लग्नानंतरचे केळवण !

.
" केळवण ? ते काय असते ? केळीची एखादी डिश बनवून सर्व्ह करतात का ?" पाखी अधिकला रुमाल देत म्हणाली.

" नाही ग. लग्नाआधी नवराबायकोला जेवायला बोलवतात. मेजवानी देतात. पूर्वीच्या काळी मुंज झाल्यावर मुले गुरुगृही जायचे , लग्न झाल्यावर मुली सासरी जायच्या. मग वर्षानुवर्षे भेटीगाठी व्हायच्या नाही. त्यामुळे मुंज , लग्न याचे मुहूर्त ठरले तर नातेवाईकांना एकत्र जमून मेजवानी द्यायचे. त्यामुळे निवांतपणे सर्वांच्या गप्पा व्हायच्या. " अधिक म्हणाला.

" अधिक , लग्नाआधी ते दोघे नवराबायको थोडी असतील. " पाखी हसत म्हणाली.

" पाखू , होणाऱ्या नवराबायकोला मेजवानी देतात. "
अधिक म्हणाला.

" पण आपलं तर लग्न झाले ना आता. " पाखी म्हणाली.

" हो. आत्या लग्नाला येऊ शकली नाही , लग्नाआधी केळवण देऊ शकली नाही म्हणून आता जेवायला बोलवलं आहे. " अधिक म्हणाला.

" नाव काय तुझ्या आत्याचे ?" पाखी म्हणाली.

" कोकीला मोदी. " अधिक म्हणाला.

" गुज्जू ?" पाखी म्हणाली.

" माझ्या बाबांची मानलेली बहीण आहे. " अधिक म्हणाला.

" ओह. " पाखी म्हणाली.

" आता मी ऑफीसला जाऊन येतो. आज लेट होईल थोडं यायला. पण तू सात वाजेपर्यंत तयार हो. मी येताच लगेच निघू. " अधिक म्हणाला.

" तू तयार नाही होणार ?" पाखी म्हणाली.

" पुष्पाचा लास्ट सिन नाही बघितला ? आम्ही मुले लग्नमंडपात चड्डीवरपण पोहोचलो तरी पाच मिनिटात तयार होतो. तुम्हालाच तासन्तास लागतात तयार व्हायला. " अधिक म्हणाला.

" हा हा हा. सो फनी. " पाखी म्हणाली.

" ओके बाय. " अधिक पाखीच्या कपाळावर किस करत म्हणाला.

" बाय. " पाखी म्हणाली.

***

संध्याकाळी अधिक घरी आला. पण त्याला यायलाच आठ वाजले.

" अधिक , सॉरी. तू सातपर्यंत तयार व्हायला सांगितले होते. आठ वाजले. मला एक तास उशीर झाला. पण तू का उशीर केलास ?" पाखी म्हणाली.

" ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. आत्यासाठी गिफ्टही घ्यायचे होते ना. पण आपल्याला उशीर नाही झाला."
अधिक म्हणाला.

" कसकाय ?" पाखी म्हणाली.

" मला माहिती होते की तुम्ही बायका तयार व्हायला उशीर लावता. म्हणून मी मुद्दाम सातचा टाइम सांगितला होता. म्हणजे तयार होईपर्यंत आठ होतील आणि आपण वेळेवर निघू. " अधिक म्हणाला.

" स्मार्ट बॉय. यापुढे लक्षात ठेवेल ही ट्रिक. म्हणजे तू सातला तयार व्हायला सांगितले तर मी आठ वाजेपर्यंत तयार होईल आरामात. " पाखी म्हणाली.

" हो का पाखू ? मग मी सहालाच तयार व्हायला सांगेल. " अधिक पाखीला मिठीत घेत म्हणाला.

" अधिक , लवकर फ्रेश हो. भूक लागलीय. जा. " पाखी अधिकला दूर ढकलत म्हणाली.

***

अधिक-पाखी " मोदीनिवास " जवळ पोहोचले.

