याची बुलेट अंगणातच पार्क करतो आणि तो आल्याचं सांगण्यासाठी त्याच्या बाबांना फोन करतो...तसे त्याचे बाबा "आलोच..."असं आत सांगून बाहेर येतात... मग दोघेही आत जातात...पिंकीश कलरच शर्ट, ब्लू पॅन्ट असा फॉर्मल पेहराव त्याने केला होता... एखादा राजकुमार शोभावा अशी उंची आणि बॉडी असलेला तो ...एकदम टापटीप ऑफिसर शोभावा असा तो... आर्मीची शिस्त असणारा तो घरात प्रवेश करतो जान्हवी तर त्याच्याकडे बघतच बसते...त्याला बघताच एक सणसणीत शिट्टी मारावी असं तिला वाटतं होतं पण तितक्यात तिच लक्ष आईकडे गेलं आणि तिने तिचा प्लॅन कॅन्सल केला आणि मनातल्या मनातच,"नको बाबा आई लय हानेल... त्यात होणारा जीजू आहे आपला असलं कायतरी केल तर ताईपण हानेल..."जान्हवी मनातल्या मनात बोलत होती.... तेवढ्यात मुलाच्या काकू बोलू लागतात, "आले बरं का जान्हवी तुझे होणारे जीजू..."राधिकाचे आईबाबा त्याच स्वागत करतात...
सतीशरावं बोलू लागतात,"पाटीलसाहेब हे आमचे चिरंजीव विक्रम सतीश देशमुख बरं का..."विलासराव "नमस्कार..."विक्रम विलासरावाना वाकून नमस्कार करतो... ते त्याला आशीर्वाद देतात...जान्हवीला तर गुदमरल्यासारखं होतं होतं...तिचा आनंद काय तिच्या पोटात मावत नव्हता... तिचा हा आनंद बघून विक्रमचे काका बोलू लागतात,"जान्हवीबाई जा आता तुमच्या ताईसाहेबाना घेऊन या... आता मुलगा पण आलाय काय?.."जान्हवी "हो आता आणते..."असं म्हणून आत निघून जाते... इकडे सर्वांच्या गप्पा सुरु होतात..."बरं का विलासराव तुमची पोरगी जरा जास्तच नशीबवान नाय म्हणजे विक्रम खास सुट्टी काढून तिला बघायला आलाय..."विक्रमचे काका विक्रमची मस्करी करतच बोलतात..."व्हय का?... "विलासराव..."हो मग... अहो आजवर आमच्या वहिनींनी आणि आमच्या सौभाग्यवतीनी किती पोरीचे फोटो पाठवले असतील त्याला त्याची काय गिनती नाय बरं का... पण साहेब अवतरले आजच "विक्रमचे बाबा बोलू लागतात..."काय ओ त्या पोराला पिडताय त्याला सुट्टी नसते हो कि नाय रे विक्रम.."विक्रमच्या काकुही त्यांच्यात सामील होतात...
हसीमजाक चालूच होता... पण विक्रमची नजर मात्र पूर्ण हॉलभर फिरत होती... हॉलमध्ये लावलेले राधिका आणि जान्हवीचे फोटोस तो लपूनच बघत होता... आणि त्याची नजर सारखी सारखी राधिकाला शोधत होती... त्याने जिच्या बायोडेटात मुलगा सैन्यात असावा असं वाचलं होतं ती हिच जी आज समोर येणार होती... शेवटी त्याची उत्सुकता संपली...आतल्या बाजूच्या दिशेने पैंजण वाजण्याचा आवाज येऊ लागला तसं सर्वांची नजर त्यादिशेने वळली... जान्हवी राधिकाला घेऊन येतं होती... राधिका खाली मान घालून हातात कांदेपोह्यांचा ट्रे घेऊन चालत येतं होती... तिला पाहताच विक्रमचा तर कलेजाच खलास झाला होता... राधिकाने पोह्यांचा ट्रे समोरच टीपॉयवर ठेवला आणि सगळ्यांना एक एक डिश देऊ लागली..."बस बाळा समोर तूपण..."विक्रमच्या आई...जान्हवी राधिकाला विक्रमच्या समोर बसवते... राधिका चोरट्या नजरेने विक्रमला बघत होती आणि तोही तिला तसंच चोरून बघत होता... मध्येच त्यांची नजरा नजर होतं होती आणि दोघांच्याही मनात फुलपाखर उडत होती...
