Login

लागीर झालं जी (भाग 3)

प्रेमात पडलेल्या दोन जीवांची गोष्ट
विक्रम गच्चीवरून पुन्हा खाली हॉलमध्ये येतो...जान्हवी आणि राधिकाही त्याच्या मागोमागच खाली येतात... विक्रम आपल्या जागेवर जाऊन बसतो...राधिका आणि जान्हवी किचनमध्ये निघून गेल्या... "ओय होय ताईसाहेब जीजू तो फुल टु क्लीन बोल्ट झालेत हा तुला बघून..."जान्हवी राधिकाला बोलत होती..."गप गं काहीही काय.... आणि हळू बोल ऐकतील ना सगळे..."राधिका लाजतच जान्हवीला बोलते... "काय लाजतेय काय लाजतेय...अरे तेरी इसी अदा पे जीजू फिदा हैं..."जान्हवी..."गप गं नौटंकी..."बाहेरून बोलण्याचे आवाज येतात तशा दोघी गप्प होतात आणि किचनच्या दाराआडूनच बाहेर बघू लागतात...
                "काय मग चिरंजीव पसंत आहे का मुलगी?..."विक्रमचे बाबा विक्रमला... विक्रम मात्र मान खाली घालून गपचूप बसला होता... "ओ विक्रम रावं आम्हांला तुमची मौनाची भाषा कळत नाही बरं का काय ते तोंडानेच सांगा....अजून एकदोनदा भेटायला आवडेल का? म्हणजे त्यानंतर निर्णय घ्यायचाय का?"विक्रमचे काका..."काय आणि कोणाला विचारताय तुम्ही? या साहेबांना वेळ आहे का? सकाळी आले आणि संध्याकाळी जातील... एक दोनदा भेटायला आवडेल का म्हणे..."विक्रमच्या काकू...."काय झालं विक्रमरावं?... तुम्हाला हवं तर वेळ घ्या काहीच हरकत नाहीये..."राधिकाचे बाबा..."अहो नाही नाही असं काहीच नाहीये..."विक्रम..."मग लगेच सांग कि काय ते कशाला सस्पेन्स वाढवतोयस?..."विक्रमचे काका..."बरं मग ऐका मी तयार आहे लग्नाला..."विक्रम..."अरे व्वा... अभिनंदन... शेवटी आमच घोडं गंगेत न्हाल...अभिनंदन बरं का विलास रावं "विक्रमचे काका..."मी आता काहीतरी गोड घेऊन येते.. "राधिकाची आई...."अहो राधिकाना तर विचारा आधी त्यांचं काय म्हणणं आहे ..."विक्रम... "विक्रमचे बाबा  ..विचारणार विचारणार... अरे हे पन्नास टक्के काम झाल्याचा आनंद...
                राधिका लपूनच बाहेर बघत होती...विक्रमच्या होकाराने स्वतःशीच लाजत होती... जान्हवी तर खूश होऊन बाहेर जाते ..."या या मेव्हणीबाई तुम्हाला पसंत आहेत का जीजू..."विक्रमचे काका..."मी मगाशीच जीजूला पसंती दर्शवलीय काय जीजू..."जान्हवी असं म्हणून विक्रमला डोळा मारते..."अरे तुमची पसंतीही महत्वाची शेवटी लाडक्या एकुलत्या एक मेहुणीबाई तुम्ही.... बरं मग तुमच्या ताईसाहेबांच काय म्हणणं आहे?..."विक्रमचे काका..."तुम्हाला एक खासगीतली गोष्ट सांगू का?... "जान्हवी..."सांगा कि..."विक्रमचे बाबा..."होकार कालच झालाय आमच्या ताईसाहेबांचा आज फक्त रीत म्हणून हे सगळ..."जान्हवी सगळ सांगून टाकते... राधिका तर इथे कपाळावर हात मारून घेते..."ह्या पोरीच्या पोटात काही राहणार नाही..."राधिका स्वतःशीच पुटपुटते..."बरं... असय का म्हणजे विलासराव लक्षात येतंय का तुमच्या हे आधीच जुळलंय आपणच उगाच कष्ट घेतोय..."विक्रमचे काका..."हो ना... बघा पोरांनी आपले कष्ट वाचवले..."विक्रमच्या काकू..."वाचवले कसले उलटं वाढवले म्हणा... ओ होणाऱ्या चुलत सासूबाई आता लग्नाची तयारी करायचीय तुम्हाला इतक्यात थकताय होय.."विक्रमचे काका..."अवो अशी कशी थकेन बरं माझ्या लेकाच लग्न हाय..."विक्रमच्या काकू... विक्रम खुपवेळ शांतच होता...काहीच बोलत नव्हता... स्वतःच्या बघण्याच्या कार्यक्रमात कोण बोलत असतात व्हय... तेव्हा तर घरच्यांना बोलायचा चान्स द्यायचा असतो... विक्रमच्या घरचे एकदम मोकळ्या स्वभावाचे असल्याने ते अगदीच मोकळेपणाने बोलत होते..."बरं मग विलास रावं.. पुढच आपण भेटू तेव्हा ठरवू... दोन्हीकडून होकार आहे तर उगाच उशीर कशाला करायचा..."विक्रमचे बाबा...""हो हो तुम्ही म्हणाल तसं..."राधिकाचे बाबा..."चला तर मग आम्ही निघतो आता... भेटू लवकरच..."असं म्हणून विक्रमचे बाबा उठून उभे राहतात...बाकीचे सगळेही त्यांच्यासोबत उभे राहतात आणि राधिकाच्या आईवडील आणि जान्हवीचा निरोप घेऊन जायला निघतात... सर्वजण बाहेर येतात...
                विक्रमचे आईबाबा काकाकाकू निघून जातात... पण विक्रमचा पाय काही निघत नव्हता आणि गाडीही स्टार्ट होतं नव्हती....त्याची नजरही राधिकाला शोधत होती...तो इकडे तिकडे बघत त्याच्या बुलेटला किक मारत होता...राधिकाचे आईवडील विक्रमसाठी बाहेरच थांबले होते...तेवढ्यात जान्हवी बोलते... "आईबाबा अवो जा ना आत..."जान्हवी..."आणि तु?..."राधिकाची आई..."हो हो आलेच मी...येते जिजुंना बाय करून..."जान्हवी... राधिकाचे आईवडील विक्रमचा निरोप घेऊन आत निघून जातात...जान्हवी विक्रमच्या गाडीपाशी येते..."हाय जीजू काय झालं गाडी स्टार्ट होतं नाही का?..."जान्हवी..."हो बघ ना..."विक्रम..."आता ती स्टार्ट केल्याशिवाय कशी होणार?..."असं म्हणून बुलेटची किल्ली फिरवते... गाडी लगेचच स्टार्ट होते..."अरे स्टार्ट झाली कि..."विक्रम..."हा काम मनापासून केलं तर होतंच..."जान्हवी..."बरं... चलो बाय..."विक्रम इकडेतिकडे बघतच बोलतो..."इकडे तिकडे बघून उपयोग नाही ओ नाही दिसणार ती..."जान्हवी..."अ... कोण नाही दिसणार?... मी गाडी स्टार्ट होतं नव्हती म्हणून थांबलेलो आता झाली सो निघतो...बाय... "असं म्हणून गाडी स्टार्ट करतो आणि निघतो... जान्हवी पाठूनच मोठ्याने बोलते.,"जरा पुढे जाऊन मागे वळून बघा तुम्हाला जे पाहायचं होतं ते दिसेल.."विक्रम अगदी तसंच करतो पुढे जाऊन पुन्हा वळून मागे पाहतो राधिका तिच्या खोलीच्या खिडकीपाशी उभी होती...दोघांची नजरानजर होते दोघेही एकमेकाकडे बघू हसतात मग विक्रम तिथून निघून जातो...आणि पुढे जाऊन पुन्हा थांबतो..."जान्हवी..."जान्हवी आत जायला निघालीच होती... तितक्यात तिला मागून तो हाक मारतो...
                 जान्हवी विक्रमपाशी येते... "काय होतय जीजू... पाय निघेना झालंय कि काय?"जान्हवी मिश्किलपणे विक्रमला बोलते..."तुम्हीपण ना सालीसाहिबा खूपच मजेशीर आहात बरं का..."विक्रम..."मग.. असणारच ना जान्हवी हू मै.."जान्हवी..."काय संबंध?..."विक्रम... जान्हवी डोक्यावर हात मारतच "जाऊदे तुम्ही हाक का मारलीत?... काही काम होतं का?.."जान्हवी विक्रमला विचारते..."हो... पण हे आपलं सीक्रेट हा..."विक्रम..."अय्यो... सिक्रेट का... सांगा सांगा मला सीक्रेट जाम आवडतात..."जान्हवी..."आवडतात म्हणजे?... तुम्ही सीक्रेट फोडता काय? मग नको बाबा.."विक्रम..."तुम्ही... अरे देवा जीजू लहान आहे ओ मी तुमच्यापेक्षा... आणि सिक्रेट फोडत बिडत नसते मी... हा पण माझा स्वभाव असा हाय कि कधीकधी ताईसमोरं पचकते पण तिचा काय संबंध नसतो त्यामुळे काय एवढा फरक नाय पडत..."जान्हवी..."मग तुला नकोच सांगायला जाऊदे जिच्यापासून लपवायचंय तिलाच सांगणार तु...मी जातोच संध्याकाळची गाडी पकडून..."विक्रम..." अच्छा असय का बरं.... आणि मी जातोच म्हणजे नाहीतर काय थांबणार होतात का?.."जान्हवी..."हम्म..."विक्रम..."हम्म काय?...सुट्टी नाहीये ना तुम्हाला?..."जान्हवी..."चार दिवसाची सुट्टी काढलीय चांगली..."विक्रम..."मग आज संध्याकाळीच का जाताय?... "जान्हवी..."तु खूप प्रश्न विचारते जातो मी..."विक्रम..."जीजू जीजू थांबाना... बरं सांगा काय मदत हवीय..."जान्हवी..."पण हे आपलं..."विक्रम..."सिक्रेट असेल डोन्ट वरी ताईला काही नाही कळणार..."जान्हवी..."बरं ऐक.."विक्रम..."हा.."जान्हवी... दोघेही थोडावेळ बोलतात...."ओहके... असय का बरं बरं जीजू तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं...जीजू लागीर झाली रावं तुम्हाला..."हसतच जान्हवी विक्रमला बोलते..."असं बोलणार का आता तुम्ही मेव्हणीबाई..."विक्रम..."बरं सॉरी.."जान्हवी मिश्किलपणे बोलते...
                  तेवढ्यात विक्रमचा फोन वाजतो..."हो हो येतोय... रस्त्यातच आहे... हो हो आलोच..."असं म्हणून विक्रम फोन ठेवून देतो... विक्रम शेजारच्याच गावात राहत असल्याने विक्रमच्या घरचे घरी पोहोचले होते पण या साहेबांचा काही पाय निघत नव्हता..."काय ओ जीजू काय झालं?..."जान्हवी..."चलो बाय मेव्हणीबाई मी जातो नाहीतर घरचे शोधत परत मागे येतील... बाय काळजी घे... आणि आपलं सिक्रेट लक्षात ठेव..."विक्रम..."येस जीजू... तुम्हीपण सांभाळून जा..."जान्हवी... विक्रम तिथून निघून जातो...जान्हवीही आत येते...
                  जान्हवी खोलीत येते... राधिका आरशासमोर बसली होती आणि मेकअप उतरवत होती... कानातले काढतच राधिका बोलते, "जानू ऐक ना हे गळ्यातल अडकलंय ते जरा बघ ना..."राधिका बोलत होती पण जान्हवीच काही लक्ष नव्हतं...जान्हवी कपाटात काहीतरी शोधत होती..."काय चाललंय जानू काय शोधतेयस?..."राधिका जान्हवीला..."काही नाही गं... काय गं तायडे एकपण चांगला ड्रेस नाही तुझ्याकडे..."जान्हवी तोंड वाकड करतच बोलते..."आता तुला माझे ड्रेस कशाला हवेत... तुला घालायचाय का?... अगं तो आहे कि लाल कलरचा अंब्रेला टाईप मस्त वाटेल तुला..."राधिका..."इव दिदे तो चांगला आहे काय... मला अजिबात आवडतं नाही तो कलर..."जान्हवी तोंड वाकड करतच उत्तरं देते..."मग तो हिरवा..."राधिका..."तो तर नकोच..."जान्हवी..."मग..."राधिका काही बोलणार तेव्हढ्यात जान्हवी तिला थांबवते..."जाऊदे तु माझाच एखादा घाल... आणि पुढच्यावेळीपासून माझ्या चॉईसने कपडे घ्यायचे हा..."जान्हवी..."हा... पण एक एक मिनिट तु एवढावेळ माझ्यासाठी ड्रेस शोधत होती होय..."राधिका "हा मग..."जान्हवी..."अगं पण का?...मला कुठं जायचंय "राधिका..."जायचंय एके ठिकाणी  तुला काय करायच तुला चल म्हणलं कि चलायचं..."जान्हवी ..."बरं जान्हवी मॅडम... मेरी जानू लेके जायेगी वहाँ जाऊंगी... "राधिका हसतच बोलते..."थॅट्स बेटर.."जान्हवी... "बरं..."राधिका.. "तु तुला हवं ते करतं बस..."असं म्हणून राधिका बाथरूममध्ये निघून जाते...जान्हवीची शोधमोहीम सुरूच होती... राधिकाच्या कपाटात काही न मिळाल्याने तिने स्वतःच कपाट पिंजून काढलं आणि शेवटी तिला तिच्या मनासारखा एक ड्रेस मिळालाच... तो हातात घेऊन "हा ये सही हैं..."जान्हवी..."जानू ए जानू..."जान्हवीची आई तिला हाक मारते म्हणून ती ड्रेस बेडवरच ठेवून बाहेर निघून जाते...राधिकाही काही वेळाने बाथरूममधून बाहेर येते...
                 "ही मुलगी कधी सुधारायची नाही..."असं म्हणून राधिका बेडवरचा ड्रेस उचलून सरळ कपाटात ठेवते आणि बाहेर जाते...दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं म्हणून जान्हवी राधिकाला लवकरच झोपायला लावते.. राधिकाला झोप तर येतं नव्हती पण आज तिची पार्टनरच झोपायला सांगत होती आणि चक्क आज तिची पार्टनर जान्हवी गपचूप झोपूनही गेली होती मग जागून तरी काय करणार म्हणून विक्रमची स्वप्न पाहत राधिका झोपून जाते...

0

🎭 Series Post

View all