" अधिक , कसला भारी बंगला आहे. टिव्ही सिरीयलमध्ये दाखवतात ना तसाच आहे. बरे झाले यांनी जेवायला बोलावले. दीपिकाला सुट्टी मिळाली."
पाखी म्हणाली.

" आणि तिच्या मेससमान जेवण्यापासून आपल्याला सुट्टी मिळाली." अधिक म्हणाला.

" चल आत. " पाखी म्हणाली.

दोघांनीही आत प्रवेश केला. " मोदी निवास " जणू एक भव्य राजवाडाच होता. बाहेर मोठे गार्डन आणि आतूनही घर खूप सुंदर होते. एक व्यक्ती बागेत काम करत होता.

" माळीकाका , कोकीला मोदी आहेत का ? त्यांना भेटायचे होते. " अधिक म्हणाला.

" होय. आहेत त्या. " माळीकाका म्हणाले.

मग अधिक-पाखी आत गेले. कोकीला मोदी हिने अधिक-पाखीचे स्वागत केले. तिने नारंगी रंगाची साडी गुजराती पद्धतीने घातली होती. तिचा चेहरा भयभीत करणारा होता. तिच्या डोळ्यांमध्ये सतत क्रोधाग्नी भडकत असे. बऱ्याचदा काही न बोलता फक्त नजरेनेच ती जरब निर्माण करायची. अधिक आणि पाखीने कोकीलाचे चरणस्पर्श केले.

" आत्या , हे तुमच्यासाठी. " अधिक म्हणाला.

" उपहार की क्या आवश्यकता थी. बैठो. " कोकिला म्हणाली.

कोकीलाने सोफ्यावर बसण्याचा इशारा करताच अधिक आणि पाखी सोफ्यावर बसले. त्यांच्या घरात काम करणारी " मणी " दोघांसाठी पाणी घेऊन आली. अनावधानाने मणीकडून पाणी सांडले गेले.

" मणी , डोबी डफोड. " कोकिला विजेप्रमाणे गर्जली.

अधिक-पाखी थरथरू लागले.

" आम्हाला तहान नाही. " अधिक-पाखी दोघेही एकसुरात म्हणाले.

तेवढ्यात तिथे गोपी बहू आली. पाठोपाठ राशीपण आली. गोपी ही कोकीलाची सून तर राशी कोकिलाच्या पुतण्याची म्हणजे जिगरची बायको.

" मी खास सरबत बनवलं आहे. तुम्ही हे प्या. तुम्हाला आवडेल. " गोपी म्हणाली.

दोघांनी ते सरबत घेतले.

" खूप छान झाले आहे सरबत. " पाखी म्हणाली.

" जी धन्यवाद. " गोपी म्हणाली.

" अच्छा क्यों नहीं बनेगा. मेरी गोपी बहूने अपने हाथोंसे जो बनाया है. " कोकिला म्हणाली.

तेवढ्यात तिथे ऐहेम आला. त्याने फॉर्मल कपडे घातले होते.

" ऐहेम डिकरा , इनसे मिलो. ये है अधिक और ये है पाखी. " कोकिला म्हणाली.

" हॅलो. " अधिक म्हणाला.

" मॉम , मुझे लोगों से मिलने का वक्त नहीं है और ना ही इंटरेस्ट हैं. " ऐहेम म्हणाला.

" पर डिकरा.." कोकिला म्हणाली.

" मॉम , एक इम्पॉर्टेन्ट क्लाइंट है. लंडन से उनकी फ्लाइट आने वाली है. मुझे अभी उनके साथ मीटिंग करनी है. मैं आता हूं. जय श्री कृष्ण. " ऐहेम म्हणाला.

" जय श्री कृष्ण. " कोकिला म्हणाली.

" मेरा रुमाल ?" ऐहेम म्हणाला.

ऐहेम त्याचा रुमाल विसरला होता. लगेच गोपी त्याचा रुमाल घेऊन आली.

" थँक्स. " ऐहेम म्हणाला.

ऐहेम निघून गेला. गोपी मात्र स्तब्ध होऊन गालातल्या गालात हसत होती.

लालाला लाला लाला
लालाला लालाला

" यांना काय झाले ?" पाखी म्हणाली.