सगळी शांतता मोडतच मुलाच्या आई बोलू लागतात,"नावं काय पोरी तुझं?... "राधिका बोलते,"कु. राधिका विलास पाटील."... "शिक्षण किती झालय?"विक्रमचे काका विचारतात..."बी. ए. झालंय...मराठी स्पेशल विषय होता..."जान्हवी सांगते..."ओह....छानच कि म्हणजे मराठी साहित्य वैगरे आवडतं असेलच..."विक्रमचे बाबा..."विषय आहे का काका... कविता पण करते आमची तायडी..."जान्हवी बोलते..."अरे व्वा जमतंय मग आपलं..."विक्रमचे बाबा..."म्हणजे? तुम्हीपण कविता करता का?.. "जान्हवी विक्रमच्या बाबांना विचारते..."एवढं कुठलं साहित्यक्षेत्राच नशीब... अगं फक्त वाचायला आवडतं मला... कविता वाचायला जरा जास्तच... मग कवी आणि वाचक जमतंय ना?..."विक्रमचे बाबा..."अच्छा तसं होय.."जान्हवी..."बरं पोरी मला एक सांग स्वयंपाक येतो कि नाही..."विक्रमच्या काकू राधिकाला विचारतात..."हो येतो ना..."राधिका उत्तरं देते..."बरं अजून काय विचारायचं..."विक्रमचे बाबा..."गाता येतं काय?... "विक्रमच्या काकू .."तायडीला कुठे इंडियन आयडॉल मध्ये जायचंय?..."जान्हवी स्वतःशीच पुटपुटते...."हो येतं थोडं थोडं... गाणं ऐकायला आवडतं आणि गायलाही..."राधिका उत्तरं देते..."बरं... मग आमचे प्रश्न तर संपलेत... चिरंजीव तुम्हाला काही विचारायचय का?..."विक्रमचे बाबा विक्रमला विचारतात... तो काहीच बोलत नाही..."काय दादा तूपण असं सगळ्यांसमोर अवघडलीत पोरं.... विलासराव तुमची काय हरकत नसेल तर हे एकट्यात भेटले तर..."विक्रमचे काका बोलतात..."व्हय व्हय अवो चाललं कि... जान्हवे जा ताईला आणि विक्रमरावांना गच्चीवर घेऊन जा..."विलासरावं बोलतात... मग तिघेही तिथून गच्चीच्या दिशेने निघून जातात...
तिघेही गच्चीवर पोहोचतात..."ताईसाहेब होणारे जीजू तुम्ही बोला मी आहेच..."असं म्हणून जान्हवी तिथून निघून जाते..राधिका गच्चीच्या कठड्यावर ठेवलेल्या एका कुंडीपाशी येऊन उभी राहते...विक्रमही गपचूप बाजूला उभा राहतो...काहीकाळ दोघेही शांतच होते... शेवटी विक्रमच बोलू लागतो,"ऍक्चूली ही माझी पहिलीच वेळ आहे मुलगी वैगरे बघण्याची..."."माझी ही.."राधिका..."अच्छा म्हणजे ओपनिंग बॅट्समन मीच आहे तर..."असं म्हणून तो स्वतःशीच हसतो...राधिकाही हसू लागते..."एक विचारू?"विक्रम..."हा विचारा ना "आपण बसून बोलू शकतो का प्लीज..."विक्रम..."हो हो..."राधिका... गच्चीवरच एक झोपाळा होता दोघेही झोपाळ्यावर बसतात..."हे मस्त आहे..."विक्रम..."काय?.."राधिका..."झोपाळा ओ..."विक्रम.."अच्छा..आमच्या जान्हवी मॅडमची फर्माईश "राधिका..."जान्हवी म्हणजे आता ज्या आल्या होत्या त्या का?..."विक्रम..."हो माझी छोटी बहीण "राधिका..."ओके..."विक्रम..."हम्म..."राधिका...पुन्हा काही काळ शांतता पसरते...
