लग्न कुटुंबाची प्रगती की वैयक्तिक अधोगती भाग १

लग्न झाले तरी आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क तिला देखील आहे.
सुषमा अभ्यासात निपुण होती. प्रेमळ स्वभावामुळे तिने सर्वांच्याच मनात जागा निर्माण केली होती. कोणीही कितीही दुखावलं तरी उलट शब्द न उच्चारता ती हसून तिथेच ती गोष्ट सोडून देत होती. शिक्षण पूर्ण करुन सुषमा आय. टी. कंपनीत मोठ्या हुद्यावर कामाला होती.

आपल्या लेकीचं थाटामाटात लग्न लावून दिले की, सुखाने संसार झालेला पाहायला मन आसूसलेले होते. सुषमाला अनुरुप जोडीदार मिळण्यासाठी विराज आणि मयुरीने जोरदार सुरवात केली होती.

सुषमाला तिच्याच तोलामोलाचा अनय सुयोग्य असा जोडीदार लाभला होता. थाटामाटात सुषमाचा विवाह लावून देण्यात आला होता. सुषमा महिनाभर घरी राहिल्यानंतर आपल्या कामाच्या तयारीला लागली होती.

अनयच्या घरी नव्या सूनेचे सूनमुख पाहण्यासाठी पाहुणे घरी बघायला गेले होते. सुषमा मात्र कामावर गेली होती. पाहुणे एवढे तास खोळंबले होते. सुषमाला भेटून ते लगेच आपल्या घरी निघून गेले होते. सणवार साजेरं करण्यात वर्ष कस चुटकीसरशी निघून गेले होते.

एके दिवशी सुषमा कामावर जाताना अचानक चक्कर येवून पडली होती. ताबडतोब डाॅक्टरांना बोलण्यात आले होते. नव्या मातृत्वाची चाहूल सुषमाला लागली होती. दोन्ही घराण्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुषमाला काय आवडते आणि काय नाही याची जणू लिस्टच अनयने तयार करुन घेतली होती. सुषमाला जेव्हा पण आईसक्रीम खाण्याची इच्छा होत असायची तेव्हा अनय ती घेवून येत होता.

नऊ महिन्याचा कालावधी हसत-खेळत पार पडला होता. गोंडस मुलाला म्हणजेच शिवांशला सुषमाने जन्म दिला होता. शिवांश आता जवळ-जवळ सहा महिन्याचा झाला होता. सुषमाने कामावर जाण्यास सुरवात केली होती.

लहान जीव तो आईच्या प्रेमाला आसुसलेला होता. सुषमा घरी येईपर्यंत तो रडून झोपी जात होता. सुरवातीला होईल त्रास पण नंतर तो सवय झाल्यावर राहिल असे सुषमाला वाटत होते.

" मुलगा झाला आता. त्याच्याकडे लक्ष द्यायला हवे. तसेच बाळाला पाहायला पाहुणे-रावळ्यांच घरी येणं होत असतं. मला वाटत तू सुषमाला समजावून सांगाव. नोकरी करणे सोडून दे म्हणून. यामुळे बाळाला देखील आईचे प्रेम मिळेल." अनयची आई अनयशी बोलत होती.

दोन-तीन दिवसांनी अनयने सुषमाकडे याविषयी बोलायचे ठरवले होते.

" तूझी आता खूप धावपळ होत असेल तर तू नोकरी करु नकोस आता. आपल्या शिवांशकडे लक्ष देत तू देखील आराम करु शकशील."

" मला विचार करायला वेळ हवा आहे." सुषमा अनयला सांगत होती.

'आपल्या मुलाकडे आपणचं लक्ष द्यायला हवं. कोणाला या गोष्टीचा त्रास व्हायला नको. शिवांश थोडा मोठा झाला की त्याला सांभाळणे फारसे जड जाणार नाही.'स्वत:शीच पुटपुटत सुषमा विचार करत होती.

अखेर सुषमाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता.सुषमाचा हा निर्णय तिला आनंददायी ठरणार का? पाहूया अंतिम भागात.

🎭 Series Post

View all