" ते ऐहेमजीजू फक्त मॉम मॉम करत असतात ना. आजपहिल्यांदा ते गोपीशी न रागावता बोलले आहेत त्यामुळे गोपीला ते खूप रोमॅण्टिक वाटलं. म्हणून ती शॉकमध्ये गेली आहे. " राशी म्हणाली.

तेवढ्यात तिथे किंजल आणि धवल आले. किंजल ही कोकीलाची मुलगी आणि धवल कोकीलाचा जावई होता.

" ये मेरी बेटी किंजल और ये हमारे दामाद धवल. " कोकिला म्हणाली.

" हॅलो. नाईस टू मिट यु. " पाखी म्हणाली.

थोडा वेळ सर्वांनी गप्पा मारल्या.

" पाखी , तुला तर आमचे घर राजवाडाच वाटत असेल ना. म्हणजे बघ आमचा सोफा अमेरिकेहून इमपोरटेड , आमचा हा टीव्ही जपानहून इमपोर्टेड , आमचे फर्निचर जर्मन कंपनीचे. " किंजल म्हणाली.

" फक्त किंजलबेनच मेड इन इंडिया. " राशी म्हणाली.

किंजलने नाक मुरडले.

" माझाकडे एक डॉगी होता वीसचा. तो तर ब्राझीलहून आणला होता. " किंजल म्हणाली.

" हो का ? माझ्याकडेही एक डॉगी होता. वीसच हजाराला पडला. तुम्ही कुठून घेतला होता ?" पाखी म्हणाली.

" वीस लाख. " किंजल म्हणाली.

" ओह. " पाखी म्हणाली.

" तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखे वाटत आहे. "
अधिक म्हणाला.

" पागलखान्यात बघितले असेल. " राशी म्हणाली.

किंजलने नाक मुरडले.

" मी कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंग करायचे. "
किंजल लाजत म्हणाली.

" आठवलं. किंजल बान्यानच्या पोस्टरवर. " अधिक म्हणाला.

" खरतर , मीच त्या कंपनीचा सीईओ आहे. आमचं लग्न झाले आणि मी ती कंपनी सुरू केली. " धवल म्हणाला.

" मी तुमचे बान्यान खूप वापरतो. तीन-चार वर्षे काही होत नाही. खराब झाले तरी मी गाडी पुसायला किंवा पायपुसनी म्हणून वापरतो. मी खूप मोठा फॅन आहे तुमच्या कंपनीचा. " अधिक म्हणाला.

" ओह थँक्स. जर मला माहिती असते की माझ्या कंपनीचा इतका मोठा फॅन आला आहे तर मी चारपाच बान्यान घेऊन आलो असतो सोबत. " धवल म्हणाला.

" पाखू , माझी धवल सरांसोबत एक फोटो काढ ना."
अधिक म्हणाला.

पाखीने दोघांची फोटो काढली. धवल रडू लागला.

" आज मला जीवनात पहिल्यांदाच कुणीतरी माझा फॅन भेटला. " धवल अश्रू पुसत म्हणाला.

" धवल , कंट्रोल. " किंजल म्हणाली.

" सारो. अधिक , भाई कैसे है ? " कोकिला म्हणाली.

" बाबा ठीक आहेत. " अधिक म्हणाला.

" मैं तुम्हारे विवाह में आने वाली थी. परंतु , बा की तबीयत ठीक नहीं थी. इसलिए नहीं आ पायी. " कोकिला म्हणाली.

" काही हरकत नाही. " अधिक म्हणाला.

" मैं और तुम्हारे पिताजी बजपन में एकही पाठशाला में पढ़ते थे. " कोकिला म्हणाली.

" कागडी पण शाळेत जायची ? ही तर स्वतःच प्रिन्सिपलसारखी वागते. शाळेत तर शिक्षकांनाच रागवत असेल. " राशी मनातल्या मनात म्हणाली आणि खुदकन हसली.

" राशी , मैंने कोई विनोद सुनाया है कि तुम्हारे मुख पर हास्य आ रहा है ?" कोकिला म्हणाली.