पुन्हा शांतता भंग करतं विक्रम बोलू लागतो,"तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर विचारा "..."मी काय विचारणार?"राधिका..."मी काय विचारणार म्हणजे?... मगाशी तर माझ्या घरच्यांनी तुम्हाला इतके प्रश्न विचारले तुम्हाला नाही विचारायचे का?..."विक्रम..."मला प्रश्न विचारायची गरजच पडत नाहीये तुम्ही आधीच उत्तरं देताय..."राधिका..."अच्छा...तरी असेल एखादा प्रश्न तर... किंवा आपल्या भावी जोडीदाराबद्दल एखादि अपेक्षा "विक्रम..."नाही.. तरी विचारायचच असेल तर एक विचारू "राधिका..."गो अहेड..."विक्रम..."तुमच्या आयुष्यात माझ्या आधी एखादी मुलगी?..."राधिका जरा कचरतच विक्रमला विचारते... विक्रम हसू लागतो "वूमेन्स विल बी वूमेन्स..."विक्रम..."सांगा ना "राधिका आता फ्रीली बोलू लागली होती..."तूम्ही ज्या जागेवर असाल त्या जागेच्या आसपास तरी कोणी नाही... मैत्रिणी होत्या पण जवळची अशी कोणी नाही.."विक्रम दिलंखुलासपणे उत्तरं देतो..."बर्रर्रर्र... मग तुमची तुमच्या भावी जोडीदाराकडून एखादी अपेक्षा?..."राधिका..."अपेक्षा?... ती माझी चांगली मैत्रीण असावी.... माझ्या सुखदुःखात साथ देणारी असावी...ती जी कोणी असेल ती माझी दुसरी बायको..."विक्रमच बोलणं मध्येच थांबवतच राधिका बोलू लागते,"दुसरी बायको?..."राधिका..."हो म्हणजे माझी ड्युटी माझी पहिली बायको आहे ना त्यामुळे तिने माझ्या पहिल्या बायकोवरही तितकंच प्रेम करावं प्रेम करावं तिने ते दुसरेपण स्वीकारावं,माझ्या आईबाबांना सांभाळावं, माझ्यावर खूप प्रेम करावं तिने स्वतःवर खूप प्रेम करावं बस "विक्रम..."अच्छा..."राधिका..."अजून काही?..."विक्रम.."म्हणजे रहावत नाही म्हणून विचारतेय..."राधिका..."हो हो विचारा... मला पण मज्जा येतेय... मित्राना हसायचो आज माझी बारी आलीय...आणि त्यासाठीच थांबलोय आणि त्यासाठीच इथे आलोय ना आपण "विक्रम..."काय ओ..."राधिका लाडीकपणेच बोलते.. "बरं बोला..."विक्रम हसू थांबवतच बोलतो... आधी एकमेकांना लाजणारे ते आता एकदम फ्री झाले होते...
"मगाशी तुमचे काका बोलले ते आत मला ऐकू येतं होतं... तुम्हाला आजवर खूप मुलींचे फोटो दाखवले गेले पण तुम्ही कुठल्याच मुलीला भेटला नाहीत पण माझा फोटो आणि बायोडेटा बघून भेटायला आलात असं का?... म्हणजे?"राधिका..." मुलगा सैन्यात असावा... असं मुलाकडून असलेल्या अपेक्षेच्या चौकटीत लिहिणारी मुलगी नक्की कोण हेच बघायला आलो...आणि फोटोस... खरंतर आईने आणि काकूंने खूप फोटोस पाठवले पण मी एकही बघितला नाहीये... आणि सॉरी खरंतर तुमचाही बघितला नव्हता.. फक्त बायोडेटा वाचला होता...मला उत्सुकता होती कोण बरं आहे ही मुलगी जिला फौजीशी लग्न करायचंय? "विक्रम..."यात काय मोठ आजकाल खूप मुली म्हणतात कि मला फौजीशी लग्न करायचंय... तुमच्या त्या बायोडेटात एकतरी तशी आली असेलच कि "राधिका..."नाही ना...नाहीतर तुमच्या हाती लागलो असतो का?... आणि खूप मुली बोलतात ते फक्त स्टेटस पुरतं असतं ओ... सिरीयल चे परिणाम बोलू शकतो... त्यात पोलिसांची, फौजीच आयुष्य खूप रंगवून दाखवलेलं असतं खऱ्या आयुष्यात असं काहीही नसत आणि याला मी आकर्षण म्हणतो "असं म्हणून विक्रम पुन्हा हसू लागतो..."