पूर्वार्ध.
गेल्या भागात आपण पाहिले की, विक्रम आई-बाबांना मनालीचे जे वागणं आहे ते किती विक्षिप्त आहे ते सांगतो. आई-बाबा ते ऐकत असतात.

तो पुढे बोलू लागला,
"आई-बाबा लग्न आयुष्यातील खूप मोठे वळण असतं. त्या वळणावर पूर्ण आयुष्य बदलतं, माझंही आयुष्य बदलणार होतं. मी खुश होतो,पण मनाली मला जरासुद्धा रिस्पेक्ट देत नव्हती. लहानपणापासून मी तुमच्या दोघांचं नातं पाहिलं आहे. एकमेकांना सन्मान देत आलात. एकमेकांचा नेहमीच आदर केला आणि तीच अपेक्षा मी माझ्या होणाऱ्या बायकोकडून म्हणजेच मनाली कडून करत होतो. ती मला अगदी वाट्टेल तसं वागवत होती.
त्यादिवशी मी तिला भेटायला गेलो. तेव्हा ती पटकन मला म्हणाली,
" आपण लग्नानंतर पुण्याला शिफ्ट होऊया. तू आणि मी. तू आई बाबांना काहीतरी बहाणा दे. आतापर्यंत आलेल्या अनुभवामुळे मी त्या दिवशी तिला माझं मत स्पष्ट सांगितलं. काहीही झालं तरी मी माझी नोकरी, माझं घर सोडणार नाही. खरंतर तिला एकत्र कुटुंबात राहायचं नव्हतं. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तुला कसलाच त्रास होणार नाही. सगळं काही व्यवस्थित आहे; पण तिला ते मान्य नव्हतं. ती तेच म्हणत होती, मी एकत्र कुटुंबात राहूच शकत नाही. जर तुला माझ्याशी लग्न करायचं आहे तर तुला वेगळं रहावं लागेल. तिने ही कंडीशन टाकली.
ती जे म्हणेल ते मी ऐकत राहिलो, त्यामुळे तिला ह्या वेळेस देखील असंच वाटलं की, मी हो म्हणेल ;पण मी माझ्या मतावर ठाम राहिलो. तिला प्रचंड राग आला. अक्षरशः ती म्हणाली तू जर माझं ऐकलं नाही तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेल आणि त्याला सर्वस्वी तूच जबाबदार असशील."

हे सारं ऐकून प्रतिमाने तर डोक्याला हाताच लावला. मनाली असं वागत असेल असं स्वप्नातही तिला वाटलं नव्हतं. प्रथमेश देखील हे सगळं ऐकून आश्चर्यचकित झाला.
मी तिथल्या तिथे तिला म्हणालो,
"हे लग्न मोडलं. आई आता मला तूच सांग मी हे जे केलं ते चुकीचं केलं का? जर नात्याची सुरुवातच अशी असेल तर पुढे काय होईल? ह्याची कल्पना मला करवत नव्हती. न जाने का माझ्यात ती ताकद आली. माझं लग्न मोडलं तर लोकं चार दिवस नाव ठेवतील, आपल्यापाठी कुजबुज करतील, लोकं हसतील; पण माझं जर आयुष्य बरबाद झालं तर लोकं मला सावरायला येणार आहेत? नाही ना? मी फार विचारपूर्वक निर्णय घेतला आहे आणि मला हाच निर्णय योग्य वाटला. शेवटी हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. "

"विक्रम तू जे ही केलं योग्यच केलं. चुकीच्या नात्यात माणूस कधीच खुश राहू शकत नाही. तुझा निर्णय योग्य आहे." प्रतिमा.
"हो विक्रम तू जो निर्णय घेतला तो बरोबर आहे, आम्ही तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभं आहोत."
तितक्यात शारदाचा फोन आला.
प्रतिमाने फोन उचलला.
"शारदा ताई, विक्रम आणि मनालीचे कधीच पटणार नाही. माझ्या मुलाने जो निर्णय घेतला आहे तो मला योग्यच वाटतो. माफ करा पण हे लग्न मोडलं आहे."
असं बोलून तिने कॉल कट केला.
प्रथेमेशने विक्रमच्या पाठीवर हात फिरवला.
"विक्रम, इतकं सारं झालं आणि तू आम्हाला खबर देखील लागू दिली नाहीस. तिचं वागणं जेव्हा खटकत होते, तेव्हाच जर तू सांगितले असते तर आम्ही तुला नक्कीच सपोर्ट केला असता."

"बाबा, मला माहित आहे तुम्ही सपोर्ट केला असता; पण मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. परिस्थितीला सामोरे जायची भीती वाटत होती. भावनांचा आणि मनाचा देखील गुंता झाला होता. तो मी सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. लग्नाच्या चार दिवसाआधी का होईना पण गुंता सुटला. बाबा आज मोकळा श्वास घेतला. इतके दिवस दडपण आले होते. गुदमरत होतं. रडायला यायचं. आज मी टेंशन फ्री झालो. खरं सांगू का तुम्हा दोघांशी बोलून झाल्यावरच मन हलकं झालं."
आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती.
मनालीने विक्रमला मॅसेज केला.
"माझ्या म्हणण्याप्रमाणे तू वागणार असशील तर आपण लग्न करू शकतो."

विक्रमने रिप्लाय दिला.
"थँक्स मनाली तुझं खरं रूप दाखवलं. ह्यापूढे पुन्हा माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नको."

नेहमीच मनाली त्याला ब्लॉक करायची; पण आज त्याने तिला ब्लॉक केलं ते नेहमीसाठी.
काही दिवसाने विक्रमला त्याच्या स्वप्नातील राजकुमारी भेटली. जी त्याला सन्मान देत होती. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होती. विभा नाव होतं. विभाने त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाचे रंग भरले.
लग्न हे असं बंधन असतं जे हवंहवं वाटलं पाहिजे. एकमेकांप्रती ओढ,प्रेम, जिव्हाळा,विश्वास, सन्मान आपसूकच यायला हवा.
लग्न असं वळण असतं,त्या वळणावर आयुष्य बदलतं. बदल हा सकारात्मक पाहिजे,नकारात्मक नाही. आयुष्याचा जोडीदार निवडतांना सजग राहिलो तर सारं आयुष्य सुखाचे होईल. नाही का?
समाप्त.
कथा लेखन - अश्विनी ओगले.
कथेचा वापर यू ट्यूब किंवा कोठेही आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.