" सॉरी. " राशी म्हणाली.

" गोपी बहू , भोजन की व्यवस्था करो. सबको भोजन पड़ोसो. " कोकिला म्हणाली.

" जी. " गोपी म्हणाली.

तेवढ्यात तिथे माळीकाका आले.

" सब कार्य समाप्त हो गया ?" कोकिला म्हणाली.

" गुलाब के फूल सुख गए है. नए लगवाने पड़ेंगे. " माळीकाका उर्फ पराग म्हणाले.

" एक कार्य भी उचित रूप से नहीं करते हो आप. खा खा के चरबी चढ़ गयी है. " कोकिला म्हणाली.

" कागड़ी कधी स्वतःला पण आरश्यात बघ. " राशी मनातल्या मनात म्हणाली.

" जाओ. कपड़े बदलो और खाने को आओ. " कोकिला म्हणाली.

" जी. " माळीकाका उर्फ पराग म्हणाले.

" मालीकाका भी हमारे साथ जेवेंगे सॉरी खायेंगे क्या ?" पाखी म्हणाली.

" ते यांचे पती आहेत. त्यांना बिजनेस येत नाही म्हणून सासूबाईंनी गार्डनिंगचे काम दिले आहे. " राशी म्हणाली.

" विराम. राशी तुम्हें जानकारी देने के लिए किसीने बाध्य नहीं किया. तो कृपा करके अपने जबान पे लगाम रखो. " कोकिला म्हणाली.

" सासरेबुवांनी या खडूस बाईसोबत कसा संसार केला असेल. " राशी मनातल्या मनात म्हणाली.

कोकिला , तिचा पती पराग , किंजल , धवल , कोकिला हिची सासू म्हणजेच बा हे सर्व जेवायला बसले. बाला थोडे कमी ऐकू यायचे.

" हे कोण ?" बा म्हणाली.

" मी अधिक. " अधिक म्हणाला.

" कमी ?" बा म्हणाली.

" नाही नाही. अधिक. " अधिक म्हणाला.

" कमी ऐकू येते मला. ही कोण ?" बा म्हणाली.

" मी पाखी. " पाखी म्हणाली.

" राखी ?" बा म्हणाली.

" नाही. पाखी. " पाखी म्हणाली.

" सारो. " कोकीला म्हणाली.

" एक विचारू का ? तुमचे आडनाव मोदी आहे. मग आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे कोण लागतात ?" पाखी म्हणाली.

" पाखी , आपलं आडनाव पवार आहे. मग आदरणीय शरद पवार काय आपले काका लागतात का ? काहीही असते तुझे. " अधिक म्हणाला.

" ओह. सॉरी. " पाखी म्हणाली.

" सारो. अभी हम भोजन आरंभ करते है. " कोकिला म्हणाली.

गोपी आणि राशीने सर्वाना जेवण वाढले. सर्वजण जेवायला सुरू करणार तेवढ्यात तिथे ऐहेमही आला.

" ऐहेम डिकरा , तुम जल्दी आ गए ?" कोकीला म्हणाली.

" मॉम वो , क्लाइंट जिस प्लेनसे आने वाले थे उस प्लेन का एक्सीडेंट हो गया. सब मर गए. क्लाइंट भी डील साइन होने के बाद नहीं मर सकते थे. ये सब इस म्हनहुस गोपी गवारके वजह से हुआ है. इसने रुमाल दिया और.. " ऐहेम म्हणाला.

गोपी रडू लागली आणि तिच्या नाकातून शेंबूड गळू लागले.

" गोपिबहू , अपना नल क्षमा नाक साफ करके आओ. ऐहेम , व्यवसाय में लाभ और नुकसान तो होते रेहते है. तुम भोजन करने आ जाओ. " कोकीला म्हणाली.

फ्रेश होऊन ऐहेमपण जेवायला बसला. तोपर्यंत सर्वजण थांबले होते.

" अधिकदादा , तू पाखीला खास भरव आणि उखाणा घे. आणि पाखी तू पण. " राशी म्हणाली.

" नाही नाही नको. " अधिक म्हणाला.

" घे रे. " राशी म्हणाली.

" कृष्णाने वाजवली राधेसाठी बासरी
पाखी आली जीवनी बनुनि बायको साजरी." अधिक म्हणाला.

" आता पाखी तू. " राशी म्हणाली.

" अनुपमासाठी अनुज , काव्या वनराजसाठी
डिंपल समरसाठी तशी पाखी अधिकसाठी. " पाखी म्हणाली.

सर्वजण एक मिनिट स्तब्ध होते. मग भानावर येताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

" मी पण कोकीलाला घास भरवत उखाणा घेणार. "
पराग म्हणाला.

" घ्या ना. " पाखी म्हणाली.

" नाव जरी कोकिला असले
तरी आवाज आहे भसाडा
वागणं बोलणं तिचे जसे
फुटलेला ढोल आणि नगाडा " पराग म्हणाला.

सर्वजण हसले. कोकिलाबेनच्या कानातून धूळ निघू लागला.

" वाह माळीकाका सॉरी पराग काका. एक नंबर. "
अधिक म्हणाला.

" आता कोको तू घे उखाणा. " पराग म्हणाला.

" विराम. इधर ऐहेम को कार्यालय के कार्यों में लाभ नहीं हो रहा है और आप उखाना लेने को बोल रहे है." कोकीला म्हणाली.

" लो ना. " धवल म्हणाला.

" घ्या ना. " पाखी म्हणाली.

" शादी करके आयी
कोकिला परागजी के द्वार
यदि में सावध नहीं रही
तो मोटाभाभी हथियालेंगी कारोबार !" कोकीला म्हणाली.

" ऐहेमभाई , गोपी भाभी तुम्ही पण घ्या ना. " अधिक म्हणाला.

" मैं रंग वो रंग रसिया
ऐहेमजी साथ निभाना साथिया !" गोपी लाजत म्हणाली.

" ग्रीन टी मागितल्यावर
तिचे दूध उतू गेलं
गोपीसोबत लग्न झाल्यावर
तिने माझं लॅपटॉप धुतलं !" ऐहेम म्हणाला.

सर्वजण हसले. सर्वांनी जेवायला सुरुवात केली. भाजीत मीठ नव्हते. कोकिला चिडून उभी राहिली.

" गोपी बहु.." कोकीला म्हणाली.

" जी माँ जी. " गोपी म्हणाली.

" जब तुमने मुझपर सरबत गिराया तब में साड़ी बदलने अपने शयनकक्ष में चली गयी. तब रसोड़े में सब्जी कौन बना रहा था ? तब रसोड़े में कौन था ? कौन था ? मैं थी तुम थी कौन था ? कौन था ?" कोकीला म्हणाली.

" राशी.." गोपी रडत म्हणाली.

" ये राशी.. सब्जी बनाने रख दिया और सामाजिक माध्यम में व्यग्र हो गयी. " कोकीला म्हणाली.

" सॉरी. " राशी म्हणाली.

" नो प्रॉब्लम. भाजी मिठाशिवाय पण छान लागत आहे. तरीही लागलेच तर आम्ही वरून मीठ टाकू. पाखी पण खूप काही विसरते. एकदा तर वांग्याचे भरीत बनवायला घेतले आणि त्यात वांगेच टाकायला विसरली. " अधिक म्हणाला.

" मी तर मीठ खातच नाही. " पाखी म्हणाली.

सर्वांचे जेवण झाले. नंतर पाखीला वॉशरूमला जायचे होते. किंजल तिला वॉशरूममध्ये घेऊन गेली.

" बापरे ! इतकं मोठं वॉशरूम. भिंतीलाही पेंटिंग्ज टांगल्या आहेत. इथे तर चक्क मोनालीसाबाई ! हिला बघून पोट जास्त साफ होते का ?" पाखी स्वतःच्याच जोकला हसली.

" सो फनी ! या सर्व पेंटिंग्ज वेगवेगळ्या एक्झिबिशनमधून खरेदी केल्या आहेत. या परफ्युमच्या बॉटल्स दिसत आहेत ना त्या तर इंपोर्टेड आहेत. फ्रान्स, कॅनडा , अमेरिका , इंग्लंडमधून आणल्या आहेत. याची किंमत सहा-सात हजार तर असेलच. " किंजल म्हणाली.

" सहा-सात हजार रुपये ?" पाखी म्हणाली.

" डॉलर्स. आम्ही इंपोर्टेड वस्तू इतक्या वापरतो की रुपयेमध्ये बोलतच नाही. डॉलर्समध्येच. " किंजल म्हणाली.

" ओह. " पाखी म्हणाली.

" मी येते. " किंजल म्हणाली.

किंजल निघून जाताच पाखीचे लक्ष तिथे ठेवलेल्या एका परफ्युमवर गेले. मग तिने परफ्यूम हातावर स्प्रे केला आणि त्याचा वास घेतला.

" इतकाही काही खास वास नाही. याहून चांगला वास असलेले परफ्युम माझ्याकडे आहेत. " पाखी म्हणाली.

तेवढ्यात पाखीचा फोन वाजला आणि तिच्या हातून परफ्युमची बॉटल पडली. ती बॉटल फुटली.

" अरे देवा ! आता ती किंजल माझ्याकडून पैसे वसूल करेल. सहा-सात हजार रुपये. नाही डॉलर्स. म्हणजे गुणिले शंभर. साठ हजार. अधिकची पूर्ण सॅलरी जाईल यात. काय करू ?" पाखी म्हणाली.

पाखीने त्या बॉटलचे तुकडे कुठेतरी लपवले. मग घाबरून ती बाहेर आली. अधिक गप्पा मारत बसला होता.

" अधिक , निघायचे का ?" पाखी म्हणाली.

" हो. काय झाले तू इतक्या टेन्शनमध्ये ?" अधिक म्हणाला.

" काही नाही. " पाखी म्हणाली.

अधिक-पाखीने सर्वांचा निरोप घेतला आणि ते घरी पोहोचले. घरी पाखी शांत-शांत होती. रात्री झोपताना अधिकने पाखीचा हात हातात घेतला.

" पाखू , काय झाले आहे ? खर खर सांग. " अधिक म्हणाला.

" अधिक , मी वॉशरूममध्ये गेले होते. तिथे.." पाखी म्हणाली.

" तिथे ?" अधिक म्हणाला.

" एक परफ्युमची बॉटल माझ्याकडून फुटली. " पाखी म्हणाली.

" त्यात काय ? सॉरी म्हणायचं ना तेव्हाच. कितीही हिटलर असली तरी आत्या आहे आपली." अधिक म्हणाला.

" सहा हजाराची होती. " पाखी म्हणाली.

" अच्छा. काही हरकत नाही. मी शेअर मार्केटमधून पैसे काढतो. जिम कॅन्सल करतो. मागच्या वेळी डॉगीमुळे जिम कॅन्सल केलं तर आता परफ्युममुळे. बहुदा माझ्या नशिबात जिमच लिहिलेले नाही. " अधिक म्हणाला.

" सहा हजार डॉलर्स. " पाखी म्हणाली.

ही किंमत ऐकून अधिकला धक्का बसला. तो स्तब्ध झाला.

" अधिक..काय झाले ?" पाखी म्हणाली.

शेवटी पाखीने अधिकचा चिमटा काढला. तेव्हा कुठे अधिक भानावर आला.

" पाखी , तू एखादा स्वस्त परफ्युम पाडू शकत नव्हतीस ?" अधिक म्हणाला.

" मी मुद्दाम नाही पाडलं यार. " पाखी म्हणाली.

" बर आता टेन्शन नको घेऊ. उद्या आपण परत तिकडे जाऊ आणि त्यांची माफी मागू. " अधिक म्हणाला.

" जर त्यांनी पैसे मागितले तर ? ती किंजल खूप खडूस आहे. ती " अनुपमा " वाली किंजल नाही तर " साथ निभाना साथीया " मधली किंजल आहे. " पाखी म्हणाली.

" आहेत माझ्याकडे पैसे. जिमचा प्लॅन पोस्टपोन करेल. शेअर्स खरेदी केले होते ते विकेल. किडनी विकेल. " अधिक म्हणाला.

" प्लिज , तू तुझी किडनी नको विकू. " पाखी म्हणाली.

" माझी नाही तुझी विकेल. परफ्युम तू फोडलं ना. " अधिक म्हणाला.

पाखीने उशी घेतली आणि ती अधिकला मारू लागली. नंतर तिने अधिकच्या मांडीवर डोके टेकले आणि अधिक तिच्या केसांवरून हात फिरवू लागला.

" थँक्स मला समजून घेण्यासाठी. " पाखी म्हणाली.

" पण पुन्हा अस वागू नको. मी दरवेळी इतके पैसे जमा नाही करू शकणार. " अधिक म्हणाला.

" हो. " पाखी म्हणाली.

***

सकाळी दोघेजण परत " मोदी निवास " ला गेले. त्यांनी सर्व सत्य सांगितले.

" आता तुम्ही पैसे युपीआय करताय की कॅश ?" किंजल म्हणाली.

" पण " अतिथी देवो भव " असे आपणच म्हणतो ना. मग पाखीकडून चुकून परफ्युमची बॉटल फुटली तर तिच्याकडून पैसे घ्यायचे का ?" राशी म्हणाली.

" सध्या मी फक्त तीस हजार देऊ शकतो. बाकीचे पैसे मी पुढच्या महिन्यात देईल. " अधिक म्हणाला.

" विराम. आज जीवन में प्रथम अवसर हैं जब इस राशीने उचित बात बोली है. अधिक बेटा , जब में छोटी थी तब मेरे माँ ने दिए हुए कुछ पैसे मेरे से खो चुके थे तब तुम्हारे पिताजीने स्वयं के पैसे मुझे दिये थे और मुझे माँ के डाट से बचाया था. तो आज मेरा अवसर है. तुम मुझे मेरे बेटे समान हो. मैं तुमसे पैसे नहीं ले सकती. मैं पाखी को क्षमा करती हूं. " कोकीला म्हणाली.

तेवढ्यात तिथे धवल आला.

" किंजलजी , तुम्ही जे परफ्यूम सांगितले होते ते आले आहे. " धवल म्हणाला.

" परफ्युम ?" राशी म्हणाली.

" हो. काही दिवसांपूर्वी किंजलजीच्या हातून परफ्युमची बॉटल फुटली होती. तेव्हा त्यांनी तशीच दिसणारी दुसरी बॉटल घेऊन त्यात साधं परफ्युम भरलं आणि मला अमेरिकेचे दुसरे ब्रॅण्डेड परफ्युम ऑर्डर करायला सांगितले. " धवल म्हणाला.

किंजल इकडे तिकडे बघू लागली.

" मणी.." कोकीला म्हणाली.

" जी." मणी म्हणाली.

" आज से तुम्हें सात दिन की छुट्टी. आजसे तुम्हारा काम किंजल करेंगी. " कोकीला म्हणाली.

" पर मम्मी. " किंजल म्हणाली.

" विराम. भूल पाखी से भी हुई लेकिन उसने अपनी गलती छुपायी नहीं. तुम इस घर की बेटी होकर भी ऐसे कृत्य करती हो. सीखो जरा पाखी से. और तुम पाखी से पैसे माँग रही थी. लज्जा आ रही मुझे की मैं तुम्हारी माँ हु. " कोकीला म्हणाली.

किंजलने सर्वांची माफी मागितली. मग सर्वांचा निरोप घेऊन अधिक-पाखी बाहेर आले.

" तुझी आत्या किती खडूस आहे. रसिका मॅडमच्या कथेत पण इतक्या खडूस सासू नसतात. " पाखी म्हणाली.

" हिंदी पण किती शुद्ध. नेक्स्ट टाइम डिक्शनरी घेऊनच येऊ. " अधिक म्हणाला.

दोघेही हसले आणि पाखी अधिकच्या मिठीत विसावली.

©® पार्थ धवन



🎭 Series Post

View all