तेही खरंच "राधिका..."झालेत कि अजून काही प्रश्न?", विक्रम..."शेवटचा एक..."राधिका..."मी तुम्हाला कदाचित जास्तच हुशार आहे असा वाटतोय बरं विचारा.."विक्रम..."तुमच्या मते, सौंदर्य म्हणजे काय?..."राधिका..."सोपय कि... जे आपल्याला प्रेमात पाडत ते सौंदर्य ... जी गोष्ट माणसाला आवडते ती सुंदरच असते.. तिलाच सौंदर्य म्हणावं "विक्रम..."म्हणजे... "राधिका.."म्हणजे बघा हा आपला तिरंगा मीतर प्रेमातच आहे त्याच्या म्हणजे तो सुंदर आहे बरोबरं ना ते खरं सौंदर्य ज्याला जपण्यासाठी कित्येकजण जीवाची बाजी लावतात आणि शेवटी तेच सौंदर्य लपेटून अमर होतात ते खर सौंदर्य जे चिरकाळ असत जे कमी होतं नाही ...जी गोष्ट आपल्याला प्रेमात पाडते ती सुंदरच "विक्रम..."हम्म "राधिका..."बरं आपण जायचं का मग आता तुमच केबीसी. संपल असेल तर..."विक्रम... "हो..."राधिका... विक्रम उठतो आणि जाण्यास निघतो... राधिकाही त्याच्या मागोमाग उठते... तिच्या साडीच्या निऱ्या जरा विस्कटल्या होत्या... ती त्या सरळ करायचा प्रयत्न करतं होती.. विक्रम काही अंतरावर जाऊन मागे बघतो तर राधिका निऱ्या नीट करतं होती... ती मान खाली घालत होती तसे तिचे केस तिच्या चेहऱ्यावर येतं होते... ती ते सावरतच निऱ्या नीट करायचा प्रयत्न करतं होती...
तेवढ्यात विक्रम मागे येतो आणि गुढघ्यावर खाली बसतो..."थांबा मी करतो "विक्रम..."अहो पण तुम्ही?..."राधिका..."त्यात काय थांबा..."विक्रम... विक्रम निऱ्या नीट करू लागतो... राधिका तर त्याच्याकडे बघतच बसते... ती त्याच्या रूपाच्या प्रेमात होतीच पण आता ती त्याच्या मोकळ्या स्वभावाच्याही प्रेमात पडली होती... विक्रम निऱ्या नीट करून उभा राहतो..."एक गोष्ट करायची राहूनच गेली "विक्रम... "कोणती?.."राधिका... "आपण मित्र होऊ शकतो का?..."विक्रम... राधिका हसतहसतच आपला हात त्याच्या हातात देते...दोघेही एकमेकांकडे बघून एक गोडशी स्माईल देतात... तेवढ्यात तिथे जान्हवी येते "चला भेटण्याची वेळ संपलेली आहे "जान्हवी..."बरं चला..."विक्रम..."ओ चला काय चला माझ्याशी ओळख करा... हॅलो मी जान्हवी जर तुमच जुळलं तर तुमची छोटी मेहुणी असेन मी... "जान्हवी..."हॅलो जान्हवी जी... मी विक्रम जर तुमच्या ताईसाहेबांचा होकार असेल तर तुमचा होणारा जीजू असेन मी " असं बोलून विक्रम राधिकाकडे एक नजर टाकतो आणि एक स्माईल देतो..."व्हॉट... येईई... अब तो सिटी बनती हैं बॉस "असं बोलून जान्हवी मस्तपैकी एक शिट्टी वाजवून देते..."अरे देवा हेही टॅलेंट आहे का तुमच्यात?"विक्रम..."खरतर आलात तेव्हाच माझ हेच टॅलेंट उफाळून बाहेर येतं होतं पण त्याला आतच ठेवल नाहीतर जाम मार खाल्ला असता मी "जान्हवी... विक्रम हसतच "बरं मग निघायचं का आता?... खाली सगळे वाट बघत असतील आणि माझी संध्याकाळची ट्रेनही आहे दोनच दिवसाची सुट्टी मिळाली होती... "विक्रम... "हम्म..."राधिका..."चला..."असं म्हणून विक्रम निघून येतो राधिका आणि जान्हवीही त्याच्या मागोमाग खाली येतात..

आजपुरतं एवढंच ?... तुमच्या समीक्षेच्या आणि स्टिकररुपी प्रोत्साहनाच्या प्रतीक्षेत...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा